130) महाराष्ट्र रेखाचित्र संघटनेच्या माध्यमातून ४९ वा वर्धापनदिन साजरा करत असताना एका अजातशत्रू, हरहुन्नरी, सदाबहार, संघटनप्रीय, परोपकारी, सामाजिक बांधिलकी जोपासत समाजकार्यात अग्रेसर, अनेक संस्थेवर मानाची पदे भुषवूनही अत्यंत विनम्र आणि निगर्वी , सर्वांशी प्रेमळ असे जिव्हाळ्याचे संबंध दृढ करणाऱ्या व्यक्तीमत्वाचा सन्मानपत्र देवून यथोचित सत्कार करण्यात आला याचा आनंद तर आहेच पण ही बाब संघटनेसाठी आणि संघटना परिवारासाठी निश्चितच अभिमानाची आहे...💐🤝🙏
••आदिनाथ द.रावळ, सेनिआ-१, कोथरूड (पुणे)
129) संघटनचा ४९वा वर्धापन दिन ऐतिहासिक अश्या (औरंगाबाद) जिल्हात नुकताच पार पडला,पण कार्यक्रम एकदम अविस्मरणीय झाला, खुप भारी हं, औरंगाबाद टिमच जोरदार आहे यार,...... किती मनातुन सर्वांनवर प्रेम करणारा जिल्ह्यातील टिम आहे, मनातुन कौतुक वाटते मला या सेवानिवृत्ती लोकांचे,या लोकांनसाठी काय बोलावं काहीच शब्द सुचत नाही*आहे या कार्यक्रमाला आदरणीय वाया.यो.पठाण साहेबांना खुप मीस केले आम्ही सर्वांनी आपल्या संघटनेचा कोहीनुर हिरा*अभ्यासु असे म्हणजे माननीय जकी जाफरी साहेब हे तर सर्वांनाच सांभाळून घेणारी व्यक्तीमत्व आहे.औरंगाबादच्या जिल्हाच्या अध्यक्षा सौ विणाताई तर ग्रेटच आहे तसेच आदरणीय सचिव नाईक साहेब यांनी टिम सोबत खुपच छान 💗 कार्यक्रमाचे नियोजन केले होते, तसेच नियोजन करणारे आपल्या संघटनेचे डॉन,सर्वांनवर प्रेम करणारे माजी प्रमुख सल्लागार आमचे मोटा भाई आदरणीय श्री करपे साहेब यांचा या कार्यक्रम आखायचा फारच मोठा सिंहांचा वाटा होता,तसे ते एकदम भारी, ग्रेटच आहे, सर्वांना आपले करणारे,आदरणीय के.के.जाधव साहेब,आदरणीय भुसावळकर साहेब, आदरणीय अहमद साहेब*व इतर संपूर्ण औरंगाबाद टिम यांनी या कार्यक्रमात असे काम करतांना दिसलेत की जनुकाही यांच्या घरचाच कार्यक्रम आहे.जाधव साहेब,नाईक साहेब काय तर पाहुण्यांन करिता खुर्च्या उचलत आहेत,काय तर इकडुन-तिकडे कामात धावपड करित आहे,खरच कार्यक्रम एक नंबर झाला,त्यातल्या त्यात संतोषरावाचे उत्कृष्ट चारोळ्या सोबत संचालन एक नंबर,सौ रोहिणी ने तर मस्त असे भक्ती गीत,स्वागत गीत आणि एकदम सुंदर असे आभारप्रदर्शन उत्तमच.
प्रमुख अतिथी मा..श्री जोगदंड साहेबांनी तर आपल्या कॅडरला तर प्रोत्साहीत केले सर्वांना तुमची कॅडर म्हणजे फार महत्त्वाची म्हणून आपल्या भाषनात बोलुन दाखवले.
. वर्धापन दिना निमित्त मला सन्मान चिन्ह देऊन माझा सत्कार केला त्याबद्दल मी केन्द्र कार्यकारिणीची व औरंगाबाद जिल्हाची खुप खुप आभारी आहे तसेच मा.श्री महाडिक सरांना गौरव पुरस्कृत केलेत, खुपच छान.मला सार्थ अभिमान आहे मी या संघटनेची सभासद आहे पदाधिकारी आहे.आपल्या संघटनेचे कौतुक कराव तेवढं कमीच आहे, म्हणून म्हणते मित्र-मैत्रिणींनो आताही काही वेळ गेली नाही संघटनेला जुळा, सर्व आपलेच आहे.अहो त्या रिटायर्ड यंग स्टार * लोकांना(सभासदांना)बघा त्यांना संघटनेचे किती महत्त्व आहे, आपल्याला वाटते की,हे सर्व सेवानिवृत्त झाले आहेत तर त्याच्याकडे वेळच- वेळ आहे,असं नाही ऐवढ्या उन्हात बिचारे कुणी अमरावती वरुन आलेत,तर कुणी वर्धेवरुन, कुणी नांदेड वरुन तर कुणी बुलढाणा वरुन आलेत,त्यांना माहीत आहे संघटना म्हणजे काय?त्यांनी खुप संघटनेचे उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत, त्यामुळे त्यांना संघटनेचे महत्व माहित आहे,आपल्या नविन लोकांना संघटना म्हणजे काय हे अजुनही कळलेलं नाही दिसत, खंत वाटते,फक्त पद मिळावे म्हणून बघता, ही संघटना कालांतराने आपल्या नविन कार्यरतकडेच येणार आहेत, संघटनेत एकरुपच होणार नाहीत तर तुम्ही सभासदच राहणार नाहीत, सभासदच नाहीत तर संघटनाच उरणार नाही, म्हणून म्हणते मित्र-मैत्रिणींनो आपल्या हक्कासाठी लढण्या करिता संघटना आवश्यक आहे,संघटनेत एकरुप व्हा.
लिहायच तर खुप आहे,पण उगाच भारुड होईल ते, मनस्वी औरंगाबाद टिम ग्रेट आणि धन्यवाद,जय संघटना🙏❤️🤝🤝 सौ वंदना परिहार
.
128) संघटनेचा सन्मान ,संघटनेचा वर्धापन दिन
छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्हा आयोजित 49 वा महाराष्ट्र राज्य रेखाचित्र संघटनेचा वर्धापन दिन 15 जून रोजी छत्रपती संभाजी नगर येथे गोदावरी हॉलमध्ये अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला.. तो दोन्ही जिल्ह्यातील कार्यकारिणीतील पदाधिकारी व सभासदांच्या उत्साह पूर्ण सहभागाने आणि मेहनतीने.
