63) जिवन प्रवासातील सतसंगी सहप्रवासी मिळाला तर जिवन प्रवास सार्थकी लागतो... सज्जन म्हणुन बनायचे असेल तर सतसंग व संतसंग आवश्यकच असतो ...चुक हि आयुष्याचं एक पान असेल व नाती आयुष्याचं पुस्तक आहे तर अशा वेळी चुकीचं पान फाडुन टाकावे व एका पानासाठी अख्ख पुस्तक गमावु नये... हे विचार खरोखरच जिवन जगण्याचा उपदेश आहे.. एकंदरीत सर्व लेखाचा सार म्हणजे संगत चांगली मिळाली सुसंस्कृत सहवास असला तर जिवनाचा प्रवास आपल्या दिव्य उद्देशा ठिकाणी पोहचवतो... संताचे संगती मनोमार्ग गती.. पण अशी संगत मिळालायला पण भाग्य लागत असते.. ज्याला अशी साथ मिळाली त्याचे आयुष्य धन्य होते.... रावळ साहेब अतिशय आध्यात्मिक व गहन असे प्रस्तुत लिखाणातुन आपण फार मोठे जिवनाचे मर्म कथन केले आहेत यावर तासनतास चर्चाही होउ शकेल .. कधी योग आला तर नक्कीच तुमच्याकडुन ज्ञान संवादाचा उपहार लाभेल या प्रतिक्षेसह आपल्या लेखास संग्रही तथा मनोमस्तिष्कात साठवून ठेवत आपले अंतःकरणापासुन धन्यवाद ! ( मा. श्री. आदिनाथ रावळ साहेबांच्या खालील लिखाणावर मा. राजेंद्र करपे साहेबांनी दिलेली प्रतिक्रिया ) दि. 9 एप्रिल 2023
62) ✍️ *चालुन थकल्यावर समजते की प्रश्न प्रवासाचा नाही तर सोबतीचा होता सोबतीला सहप्रवासी कसे मिळतात यावरच बराचसा प्रवास अवलंबून असतो मग तो प्रवास रस्त्यावरचा असो की आयुष्याचा मी माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत देतो कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते एकत्र येणे ही सुरवात एकामेकां सोबत राहणे ही प्रगति आणि एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश दु:खी माणसाच्या मदतीला दिलेला हात हा प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन्ही हातांपेक्षा अधिक श्रेष्ठ असतो कधी चुक झाल्यास माफ करा पण कधी माणुसकी कमी करु नका चूक ही आयुष्याचं एक पान आहे पण नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तक आहे गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका पण एका पानासाठी अख्खं पुस्तक गमावू नका कागदाची नाव होती पाण्याचा किनारा होता आईवडिलांचा सहारा होता खेळण्याची मस्ती होती मन हे वेडे होते कल्पनेच्या दुनियेत जगत होतो कुठे आलोय या समजुतदारीच्या जगात या पेक्षा ते भोळे बालपणचं सुंदर होते लक्ष साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही.तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं मिळणं महत्त्वाचं आहे सृष्टी कितीही बदलली तरी माणूस पूर्णत: सुखी होत नाही पण दृष्टी बदलली तर नक्कीच सुखी होतो नियम सोपा असतो तो अंमलात आणणे कठीण असते सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे माणसाने माणसांवर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला त्या विश्वासावर देखील आघात झाला तेव्हा कुलूपचा जन्म झाला आणि जेव्हा कोणाचाच कोणावर विश्वास राहिला नाही तेव्हा मात्र सीसीटीव्ही चा जन्म झाला श्रीकृष्णाने खूप चांगली गोष्ट सांगितली आहे ना हार पाहिजे ना जीत पाहिजे जीवनात चांगल्या यशासाठी चांगल्या माणसांची साथ पाहिजे इतरांना खाली पाडणारा व्यक्ती ताकदवान नसतो पडलेल्यांना उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान असतो श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते कायम टिकनारी गोष्ट एकच ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी मानवी नाते हे कधीच नैसर्गिक रित्या तुटत नाही मनुष्यच त्याला संपवतो कारण ते मरते एकतर तिरास्कराने दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे नात्यांमधे विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते कारण उजाळलेली सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी असते यशापर्यंत पोहचण्याची वेळ ही आपल्या हिशोबाने चालणारी नसते म्हणून आपल्याला तिच्या हिशोबाने चालणे जमले की यश फार दूर राहत नाही*✍️
*👏विचारधन परिवर्तन👏*
लेखक : मा. श्री. आदिनाथ रावळ, पुणे
61 ) तांत्रिक का अतांत्रिक पदांच्या चक्रव्युहामध्ये..
रेखाचित्र संवर्ग अडकला होता...
लढताना चक्रव्युहात ना सेनापती ना शस्त्रे..
अन्याय सहन करत होता...
या कठीण समयी त्या अन्यायाविरुद्ध*......
रायपुरे सरांच्या रूपाने एक सेनापती उभा ठाकला होता
घेऊन संघटनशक्तीची मशाल
जागर त्याने मांडला होता
येऊन भेटले अनेक मावळे
जंग जंग ही त्यांनी पछाडला होता
काळ होता तो सुवर्ण इतिहासाचा
काझी साहेब अन प्रमोद मुळे साहेब सरचिटणीसांचा
एकोणावीस वर्ष धुरा खांद्यावर घेऊन
हे सेनापतीही लढले होते
गाजवला त्यांनीही अखिल भारत
कलकत्ता अधिवेशनात गौरव काझी साहेबांचा झाला होता
सोपे नव्हते वेतनश्रेणी मिळवणे
त्यासाठी अभ्यास अनेक राज्यांच्या वेतन श्रेणीचा केला होता
धुरा ही हाती घेत कोरे साहेब
अतिरिक्त ठरणाऱ्या पदांसाठी लढले होते
अभियंता सहाय्यक पद मिळवत
अनुरेखकास पद प्रतिष्ठा आणि वेतन मिळवून दिले होते
खंदा अध्यक्ष दारूनकर सरांच्या रूपाने
संघटनेस लाभला होता
संघटन शक्ती साठी त्यांनी
अख्खा महाराष्ट्र धुतला होता
पदनामात बदलं अन वेतनश्रेणीचा प्रश्न
चांगलाच मार्गी लावला होता
टोणपे साहेबांच्या काळातही
कोथरूड ग्रुपने कालबद्ध पदोन्नती चा
प्रश्न संघटने पुढे ठेवला होता
लढली गेली ही केस न्यायालयामध्ये
जिंकून न्याय मिळवून दिला होता
सातवे पुष्प ते अध्यक्षपदाचे
जाफरी साहेबांच्या हाती आले
शुन्यातुन विश्व निर्मीत
अनेक प्रकरणे मार्गी लावले
जिल्हा शाखेना नवचेतना देत
महासंघटन ते घडवून आणले
विरोधकांनाही चीत करत
प्रगतीचे टप्पे गाठत आले
दौरे अन सभांनी हा काळ चांगलाच गाजला
पाचव्या वेतन आयोगातील थकबाकीच्या लाभाचा
न्याय त्यांनी मिळवून घेतला
पदोन्नतीचा ही मार्ग मोकळा करत
किचकट प्रश्न तो सोडवला
घटनादुरुस्तीचा ऐतिहासिक निर्णय घेत
इतिहास त्यांनी घडवला
आजच्या नागपूर महासभेने
उत्साह तो दुनावला
सभासदहीत दक्ष राजांचा
आज गौरवच जनु झाला.
✍🏻✍🏻 * स्वाती डोकबाणे✍🏻* ✍🏻 ( दिनांक : १३ मार्च २०२२ )
६०) सप्तसूरांचा साज लेवूनी..
हर्षाचा उन्मेष घेवूनी..
दिव्या-दिव्यांची महती सांगत..
दीपावली ही आली हासत..
मनामनांचे गुंफून नाते..
प्रीती आणि विश्वासाचे..
प्रेम रंग हे बहरतं उधळत..
दीपावली ही आली हासत..
सोनपावली अलगद आली ..
हळूच कानी करूनी हितगुज..
समृद्धीचा आशिष बरसत..
दीपावली ही आली हासत..
दीपावली ही आली हासत..
✍🏻✍🏻 * स्वाती डोकबाणे✍🏻* ✍🏻
🪔🪔 आपणा सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🪔🪔🪔🪔🪔🪔
59) बाप नावाचा माणूस
स्वतःसाठी नाही जगला
शेवटचा श्वासही तो मुलांसाठीच जगला!!!
पडता आजाराच्या विळख्यात
चेक वरील सही साठी
सराव रात्रदिसाचा केला
धडपड बघता बापाची
पाट अश्रूंचा वाहीला !!!!!😭
चेतना हरवलेला बाप
अंथरुणात खिळला
"बाबा" हाक पडता कानी
हुंकार त्याने भरला
पंचप्राण एकवटून त्याने
क्षण सुखाचा अनुभवला
मरणाच्या दारात त्याने
हात हातात लेक जावयाचा घेतला
नजरे च्या इशारे त्याने
विचार मुलांचा च केला
बाप नावाचा माणूस असा कसा जगला
शेवटचा श्वासही तो मुलांसाठीच जगला!!!
मात्र आयुष्याच्या संधी काळी
बाप संवादासाठी तरसला
किमान अपेक्षा साठी तो नेहमीच दडपला
बाप नावाचा माणूस ,राजासारखा जगला
पैशासाठी तो पोरांवर नाही विसंबला
शेवटच्या क्रियाकर्माचा विचारही त्याने जिवंतपणीच केला !!!
बाप नावाच्या माणसापुढे
देवही एक घर मागे पडला
बाप फक्त सगळ्यांच्या सुखासाठीच झटला
बाप नावाच्या माणसाचे
काव्य चित्र मी रेखाटले
मंदिरातले देव आता मी कधीच दूर सारले
हृदय मंदिरात मी माझ्या बापाला पुजले
हृदय मंदिरात मी माझ्या देवाला पुजले!!!!!!!
स्वाती डोकबाणे
58) *दाद ही दादअसते*
हृदयात प्रेरणा रुपी स्त्रोत निर्माण करणारी साथ असते
दाद ही दादअसते
हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवाव असं पान असते*
दाद ही दादच असते
ज्ञान रूपा कडून मिळालेली कलेची कदर असते
दाद ही दाद असते
सर्व श्रेष्ठ असूनही कलेचा सन्मान असते
दाद ही दाद असते
कलाकारांच्या शृंखलेत मिळालेले एक स्थान असते
दाद ही दाद असते
आनंद रूपाने ,बहरून सोडणार झाड असते.
दाद ही दादच असते
निरलस मनातून मिळालेली ती एक साद असते
दाद ही दाद असते.....नवोदित कलाकाराला मिळणारी नवसंजीवनी असते....नवसंजीवनी असते
स्वाती डोकबाणे
57) *रेखाचित्र संघटनेच्या महिला प्रतिनिधी श्रीमती स्वाती डोकबाने यांनी घटना दुरुस्ती बैठकीच्या शुभारंभी सादर केलेल्या विद्यमान कार्यकारीणीच्या कारकिर्दीचे सिंहावलोकन करता प्रस्तुत केलेली कविता लिखीत स्वरुपात सादर .* कोल्हापूर आमसभेने इतिहास घडवला
सत्तांतराचा मोठा कौलच दिला
अध्यक्ष महोदयांनी फेटा बांधला
मराठवाड्याचा झेंडा रोवला
कार्यकारिणीचा डंका वाजला
उत्साहाचा ढोल धडाडला
परखड वक्ते , टीकाकार सच्चे
ढवळून निघाले वातावरण सारे प्रामाणिकपणा अन मेहनतीचे
इंद्रधनु रंग सजले
सभा अन् , दौऱ्यांचा माहौल सजला
शेगावीच्या पहिल्या सभेने मनाचा ठाव घेतला
अन् , संकेतस्थळाच्या अनावरणा ने
डिजिटल क्षेत्रात प्रवेश मिळवला
सगळ्याच सभा विशेष गाजल्या
धुळे यवतमाळ अन चंद्रपूरच्या सभेने मानाचा तुरा खोवला
पश्चिम महाराष्ट्र दौराही झाला
मनामनातील भडास ओकला, झाला सगळा निचरा
कोकण दौर्यात प्रेमाचे पुकार, विश्वासाची वेगळीच साथ
विदर्भ दौरा यशोशिखर ठरला
संस्थापकाचे दिव्य दर्शन दिधला
निरोप हा आगळाच ठरला, साश्रु नयनांनी निरोप घेतला.
औरंगाबाद बैठक सुवर्ण अक्षरातील पान ठरले
घटना दुरुस्तीच्या कामाचे , नजीर शेख सर शिल्पकार ठरले
यशस्वी करत सर्वच टप्पे
सोडवून घेतले अनेक मसले
कैवारी हे सभासदांचे.. नाही भ्रष्ट नेते..
रात्रं दिवस मेहनत, अन् नाही जीवाची परवा
ठेवा सभासदहो याची जाण, देऊन त्यांना आदराचा मान
संघटनशक्ती आहे ही नाही खोटी भक्ती
प्रत्येक कार्यासाठी लागते धनाचीच शक्ती
संघटनेचा असे हा निधी , नाही ही भीक
जाणून संघटनेचे महत्व, समजुन ही रीत
शुद्ध रत्नांची खान येथे, नाही गर्व अभिमानाला स्थान येथे
बहुरंगी कलाकारांच्या भांडारात प्रत्येकाचा सन्मान येथे,
अशीही संघटनशक्ती, शिलेदारांची बळकट काठी
एक रूप अन् एकतेची हीच महाशक्ती.. हीच महाशक्ती !!!!!🤝 *स्वाती डोकबाणे नाशिक*
56)
*कविता*
कविता! छान पैकी वाचून झाल्यावर,
तितकीच छान घडी घालून ती,
ठेवायची असते खिशात ..जिथे हृदय जवलच असतं तिथे.