गोदावरी हॉलच्या बाहेर काढलेलीअतिशय सुंदर रांगोळी,तसेच सौ. विना मॅडम, स्वतःच्या जाफरी सर, करपे सर, राव सर ,मते सर, नाईक सर यांनी अत्यंत प्रेमाने मुख्य द्वारावर स्वागत केले. इतरही सर्व सभासद तिथे उपस्थित होते.
जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, अध्यक्षा श्रीमती विना ठाकूर मॅडम व करपे सरांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम नियोजनासह कार्यक्रम सुरू झाला.
अत्यंत गुणी अधिकारी वर्ग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यात *
इंजि. श्री. संजय पडलवार (* कार्यकारी अभियंता दक्षता पथक, छ. संभाजीनगर)
* प्रमुख अतिथी *
इंजि. श्री. इ. बी. जोगदंड (सेवानिवृत्त मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक ला.क्षे.वि.प्रा., छ. संभाजीनगर)
इंजि. श्री. जयसिंग हिरे (सहाय्यक अधिक्षक अभियंता, ला.क्षे.वि.प्रा., छ. संभाजीनगर)
सूत्रसंचालनाचे सूत्र कवीवर्य संतोष मते सरांनी हातात घेत कार्यक्रमाला एक अनोखे रूप दिले.
प्रमुख पाहुण्यांचे उपस्थितीत, व केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या हाताने दीपप्रज्वलन झाले.
सौ रोहिणी एडके मॅडम यांच्या सुमधुर आवाजात ईशस्तवन आणि स्वागत गीताने वातावरण प्रसन्न झाले.
प्रमुख पाहुणे व केंद्रीय पदाधिकारी यांचे सत्कार करण्यात आले.
त्यानंतर संघटनेचा वर्धापन दिनाच्या निमित्याने संघटनेचे मुहूर्त मेढ रोवलेले संघटनेचे मूळ पुरुष कै. संभाजी रायपुरे सर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यानंतर मी स्वतः म्हणजे( स्वाती डोकबाणे) संघटनेच्या इतिहासावर थोडक्यात माहिती देत कविता सादर केली.
कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण असलेले
👑श्री. नरेंद्र महाडिक (संघटना तथा सामाजिक कार्यातील विशेष योगदानाबद्दल)
यांचा विशेष हृदय गौरव सन्मान आदरणीय जाफरी सर व उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते
करण्यात आला. महाडिक सरांची संघटने विषयीची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी 1972 पासून ची सर्व संघटनेची महत्त्वपूर्ण कागदपत्रे अजूनही व्यवस्थित सांभाळून ठेवलेली आहे. 2021 च्या महाडच्या पुरातही त्यांचं घर पाण्यात असतानाही त्यांनी प्रथम ही सर्व कागदपत्रे वरच्या माळ्यावर आधी फेकली व ती अतिशय काळजीने सांभाळली. या कागदपत्रांचा संघटनेला वेळोवेळी उपयोग झालेला आहे.
सन्मानपत्र देऊन संघटना मातेची विशेष सेवा करणाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्याचा, हा अनोखा उपक्रम आदरणीय श्री करपे सरांच्या कल्पनेतून साकार झालेला आहे. याआधीही आदरणीय श्री रायपुरे सर, श्री काजी साहेब, श्री दारुणकर साहेब, श्री सुर्वे साहेब, श्री हिरे साहेब यांचेही सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आलेले आहेत.
सन्मानपत्रांचे उत्तम डिझाईन, उत्तम फ्रेमिंगसाठी करपे सर जीव तोड मेहनत घेतात ती उत्तम होण्यासाठी!आणि त्याचा एक भाग म्हणून काजी साहेब सुर्वे साहेब आणि महाडिक सर यांच्या सन्मानपत्र लिहिण्याची संधी मला करपे सरांनी उपलब्ध करून दिली त्यानिमित्ताने मला त्यांच्या कार्यावर अभ्यास करण्याची संधी मिळाली आणि त्यांना जाणून घेण्याचीही.
👑श्रीमती वंदना परिहार ( केंद्रीय कोषाध्यक्षा, म.रा.रे.चि. संघटना) राष्ट्रीय स्तरावरील संघटन कार्य व सामाजिक कार्यातील विशेष योगदानाबद्दल व रणरागिनी पुरस्कार मिळाल्याबद्दल संघटनेच्या वतीने आदरणीय जाफरी सर यांच्या हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात आला.
🎤 केंद्रीय पदाधिकारी आदरणीय गभणे सर जोशी सर, सौ वंदना सौ दिपाली मॅडम, प्रमुख पाहुणे, आदरणीय महाडिक सर, आदरणीय दारुणकर सर आदरणीय करपे सर आणि शेवटी अध्यक्ष आदरणीय जाफरी सर यांचे मार्गदर्शन पर विचार ऐकायला मिळाले.
👏कार्यक्रमात सेवानिवृत्त मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले होते. अगदी वेगवेगळ्या जिल्ह्यातून, त्यांचे हे संघटन प्रेम हे सध्या कार्यरत असलेला कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत होते.त्यांचा संघटने विषयीचा जिव्हाळा, प्रेम, मनाला खूप भावला.
🗣️सूत्रसंचालनातील मते सरांचे काव्य विशेष आकर्षणाचा भाग होता.
संघटने विषयी सांगायचं झाले तर महाडीक सरांनी याचं एक उत्तम उदाहरण दिलं की संघटना कर्मचाऱ्यांसाठी काय करते? त्यांच्या आधी लागलेला लिपिक आणि ते स्वतः यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळेस पगारातील फरक हा चक्क 30000 रुपये होता.
त्यांनी कार्यरत कर्मचाऱ्यांना संदेश देत बोलले की, त्यांच्या रिटायरमेंटच्या वेळेस त्यांना एक लाख 37 हजार पगार होता. तो केवळ आणि केवळ संघटनेने वेळोवेळी वेतनश्रेणी मध्ये करून घेतलेली सुधारणा आणि वेळोवेळी दिलेला लढा! यावरून संघटनेची शक्ती ओळखून सर्वांनी संघटित रहा!
याची जाणीव ठेवून त्यांनी त्यांची रिटायरमेंट झाल्यानंतर संघटनेसाठी पाच हजार रुपये देणगी दिली. 50 व्या वर्धापन दिमाखात साजरा करण्यासाठी 25 हजाराची देणगी जाहीर केली.
👏सौ रोहिणी मॅडम यांनी आभार प्रदर्शन करत उपस्थितांचे, प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या कार्यक्रमात सहभागींचे आभार मानले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
त्यानंतर सर्वांनी रुचकर अशा स्नेहभोजनाचा आनंद गप्पागोष्टी करत घेतला.
संघटना ही आपली माता आहे आणि आपण तिची लेकर आहोत. मान-अपमान याच्याही पुढे काय असेल तर ती म्हणजे आपली महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा संघटना, आपल्या सर्वांसाठी अत्यंत गौरवाची असलेली आपली ही माता माऊली! आणि या संघटनेचे सारथ्य करणाराही अत्यंत कुशल, विनयशिल, अत्यंत अभ्यासू असं व्यक्तित्व म्हणजे आदरणीय श्री जाफरी सर आणि तितक्याच जबाबदारीने, कुशलतेने, आणि ताकदीने त्यांना साथ देणारे सरचिटणीस आदरणीय श्री गभणे सर आणि संपूर्ण पदाधिकारी वर्ग, जो तो त्याच्या त्याच्या परीने संघटनेसाठी आपले योगदान देण्यासाठी धडपडत असतो. त्यात आपले सामान्य सभासदही आणि संघटनेवर अतिव प्रेम करणारे सेवानिवृत्त वर्गही.
म्हणूनच म्हणावेसे वाटते.
या संघटनेवर, या मातेवर
शतदा प्रेम करावे!
एकता अन बळकटीचे
सुर नवे हे गावे
विसरून सारे*
या मातेवर शतदा प्रेम करावे!
श्रीमती स्वाती डोकबाणे
महिला प्रतिनिधी
(म.रा.रे.सं)
127) महत्वाची सुचना: बैठक परिपत्रक
बक्षी समितीच्या खंड 2 चे अनुषंगाने जिल्हा शाखा अध्यक्ष/ सचिवांसोबत बैठक
दि. 30/09/2023 रोजी सकाळी 11:00 वाजता
स्थळ- जलसंपदा विभाग शेगाव चे विश्राम भवन
126) संघटनेची मान्यताबाबत माहिती अधिकारात प्राप्त माहिती सामान्य प्रशासन विभागाने दिलेली माहिती सर्व सभासदांसाठी उपलब्ध करण्यात येत आहे.
125) बक्षी समिती खंड दोन संदर्भात काही जिल्हा शाखांनी उपस्थित केलेल्या शंका व प्रश्नांबाबत खुलासा
124) [16:38, 8/29/2023] शासनाने बक्षी समितीच्या अनुषंगाने परत वेतनश्रेणी मध्ये तफावत निर्माण करुन आरेखक श्रेणी १ व प्रमुख आरेखक यांचे वेतनश्रेणी वर अन्याय केल्याचे दिसून येत आहे.
[16:38, 8/29/2023] आपल्या संघटनेच्या सर्व जिल्हा शाखा अध्यक्ष / सचिव यांनी सदर परिपत्रक आपल्या जिल्ह्यातील सर्व सभासदांच्या निदर्शनास आणून देण्यात यावे, व सभासदांची मते व जिल्हा शाखेचे मत दिनांक २५/०७/२०२३ पुर्वी संघटनेस कळवावीत.
[16:38, 8/29/2023] जेणे करुन पदांची वेतनश्रेणी सुधारणा करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल.
123) *दफ्तर दिरंगाई कायदा, 2006*
👉 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना
चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत
नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड किंवा पाच वर्षे सक्तमजुरी किंवा दोन्हीही
अशा शिक्षेची तरतूद आहे. माहिती अधिकार कायदा २००६ ची दुसरी मर्यादा म्हणजे या कायद्यानुसार मिळालेल्या माहितीतून जरी हे स्पष्ट झाले की सदरहू फाईल विवक्षित खात्याकडे महिनोंमहिने पडून आहे; तरी पुढे काय करायचे यावर उत्तर म्हणून राज्य सरकारने ‘शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध’ करण्यासाठी १२ मे २००६ रोजी राज्यपालांच्या संमतीने शासन निर्णय जारी केला आहे.
यातील प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे-
👉 कलम-८ (१)
प्रत्येक कार्यालय किंवा विभाग, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत नागरिकांची सनद तयार करून प्रसिद्ध करेल.
स्पष्टीकरण- नागरिकांची सनद याचा अर्थ, कार्यालयाने किंवा विभागाने दिलेल्या सुविधा किंवा सेवा यांची सूची तसेच अशा सुविधा किंवा सेवा सर्वसामान्य जनतेला
पुरवण्यासाठी असलेली कार्यमर्यादा असा आहे. (माहिती अधिकार कायद्याच्या कलम ४(१)(ख)(चार) मध्येही हेच अभिप्रेत आहे.)
👉 कलम-८ (२) नागरिकांच्या
सनदेमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीमध्ये, संबंधित प्राधिकाऱ्यांकडून कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही, तर आवश्यक ती कार्यवाही न केल्याबद्दल त्यांना जबाबदार धरले जाईल आणि संबंधित अधिनियम, नियम किंवा विनिमय यामध्ये उल्लेखलेली कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल.
👉 कलम-९- प्रत्येक कार्यालयाचा किंवा विभागाचा प्रमुख, त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या, त्याला दुय्यम असणाऱ्या अधिकाऱ्यांकडे अंतिम निर्णय घेण्यासाठी
सोपविण्यात आलेल्या अधिकारांची यादी प्रसिद्ध करेल. तसेच अंतिम निर्णय घेण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांचे स्तर करेल व हे सर्व काम अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून एक वर्षांच्या आत पूर्ण करून प्रसिद्ध करण्यात येईल व पुढील प्रत्येक वर्षांच्या १ एप्रिल रोजी ते अद्ययावत करण्यात येतील.