कविता नसते रेल्वे तिकीट वा एस टी चं, प्रवास झाला की, टाकून द्यायला...
कविता नसते किराणा मालाची यादीही पुन्हा-पुन्हा जिन्नस मोजून पिशवीत भरण्यासाठीची..
कविता असते जणू एक Doctor's perception जपून ठेवावंअसं..
जेव्हा-जेव्हा अस्थिर, अस्वस्थ, मन उदास-बैचन होईल तेव्हा-तेव्हा वाचून काढावी..
सकाळ-दुपार-संध्याकाळ-रात्री..जेवणाआधी-जेवणानंतर वगैरे...
कविता असते छोट्या-मोठ्या आजारावरची अस्सल गोळी-औषध..
अख्ख झाड नाही ठेवता येत खिशात..
कवितेच झाड, अगदी बहरलेली फुले असलेलं ठेवू शकतो खिशात..
नाचरा मोर, कोकीळ कुहू-कुहू, चिवचिव चिमणी..बसून राहतात खिशात कवितेच्या पानावर..
सारं विश्व कविता लेवून सजते,
कवीचे जग लेवून सजते.
कविता असते एक प्रेयसी, कायम सोबत करणारी प्रवासातल्या कुठल्याही वळणावर...
*कवी कधीच एकटा नसतो*
......डीडी..19240712202001
55)
*मला काहीच माहित नसतं*
*जेव्हा मी पहिल्यांदा तिकडे जातो..*
*फक्त address..*
*जन्माचं तेच झालयं,*
*माझे आईवडील, देव धर्म जात...*
*address आधीच ठरलेला होता..*
...डीडी...
54)
द-या द-यांत
डोंगरा डोंगरांत
फिरतो मी.......
माणसे भेटतात मला डोंगरा सारखी
राकट असलेली
शांत शितल मानुसकीने
पाझरलेली........
तेव्हा माझे मन
जाते हरखून.......
शिवदास दोंदे
दि. ३०/१२/२०२०.
53) *अडगळीतली का असेना, तुमची जागा ते मोकळी करून देतात जाता-जाता......*
ते जाऊच नयेत असे सर्वांनाच वाटते असेही नाही..
त्यांची उपयुक्तता सर्वार्थाने संपलेली आहे असेच वाटणारे जास्त..
तरीही ते जगत असतात या भ्रमात की यांना आपण हवे आहोत...
अशा स्थितीत औषधे काम करतात असेही नाही
will power हेच त्यांचं खरं औषध असतं या काळात..
.......... पण एक दिवस येतो...ते जातात ...
त्यांना ज्या खोलीत ठेवलेलं असतं ती खोली, दरवाजे,खिडक्या मोकळा श्वास घेतात....
आणि तुम्हीही मोठा श्र्वास सोडतात सुटकेचा..
त्यांची अंथरूणं, पांघरूणं, त्यांच्या अजून काही-काही वस्तूंची लवकरात लवकर जाळून वा पुरून विल्हेवाट लावली जाते आणि अडकलेला कोपरा तुमच्या साठी खऱ्या अर्थाने कामाचा ठरू लागतो.
ते काहीही घेऊन जात नाही तुमचं! *जाता जाता अडगळीतली का असेना ते तुमची जागा मोकळी करून देतात*
तुमच्या घरातल्या अगदी चिल्ल्या-पिल्ल्यांपासून तुमच्यापर्यंत, (तुम्ही घरातले आता सर्वात मोठे)खूप काही- काही केलेलं असतं त्या जाणाऱ्या माणसानं.
अगदी सहज विसरून जातात तुम्ही, त्याच्या तेराव्या पर्यंत.
खरंच तुमची स्मरणशक्ती या संदर्भाने कमी होत चालली आहे आणि तिची तुम्हाला तिळमात्र खंत नाही.
पण खरंच सांगतो,
*अडगळीतली का असेना ते तुमची जागा मोकळी करून देतात जाता जाता*
.....डीडी. नाशिक.
52) *......आणि तो पुन्हा आला!*
तो जातांना पुन्हा येईल असं काही म्हटला नव्हता...परंतु जसे-जसे महिने सरकू लागले आणि 2021 चा ऑगस्ट सुरू झाला तेव्हा खात्रीने वाटू लागले की हा पुन्हा येईल..
मागचं वर्ष किंबहुना दिड वर्ष जीव मुठीत घेऊन सरकवणं चालू आहे..त्यात पहिली घेतली तर दुसरी केव्हा...? सारखं अंतर कमी-जास्त...
मोफत हवी असेल तर मरणाची गर्दी..विकत हवी असेल तर मिळतेच-मिळते..त्यात तिची परिणामकारकता किती दिवस टिकेल हा एक वेगळा मुद्दा!असो.
तर ऑगस्टची आठ तारीख उजाडली आणि तो आला अगदी रात्री बारा वाजता आला असला तरी त्याचं दर्शन सकाळी आठ नंतर झाले म्हणजे आठ ला आठ वाजता. जेव्हा फोन वाजायला लागला तेव्हा.. आणि मी म्हटलं तो आला.
खरंतर तो येण्याची तारीख ही मला दहा वर्षापूर्वी सापडली तेव्हापासून हा नित्यनेमाने येऊ लागला त्याआधी मी किंवा माझ्या मित्र परिवाराने व जन्मदात्यांनी ही त्याची दखल घेतली नव्हती.
काल जेव्हा तुम्ही सर्वांनी उदंड असं काही दिलं आणि ते अजून काही वर्ष पूरलं तर हा पुढील काही वर्ष अखंड येईल याची खात्री वाटावी अशी विश्वासहर्ता निर्माण व्हावी अशी स्थिती आता आहे.
तो येतो तेव्हा जगण्याची लढाई आपण इतके वर्ष ईमानाने लढलो याची खात्री पटते. प्रसिद्धीच्या वल यावर किंवा स्वाभिमान विकून काही यश मिळतं आणि ते मिळवणे म्हणजे यश असतं असं मला वाटत नाही. आपल्या तत्वांशी तडजोड करून काही मिळवणं म्हणजे कणाहीन आयुष्य जगण्यासारखं आहे. माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी आपण सर्वांनी साथ दिली आहे पण दुःखात इतकेच लोक बरोबर नसतात हेही खरं!
काल जेव्हा तो आला तेव्हा त्याने मला ओळखलं नाही. म्हणाला तू जरा वेगळा दिसतोस. मी म्हटलं," हो, संधीच्या आड येणारी माणसं मला ओळखता येऊ लागली. कोण हितचिंतक कोण तोंडावर गोड हे मी आता ओळखू शकतो. त्याच्यासाठी पंचावन्न वर्षे उलटावी लागली"
तेव्हा तो म्हणाला, "गुड. पण अजून एक बदल जाणवतो तुझ्यात, तू आता सर्व गोष्टींकडे तटस्थपणे बघू शकतोस. आनंद आणि दुःख याकडे तू तेवढ्याच समतोल दृष्टीने बघायला शिकला. कुठल्याही वलयात अडकू नकोस. तुझा स्वतःचा असा झेंडा आहे. तो तुझ्या हातात ठेव. मिरवण्यासाठी नाही .वाऱ्याची योग्य दिशा तुला सापडली आहे.अंतर्मनातून आनंदाची प्रचिती येऊ लागलीआहे. समाधानाची ही ज्योत अशीच तेवत ठेव. ईर्ष्या , स्पर्धा ज्याच्या सीमारेषा ओलांडून तू एका शांतीच्या मार्गावर चालताना मला दिसतो आहेस." "धन्यवाद मित्रा! इतका चांगला बदल तुला माझ्या दिसतो आहे, असे नक्कीच तुला वाटत असेल तर तुझे पुन्हा एकदा धन्यवाद !"
तो थांबला अगदी रात्री बारा पर्यंत, जाताना म्हणाला, "मी पुन्हा येईल तुला तुझ्या मित्रांनी उदंड शुभेच्छा दिल्या आहेत तेव्हा यावच लागेल."
नऊ तारखेचे क्रांती दिन आणि आदिवासी दिन या दोन दिनांच्या शुभेच्छा देऊन मी त्याला विदा केले .
....डीडी. 9/8/2021.
51)
सत्यसाठीच मनात तडफड हि अंतरिक ओढ... तुमचे सारखे बधुंचे अनुभव, प्रोत्साहनपर ४ शब्द रेखाटुन, २ पाऊले चालत यथार्थ जिवनात वाटचाल करताना जिवन सार्थकी लागावे....!! हिच ईश्वरीय कृपा लाभली🤝🙏🤝
*सभीके जिवनमे कुछ ना कुछ कम है....! 😇*
*मगर ना बदनामी का डर और ना कुछ खोने का गम है...!🌳🧘🏻♂️*
*यही सच्चाई का इनाम और शब्दोमें तिरो जैसा लक्षभेदनेका दम है...!!* 💪
सतिश पारणकर
50) *मृत्यूचे ढिगारे*
केवळ टिव्ही वरची दृष्ये बघून,
क्षणभर श्वास थांबून रहावा...
आपला तान्हुला.., आपला म्हातारा बाप,..आई, आपला भाऊ, आपली ताई..,पत्नी ...
श्वास रोखून..असेल का जिवंत या एकच वेड्या आशेवर..
डोळ्यात प्राण आणून वाट पहात बसायचं..
मृत्यू चा डोंगर अंगावर येवून पडल्यावर कसल्या वेदना..कसला आक्रोश.. कसला श्वास...?
चिखल-चिखल झालेले मृत देह बघितले की, हृदय चिरून जो आक्रोश बाहेर पडतो तो थेट आभाळ भेदून जातोय...
आता यानंतर येणारा अश्रू चा महापूर रोखण्याचे खरे आव्हान आहे..
...डीडी..
49) _*जीवन*_
*सकल जिवनात सुरू असतो संघर्ष।*
त्याविना मिळत नाही कुणालाही हर्ष।।
*कुणी असतो बेकार, तर कुणी कौटुंबिक त्रस्त।*
सांगायला मात्र सगळेच सांगतात, आहे मी मस्त।।
*कहाणीत असते सगळ्यांच्या, थोडा अधिक क्लेश।*
पण ते सगळं सोसून, जीवन जगत असतो शेष।।
*तीन दिवसांच आयुष्य, बालपण - तारुण्य - म्हातारपण।*
सगळं काही उपभोगून सुद्धा, नाही उद्धार विना समर्पण।।
*- श. गो. आक्केवार, चंद्रपूर*
48) प्रेमाचे दुःख काळजात
माझ्या सलू लागले
माझेच काटे मला
आता टोचू लागले.
लग्नाचा गुलाबी बहर
उतरल्यानंतर सारेच
संसार संसार म्हणू लागले
संसारही व्यवहारी होऊ लागले
बेकार होतो जरी ही
बहु होता हुन्नर तरीही
जग माझ्यावर हसु लागले.
कतॄत्वाने माझ्या उचल घेता
जीवन माझे पलटू लागले.
मग गूळाच्या ढेपेला मुंगळे चिकटू लागले.
मित्र परिवार झाला बहुत
मैफीलीचे मेळे भरू लागले.
दिल दोस्ती दुनियादारी म्हणू लागले.
मी चळवळीच्या रथात बसता
घोडेच रथ सोडून पळून लागले.
चळवळीचे अस्तीत्वच धोक्यात येवू लागले.
जीवन संपता माझे
विल्हेवाट लावता त्यांनी
आठवणीत माझ्या ते जेवू लागले.
प्रेमाचे दुःख काळजात
माझ्या सलू लागले
माझेच काटे मला
आता टोचू लागले.
शिवदास दोंदे
दि. २४/०२/२०२१.
47) 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*तुझ्या रूपाची ओढ...*
➖➖➖➖➖➖
सावळ्या रुपाची तुझ्या,
*आस नयनांना या लागली...*
तिथे चंद्रभागा वाहते अन्,
*इथे डोळ्यातून आसवं वाहिली...*🚩
परंपरा तुझ्या वारीची,
*आज ही अधुरी राहिली...*
वैष्णवांनी दुमदुमलेली पंढरी,
*आज सुनीसुनी रे राहिली...*🚩
कसा थांबला रे बापा?
*तुझ्या दिंडीचा सोहळा...*
नजर टाक तू भक्तांकडे,
*येऊ दे ना तुलाही कळवळा...*🚩
तुझा नावाचा जय घोष,
*सार्या ब्रम्हांडात निनादतो...*
वेडा भक्त रे मी तुझा,
*एकटाच तुझे नाम गातो...*🚩
सोडुनीया हात कटीचे,
*तू हाती घे ना सुदर्शन...*
दूर करूनी ढग संकटाचे,
*पंढरीला येऊ दे भक्तगण...*🚩
©️®️संतोष मते...🚩
औरंगाबाद...✍️
➖➖➖➖➖➖➖
◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
46)
🙏🙏✍️🙏संसार अभंग
😌😌😌
उघड जरा से
सलून चे दार
केसांचा हा भार
डोक्यावरी !१!
केस विंचरण्या
वापरतो फणी
घालतो मी वेणी
कित्ती छान !२!
केस हे धुण्यास
लागतात तास
गळ्याला ते फास
कधीकधी !३!
कधीतरी वाटे
माळावा मोगरा
थोडा थोडा तोरा
दाखवावा !४!
जेवणात जेव्हा
लांब केस येतो
मुलगा बघतो
मजकडे !५!
मुलगी हसून
मला म्हणे 'आई '
सुंदर गं बाई
दिसतेस !६!
बायको वेगळी
मला चिडविते
काढू का म्हणते
उवाबिवा !७!