👉 कलम-१० (१)- प्रत्येक शासकीय कर्मचारी त्यास नेमून दिलेल्या किंवा त्याच्याशी संबंधित असलेले शासकीय कर्तव्य व शासकीय काम अत्यंत दक्षतेने आणि शक्य तितक्या शीघ्रतेने पार पाडण्यास बांधील असेल. परंतु
साधारणपणे कोणतीही फाईल विभागातील किंवा कार्यालयातील कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याकडे सात कामाच्या दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही.
परंतु आणखी असे की, तत्काळ व तातडीच्या स्वरूपाच्या फाईली, त्या प्रकरणाच्या निकडीनुसार शक्य तितक्या शीघ्रतेने आणि प्राधान्याने तत्काळ फाईल शक्यतो
एका दिवसात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी आणि तातडीच्या स्वरूपाची फाईल शक्यतो. चार दिवसात निकालात काढण्यात येईल.परंतु दुसऱ्या कोणत्याही विभागाकडे विचारार्थ पाठवायची आवश्यकता नसलेल्या फाईलीच्या संबंधात, संबंधित विभाग त्या प्रकरणावर 45 दिवसांच्या आत निर्णय घेईल व आवश्यक ती कार्यवाही
करेल आणि दुसऱ्या कोणत्याही विभागाकडे विचारार्थ पाठवायची आवश्यकता असलेल्या फाईलींच्या संबंधात तीन महिन्यांच्या आत निर्णय घेण्यात येईल व आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.
👉 कलम-१० (२) एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यांस
नेमून दिलेले किंवा त्याच्याशी संबंधित असलेले शासकीय कर्तव्य किंवा शासकीय काम पार पाडण्यास जाणूनबुजून किंवा हेतुपुरस्सर विलंब लावणे किंवा दुर्लक्ष करणे ही, अशा शासकीय कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यपालनातील कसूर ठरेल आणि असा शासकीय कर्मचारी, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अन्वये किंवा अशा कर्मचाऱयाला लागू असलेल्या अन्य कोणत्याही संबद्ध
शिस्तविषयक नियमांखाली यथोचित शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र होईल.
👉 कलम-१०(३) कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याकडून झालेली कर्तव्यपालनातील अशी कोणतीही कसूर संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याच्या लक्षात आल्यावर किंवा त्याच्या लक्षात आणून दिल्यावर अशा शासकीय कर्मचाऱ्याकडून झालेल्या, अशा कर्तव्यपालनातील कसुरीबाबत त्याची खात्री पटल्यावर तो कसूर करणाऱ्या अशा शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध, वार्षिक गोपनीय अहवालात अशा कर्तव्यपालनातील कसुरी संबंधातील नोंद करण्यासह संबद्ध शिस्तविषयक नियमांखाली, यथोचित शिस्तभंगाची
कारवाई करील. कलम-११ कलम १० मधील कोणतीही गोष्ट पुढील बाबींना लागू होणार नाही.
(एक) न्यायप्रविष्ट बाबी;
(दोन) लोक आयुक्त किंवा उप लोक आयुक्त आणि अन्य घटनात्मक संस्था, आयोग इत्यादी.
(तीन) न्यायिकवत बाबी
(चार) केंद्र किंवा अन्य राज्य शासनाच्या संबंधातील प्रकरणे
(पाच) विधी विधानाशी संबंधातील बाबी
(सहा) मंत्रिमंडळास सादर होणाऱ्या मुख्य धोरणात्मक बाबीसंबंधीची प्रकरणे.
👉 कलम-१२ या प्रकरणाच्या तरतुदीचे अनुसरण केले जात आहे किंवा कसे याची तपासणी करण्यासाठी, शासन, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या आत, विहित रीतीने प्रशासनिक मूल्यमापन करण्यासाठी, एका यंत्रणेची तरतूद करील. या ‘शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५’ अर्थात दफ्तर दिरंगाई कायदा यातील तरतुदींची अंमलबजावणी आजही बहुसंख्य शासकीय कार्यालयात होत नसल्याने आजही ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ याचा प्रत्यय नागरिकांना येतो आहे. माहिती अधिकार
कायद्याचा प्रभावी वापर करून एखादी फाईल/ प्रकरण कोणाकडे किती दिवस प्रलंबति होते व निर्णय घेण्यास किती दिवस लागले याची माहिती मिळवून नंतर
त्या माहितीच्या आधारे या दफ्तरदिरंगाई कायद्यातील कलम १० च्या तरतुदींचा वापर करून फाईल प्रलंबित ठेवणाऱ्या कर्मचारी/ अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची
कारवाई व्हावी, यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले तरच सरकारी कारभारात थोडीशी गतिमानता येईल. माहिती अधिकार कायदा, अभिलेख व्यवस्थापन कायदा व हा दफ्तर दिरंगाई कायदा या तिन्ही कायद्यांचा सुयोग्य समन्वय साधत नागरिकांनी शासन यंत्रणा अधिक गतिमान, पारदर्शी व उत्तरदायी होण्यासाठी प्रयत्नशील राहणे ही काळाची गरज आहे.
==================================
आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन
आपल्या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण दिनांक ६/५/२०२३ रोजी ऐतिहासिक शहर छत्रपती संभाजी नगर मध्ये आयोजित करण्यात आली होती, या सभेस महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील सभासदांनी भाग घेतला या सर्व उपस्थित सभासदांचे मनःपूर्वक धन्यवाद व आभार मानतो. जे काही वैयक्तिक कारणांमुळे ईच्छा असून ही उपस्थित राहू शकले नाहीत असे अनेक सभासदांनी मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क करुन सांगीतलं अशाही सर्व सभासदांचे धन्यवाद.
नियोजन कार्यक्रमानुसार या सभेत लोकशाही पध्दतीने व संघटनेचे नियमांस अधीनराहून पुढील पाच वर्षांसाठी नविन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. यावेळी एक- एका पदासाठी अनेक सभासदांनी उमेदवार घोषित केले होते, त्यामुळे आवाजी मतदानाद्वारे निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येवून पदाधिकारी निवड करण्यात आली, या मतदानात सहभागी होवून निवड झालेल्या सर्व पदाधिकारी सभासदांचे अभिनंदन करतो.
आपण माझी संघटनेचा पुढील काळासाठी अध्यक्ष म्हणून निवड केली त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. मी माझे मागील अध्यक्ष पद कालावधीत शासनस्तरावरून आपल्या हिताचे अनेक निर्णय मान्य करून घेण्यासाठी प्रयत्न केले, त्याच प्रमाणे पुढील काळात ही आपल्या संवर्गाचे हितासाठी सदैव तत्पर असेल अशी ग्वाही देतो. मागील पंचवार्षिक काळात माझे सोबत असलेल्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सचिव यांनी मोलाचे सहकार्य केले आहे, असेच सहकार्य व मार्गदर्शन सर्व सभासद व सध्याचे कार्यकारिणी सदस्य यांचे कडून पुढील काळातही मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
निवडणूक प्रक्रिया काळात काही सभासद स्नेही यांचे मत-मतांरातून मन दुखावल्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी त्यांना विनंती करतो की, मतभेद अवश्य असावेत, पण मनभेद होवू न देता आपण पुढील काळातही संघटनेच्या , तद्वतच सर्व सभासदांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सहकार्य करावे नव्हे करालच याची खात्री देतो. काही जिल्ह्यांमधील सभासदांना पदाधिकारी निवडीमध्ये तांत्रिक अडचणी मुळे प्रतिनिधित्व मिळाले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तथापि, प्रतिनिधित्व न मिळालेल्या जिल्ह्यातील सभासदांना पुढील काळात पदाधिकारी निवडीमध्ये प्रतिनिधित्व देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत याची ग्वाही देतो.
दिनांक ६/५/२०२३ रोजी च्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी छत्रपती संभाजी नगर येथे उपस्थित राहिलेल्या सभासदांसाठी निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली होती यांमध्ये कात्री त्रुटी, उणीव राहिली असल्यास त्यास आपण मोठ्या मनाने माफ कराल अशी आशा व्यक्त करतो. तसेच त्रुटी उणीवा राहिल्या असतील तर मला व्यक्तिशः मोबाईल द्वारे अथवा थेट संवादातून माझे निदर्शनास आणून देण्यात याव्यात म्हणजे पुढील काळात त्यांची पुनरावृत्ती टाळता येईल.
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद
आपलाच
जकी जाफरी.
120)
*महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष पदी श्री जकी अहमद जाफरी यांची बिनविरोध निवड* दिनांक ६ मे २०२३ शनिवार रोजी तिवारी मंगल कार्यालय रेल्वे स्टेशन रोड छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथे रेखाचित्र शाखेची सर्वसाधारण सभा झाली .. या सभेला संपुर्ण महाराष्ट्रातील जलसंपदा विभाग , सार्वजनिक बांधकाम विभाग,भुजल सर्वेक्षण विभाग , पाणीपुरवठा, शासकीय मुद्रणालय, इतर असे अने क विभागातील रेखाचित्र आरेखक संवर्गाचे सर्व जिल्हा शाखा पदाधिकारी , सेवानिवृत्त तसेच कार्यरत सदस्य , संघटनेचे माजी जेष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .. कार्यक्रमाचा शुभारंभ भुजल सर्वेक्षण ची कर्मचारी श्रीमती दिपाली खोबरे व इतर सहकार्यांच्या राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा या समुह गायनाने झाला.. केंद्रीय अध्यक्ष श्री जकी जाफरी यांचे शुभहस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले... रेखाचित्र संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष श्रीमती विणा ठाकुर यांनी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री जकी जाफरी यांचा पुष्पगुच्छ देउन सत्कार केला.. तसेच सर्व सन्माननीय केंद्रीय पदाधिकार्यांचा छ.छत्रपती संभाजीनगर जिल्हा शाखेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.. संघटनेचे सरचिटणीस श्री सुधीर गभणे यांना मागील सभेच्या इतिवृत्ताच्या अहवालाचे वाचन केले.. कोषाध्यक्ष श्री श्रीकृष्ण आपटे यांनी मागील पाच वर्षातील लेखापरिक्षण अहवालाचे वाचन केले.. संघटनेचे मावळते अध्यक्ष श्री जाफरी यांनी संघटनेच्या मागील पाच वर्षाच्या कालावधीतील संघटनेने केलेल्या दैदिप्यमान कार्याविषयी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सविस्तर माहिती सर्व उपस्थितांना दिली.. संघटनेने मागील पाच वर्षात विवीध विषयांवर संघटनेने संपादित केलेल्या अवगत केलेल्या यशस्वी कारकिर्दीबद्दल विस्तृत कथन केले.. दुपारच्या सत्रामध्ये महाराष्ट्र राज्य रेखाचित्र संघटनेची पुढील पाच वर्षा करीताची नवीन कार्यकारीणी निवडण्याची प्रक्रीया सुरु झाली ...महाराष्ट्रातुन आलेल्या जिल्ह्यातील अनेक इच्छुक सदस्य उमेदवारांनी आपले नामनिर्देशन भरले .. या नवीन कार्यकारीणी निवड प्रक्रीयेसाठी श्री राजेंद्रकुमार खाजेकर यांनी निर्वाचन अधिकारी म्हणुन काम पाहीले.. नुतन कार्यकारीणीची निवड हि सभागृहात आवाजी बहुमताने करण्यात आली...