आई मजा घेते
घरी दोन सुना
केसातल्या पिना
इथेतिथे !८!
मनी कधी येई
करावी टक्कल
आहे का अक्कल
आई म्हणे !९!
आता ठरवले
लांबच ठेवतो
होऊन मी जातो
सेलिब्रिटी !१०!
🙏🙏✍️🙏🙏
राजेश माहूरकर
नागपूर - कन्हान
45) संवाद
(लघुकथा)
"सुंदर मुली आपल्या साठी नस्त्या."
"मग"?
"अरे आपून गंद्या नालीतले किडे..अंगाचा वास येत्तो आपल्या......गेली ती चल..."
....×××...
खोपटाच्या दाराशी असलेल्या दगडाशी ठेचकाळत तो खोपटात शिरला..
"अगं आये, तुला भेटला नाय काय कोनी पैकावाला..,चिकना ...लगीन कराया..? मला जनम दिल्ला ह्या खोपटात....
...........
सुरुवातीला काहीच दिवस शाळेत गेलेली ती.
तिच्या डोळ्यासमोर क्षणभर त्याचा चेहेरा येवून गेला तिच्याच वर्गात होता तो.
.....हो तो पैसेवाला आणि चिकनाही होता.
...........×××××..........
.....डीडी....
44) *लिंक...*
(कामाच्या, गरजेच्या, आनंदाच्या, चांगली माहिती देणा-या वगळून)
निळ्या (ब्ल्यू) रंगाची ...
मोबाईलच्या स्क्रीन वर..लिंक!
काही स्माॅल, काही कॅपीटल अल्फाबेट..काही डिजीट, काही स्पेशल कॅरेक्टर...
बोटाचा हलका स्पर्श(टच)..
आणि अद्भूत दुनियेत प्रवेश.
कधी कधी भिती वाटते,
खरी-खुरी भिती.
कोठून कधी येईल..,अनाहूत पणे..
नको असलेली, नको ते दाखवणारी,
फसवणूकीची, मनःस्ताप देणारी वगैरे-वगैरे...
ह्या निळ्या रंगाच्या सोबतीनं,
जगणं सोपं झालं की,
लिंक च्या अक्षरांसारखं क्लिष्ट.
हळूहळू चालत रहावं कि फास्ट पळावं?
टच करावं की करू नये?
To be or not to be...?
जणू एखादी निळ्या-सागरी रंगाची, निळ्या-निळ्या डोळ्यांची तरुणी,
खुणावते..भूरल पाडते ....
तरल हातांच्या बोटांना.
....डीडी.नाशिक.
(C) 15/07/2021.
43) _*मागच्या वर्षीची गोष्ट आहे ...आमचे अधिक्षक अभियंता सेवानिवृत्त होत असल्याने एका मोठ्या हॉटेलमध्ये जंगी समारोप समारंभ होता निवडक लोकंच आमंत्रीत होती ..सुपर क्लासवन आॕफीसर चा सेवानिवृत्ती कार्यक्रम त्यास प्रमुख पाहुणे आमचे गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक व अनेक उच्च अधिकारी उपस्थित होते...कार्यक्रमास खुपच छान शिस्तबद्ध पद्धतीने सुरवात झाली..स्वागत वगैरे अनेक अगदी धीर गंभीर शांततेत प्रोटोकॉल पाळुन चालले होते .. मी आपला एका ओळीत कोपरा धरुन शांतपणाने कार्यक्रम चालु असताना यथावेळी हळुहळू टाळ्या देत होतो... अधिकार्यांची भाषणे सुरु झाली..भाषणे म्हणजे उत्सवमुर्तीची स्तुती कवणेच...एक एक अधिकारी आपली अनुभवे व मनोगते अतिशय नम्रपणे कथन करत होता ..साहेबांचे वर्णन ऐकून सौ.बाईसाहेब व मुलेही खुप गर्व वाटावा अश्या आनंदात होते...अनेक अधिकार्यांची भाषणे झाली पण कार्यक्रमात उत्साह येईना..बरेच लोकं आळसावले...जो तो साहेबांची तारिफ करण्यात धन्य समजायला ... साहेबांनी पस्तीस वर्षे अहोरात्र सेवा केली , आयुष्य डिपार्टमेंटसाठी वाहीले, साहेबांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा या पुढेही शासनाला फायदा व्हावा..व साहेबांनी विभागाला आवश्यक वेळी मदतीला यावे.वगैरे वगैरे... आता मात्र लोकं खरंच कंटाळली भाषणावरुन लोकांचे लक्ष हटले कुठे कुठे कुजबूज सुरु झाली ...अचानक सुत्र संचालिकेने पुढील मनोगतासाठी माझे नाव पुकारले.... मी तर चाटच पडलो मी क्लास थ्री कर्मचारी तो ही सेवा निवृत्त विशेष निमंत्रितही नाही मला काहीच सुचेना ... नाव पुकारले तर दोन शब्द बोलावेच लागणार ..उपस्थित अधिकार्यांनीही काने टवकारली... मग मी सुत्रसंचालिकेकडे तक्रार नजरेने पाहत स्टेजवर गेलो ... अगदी सर्व अधिकारी वर्ग पाहुणे वगैरे सर्व हे माझे जवळचे मित्र जणु यांच्यापेक्षा मला जास्त ज्ञान आहे असे समजुन मनोगत सुरु केले अस्सल घरगुती भाषेत.. अन् काय कमाल प्रत्येक वाक्याला टाळ्या अन हश्या ने हॉल मध्ये वातावरण बदलुनच गेले..मलाही कळेना मी काय बोलतोय पण वातावरण बदलले म्हणजे लोकांना पटले असच बोललो असणार... एक वाक्य म्हंटले होते कि .. साहेब आता तुम्ही पुनः या आॕफीसकडे फिरकायचे सुद्धा नाही या आवारात तुम्ही दिसायला नको.. आयुष्याची पस्तीस वर्षे शासन सेवेला दिलेत आता खुप झाले एका व्यक्तीवर तुम्ही घोर अन्याय केलाय ..पस्तीस वर्षे त्यांनी सोसलंय ...लक्ष्मणाने भाउ श्रीराम सोबत चौदा वर्षे वनवास केला सोबत साक्षात प्रभुराम तरी होते परंतु उर्मिलाने त्या वनवासाचे चटके चौदा वर्षे भोगले तदवत साहेब तुम्ही अन्याय केला आता उर्वरीत आयुष्यावर तुमचा अधिकार नाही त्या उर्वरीत आयुष्याच्या क्षणाक्षणावर तुमच्या पत्नीचा अधिकार आहे ...आता सर्व वेळ काय करायचे त्या ठरवतील ....साहेब तुम्ही या अधिकार्यांचे काही ऐकु नका...या आणि अशा अनेक सहज किश्श्याने अक्षरशः कार्यक्रमात रंगत आणली ..साहेब माझे जुने व जवळचे असल्याने अनेक उदाहरणे किस्से वर्णन करुन काही जोक्स व मिश्कील शब्द वापरुन बोलत राहीलो ...माझ्या भाषणानंतर मात्र मग सगळेच अधिकारी फ्री झाले मग तेही अधुन मधून विनोदी स्वरुपात बोलते झाले... प्रमुख पाहुण्यांनी उत्सवमुर्तीकडे मी कोण आहे हि विचारणा केली यावरुन त्यांनाही माझे भाषण आवडले असे वाटले... कार्यक्रम संपला साहेबांनी हातात हात धरुन हस्तांदोलन करुन घरी येत जा भेटायला असे म्हंटले... तेच बाईसाहेबांनीही आग्रहाने सांगीतले...नंतर तर महिनाभर उपस्थितापैकी जो भेटेल तो म्हणायचा व्वा काय बोलल्लात राव तुम्ही सर्वात छान ..वातावणच बदलुन टाकले... असो मला वक्ता असल्याचा आनंद त्या दिवशी मिळाला...सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामुळे... कालच त्या साहेबांच्या घरी गेलो होतो काही संघटनेच्या कामासाठी...तर एक वर्षापासुन एक सुपर क्लासवन आॕफीसर लॉकडाउनचे कारण का असेना पण घरात बसुन अक्षरशः वैतागलेय काय करावे त्यांना काही सुचत नाही त्यांच्या प्रतिष्ठे प्रमाणे काही करता येत नाही काही वागता येत नाही..तासभर आम्ही गप्पा केल्या व बाहेर पडल्यावर वाटलं खरं आपली सेवानिवृत्ती किती सुखाची...एका मुक्त पक्ष्याप्रमाणे निर्भय.निर्विकार स्वच्छंद सेवा निवृत्तीनंतरचा काळ व्यतीत होत आहे आपला....*_
42) ♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
*अ.ल.क*
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
*विषय - क्षण*
*शीर्षक- क्षण सुखाचा...*
त्या दोघांचं एकमेकांवर नितांत प्रेम....गरीबी आडवी आली.ती प्रशासकीय अधिकारी...तो शेतकरी.तिच्या प्रेमात तो वेडा होतो. शासन मनोरुग्णांसाठी जी समिती गठीत करते त्याचा अध्यक्ष तिला बनवलं जातं. स्वतःचं गाव असल्याने ती त्या गावात खूप वर्षांनी प्राधान्याने भेट देते. समोर तो बघून ती निशब्द होते. अन् तिला आपल्या झोपडीत *बघताक्षणीच* त्याने आनंदाने शेवटचा श्वास घेतला...💞
💗💗💗💗💗💗💗💗
_संतोष मते....💞
(औरंगाबाद)
💓💓💓💓💓💓💓💓
41) *फाईल*
ही नवी कोरी फाईल..
ओऊन ठेवली एका धाग्यात(लेसमध्ये)
पेजींग केलयं ...१ते९९पाने वगैरे..
पानांच्या कोप-यावर डाव्याबाजूला.
जोडून ठेवली एखाद्या फेसबुक वा व्हाॅटस् अप ग्रूपवर असावी तशी.
खिडकीच्या बाजूने हवा आली की, ही पाने हलू लागतात.
हवे बरोबर डोलूही लागतात..कधी फडफडतात हवेचा जोर वा रंग बघुन..
हवे बरोबर एखादा विषय आला की बोलूही लागतात..मनातलं.
मग सुरू होतात कमेंटस्..लाईक्सही..
मी बघत असतो..वाचत असतो.
क्रिएटर वा अॅडमिन म्हणून..सुखावतो..
माझ्या सुंदर अक्षराने रंगीत पेन घेवून लेबलींग करतो फाईलवर कोरून वगैरे..खूषीत.
फाईल क्रमांक...१
*विषय...दिल,दोस्ती देवीदास...(३डी)*
पाने ...१ते९९.
सन...२०२१...(जुलै).
...........डिडि.......१२/०७/२०२१.
40) 🌹🌹 मोसीक ए.आर.🌹🌹
सोप्पं नाही आयुष्यभर नजर ताब्यात ठेवणे ,ही कला तिलाच जमू शकते ,तिला म्हणजे सौभाग्यवतीला ,लग्नातील स्वप्नाळू नजर तिची ते नवऱ्याच्या चुका सांभाळणारी नवऱ्याच्या चुकांना सर्वांसमोर आधार देणारी नजर ,नुसती नजर नाही संयमी नजर ,नवरा कसाही असू दे तिच्या नजरेत डोकावून बघा अभिमानच दिसेल नवऱ्याबद्धलचा ,हा अभिमान कायमचा त्याच परिमाणात आणि परिणामात नजरेत दिसायला हवा हे भान तिला कोण देत असत कोणास ठाऊक पण कित्येक पडझडीच्या परिस्थितीत नवर्याबद्धलच मत तिच्या नजरेत कधीच बदलत नाही आणि हे सातत्य अगदी स्वतःच्या अंतापर्यंत टिकवून ठेवण्याची शक्ती हिला कोणी दिली असावी ह्याच मला आत्यंतिक कुतूहल आहे ,
मानसिक आणि शारीरिक अथवा बौद्धिक अडचणी असताना सुद्धा कधीही तिची नजर वर उचलून बघा मनातल्यामनात तुम्हाला तुमच्याबद्धलचा विश्वासच वाटेल हे मला सर्व संवेदनशील नवऱ्यांना सांगावस वाटत ,लग्न झाल्यापासून सर्वप्रकारच्या जबाबदाऱ्या पेलताना सर्व दुःख झेलताना सर्व नाती सांभाळताना आपल्या नवर्याबद्धलची नजर सांभाळावी लागते ह्या सौ ला ,आणि ती तीच कार्य चोखपणे बजावत असते कितीही विरोध असला अंतर्गत अथवा बहितर्गत तरीही ,बाहेरच्या माणसाला नवऱ्याबद्धल बोलण्याचं धाडस ह्या नजरेकडे बघून होत असेल असे वाटत नाही ,म्हणूनच यमराज सुद्धा धसकावले ह्या विश्वासी नजरेसमोर ,नवरा कसाही असला तरी नजर मात्र तीच ,कधीही त्या नजरेत द्वेष /तिरस्कार दिसणे म्हणजे अपवादच ,
निर्जीव शरीरातील नजर सुद्धा हेच दर्शवेल कदाचित ,नवऱ्याच्या अंतिम क्षणी अथवा बायकोच्या अंतिम क्षणी त्या नजरेत डोकावले तर पूर्ण विश्वासाच्या लाटाच लाटा दिसतील दुसरं काही नाही ,
ह्याच नजरेच्या आधारावर कदाचित तिचा जोडीदार हे आयुष्य जगत असतो निर्धास्त पणे ...
मी खचलो की फक्त तिच्या नजरेत एकदा बघतो मलाच माझा विश्वास /अभिमान माझी कुवत त्यात दिसते आणि मी पुन्हा उभा राहतो आयुष्यात ..
🌹🌹 मोसीक ए.आर.🌹🌹
39) तूझं गडद आभाळ..
जोरदार बरसणं.
इकडेतर ढगच नाहीत,
डोळे आटलेले...
.......डिडि...नाशिक.
38) तूच व माय
तूच आई भिमाई
तूच सावित्री
तूच माता रमाई
स्वराज्याची तूच माता
तूच जिजाऊ व माय
तूच अष्टभुजा
तूच जगदंबा
तूच काल्पणिक दुर्गा,
उच्चपदावर पोहोचलेली सुशिक्षित
महिला ही तूच
अन् त्यांच्या समोर नतमस्तक होताना
तुझ्या त्या वैज्ञानिक बुद्धीला
प्रश्न न पडणारी तूच व माय
तुच कधीकाळी सती जाणारी,
व्यवस्थेने शिक्षण नाकारलेली,
आणि आता शिकून-सवरून,
स्वतःचा इतिहास विसरलेली तूच व माय.
मंदिर प्रवेशासाठी झगडणारी,
ऋषिपंचमीला स्वतःचाच विटाळ पुजणारी
पुरुष प्रधान संस्कृती ला पाठीशी घालणारी तूच व माय
मुलगी झाल्यावर खट्टू होणारी
मुलगा झाल्यावर आनंदित झालेली.
मुलगी आणि सून
असा भेदभाव करणारी तूच व माय
निवडून आलेली,
उच्च पदावर जाऊन बसलेली,
निर्णय घेण्याची क्षमता असलेली,
पण घेऊ न शकणारी,
नवऱ्याच्या हातातली कठपुतली तूच व माय
शाळेत हुशारीने गाजणारी
लग्न झाल्यावर नवऱ्याबरोबर
संसारात रममाण झालेली
स्वतःच स्वत्व विसरलेली
'प्रतिभा'वंत तूच व माय
तूच कल्पना
तूच सुनिता
आकाशाला गवसणी घालणारी
पराक्रमी तूच व माय
तूच धरिती
तूच सृष्टी
आणि सृष्टीच्या बापाची ही आई
तूच व माय.....
शिवदास दोंदे
दि. ०८/०३/२०२१
37) #सुप्रभात...🌹
आईशी गप्पा मारण्यासाठी शेजारच्या काकु यायच्या. त्यांच्या गप्पा म्हणजे ठराविक विषयांवर सुनेचे वागणे ..आणि लेकीशी तुलना.
अतिशय सुखी असलेल्या मुलींविषयी तिला खुप त्रास आहे हो ( तिच्याकडे येणार्या जाणार्या लोकांचा ) नवर्याचा नाही , तिलाच सगळे करावे लागते हो .. आपल्या वेळी असे नव्हते हे सांगताना आम्हाला ( आई आणि शेजारच्या काकू मंडळीला ) कीती करावे लागायचे ?. 20/20 माणसांचा स्वयंपाक करावा लागत असे .. अर्ध्या किलोमीटरहुन पाणी आणावे लागत असे .. घरकामाला आजच्या सारखी बाई नसायची .. ईत्यादी ईत्यादी . अर्थात ते खरेही होते.
बोलता बोलता काकु बोलल्या आजकालच्या मुलांना भाऊ , बहिणीविषयी एकमेकांविषयी काही वाटत नाही ,कुणी विचारत नाही . असा काही तक्रारवजा सुर होता . तिथपर्यंत मी त्यांच्या सोबत होतो.
मग थोडा विचार केला माझ्या लहानपणी मी माझी बहिण ,अगदी प्रसंगानुरुप चुलत , मावस , आत्त्तेभाऊ , मामेभाऊ दहा बाय दहाच्या च्या खोलीत मस्त आनंदाने रात्री पांघरण कमी पडले तर अंग बारीक करून भावाच्या पांघरुणात शिरत असु .
शक्यतो एका ताटात जेवायला बसत असु ..!! लहान झालेली कापड ( अल्टर ) करून घालत असु.
मोठ्या भावाची पुस्तके शक्यतो असायची .आत्या त्याला शिकतानाच सांगायची अझहर निट वापर मोसिकला ( मला ) पुढच्या वर्षी द्यायची आहेत ...
आज आपणच मुलांना स्वातंत्र्याच्या ( त्यांनी न मागितलेल्या ) नावाखाली स्वतंत्र खोल्या provide करत असतो. इतरही सगळ्या गोष्टी ज्याची त्याला स्वतंत्र.
कुणी एखादी वस्ती भावाची/ बहिणीची घेतली की लगेच... आं... दादाची आहे न ती.. किंवा ताईची आहे न ती.. असे म्हणून घेऊ देत नाही.
थोडक्यात no sharing संस्कृती आपणच त्यांना देत आहोत .
लहानपणापासून हे माझे हे तुझे हे ठरवुन देत आहोत त्यामुळे हे आपले आपल्या दोघांचे आमचे त्यांना काय माहीत होणार ..?! माझे, तुझे अशीच शिकवण त्यांना मिळते. आणि तीच परिपक्व होते. त्या वयात त्यांना कितपत कळणार.?
जिथे बाळकडूच आपण त्यांना अश्या संस्काराचे देत असु तर स्वाभाविकपणे तेच विचार आणि पृवृत्ती त्यांच्यात विकसित होणार ...!
कळतेपणी आपण त्यांनी एकमेकांना विचारावे .. एकमेकांच्या अडचणी वाटून घ्याव्यात (share कराव्यात ) ही अपेक्षा बाळगणे कितपत योग्य होईल .?!
विनाकारण त्यांना दोष देणे संयुक्तीक ठरेल ..?!!
आधी आपल्या वेळी जे होते ते द्या आणि मगच तशी अपेक्षा ठेवा ...
काकु कडे बघून हसलो आणि बोललो काय काकू ..?! माझ्या मनातील हे सर्व त्यांनी ओळखले की काय असा विचार करून ...!!!
🌹🌹. मोसिक ए.आर. 🌹🌹
36)
*जाने कहा गये वो दिन..*
वेळ रात्री नऊ साडेनऊची. घराघरांमधल्या हॉलमधे टिव्ही, मालिकांचे घाणे टाकत असतो. बथ्थड डोक्याच्या मठ्ठ मराठी मालिका.. कपिल शर्माचा कॉमेडी शो, हवा येऊ द्या.. असं काही तरी चाललेलं असतं. माणसं बायकांचं, बायका माणसांचं सोंग घेऊन प्रेक्षकांचं मन रमवण्याचा प्रयत्न करत असतात. ढॅन ढॅन करत जाहिराती अंगावर येऊन कोसळत असतात. त्या सगळ्या गचक्यात जेवणं उरकणं चालू असतं. कोणी एकीकडे मोबाईलमधे डोकं खूपसून दूर कोणाशी तरी चॅट करत असतं. त्या नादात ताटात काय चाटतोय त्याचं भान नसतं. हे झालं आताच्या काळातलं चित्र.
साधारण पन्नासएक वर्षांपूर्वी मध्यमवर्गीय घरांमधे रात्रीचं चित्र कसं असायचं बरं?
सुट्टीत, उन्हाळ्यात किंवा असंच कोणी टूम काढली की तिन्हीसांजेला मुलांची अंगत पंगत व्हायची. आपापल्या घरून ताटं घेऊन मुलं कोणाच्या तरी अंगणात किंवा गच्चीत जमायची. हसत खेळत पाखरांची पंगत उठायची. कधी जेवणानंतर लगेच मामाचं पत्र सुरू व्हायचं. नदी की पहाड... डबा ऐसपैस.. अरिंग मिरिंग लोंगा तिरिंग...गाई गोपी उतरला राजा... भोज्जा...
नऊ साडेनऊ म्हणजे तर झोपायची वेळ असायची.. आठ साडेआठलाच अंथरूणं टाकणे नावाचा कार्यक्रम सुरू व्हायचा. गाद्या घालून झाल्या की मच्छरदाण्या लावणे. पण त्या आधी मुलांच्या कोलांटउड्या व्हायच्या. हा कार्यक्रम साधारणपणे कोणी मोठ्या माणसाने डरकाळी वजा इशारा देईपर्यंत चाले. मग मच्छरदाणी प्रकरण सुरू होई. मच्छरदाण्यांची ठराविक दोरी ठराविक खिळ्यांनाच बांधावी लागायची. त्यामुळे ज्याचं काम त्यालाच करावं लागायचं. असं कोणीही आलं आणि मच्छरदाणी बांधली असा मामला नसायचा. मच्छरदाणी बांधली की आपलं सगळं सामानसुमान घेऊन मच्छरदानीत शिरावं लागायचं. मग सारखं आत बाहेर करता यायचं नाही. कारण मग डास आत घुसायचे. तरी झोपण्यापूर्वी एखादा डास शिरलेलाच असायचा. मग प्रत्येक जण आपापल्या मच्छरदाणीत रांगत टाळ्या पिटतोय असं दृष्य दिसायचं.
पण रात्रीची खरी मजा तर उन्हाळ्यात असायची.. गच्चीवर झोपण्याची. रोडच्या कडेला असलेल्या ओट्यावर पण बिनधास्तपणे झोपायचे लोक. अंगणातही झोपायचे. पण गच्चीवरचा मामला काही औरच. ब-याचदा माळवदाची घरे असत. जिना वगैरे असेलच असंही नसायचं. एखादी मोडकी शी शिडी असायची. मोठाली पोरं अंथरूणं वर न्यायची. बारकाली पोरं त्यांना मदत करायची. मोठी माणसं .. महिला वर्ग खालचं कडीकुलपं बघून शेवटाला येत. तोपर्यंत वर अंथरूणं पडलेली असत. कधी पोरं संध्याकाळीच अंथरूणं घालून ठेवत. रात्रीपर्यंत ती गार पडलेली असत. ट्रांझिस्टर्स तेव्हा नविनच आलेले होते. मग ठराविक स्टेशनं लावली जात. विविध भारतीवर, सिलोनवर जुण्या गाण्यांचा कार्यक्रम ,भुले बिसरे गीत, बेलाके फूल वगैरेअसायचे.. रफी चा मधाळ आवाज, 'खोया खोया चांद' म्हणत आकाशातल्या चांदला थबकायला भाग पाडायचा. किशोर... सुधा मल्होत्रा, 'कश्तीका खामोश सफर' घडवायचे. त्या काळच्या निवेदकांच्या आवाजातही वेगळाच खानदानी ठहराव असायचा..शब्दांची लडिवाळ नाजूक बोटं जणू झोपेची जादू करताहेत असे त्यांचे निवेदन असायचे. वातावरणातल्या शांततेचा लहेजा सांभाळून त्यांचं ऩिवेदन चालायचं.. गाणी ऐकता ऐकता कधी निद्रादेवी कवळायची कळायचं पण नाही.
आता रफी, रेडीओ, खोया खोया चांद.. कश्तीका खामोश सफर.. सगळंच खामोशीच्या पडद्याआड गेलं. गच्चीवर झोपणं. अंथरूणं घालणं. तांब्या भांडं, ओडोमॉस घेऊन... ट्रांझिस्टर घेऊन वर जाणं. आकाशाकडे बघत पूरवैया अनूभवत रेडिओ ऐकणं, व्याधाचं नक्षत्र शोधणं.. चंद्राच्या डागांमधे ससा-हरीण शोधणं... सगळं वेडगळपणाचं वाटावं इतकं विज्ञानाने लोकांना शहाणं करून सोडलं.
नवनविन शोधांनी माणसाची आयुष्याची लांबी वाढली पण त्यातली खोली हरवली. लोकसंख्या भरभर वाढली.अंगण तेवढंच राहिले आणि त्याचे हकदार वाढले.
ऐंशी च्या दशकात आधी टिव्ही ने माणसं गिळली. नंतर मोबाईलने. दोघांनी मिळून मुलांचं तर बालपणच खाऊन टाकलं. सुरूवातीली टिव्हीचा एकच चॅनल होता तोही संध्याकाळी पाचला सुरू व्हायचा पण आख्खा वाडा, बिल्डींग त्याच्यासमोर एकवटायची. तल्लीन व्हायची. आता शेकडो चॅनल्स आले, तरीही मन रमत नाही. रिमोट घेऊन, 'घे पुढं.. घे मागं'..असं तासभर करावं तरी दर्जेदार म्हणावं असं काही सापडत नाही. सज्जन लोकांऐवजी दुर्जन पात्रांची चलती आली. परोपकारी लोकांना कोणी विचारेनासं झालं आणि ज्याच्या अंगी जास्त उपद्रव मूल्य त्याला दहशतीपोटी का होईना .. जास्त मान, अशी वेळ आली...सगळ्यांमधे एकप्रकारचं चिबांवलेपण आलं. जुन्या शांत जगरहाटीचा ठहराव सगळा वाहून गेला.
चटणी भाकरी जाऊन पिझ्झा पास्ता आला. घरी आया बायांनी निगुतीनं केलेल्या शेवया गेल्या आणि 'टू मिनिट नुडल्स' आल्या. दिवाळी दस-याला घर माणसांनी भरायचं. आता प्रत्येकाला नियतीने वेगवेगळ्या खुंटीवर टांगून टाकलं. पैसा खूप आला पण सूख समाधान मात्र हरवलं. जाहिरातींनी माणसं हावरट बनवली. शोभेच्या वस्तू... सामानाने घरं भरली..पण कोठीची खोली रिकामी झाली. स्पर्धा, अहंकार ह्यांनी माणुसकी.. जगण्यातला आनंद हिरावून घेतला. चंद्राला भाऊ मानणा-या बायका आणि चंद्राला मामा म्हणणारी पोरं हळू हळू नामशेष झाली. त्याच चंद्रावर आता प्लॉट्सची विक्रीपण सुरू झाली. काळाने सगळ्यांमधली हळवी नाती पुसून टाकली. आणि निव्वळ चौकस चिकित्सक पिढी जन्माला आली. मार्कांच्या शर्यतीत माहितीचा पूर आला.. ज्ञान मात्र कुठे तरी तोंड लपवून बसलं. पैसे कमवायला शिकवणारे कारखाने उभे राहिले पण जगणं शिकवणारं कोणी राहिलं नाही..