वर्ष २०२३ ते २०२८ या पुढील कालावधीच्या संघटन कार्यासाठी संघटनेचे अध्यक्ष श्री जकी अहेमद जाफरी यांचीच दुसऱ्यांदा केंद्रीय अध्यक्ष म्हणुन बिनविरोध निवड करण्यात आली... उपाध्यक्ष पदासाठी श्री राहुल साळुंके पुणे व श्री रविंद्र बिंड अमरावती यांची निवड झाली तसेच सरचिटणीस पदी श्री सुधीर गभणे नागपुर , श्री विनायक जोशी लातुर अतिरिक्त सरचिटणीस , श्रीमती वंदना परिहार नागपुर कोषाध्यक्ष , श्री अमोल सुपेकर अहमदनगर सहकोषाध्यक्ष , श्रीमती स्वाती डोकबणे नाशिक व श्रीमती दिपाली खोबरे भुजल सर्वेक्षण ,औरंगाबाद यांची महिला प्रतिनीधी निवड झाली... विभागीय सचिव पदासाठी औरंगाबाद विभागकरीता श्री मोसिक परभणी व लातुर विभागासाठी परळीचे विनोद मिसाळ तसेच अकोला साठी वाशिमचे श्री सतीश पारणकर ,अमरावती विभागासाठी श्री सचिन गुरुडे , नागपुर विभागासाठी श्री प्रशांत कहाते ,चंद्रपुर विभागाकरीता श्री शशीकांत अक्केवार ,नाशिक विभागा करीता धुळे चे श्री जिभाउ बच्छाव ,पुणे विभागाकरीता नगरचे श्री हाफीज शेख यांची निवड झाली... महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा संघटनेच्या नवीन नवनिर्वाचित कार्यकारीणीच्या पुढील पाच वर्षाकरीता विजयी पदाधिकार्यांची निर्वाचन अधिकारी श्री राजेंद्रकुमार खाजेकर यांनी घोषणा केली व त्यांचेच हस्ते सर्व विजयी उमेदवारांचा पुष्पगुच्छे शाल व फेटे बांधुन मोठ्या जल्लोषात सत्कार करण्यात आला .. या संपुर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाची जवाबदारी छत्रपती संभाजीनगर जिल्हा शाखेने यथोचित पार पाडली ..या सभेच्या व निवडणुक कार्यक्रमासाठी जिल्हा शाखेच्या अध्यक्षा श्रीमती विणा ठाकुर,श्री एस.एम .नाईक ,श्री वाय .ओ.पठाण ,श्री अहेमद, श्री के.के.जाधव,श्री भुसावळकर,श्री परळीकर,श्री पाडवी,श्री संतोष मते ,श्री कोकाटे ,श्री प्रमोद राव , श्री जनार्धन शेरे श्री पालकर,श्री वसंत सोनवणे इत्यादी अनेक रेखाचित्र संवर्गाच्या आजी माजी सदस्यांनी मोठ्या हिरारीने सहभाग घेउन या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले... या कार्यक्रमाचे सुंदर असे सुत्र संचलन भुजल सर्वेक्षण च्या श्रीमती दिपाली खोबरे यांनी केले... राष्ट्रगीतानंतर संघटनेचा दिवसभराचा कार्यक्रम संप्पन्न झाला.... श्री राजेंद्र करपे यांनी कार्यक्रम संप्पन्नतेनंतर आभार प्रदर्शन सादर केले....
119) सर्वसाधारण सभा दि 6 मे 2023
118) महत्वाची सूचना
114) एकच मिशन जुनी पेन्शन संप मध्ये मा.जाफरी साहेब मनोगत व्यक्त करताना
113)
112)
वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटिस ( फ़क्त सभासदांसाठी )
( सन 2021-22 )
आपणांस या द्वारे कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य रेखाचित्रशाखा कर्मचारी संघटना, महाराष्ट्र ची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.०८ जानेवारी २०२३ रविवार रोजी श्री. ज्ञानराज माऊली कृपा प्रासादिक संस्था, शेगांव (दुमाळा) पंढरपूर जि.सोलापूर येथे सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० या वेळेत आयोजित केली आहे. सदर सर्वसाधारण सभा गणपूर्ती अभावी स्थगीत झाल्यास त्याच दिवशी त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर घेण्यात येईल. त्यास गणपूर्तीची आवश्यकता राहणार नाही. तेव्हा सदर सर्वसाधारण सभेला सर्व केंद्रिय पदाधिकारी, जिल्हा शाखा पदाधिकारी व सभासद यांनी उपस्थित रहावे हि विनंती.
सभेचे विषय:-
१) मा. अध्यक्ष व मान्यवरांचे स्वागत.
२) संघटनेच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करणे.
३) दि.१३ मार्च २०१८ रोजी नागपूर येथील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे...
४) सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील जमा खर्चास मंजूरी घेणे.
५) जिल्हा शाखा व सन्माननिय सभासदांकडून प्राप्त सुचनांवर चर्चा व त्यांचे समाधान करणे.
६) संघटनेची घटना दुरूस्ती प्रस्तावास सर्वसाधारण सभेची मंजूरी घेणे.
७) मा. अध्यक्षांचे परवानगीने वेळेवर उपस्थित होणारे इतर विषयावर चर्चा.
सुधीर वामनराव गभने मा.श्री.जकी जाफरी,
सरचिटणीस अध्यक्ष यांचे मान्यतेने
प्रतिलीपी
1. श्री. राहूल साळुंखे, विभागीय सचिव, पुणे विभाग यांना माहिती व पूढिल कार्यवाहिस्तव सस्नेह प्रेषित. आपण जिल्हा शाखेशी समन्वय साधून सभेची व्यवस्था चोख ठेवावी.
2. सर्व जिल्हा शाखा- आपले जिल्हा शाखांकडून सदर वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी ठराव किंवा सूचना पाठवायचे असतील तर त्या दि. ३१/१२/२०२२ पर्यंत सरचिटणीस यांचे कडे पोहचतील अशा बेताने व्हॉटस अॅप वर पाठवावे. या तारखेनंतर आलेल्या कोणत्याही ठराव/सुचनांची दखल घेतली जाणार नाही.
3. मा. श्री. सोमनाथ देशमुख, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य रेखाचित्रशाखा कर्मचारी संघटना जिल्हा सोलापूर, यांना सदर सभेची व्यवस्था चोख ठेवण्याबाबत सस्नेह प्रेषित.
109 ) महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटना संघटनेची यशस्वी गरुडझेप
१) आरेखक संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना Auto Cad चे प्रशिक्षण विभागीय प्रशिक्षण केंद्र ( R.T.C.) वाल्मी औरंगाबाद मार्फत आयोजन करण्यात संघटनेला यश प्राप्त झाले.. संघटनेच्या प्रयत्नामुळे वर्ष 2019, 2020 या कालावधीत पाच प्रशिक्षण वर्गाचे आयोजन झाले.व आरेखक संवर्गाचे अनेक कर्मचारी यांना AUTO CADE चे प्रशिक्षण मिळाले..
२) १.१ १९९६ ते ३१.०३ २००६ या कालावधीतील ५ व्या वेतन आयोगातील वेतन त्रृटीतील थकबाकीचा लाभ रोखीने मीळणेबाबत दि.02.02.2019 रोजी शासनास निवेदन देण्यात आले. सप्टेंबर 2019 ला मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्याधिकरण (MAT) खंडपिठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केली व 15.12.2020 मा. न्यायालयाने संघटनेच्या बाजुने न्याय निर्णय दिला. त्या निर्णयाच्या अनुषंगाने जलसंपदा,सा.बां.विभाग,जलसंधारण,पाणीपुरवठा,या विभागाकडुन शासन निर्णय जुन , जुलै , ऑगस्ट मध्ये निर्गमीत करून घेतले. या महत्वपुर्ण संघटनेच्या कामगीरीमुळेअनेक कर्मचारी आर्थिक दृष्ट्या लाभान्वित झाले,यात विशेषतः सेवानिवृत्त तसे मयत कर्मचारी बंधुनाही आर्थिक लाभ झाला.