यंत्रयुगाने माणसाचा वेळ वाचेल अशी यंत्रे तर दिली पण जगण्यातली फुरसतच हरवून गेली..
अशा वेळी आपसुकच मनात येतं ..
*दिल ढुंढता.. है.. फिर वही ... फुरसतके रातदिन ...*
🌹🌹🌹 🌹 🌹 🌹
35) *दिलीप तू आठवतोस तेव्हा...*
आम्ही जेव्हा तरूण झालो. तेव्हा तू चरित्र अभिनेत्याच्या भूमिकेत होतास..
तू अभिनयातला बादशहा होतास.. आमच्या आधिच्या पिढीचा तू नायक होतास..
आमचा नायक सुपर स्टार अमिताभ.
'शक्ती' रिलीज झाला तेव्हा दोन पिढीतले नायक समोरासमोर आले..
तुझ्यापुढे असलेल्या अभिनेत्यास तू खाऊन टाकायचा.
त्या काळात मी तरूण असल्याने अर्थातच अमिताभची भूमिका मला रास्त वाटायची कथानकानुसार ...
जसा-जसा मोठा होत गेलो...मुलाचा बाप झालो मुलगा मोठा झाला ...आणि माझी भूमिका बदलली..
आज पुन्हा 'शक्ती' बघतांना दिलीप कुमार प्रचंड आवडला..जवलचा वाटला.. तुझी भुमिका जाणुन घेण्यासाठी मला एका तरूण मुलाचा बाप व्हावं लागलं हेच खरं..
अभिनयात कोणी कुणाला खाल्लं हा प्रश्न अलहिदा..
पण बाप-मुलाच्या भाव-भावनांचा उत्कट संघर्ष पडद्यावर बघायला मिळाला शक्ती च्या रूपाने..
*दिलीप कुमार तू ग्रेट होतास. तुला सलाम!*
..डीडी..
34) हर करम अपना करेंगे , ए वतन तेरे लिये, दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिये ! हे गाणे आणि कर्मा चित्रपट! सदाबहार दिलीपकुमार साहेब यांचा देशभक्तीपर उत्कृष्ट चित्रपट व त्यांचा अभिनय ! सन 1944 ते 1998 या कालावधीत त्यांनी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. दिलीप कुमार साहेब आमच्यासाठी जुन्या चित्रपटांचा खजिना!! सारे शहर मे आपसा कोई नही.. कोई नही, यही सोचकर रातभर में सोई नहीं! काय ते सुंदर गाणे होते! तो काळ निश्चितच आमचा नव्हता! आमच्या जन्मापूर्वीचे त्यांचे चित्रपट! पण 1950, 1960,1970,1980 चे दशक कसे होते ! भूतकाळ कसा होता यांचा अभ्यास जुन्या चित्रपटातून दिसुन येतो! 1990 च्या दशकात शाहरुख खान आल्यावर त्याची चेहरेपट्टी दिलीपकुमार साहेबांसारखी असल्याने दिलीपकुमार साहेबांच्या चाहत्यांनी शाहरूख खानला तेवढेच प्रेम दिले! पण दिलीपकुमार साहेबांचा देवदास काकणभर सरसच आहे ती मूळ कलाकृती होती! रिमेक तर कोणीही करेल ! त्यांचा ऐतिहासिक चित्रपट मुगल ए आझम कसा विसरता येईल युवराज सलीम ची भूमिका अजरामर ठरली. सलीमच्या भूमिकेत .. मेरा दिल भी कोई आपका हिंदुस्तान नहीं.. जीसपर आप हुकूमत करे.. असे सम्राट अकबर ठणकावून सांगितले!! अशा खूप भूमिका दिलीपकुमार साहेबांनी अजरामर केल्या ते एक Tragedy King होते! असे महानायक आज जरी आपल्यात नसले तरी तरी त्यांच्या भूमिकेतून ते सदैव जिवंत आहेत! दिलीपकुमार साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
🖋️🖋️: प्रमोद राव
33) 🙏🌼 *भावपूर्ण श्रद्धांजली*🌼🙏
आज करपेजींना विचार आला,
*देऊ का एक शब्द बोला…*
होता तो शब्द *शतायुषी,*
विचार आता करतात मनासी…
काही घटनांचे संकेत येती,
उपरांत घटना घडून जाती…
तसेच मनी विचार यावे,
नको तेच नेमके घडावे…
अभिनयाचा असा होता राजा,
सर्वत्र होता त्यांचा गाजावाजा…
केल्या निर्माण महान कलाकृती,
त्यामुळे त्यांची वाढली महती…
वर्षानुवर्षे त्यांनी अधिराज्य केले,
कितीतरी सिनेमे बहारदार झाले…
शतायुष्यात त्यांची प्राणज्योत मालवली,
*दिलीपसाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली…*
🌼🙏🌼😔🌼😔🌼🙏🌼
(पहिल्यांदाच एक छोटासा प्रयत्न केलेला आहे…)
☆●आदिनाथ द.रावळ, पुणे…
32)
आयुष्याच्या खेळपट्टीवर अवघ्या दोन धावांनी शतक हुकलेला हरहुन्नरी मोहम्मद युसूफ खान उर्फ दिलिपकुमार मोगल-ए-आझम चित्रपटात म्हणतात-
तकदीर बदल जाती है
जमाना बदल जाता है
मुल्कों की तारीख बदल जाती है,
शहनशहा बदल जाते है ...
मगर बदलती हुई दुनिया में
#मोहब्बत जिस इन्सान का दामन थाम लेती है ...
वह इन्सान नहीं बदलता !
हम भी कभी नहीं बदलेंगे दिलिप साहब...
क्योंकि
अपना रिश्ता ही मोहब्बत का है !
भारतीय सिनेसु्रष्टीचे विद्यापीठ हरपले
महानायक दिलीपकुमार यांनी अभिनयाचे नवनवीन मापदंड,मानदंड व आयाम निर्माण केले व त्यावरुन अनेकांना वाटचाल करुन यश,पैसा, प्रसिद्धी, पुरस्कार व पद कमावले ...दिलीपसाहेबांच्या अभिनय महासागरातील थेंब वेचत अमिताभ बच्चन व शाहरुख खान हे सर्वोच्च पदावर पोहचले...तर राजेंद्र कुमार मनोजकुमार यांनी प्रचंड यश कमावले.....
चंदेरी दुनियेतील निखळलेल्या स्वयंप्रकाशित ता-याला भावपूर्ण अभिवादन !
निष्कलंक कलावंताला अखेरचा सलाम !!
🌹🌹. मोसिक ए.आर. 🌹🌹
31)
*निसर्गाच्या सानिध्यात.....
मित्र,मैत्रीणीनच्या सहवासात...
दिवसाचा शुभारंभ तुमच्या सर्वाच्या सहवासात.....
मोहक अश्या वातावरणात....
.गार वा-याची झुळुक......
पक्ष्यांची किलबिलाट.....
सुर्याची कोवळी किरणे....
चिमण्याच्या चिवचिवाट.....
म्हणून मैत्री कशी फुलवावी.....
वेळी अवेळी,प्रसंगाला साथ तुम्ही द्यावी.....
जाती भेद पंथ भेद न करता.....
मैत्री आपली सदैव जपावी......
शब्द बंधाराच्या प्रवाहात असावी....
या गृपवरच्या काव्यसम्राटांच्या सानिध्यात मी तुटक.. पुटक काही ओळी तयार केल्यात ..त्या कितपत बरोबर आहे हे माहीत नाही..तरी क्षमस्व🙏
सौ वंदना परिहार
30) कविता
स्वाभिमान
रस्त्यात त्याची अन् माझी
अवचितच भेट झाली
चर्चेतून वादादीला
सुरूवात झाली.
ताे म्हणाला माझी लायकी काढताे
चल मी आज तुझ्यावरून अख्या
श्रीमंतांची संपत्ती आेवाळून टाकताे.
मग मी ही इरेलाच पेटलाे
मी म्हणालाे गरीबी ही जगाची मेव्हणी आहे.
चल मी पण गरीबांची अख्खी गरीबीच तुझ्यावरून
आेवाळून टाकताे.
आणि स्वाभिमानाचं काय रे ताे तर राहीलाच ना
यावर काे म्हणाला चल बिझनेस स्ट्रँटेजी
म्हणून मी ताे ही तुझ्यावरून आेवाळून टाकताे.
आता तुझं बाेल.
आता माझा चेहरा थाेडासा पडला
मी म्हणालाे मी हरलाे
मी नाही देणार त्यांचा स्वाभिमान
कुठल्याही किंमतीवर......
कारण हीच एक गाेष्ट अनमाेल आहे त्यांच्याकडे
ते ती कधीही गहान टाकत नाही
अगदी जीवघेण्या मजबूरी शिवाय.....
मी त्याच्याकडे पाहीलं
त्यानी माझ्याकडे पाहीलं
आणि मान खाली घातली
अन् पाठमाेरा हाेवून चालू लागला
पराजिता सारखा........
शिवदास दाेंदे
१५/०४/२०२०
29) कविता
तू ,मी ,आणि संसार
तू ये
मी वाट पहाताे,
तू स्फुर्र
मी कल्पिताे,
तू ठेका धर
मी ताल लावताे
तू शेक
मी जाळ धरताे,
जरी तू काेमेज
तरी मी फुलविताे,
तू ढिल दे
मी उडविताे,
तू रूस
मी मनविताे
तू मागून तर बघ
ताजमहालही देताे,
तू फक्त बस
मी बघ संसाराची गाडी कशी हाकताे.