३) सरळ सेवेने नियुक्त सहायक आरेखक, आरेखक यांच्या पदोन्नती करीता पहीले पत्र दि.02.08.2018 रोजी शासनास सादर केले व दि.22.10.2021 रोजी पदोन्नती संदर्भात सविस्तर आदेश काढले व सरळ सेवेच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती बाबत मार्ग मोकळा झाला.. .
४) राज्यातील वेतन पडताळणी पथक कार्यालयाने दुसरी आश्वासित प्रगती योजना २४ वर्षाचा लाभ संदर्भात संभ्रम तथा अडसर निर्माण करून सेवानिवृत्त आरेखक कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन देयके रोखलेली असताना संघटनेने १७.०६.२०१९ रोजी संचालक लेखा व कोषागार, मुंबई यांना निवेदन दिले व सातत्याने पाठपूरावा केला दिनांक ११.०१.२०२० रोजी वित्त विभागामार्फत वेतन पडताळणी कार्यालयांना सुचना देण्यात आल्या व दि.२३.०१.२०२० रोजी संचालक वित्त विभाग मुंबई यांनी सर्व वेतन पडताळणी पथक कार्यालयांस २४ वर्षाच्या आश्वासित योजनेचा लाभ लाभ देण्याबाबतआदेशवजा पत्र काढले.. संघटनेची हि अत्यंत महत्वाची कामगीरी आहे अन्यथा अनेक सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वेतन रोखले जाउन कायमचे आर्थिक नुकसान झाले असते.
५) दि.०८.११.२०१९ चे पत्रान्वये संघटनेचा लेखापरिक्षण अहवाल (Audit Report) शासनास सादर करण्यात आलेला आहे..
६) सातवा वेतन आयोग समिती समोर संवर्गाच्या ४/५/७ वर्षाची अट काढण्यात यावी व प्रथम नियुक्ती पासुन २४००/४२००/४३०० अशी वेतन श्रेणी व प्रमुख आरेखकास ४६००/- ची वेतनश्रेणी देण्याबाबत प्रस्ताव सादर केलेला आहे.
७) संघटनेचे कार्य व कार्यप्रणाली पारदर्शक करणे, कार्यपद्धतीचे आधुनिकीकरण करणे,समाज माध्यमांद्वारे संघटन कार्य सर्व सभासदांपर्यत पोहचविणे या करीता संघटनेचे अधिकृत संकेतस्थळ ( WebSite) निर्माण करुन शेगाव येथील संघटनेच्या भव्य सभेच्या कार्यक्रमासह अनावरण करण्यात आले.. या संकेतस्थळावरुन संघटनेच्या स्थापनेपासुनचा अर्थात मागील ४८ वर्षाच्या ऐतिहासिक कामगिरीचा आजपर्यंत च्या कार्याच्या घडामोडीचा सचित्र माहीती व इतर संघटनेच्या चालु घडामोडीचा अंतर्भाव करण्यात येउन सर्व सभासदांना माहिती उपलब्ध करुन संघटन कार्ये विकसित करण्यात आली..
८) महाराष्ट्रातील सर्व विभागातील जिल्हा शाखांना प्रत्यक्षात भेटी देणे या साठी मा.अध्यक्ष व केंद्रीय पदाधिकार्यांसह पश्चिम महाराष्ट्र ,कोकण.विदर्भात संपर्क दौऱ्याचे आयोजन करुन " संघटना आपल्या द्वारी " या विचाराने सर्व जिल्हा शाखेच्या बैठका द्वारे संघटन मजबुत करण्यात आले..सर्व जिल्ह्यातील सदस्य व पदाधिकारी यांच्या प्रत्यक्ष भेटी व चर्चे मुळे संघटना तन मन व धनाने अधिक मजबुत करण्यात संघटनेला यश प्राप्त झाले.. ९) संघटनेच्या स्थापने पासुन साधारणतः ४८ वर्षांपुर्वीची अस्तित्वात असलेली संघटनेची घटना यात कालपरत्वे सुधारणा व दुरुस्तीसह अद्ययावत सुधारीत घटना तयार करण्यासाठी वाल्मी औरंगाबाद येथे कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करुन अभ्यासपुर्वक मंथनानंतर सुधारीत घटनेचा मसुदा तयार करण्यात आला व मार्च २०२२ नागपुर येथे आयोजित सर्वसाधारण सभेत सुधारीत घटनेचा मसुदा सर्व मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहे.. १०) जलसंपदा विभाग / सां.बां.विभाग / जलसंधारण विभागातील चित्रशाखा संवर्गातील रिक्त पदे भरणे बाबत संबंधित सर्व मंत्री महोदयांना निवेदने देऊन विनंती केली.
११) सा.बां.विभाग, मुंबई परिमंडळात आरेखक संवर्गाच्या पदोन्नती करणेबाबत दि.०३.०८.२०२० व १२.०४.२०२१ रोजी निवेदन दिली व सतत पाठपुरावा करण्यात येउन जानेवारी २०२२ मध्ये पूर्ण पदोन्नत्या करवून घेतल्या.
१२) सरळ सेवेने नियुक्त झालेल्या सहायक आरेखक, आरेखक यांना विभागीय परिक्षा व प्रशिक्षणाचे प्रयोजन करण्यासाठी शासनामार्फत META नाशीक कडून अभ्यासक्रम व प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर करून शासनास सादर करण्यात संघटनेला यश प्राप्त झाले आहे व पुढिल कार्यवाही प्रगतीपथावर आहे.
१३) जलसंपदा/सां.बां.विभाग./जलसंधारण विभागातील चित्रशाखा संवर्गातील आकृतीबंध कार्यक्रम सुरू असुन संघटने मार्फत पदे वाचविण्याचासाठी शासनास प्रतिनिधीत्व करण्यात आले. पुढिल कार्यवाही प्रगतीपथावर आहे.