शिवदास दाेंदे
दि. ०५/०५/२०२०
28) _*मनुष्यस्वभाव *... विज्ञान कितीही प्रगत असो पण निसर्गनियमा पेक्षा मोठे नाही ..व निसर्ग नियम म्हणजे काय? तर अनाकलनीय अज्ञात शक्ती म्हणजे सुप्रिम पॉवर या पॉवरलाच आपण देव ईश्वर गॉड अल्ला म्हणु या... व याच ईश्वराने हि सृष्टी तयार केली जीव जंतु वृक्ष प्राणी निर्माण केले.. या सर्व निर्माण जिवात मणुष्यजन्म श्रेष्ठ आहे कारण परमेश्वराने विवेक व बुद्धी मनुष्यप्राण्याला बहाल केली.. व अनंतकाळापासुन याच बुद्धीच्या जिवावर मनुष्य प्राण्याने संपुर्ण सृष्टीवर अधिराज्य केले व अनंत काळ करत राहणार... इतर प्राण्यांना कोणत्या न कोणत्या अवयवाची कमी ठेवली मात्र मनुष्यास सर्व अवयवासह परिपुर्ण करुन पंचेंद्रिय व सहावे मन व बुद्धीचे वरदान दिले...याच सोबत काम,क्रोध, मद ,मोह ,मत्सर व अहंकार असे षडविकारही दिलेले आहेत ...या सर्व गुण अवगुणासह मनुष्य आपले आयुष्य जगत असतो... हे सर्व इंद्रीय , गुण , विकार या देहाच्या ठायी असते त्यास आपण काया , शरीर असे म्हणतो व या शरीरात चैतण्य आहे म्हणजे शरीर सजिव आहे त्यास आत्मा असे म्हणायचे व त्याच सुप्रिम पॉवर अर्थात परमात्म्याचाच अंश हा मनुष्य प्राण्याचा आत्मा आहे... व त्या विधात्याने आपल्याला या भुतलावर जन्म दिला या मानव जन्मात आपली भुमिका वठवणे यासाठी ज्या काही क्रिया मनुष्य करतो त्यास आपले कर्म म्हणायचे ...व कर्माप्रमाणे आपली गती सदगती दुर्गती ठरते... जन्माला येणारा मनुष्य हा एकटाच येतो व जाताना ही त्या अंतीम प्रवास एकट्याचाच असतो परंतु आयुष्य जगताना वरील षडविकाराने मणुष्य ग्रासलेला असतो .. मनुष्य मग स्त्री असो वा पुरुष त्याचे अस्तित्व हे स्वतंत्र असते.. सर्व इंद्रीय व विकारासह मन बुद्धीने त्याच्या वागण्यास आपण त्याचा स्वभाव ठरवतो ... प्रत्येक व्यक्ती हि भिन्न स्वभावाची असते ..कोट्यावधी संख्या असु द्या स्वभाव मात्र भिन्नच असतात ...चेहरे व व्यक्तीमत्वही भिन्नच असते ...साम्य असते पण समान नसते...जो तो आपल्या स्वभावा प्रमाणे वागतो... म्हणुन आपण त्याला मनुष्यस्वभाव असे म्हणतो... स्वभावात वरील ज्या विकाराचा प्रभाव जास्त त्यास आपण त्या स्वभावाचा म्हणतो.. जसे अहंकार असेल तर अहंकारी , क्रोध असेल तर क्रोधी इत्यादी... प्रत्येक मनुष्य हा स्वतःला काही असामान्यच समजत असतो... त्याचे जिवन एक पुस्तक असते,एक कथा कादंबरी असते तोच त्याचा संपुर्ण महानायक असतो व त्याला वाटते की मी स्वयंपुर्ण आहे ..मीच नायक आहे... हिरो आहे ..मनुष्यप्राणी संसारात वावरताना ज्या काही सभोवतालच्या गोष्टी पाहतो अनुभवतो त्यात तो स्वतःलाच अनुभवतो...समोर जे आहे ते मीच आहे असे त्याला वाटते ..जे चांगले घडते ते घडवणारा मीच आहे असेच त्याला वाटते..प्रत्येकाच्या भुमिकेत मनुष्य शिरतो..समोरचा विद्वान असेल महात्मा असेल तर क्षणभर त्याला वाटते मीच तो आहे समोरचा नेता,अभिनेता ,साधु,कलाकार शिक्षक ,गुरु,खेळाडु,वैज्ञानिक, लहान मुल,वृद्ध तरुण वक्ता श्रोता गायक संगीतकार अशा अनेकानेक व्यक्तीमत्व पाहताच मनुष्य प्रथम त्यात शिरतो व स्वतःला समोरचा आहे जे माझे नेत्र पाहत आहे तो मीच आहे असेच प्रथम त्याला वाटते तदनंतर तो भानावर येतो व मग आपले अस्तित्व पारखू लागतो यालाच मनुष्य स्वभाव म्हणतात... मनुष्य हा राजा असो का रंक त्याला स्वतःच्या आगळेपणाचा मी पणाचा अहंकार असतोच...व या मी पणाचा म्हणजे अहंकाराचा वारा अंगी शिरला तर इतर दुर्गुण विकारही मणुष्यावर हावी होउ लागतात...व त्यानुसार मानसाचा स्वभाव रंग बदलु लागतो... त्याच्या स्वभावाप्रमाणे वागणाऱ्या कृतीला प्रवृत्ती म्हणतात या प्रवृत्ती सत्वगुण रजोगुण व तमो गुणात्मक असते... मनुष्यप्राण्याच्या सर्व इंद्रिये विकार मन बुद्धी व त्रिगुण प्रवृत्ती या सर्व घटकान्वये करणारे आचरण म्हणजे मनुष्य स्वभाव ..व या सर्वांवर मात करुन जगणारा असतो स्थितप्रज्ञ पण स्थितप्रज्ञ होणे एव्हढे सोपे नसते... सर्व विकारावर तारतम्य बाळगुन मनबुद्धीचा वापर करुन आचरण केल्या मानुस सज्जन होतो ...सर्व विकारांवर मात देउन सुंदर जिवन सात्वीक जिवन जगायचे असेल तर सत्संग असणे आवश्यक आहे..सत्संगाने मानसाचा स्वभाव बदलतो ...जिवन सार्थक होते... म्हणुन सत्संग म्हणजे सज्जनाशी संग कायम असावा ...अहंकार नसावा इतरांच्या यशावर त्याच्याही पेक्षा आपल्याला अंतःकरणातुन आनंदाचा झरा निर्माण होत असेल तसेच इतरांना होणाऱ्या दुःखामुळे आपल्या ह्रदयाला पीळ पडत असेल तर समजावे की आपला स्वभाव निश्चितच चांगला आहे ...* माझ्या सर्व सत्संगीना समर्पित शुभरात्री !🙏🏻_
27) *_शुभेच्छा!! महिला दिनाच्या.._*
जगत आली दुनियेसाठी,
पण स्वत:साठी कधी जगलीच नाही,
*भरत आली पोट दुसऱ्यांची, त्यावेळेस ही उपाशीच राहीली..*
महान त्यागाची ही मुर्ती,
हिच्यापुढे सारे शुल्लक ठरती,
*बांधुनी धरण आसवांसाठी, टिपुसही कधी झिरपला नाही..*
सर्वांनी शोधला स्वत:मधला स्व:, हीचा स्व: कुठे दिसलाच नाही,
*जगत आली सर्वांसाठी ही आई, पण स्वत:साठी कधी जगलीच नाही..1..*
माय बापाच्या अंगणातली, होतीस तू परी राणी,
*जशी जुळली गाठ संसाराशी, तशीच सगळ टाकून गेली..*
जन्मापासून मोह माहेरचा, होता जरी तुझ्या उरी,
*ओढत होत बंधू प्रेम, अन् वाहत होत्या आसवांच्या सरी..*
ओसाड करुनी बापाच ताजमहल, दिल्या घरी क्षणात विरघळली,
*जगत आली सर्वांसाठी ही ताई, पण स्वत:साठी कधी जगलीच नाही..2..*
गजर लावी पहाटेचा, जरी निशेला उशिरा निजली,
*करी सडा-सारवण अंगणाची, सारे कुटुंब उठण्याआधी..*
सासु सास-र्यांची करी शुश्रुषा, सख्या लेकरावानी,
*घरी नांदती सौख्य –शांती, हीच्याच पुढाकारानी..*
कुटूंबाची करी रखवाली, तहाण भूक विसरुनी,
*जगत आली सर्वांसाठी ही सुनबाई, पण स्वत:साठी कधी जगलीच नाही..3..*
करुनी घरकाम सारं, ही ऑफीसही सांभाळी,
*वरिष्ठांनी दिलेली निर्देश, ती तंतोतंत पाळी..*
कधी ना थकली, कधी ना खंगली.. स्वत:स महिला समजुनी,
*पुरुषांच्या खांद्याला लावूनी खांदा, ती सर्वांपुढे निघाली..*
आकाश-पाताळ करुनी एक, पादाक्रांत केली यशोशिखरे सारी,
*जगत आली सर्वांसाठी ही ऑफीसीनताई, पण स्वत:साठी कधी जगलीच नाही..4..*
साता समुद्रापार पोहचली, किर्ती महिलांची,
*सारे झुकती तिच्या चरणी, अशी तिची महती..*
आहे ती सरस्वती, आहे ती लक्ष्मी,
*कराल अवमान तिचा, तर होईल ती महाकाली..*
कश्याला म्हणतो शहाण्यांनी, मारावी कुऱ्हाड आपल्याच पायी,
*सत्य हेची सांगतो महिला दिनी, हिच आपली भाग्यविधाती..5..*
_-शशिकांत गोपाळकृष्ण आक्केवार, चंद्रपूर_
26) *तिला आवडणारा पाऊस*
तिला आवडतं पावसात भिजायला.
मला आवडतं असं तिला भिजतांना बघायला....
तिचं चिंब भिजणारं ओलेपण..
माझं कोरडं रितेपण विसरायला होतं मला...
ती ओंजळीत पाऊस घेऊन चुंबत राहते..
ती स्वतःभोवती गिरकी घेवून हळूच उडी मारते...
तिच्या देखण्या गो-या पायातील पैजण-घुंगरू हळूवार वाजत असतात...
अलगत टिपत असते ती, आपल्या ओठावर पाऊस थेंब...
कोणी बघत नाही असं बघुन ती चिकटलेल्या साडीला,पदराला झटकून घेते....
पाऊस असा वेडा झालेला..
तिच्या भोवतीच पिंगा घालतो..
माझी नजरही अशीच, हटत नाही..
मला तिला डिस्टर्ब करायचे नाही...
साठवून ठेवायचे आहे डोळ्यात...
डोळ्यातून हलकेच उतरत जाईल ती,काळजात.
.....डीडी.
25) 🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼
*वाढदिवस...*
🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼
दररोज कमी होणाऱ्या दिवसाची,
*चिंता इथे कुणाला?*
प्रत्येक जीव हपापलेला इथे,
*आहे तो क्षण जगून घ्यायला...*
तीन दिवसांचं आयुष्य,
*बालपण,तरुणपण, म्हातारपण...*
कधीतरी विझेल पणती,
*संपेल अचानक हे जीवन...*
नशिबी आलेल्या क्षणांना,
*आता फक्त जगून घ्यायचंय...*
आपल्याच आयुष्याच्या वजाबाकीला,
*आपल्या माणसांसोबत साजरा करायचंय...*
पेटवलेल्या मेणबत्त्या विझवून,
*खरंच कुठलं सार्थक होत असेल?*
अगणित पणत्या लावाव्यात अंगणी,
*बघा मनाला किती आनंद होत असेल...*
वाढदिवस म्हणजे,
*जीवनाच्या प्रवासातील एक वळण...*
प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा,
*प्रत्येकाला आवडतं फक्त त्याचं जीवन...*
*संतोष मते...*✒️
(औरंगाबाद)
🌼🌸🌹🌸🌼🌹🌸
24) 🟪🟩🟪⬜🟪🟩🟪
*अभंग लेखन उपक्रम*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*।।आम्ही वारकरी।।*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सावळा तो हरी। उभा विटेवरी।।
चंद्रभागा तीरी। कलियुगी।।१।।
भक्तांचा तो मेळा। येतो दर्शनाशी।।
हीच आम्हा काशी। वारकरी।।२।।
चटणी भाकरी। अमृत आम्हासी।।
व्रत एकादशी। भागवत।।३।।
टाळ,विणा,टाळी। साधना आमची।।
पुण्याई वारीची।सालाबाद।।४।।
कपाळाशी बुक्का। तुळशीचे पानं।।
आम्हासी भूषण। संता म्हणे।।५।।
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
।।संतोष मते।।
➖➖➖➖➖➖➖➖
23) माणसाला माणूस लागतो हे आता समजायला लागलंय .....
प्रत्येक गोष्टीला अर्थ असतो, परिपूर्ण सगळेच नसतात, कमतरता प्रत्येकात असते, पण हे कोणीच मान्य करत नाही.अपूर्ण हे सुद्धा एक अस्तित्व असतं,
म्हणून ,
अपूर्ण समूळ अदृश्य बनून राहण्याआधी,
प्रत्येकाने स्वतः आणि दुसऱ्याची काळजी घ्यावी
दृष्टिक्षेपात असेपर्यंत
सर्वच निघून जाण्याआधी...!!!
मी च का करू ? हा अहंम् हाच एक नात्यातील दुवा संपवायला टपलेला असतो .
आणि आजचे दिवस मृत्यू ची झडप घालायला तरबेज झाले आहेत .!
मृत्यू सहज झाला आहे .!
so ....
चिंता सोडा ,काळजी घ्या ....
🌹🌹. मोसिक ए.आर. 🌹🌹
22) लिहावा शब्द, वाचावा शब्द
ओळखावे शब्द भावभावनांचे
शब्दांचीच आण, शब्दांचे बाण
करिती वार मनावरती,
घ्यावा शब्द, द्यावा शब्द
पाळावा शब्द जीवापाड.
--
विनायक जोशी लातूर.
21) 💫वर्षातील जुन महिना म्हणजे पावसाळ्याच्या आगमनाची प्रतिक्षा…याही वर्षी जुन चालू झाला…आकाशात मेघांचे आगमन झाले आणि त्याचप्रमाणे अनेकांचे मनामनात अकल्पित विचारांचे मेघही जमावेत असे विचार शब्दरुपाने जणूकाही जमा होऊ लागले…चातकास वर्षा ऋतूच्या आगमनाची जशी चाहूल लागते त्याचप्रमाणे या गद्य आणि पद्य प्रकारातील बरसातीत मनोमन चिंब भिजण्यासाठी भुकेलेल्या चातकाने साद दिली…सर्वांसाठी एक व्यासपीठ स्थापून मनातील भावभावनांना शब्दरुपात बंदिस्त करुन इतरांना त्याची मेजवानी पेश करण्यासाठी आवाहन केले…
आणि मग स्वच्छंदपणे शब्दसुमनांची बरसात व्हावी तद्वत मनातील भाव कविता लिखाण यातून बरसू लागले…मेघांनी भरुन आलेल्या नभामध्ये मधेच विजांचा कडकडाट होताना दिसणारे दृश्य कसे असते त्याप्रमाणे एखादे काव्य वा लेख प्रकाशमान होताहेत… या शब्दरचनांच्या मुक्त सरींवर सरी बरसू लागल्या आहेत…त्यांची अनुभूती घेताना मन आनंदाने रोमांचीत होत आहे… या शब्दवर्षावाच्या सरी बरसताना इंद्रधनूप्रमाणे त्यामध्ये होणाऱ्या विविध रंगाच्या (विचारांचा) मनमोहक उधळणीचा आल्हाददायक भास होत आहे…आता या वृष्टीमुळे ओहोळ नद्या दुथडी भरल्यानंतर वाहतात तश्या नक्कीच वाहू लागतील…मुक्त वाहणाऱ्या पाण्याला बांध घालून बंदीस्त करण्यासाठी जसा बंधारा घातला जातो आणि पाण्याची साठवण करतानाच एका उंचीवरुन त्याला प्रवाहीत करुन मळे फुलवले जातात… अगदी तसेच येथे शब्दांना या *शब्दबंधाऱ्यात* बंदीस्त करुन, त्यांची मात्तबर मान्यवरांकडून समिक्षा होताना ऊंची वाढवून मळे फुलतील असेच मला मनोमन वाटते…
☆◆○ आदिनाथ द. रावळ, पुणे..
20) *अपेक्षाभंग...*
माणसाचं जीवन हे गुंफलेलं असतं त्याच्या नात्यांसोबत... ज्यावेळेस नात्यांचे बंध जुळतात विचार जुळतात, साहजिकच त्यातून एकमेकांना मदत करणे, एकमेकांच्या भावनांचा विचारांचा दुःखांचा व सुखांचा विचार करणे हे आलंच... त्यासोबतच येतं अपेक्षांचं ओझं... ज्यावेळेस आपण कुणासाठी काहीतरी करतो.. साहजिकच अपेक्षा इतकी असते की, सुखात नव्हे परंतु आपल्या दुःखात तरी त्या व्यक्तीने एक हलकीशी फुंकर आपल्या जखमेवर घालावी... लेकरांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपण्यामागे आई-वडिलांची अशी अपेक्षा इतकीच असते की, त्यांनी म्हातारपणी आपल्या काठीचा आधार व्हावा... ज्या मुलीच्या आयुष्यासाठी बापाने आयुष्यभर सावकाराकडे गुलामी केली त्या बापाची अपेक्षा असते की आपल्या मुलीने खूप मोठं होऊन नाव करावं... तीच मुलगी ज्या वेळेस तिच्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेते.. स्वतःच लग्न करुन कुणासोबत तरी संसार थाटते.. त्यावेळेस तो बाप काय अपेक्षा ठेवू शकतो...?तो बिचारा तेव्हा जिवंत असुनही मेलेला असतो...अशा एक ना अनेक घटना समाजात नित्य घडत असतात.. त्यातून शेवटी एकच दिसून येतं... की अपेक्षा कुणाकडूनही ठेवू नये.. कारण अपेक्षा ठेवली की *अपेक्षाभंग* हा निश्चितच होणार असतो...
हे आज-काल जणू काही जीवनाचं तत्त्वज्ञान बनत आहे.
*_©️®️संतोष मते...(औरंगाबाद)*
19)
*आई*
आई मायेची सावली, प्रेमाची किनार
जिच्या आशीर्वादाने काटेरी संकट पार!
जिच्या मायेच्या स्पर्शाने दुःख हे तिळमात्र !
आई म्हणा कोणी म्हणा माय
माझ्यासाठी ती वासराची गाय!
माझ्या तिच्यातलं नात जणु शांत , कोमल, अधीर
तिच्या कुशीत प्रेमाचा अथांग सागर!
माझा स्वभाव अबोल विरक्त परी तिची
दृष्टी ठाव घेते अंतरंग!
असे मायारूपी तुझा आशिर्वाद
नलगे द्वारका काशी आणि पंढरपूर
आहे माझ्या द्वारी उभी हिच विठूमाऊली सकळ
न लागे पुन्हा काही फक्त असू दे ग आशीर्वाद
फक्त असु देग आशीर्वाद!!!!!🙏
हेमंत म. बुरडकर, चंद्रपूर
18) *शब्द नसतात केवळ शब्द...*
फुलपाखरा सारखे असतात अलवार.
तर कधी तलवारी सारखे धारधार..
शब्द असतात कधी गुळगुळीत...
यथार्थ परिणाम न साधणारे..
प्रेमाचा स्पर्श शब्दाला असला तर.. टचकन पापणी ओली करणारे.
शब्दाची हाक दुरवर पोहचते..तर,
कधी शब्द कानापर्यंत पोहचूनही, माणूस आणि माणूसपण दूरच राहते..
शब्दांनी शब्दांना एकत्र गुंफावे..
आणि शब्दांच्या प्रांगणात,
शब्दांनी,हसावे, खेळावे, बागडावे, स्वछंदी आनंदाने...
*शब्द नसतात केवळ शब्द..*
डीडी..01072021
17) *शब्द*
शब्द शब्दांचा खेळच मोठा
कधी होऊनी मायेचा उबारा
देतात मनाला छायेचा किनारा!
कधी शब्द विश्वासाचा ठेवा
पाळतो त्याचा सन्मानच खरा!
कधी शब्दा शब्दांनीच शब्द वाढतो
अन् मना मनाला छेदच देतो!
कधी शब्द आधार होतात
खचलेल्या मनाला उभे करतात!
कधी शब्द तिरकस होतात
टोमणा म्हणून बदनाम होतात !
कधी शब्द कवितेत गुंफतात
अंतरंगातील भावनांना वाट देतात !
कधी शब्द शुभेच्छा रुपी गुलदस्त्यात सजतात
अन् कौतुकाचा सोहळा करतात !
कधी शब्द रुसून बसतात
गोबर्या गालात फुगुन बसतात!
कधी शब्द विनोदात शिरतात
अन् हास्य रसांचे भुईनळे उडवतात!
शब्द शब्दांची नवलाई मोठी
पारख होते व्यक्ती बुद्धी आणि ज्ञानाची !
हृदय मन शून्य शब्द
ज्याच्या ओठी बरसतात त्याचेच होऊन जातात
म्हणूनच शब्द शब्दांचा खेळ असा
वापरील जसा तसा फिरेल वसा कारण
शब्द घेतात मनाचा ठाव
अन् शब्दच करतात काळजाला घाव!!!
स्वाती डोकबाणे
16)
शीर्षक : एक दिवस...
पावसाच्या हिशोबान, केली व्हती शेती,
दगा दिला त्यानं, अन् मायी झाली फजिती,
डोळ्याला न लागे डोळा, वाटे भीती उधारीची,
सावकारी पाश व्हता, माया गळ्याभोव्हती,
फिरले दिवस अंधाराचे, रात्र वाटे सैतानाची,
कसं जगू - कसं मरू, जत्रा भरे इचाराची..1..
फाटकी बनियान बापाची, अन मायचे तळपायही,
अजूनही बहिणीच्या वयाचे, वझे मज खांद्यावरी,
कसं करू हलाखीची, सावरा-सावर सगळ्यांपरी,
वाढे दिवसागनिक गोंधळ, माया नाचे काळजावरी,
खीपले जणू तळहाताच्या फोडाचे, जाहले चिघळूनी,
व्हता इलाज न कुठला, तरी आस व्हती अंतर्मनी..2..
बोगस जीवन माणसाचे, त्यापरी बरी जनावरे मुकी,
पैसा, अडका, मोह, माया नसती त्यांच्या नजरेमधी,
अडाणीपणा नडला सारा, गुंतलो ग्रहांमधी,
राहू, केतू, शनी, मंगळ, वाट अडवी मनामधी,
विश्वास घातकी आपुलेपण, खंजीर खुपला पाठीमंधी,
इलाज शेवटचा म्हणुनी, लटकुनी गेलो दोरखंडी..3..
घेता श्वास मज शेवटचा, हंबरली ढवळ्या पवाळ्याची जोडी,
साद घालुनी म्हणाली मजला, सोडू नका डाव अर्ध्यावरी,
कुटन झाले जग तरी, आम्ही मालकाचेच सोबती,
हिम्मत आली, धडकी फिरली, दोर गेला निसटूनी,
फेकुनी दोर, पळत सुटलो हंबरत्याच्या दिशेनी,
डोई पुढं पाह्यलं आज, सोताला तरफडत मरतानी..4..
- शशिकांत गोपाळकृष्ण आक्केवार, चंद्रपूर.
15) ➖➖➖➖➖➖➖
*धुळपेरणी....*
➖➖➖➖➖➖➖
वैशाखाचा महिना संपत आला की, मृग नक्षत्राची चाहूल लागते... पाऊस चांगला बरसेल याच आशेवर मी सुरु करतो धूळपेरणी...! काळ्या मातीच्या कुशीत मी बियाणे टाकतो... आणि आशाळभूत नजरेने दूरवर ढगांकडे पाहत राहतो... कधीतरी वीज कडकडून जाते.. आभाळ भरून येतं...कधीतरी हलक्या सरी बरसतात आणि मनाला उभारी देतात... दूरवर दिसणार्या डोंगरावर पाऊस मनसोक्त बरसून जातो... आणि माझं शिवार तसंच कोरडंठाक... तरी मी विठोबाच्या आशीर्वादाची वाट पाहतो.. आमचा विश्वास आहे की आषाढीला तरी नक्कीच मनसोक्त पाऊस येईल... बघता बघता मृग संपून जातो... आणि मग काळजात सुरू होते कालवाकालव... छानसं अंकुरलेलं बियाणं.. मान टाकायला लागतं... पुन्हा मी विहिरीतून पाणी काढून थेंब थेंब पाण्याने त्याला जगायचा प्रयत्न करतो... आणि माझा केविलवाणा प्रयत्न करत पुन्हा हरतो की काय असं वाटत असताना... खरंच एक दिवस धो-धो पाऊस येतो.... मनाला आनंद होतो... पिक जोमानं वाढतं... यावर्षी मुलीचे हात पिवळे करावे या स्वप्नात मी रंगतो... फाटलेला सदरा शिवून त्याचे आभार मानायला विठोबाच्या मंदिरात जातो... सर्व काही ठीक चालू असतांना दिवाळी जवळ आलेली असते... रानात पिकं जोमदार बहरलेलं असतं... परतीच्या पावसाचे वेध लागलेले असतात... अचानक एक दिवस डोंगराच्या पलीकडून तुफान पाऊस येतो... काही मिनिटातच गारांच्या सडा अंगणात पडतो... शेतात पिकवलेलं पांढरं सोनं भुईसपाट होऊन जातं... मातीत बांधलेलं माझं घर... पुराच्या पाण्याने भरलेल असतं... चिंता उभी राहते आता काय करायचं... मुलगी, शिक्षण, सावकार, बायको, कर्ज,बायको, आजारपण,..... डोक्यात विचारचक्र सुरू होतं.... रात्री जमिनीला पडलो असतांना अचानक जीवन संपवून टाकावं असा विचार मनात येतो... पण वयात आलेली लेक अन् मास्तरांनी शाळेत शिकवलेला तो *कणा* पुन्हा आठवतो... रात्र कधीच संपून गेली कळत नाही... पण सकाळी पुन्हा जोमाने उठून विठ्ठलाचं दर्शन घेतो... आणि माझ्या दोन सवंगड्यांसह रब्बीची तयारी करण्यासाठी शेताचा रस्ता धरतो... आणि माझ्या मनाच्या शेतात पुन्हा एकदा सकारात्मक विचारांची पेरणी करतो...
➖➖➖➖➖➖➖➖
*_संतोष मते...(औरंगाबाद)*
➖➖➖➖➖➖➖➖
14) माझी शाखा चित्र शाखा
कुणी म्हणे चित्र शाखा,
कुणी म्हणे रेखा शाखा।।
ह्या शाखेत काम करणारा,
भ्रष्टाचारावाचून नामानिराळा ।।
सुबकता असे ज्यांच्या अंगी,
ह्या शाखेचा तोचि सारथी।।
खिश्यात पेन्सिल सदैव राही,
जरी नसे दमडी काही।।
मीटिंग असो कुठलीही,
ह्यालाच साहेब प्रथम बोलवी।।
शब्दाला ह्याच्या किंमत भारी,
साहेबांच्या राज दरबारी।।
तरबेज असतो साऱ्या कामात,
म्हणूनचि साहेब घेई सानिध्यात।।
साऱ्यांच्या डोळ्यात हेचि खुपती,
म्हणे हमाली कामासाठी ह्यांची भरती ।।
सारे जळती त्याच्यावरी,
म्हणती मिरवतो बॉसगिरी।।
कधीना बोले कुणी तोंडावरी,
बोले सारे माघारी।।
तमा न बाळगे,
ह्या बोल घेवड्यांची,
ऐटीत सांभाळी,
खुर्ची चित्र शाखेची।।
जगतो पगाराच्या भरोशी,
निजतो नित्य सुखसमाधानी।।
म्हणुनीया राही सुदृढ प्रकृती,
जरी तो गाठे पंच्याहत्तरी।।
ना कुणाच्या पापाचा भागीदारी,
ना असे कलंक कुठलाही।।
जैसी करणी वैसी भरणी,
म्हणूनिया निघे ह्यांची मुले गुणी।।
चित्र शाखा अशी माझी,
ईथे माणसे मिळे स्वाभिमानी।।
परंपरा इथली संस्काराची,
मिरवी साता समुद्रापरी।।
ー शशिकांत गोपाळकृष्ण आक्केवार, चंद्रपूर.
13) हळवं मन, पिवळ उन्ह.
सोसेल का रे जीवा...
देठाहूनी विलगले मज.
झेपेल का रे जीवा...
कुणी जाई देवा चरणी, कुणी मातीमोल.
आयुष्याचे अंती उरले, फक्त कोमेजलेपणा ...
सोडेल साथ सुगंध ही, मजला कोण उरला...
पाखळीचा रंग तेवढा, शोभून दिसतो फुला...
म्हणुनी माझी आर्त हाक ही, सांगतो रे तुला.
काही नको मज आयुष्याला, सद्गती देगा देवा...
- शशिकांत गोपाळकृष्ण आक्केवार, चंद्रपूर
12) हळवं मन, पिवळ उन्ह.
सोसेल का रे जीवा...
देठाहूनी विलगले मज.
झेपेल का रे जीवा...
कुणी जाई देवा चरणी, कुणी मातीमोल.
आयुष्याचे अंती उरले, फक्त कोमेजलेपणा ...
सोडेल साथ सुगंध ही, मजला कोण उरला...
पाखळीचा रंग तेवढा, शोभून दिसतो फुला...
म्हणुनी माझी आर्त हाक ही, सांगतो रे तुला.
काही नको मज आयुष्याला, सद्गती देगा देवा...
- शशिकांत गोपाळकृष्ण आक्केवार, चंद्रपूर
11) शीर्षक : शब्द बंधारा
नावारूपास आला, हा शब्दबंधारा गाव..
लेखणी रुपी पाखरांची, किलबिल असेल सदैव..
शब्दांचे करुनी धन, चला उधळवूया अपार..
लेखणी धरुनी सारे, मनी फुटला की हो बार..
लिहती जरी एक, मिळतील दाद अनेक..
शब्दांची सजती मैफिल, आभार मानतो प्रत्येक..
धन्यवाद करपे सरांचे, स्थान दिले मजला वेशीत..
वाटे हक्काचे हे घरटे, मन रमे शब्द बंधाऱ्यात..
नावारूपास आला, हा शब्दबंधारा गाव..
लेखणी रुपी पाखरांची, किलबिल असेल सदैव..
- शशिकांत गोपाळकृष्ण आक्केवार, चंद्रपूर.
10)
प्रेमाचे दुःख काळजात
माझ्या सलू लागले
माझेच काटे मला
आता टोचू लागले.
लग्नाचा गुलाबी बहर
उतरल्यानंतर सारेच
संसार संसार म्हणू लागले
संसारही व्यवहारी होऊ लागले
बेकार होतो जरी ही
बहु होता हुन्नर तरीही
जग माझ्यावर हसु लागले.
कतॄत्वाने माझ्या उचल घेता
जीवन माझे पलटू लागले.
मग गूळाच्या ढेपेला मुंगळे चिकटू लागले.
मित्र परिवार झाला बहुत
मैफीलीचे मेळे भरू लागले.
दिल दोस्ती दुनियादारी म्हणू लागले.
मी चळवळीच्या रथात बसता
घोडेच रथ सोडून पळून लागले.
चळवळीचे अस्तीत्वच धोक्यात येवू लागले.
जीवन संपता माझे
विल्हेवाट लावता त्यांनी
आठवणीत माझ्या ते जेवू लागले.
प्रेमाचे दुःख काळजात
माझ्या सलू लागले
माझेच काटे मला
आता टोचू लागले.
शिवदास दोंदे
दि. २४/०२/२०२१.
9)
_*जीवन*_
*सकल जिवनात सुरू असतो संघर्ष।*
त्याविना मिळत नाही कुणालाही हर्ष।।
*कुणी असतो बेकार, तर कुणी कौटुंबिक त्रस्त।*
सांगायला मात्र सगळेच सांगतात, आहे मी मस्त।।
*कहाणीत असते सगळ्यांच्या, थोडा अधिक क्लेश।*
पण ते सगळं सोसून, जीवन जगत असतो शेष।।
*तीन दिवसांच आयुष्य, बालपण - तारुण्य - म्हातारपण।*
सगळं काही उपभोगून सुद्धा, नाही उद्धार विना समर्पण।।
*- श. गो. आक्केवार, चंद्रपूर*
8) *कविता*
कविता! छान पैकी वाचून झाल्यावर,
तितकीच छान घडी घालून ती,
ठेवायची असते खिशात ..जिथे हृदय जवलच असतं तिथे.
कविता नसते रेल्वे तिकीट वा एस टी चं, प्रवास झाला की, टाकून द्यायला...
कविता नसते किराणा मालाची यादीही पुन्हा-पुन्हा जिन्नस मोजून पिशवीत भरण्यासाठीची..
कविता असते जणू एक Doctor's perception जपून ठेवावंअसं..
जेव्हा-जेव्हा अस्थिर, अस्वस्थ, मन उदास-बैचन होईल तेव्हा-तेव्हा वाचून काढावी..
सकाळ-दुपार-संध्याकाळ-रात्री..जेवणाआधी-जेवणानंतर वगैरे...
कविता असते छोट्या-मोठ्या आजारावरची अस्सल गोळी-औषध..
अख्ख झाड नाही ठेवता येत खिशात..
कवितेच झाड, अगदी बहरलेली फुले असलेलं ठेवू शकतो खिशात..
नाचरा मोर, कोकीळ कुहू-कुहू, चिवचिव चिमणी..बसून राहतात खिशात कवितेच्या पानावर..
सारं विश्व कविता लेवून सजते,
कवीचे जग लेवून सजते.
कविता असते एक प्रेयसी, कायम सोबत करणारी प्रवासातल्या कुठल्याही वळणावर...
*कवी कधीच एकटा नसतो*
......डीडी..19240712202001
7) *दाद ही दादअसते*
हृदयात प्रेरणा रुपी स्त्रोत निर्माण करणारी साथ असते
दाद ही दादअसते
हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवाव असं पान असते*
दाद ही दादच असते
ज्ञान रूपा कडून मिळालेली कलेची कदर असते
दाद ही दाद असते
सर्व श्रेष्ठ असूनही कलेचा सन्मान असते
दाद ही दाद असते
कलाकारांच्या शृंखलेत मिळालेले एक स्थान असते
दाद ही दाद असते
आनंद रूपाने ,बहरून सोडणार झाड असते.
दाद ही दादच असते
निरलस मनातून मिळालेली ती एक साद असते
दाद ही दाद असते.....नवोदित कलाकाराला मिळणारी नवसंजीवनी असते....नवसंजीवनी असते
स्वाती डोकबाणे
6) बाप नावाचा माणूस
स्वतःसाठी नाही जगला
शेवटचा श्वासही तो मुलांसाठीच जगला!!!
पडता आजाराच्या विळख्यात
चेक वरील सही साठी
सराव रात्रदिसाचा केला
धडपड बघता बापाची
पाट अश्रूंचा वाहीला !!!!!😭
चेतना हरवलेला बाप
अंथरुणात खिळला
"बाबा" हाक पडता कानी
हुंकार त्याने भरला
पंचप्राण एकवटून त्याने
क्षण सुखाचा अनुभवला
मरणाच्या दारात त्याने
हात हातात लेक जावयाचा घेतला
नजरे च्या इशारे त्याने
विचार मुलांचा च केला
बाप नावाचा माणूस असा कसा जगला
शेवटचा श्वासही तो मुलांसाठीच जगला!!!
मात्र आयुष्याच्या संधी काळी
बाप संवादासाठी तरसला
किमान अपेक्षा साठी तो नेहमीच दडपला
बाप नावाचा माणूस ,राजासारखा जगला
पैशासाठी तो पोरांवर नाही विसंबला
शेवटच्या क्रियाकर्माचा विचारही त्याने जिवंतपणीच केला !!!
बाप नावाच्या माणसापुढे
देवही एक घर मागे पडला
बाप फक्त सगळ्यांच्या सुखासाठीच झटला
बाप नावाच्या माणसाचे
काव्य चित्र मी रेखाटले
मंदिरातले देव आता मी कधीच दूर सारले
हृदय मंदिरात मी माझ्या बापाला पुजले
हृदय मंदिरात मी माझ्या देवाला पुजले!!!!!!!
स्वाती डोकबाणे
1) श्रीमती स्वाती डोकबाने , महिला प्रतिनिधी, केंद्रीय कमिटी यांनी सादर केलेले त्यांचे कलाकौशल्य
2) श्री. देविदास ( डि डि ) जाधव,नाशिक जिल्हा कार्यकारणी , कोषाध्यक्ष ( मोबाईल क्रं. 8087834449 ) यांचा कवितासंग्रह आवर्जून वाचावा असा " पूर्वेकडील खिडकी " १ मे २०१७ रोजी प्रकाशित झालेला आहे.
3) श्री. सतीश पारणकर, विभागीय सचिव, बुलढाणा- वाशीम यांच्या काव्यकृती
4) संघटनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आज केलेल्या दोन कविता...
१.....
संघटने...
तूच आमची माय माऊली.
आम्ही तुझी लेकरे.
तुझ्या अंगणी फुललो, फळलो.
मकरन्द ही आम्ही,
आम्ही तुझी पाखरे.
तू प्रतिभे, तूच खरी शारदे.
आमच्या कामात निपून आम्ही,
सुंदर अक्षरांचे धनी आम्ही,
आरेखक सारे..
कलागुणांची तुझीच प्रतीके.
चरण तुझे आज स्पर्शू दे.
एकलव्य आम्ही सारे.
शिलेदार तुझे संघटने.
कार्यास तुझ्या नेऊ तडीस.
लढवय्ये आम्ही,
आम्ही सारे लढू एक निष्ठेने..
.....डीडी..वर्धापनदिन 12/06/2020.
२....कोण आम्ही
(आमची संघटना निव्वळ संघटना नाही तर कलेचा विपुल खजिना आहे..कोण आहोत आम्ही.)
आम्ही चित्रकार, गीतकार, शिल्पकार, लेखक- कवी- साहित्यिक, वक्ते, वादक, गायक आम्ही.
कुणी संगणकाचा असे अधिकारी.
कुणी कुंचल्याचा मानकरी.
कुणी खेळतो शब्दांशी
अन् कुणी टिपतो रंग आकाशीचे.
कुणी शोधी मातीच्या गोळ्यात गजानन.
कुणी लुटतो आनंदाचे पर्यटन.
असे असले तरी,
आम्ही सारे माणूस आधी.
मंदिर,मस्जिद, गुरुद्वारा, चर्च आणिक.
सारे तेथे नतमस्तक.
आमचा धर्म आमची जात...,
फक्त कलेची ही, एक सुंदर वात!
....डीडी वर्धापनदिन 12/06/2020.
कवी: श्री. देविदास ( डि डि ) जाधव,नाशिक जिल्हा कार्यकारणी , ( मोबाईल क्रं. 8087834449 )
2) श्री. देविदास ( डि डि ) जाधव,नाशिक जिल्हा कार्यकारणी , कोषाध्यक्ष ( मोबाईल क्रं. 8087834449 ) यांचा कवितासंग्रह आवर्जून वाचावा असा " पूर्वेकडील खिडकी " १ मे २०१७ रोजी प्रकाशित झालेला आहे.
3) श्री. सतीश पारणकर, विभागीय सचिव, बुलढाणा- वाशीम यांच्या काव्यकृती
१.....
संघटने...
तूच आमची माय माऊली.
आम्ही तुझी लेकरे.
तुझ्या अंगणी फुललो, फळलो.
मकरन्द ही आम्ही,
आम्ही तुझी पाखरे.
तू प्रतिभे, तूच खरी शारदे.
आमच्या कामात निपून आम्ही,
सुंदर अक्षरांचे धनी आम्ही,
आरेखक सारे..
कलागुणांची तुझीच प्रतीके.
चरण तुझे आज स्पर्शू दे.
एकलव्य आम्ही सारे.
शिलेदार तुझे संघटने.
कार्यास तुझ्या नेऊ तडीस.
लढवय्ये आम्ही,
आम्ही सारे लढू एक निष्ठेने..
.....डीडी..वर्धापनदिन 12/06/2020.
२....कोण आम्ही
(आमची संघटना निव्वळ संघटना नाही तर कलेचा विपुल खजिना आहे..कोण आहोत आम्ही.)
आम्ही चित्रकार, गीतकार, शिल्पकार, लेखक- कवी- साहित्यिक, वक्ते, वादक, गायक आम्ही.
कुणी संगणकाचा असे अधिकारी.
कुणी कुंचल्याचा मानकरी.
कुणी खेळतो शब्दांशी
अन् कुणी टिपतो रंग आकाशीचे.
कुणी शोधी मातीच्या गोळ्यात गजानन.
कुणी लुटतो आनंदाचे पर्यटन.
असे असले तरी,
आम्ही सारे माणूस आधी.
मंदिर,मस्जिद, गुरुद्वारा, चर्च आणिक.
सारे तेथे नतमस्तक.
आमचा धर्म आमची जात...,
फक्त कलेची ही, एक सुंदर वात!
....डीडी वर्धापनदिन 12/06/2020.
कवी: श्री. देविदास ( डि डि ) जाधव,नाशिक जिल्हा कार्यकारणी , ( मोबाईल क्रं. 8087834449 )
5) रेखाचित्र संघटनेच्या महिला प्रतिनिधी श्रीमती स्वाती डोकबाने यांनी घटना दुरुस्ती बैठकीच्या शुभारंभी सादर केलेल्या विद्यमान कार्यकारीणीच्या कारकिर्दीचे सिंहावलोकन करता प्रस्तुत केलेली कविता लिखीत स्वरुपात सादर . 💐
कोल्हापूर आमसभेने इतिहास घडवला
सत्तांतराचा मोठा कौलच दिला
अध्यक्ष महोदयांनी फेटा बांधला
मराठवाड्याचा झेंडा रोवला
कार्यकारिणीचा डंका वाजला
उत्साहाचा ढोल धडाडला
परखड वक्ते , टीकाकार सच्चे
ढवळून निघाले वातावरण सारे प्रामाणिकपणा अन मेहनतीचे
इंद्रधनु रंग सजले
सभा अन् , दौऱ्यांचा माहौल सजला
शेगावीच्या पहिल्या सभेने मनाचा ठाव घेतला
अन् , संकेतस्थळाच्या अनावरणा ने
डिजिटल क्षेत्रात प्रवेश मिळवला
सगळ्याच सभा विशेष गाजल्या
धुळे यवतमाळ अन चंद्रपूरच्या सभेने मानाचा तुरा खोवला
पश्चिम महाराष्ट्र दौराही झाला
मनामनातील भडास ओकला, झाला सगळा निचरा
कोकण दौर्यात प्रेमाचे पुकार, विश्वासाची वेगळीच साथ
विदर्भ दौरा यशोशिखर ठरला
संस्थापकाचे दिव्य दर्शन दिधला
निरोप हा आगळाच ठरला, साश्रु नयनांनी निरोप घेतला.
औरंगाबाद बैठक सुवर्ण अक्षरातील पान ठरले
घटना दुरुस्तीच्या कामाचे , नजीर शेख सर शिल्पकार ठरले
यशस्वी करत सर्वच टप्पे
सोडवून घेतले अनेक मसले
कैवारी हे सभासदांचे.. नाही भ्रष्ट नेते..
रात्रं दिवस मेहनत, अन् नाही जीवाची परवा
ठेवा सभासदहो याची जाण, देऊन त्यांना आदराचा मान
संघटनशक्ती आहे ही नाही खोटी भक्ती
प्रत्येक कार्यासाठी लागते धनाचीच शक्ती
संघटनेचा असे हा निधी , नाही ही भीक
जाणून संघटनेचे महत्व, समजुन ही रीत
शुद्ध रत्नांची खान येथे, नाही गर्व अभिमानाला स्थान येथे
बहुरंगी कलाकारांच्या भांडारात प्रत्येकाचा सन्मान येथे,
अशीही संघटनशक्ती, शिलेदारांची बळकट काठी
एक रूप अन् एकतेची हीच महाशक्ती.. हीच महाशक्ती !!!!!🤝 💐 स्वाती डोकबाणे: नाशिक