१४) अनुरेखक / आरेखक संवर्गाच्या सेवा प्रवेश नियम सुधारणा करणेबाबत दि.१९.११.२०२० च्या पत्रान्वये जलसंपदा विभागास प्रस्ताव सादर.
१५) अधिक्षक अभियंता . सा.बां. मंडळ जळगाव यांनी आरेखक संवर्गाविरूद्ध काढलेले परिपत्रक रद्द करणेबाबत दि.२३.०६.२०२१ रोजी संबंधीत अ.अ. यांना पत्र देऊन दि.१७.०८.२०२१ रोजी परिपत्रक रद्द करून घेतले.
१६) दिनांक .२९.१०.२०२१ च्या पत्रान्वये अ.अ. सा.बां. मंडळ पुणे यांनी अनुरेखकांच्या प्रशिक्षणासंबंधी चुकीचे काढलेले पत्र रद्द करून घेतले
१७) अनुरेखकांची अर्हता प्रशिक्षण वर्ग सुरू करणेबाबत सां.बां. मंडळ पुणे यांना पत्र देऊन सातत्याने या विषयी पाठपुरावा करण्यात आला व सद्यस्थितीत सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे.
१८) २०१९ या वर्षी धुळे येथे सर्वसाधारण सभेचे आयोजन भव्य स्वरुपात करण्यात आले .. २०२० व २०२१ या वर्षाची सर्वसाधारण / आम सभा कोविड महामारी प्रतिबंधामुळे होउ शकली नाही तथापी विलंबाने का होईना दिनांक १३ मार्च २०२२ रोजी नागपुर येथे वर्ष २०२० व २०२१ एकत्रीत रित्या सर्व साधारण महासभा आयोजित करण्यात येत आहे..
१९ ) सन २०१९, २०२०,२०२१ व २०२२ सलग चार वर्ष संघटनेच्या रंगीत दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येउन महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालये तसेच सर्व सदस्यांपर्यंत पोहचविण्यात आले...
मंजीले उन्हीको मिलती है...जिनके सपनोमे जान होती है..... पंखोसे कुछ नही होता ...हौसले से उडाण होती है....
जकी अहेमद जाफरी, अध्यक्ष ( १३ मार्च २०२२ )
१०६) अनुरेखक प्रशिक्षण व अर्हता परीक्षा सन २०२२
सर्व सन्माननीय सभासद सदस्यांनी नोंद घ्यावी
104) _*दिनांक २५जानेवारी २०२२ पुणे दौरा_ ....* *अनुरेखकांच्या अर्हता परिक्षा करीता प्रशिक्षण वर्ग सुरु करणे बाबत दिनांक १३ आॕक्टोबर २०२१ रोजी अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ पुणे यांनी सदर प्रशिक्षण सुरु करण्यात संभ्रम निर्माण झाल्यामुळे संदर्भिय पत्र जा क्र पशा /जो ३८/६७०० /सन२०२१ अन्वये प्रशिक्षण घेण्याचे टाळले होते अर्थात रद्दच झाले होते .. तथापी या पत्रानंतर संघटनेत प्रचंड गोंधळ झाला काही उपद्रवी महानुभवांच्या कारस्थानामुळे प्रशिक्षण घेण्यात अडसर संभ्रम निर्माण करण्यात आला असता संघटनेने व संघटनेच्या अध्यक्ष व केंद्रीय कार्यकारीणीने अ.अ. सा.बां. मंडळ पुणे कार्यालयाशी सातत्याने समक्ष भेटुन तसेच पत्रव्यवहार पाठपुरावा करुन सदर प्रशिक्षण पुनः सुरु करण्याबाबत प्रयत्न केले व संघटनेच्या प्रयत्न व यशाच्या परंपरेत एका अधिक यशाची भर पडली ...संदर्भ क्रमांक जा क्र / पशा /जी ३८/सन २०२१ अन्वये अनुरेखकाचे प्रशिक्षणाचे नियोजन मंजुरीचे तात्काळ पत्र काढण्यात आले...येत्या काही महिण्यातच प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे या मुळे सर्व संघटनेत आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे... सदर प्रशिक्षणाचे नियोजन करण्यास मान्यतेचे पत्र काढल्यामुळे मा.अधिक्षक अभियंता मा.श्री अ.भि.चव्हाण साहेब यांची भेट घेउन आभार मानणेसाठी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री जकी अहमद जाफरी श्री आर.डी.करपे केंद्रीय प्रमुख सल्लागार ,श्री एम .एम.अहमद श्री के.के. जाधव हे खास करुन औरंगाबाद हुन पुण्यात मा.अ.अभियंता साहेबांना भेटावयास आले होते पुण्याचे विभागीय सचिव तथा प्रभारी जिल्हा अध्यक्ष श्री राहुल साळुंके यांसह जेष्ठ मार्गदर्शक श्री आदिनाथ रावळ , श्री सुनिल शिंदे या सर्व संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी मा .अधिक्षक अभियंत्याची भेट घेतली त्यांचे पुष्पगुच्छ देउन संघटनेच्या वतीने सत्कार करुन आभार मानण्यात आले..साहेबांनीही अत्यंत आपुलकीने सर्वाची चर्चा केली संघटनेच्या सद्य कामकाजाविषयी जाणुन घेतले.... संघटनेच्या दिनदर्शिका वर्ष २०२२ चे विमोचन मा.अ.अभियंत्यांचे हस्ते करण्यात आले... कार्यालयीन अधिक्षक श्री मते साहेबांचीही भेट घेउन आभार व्यक्त करण्यात आले.. या प्रसंगीचे काही क्षणचित्रे...
103) दिनांक २१/०१/२०२१ रोजी सिंचन भवन विश्रामगृह औरंगाबाद येथे मा.इंजि. श्री म.कि पोकळे, कार्याध्यक्ष, कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य (तथा सेवानिवृत्त मुख्य अभियंता व सहसचिव, जलसंपदा ) यांनी औरंगाबाद च्या सेवानिवृत्त तसेच कार्यरत कर्मचारी सदस्यांची भेट तथा बैठक घेतली या प्रसंगी संघटनेच्या औरंगाबाद शाखेचे गठण/या सह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.. या प्रसंगी मा.श्री हंद्राळे साहेब,श्री नेमाडे साहेब श्री हिरे साहेब,श्री मिठ्ठे साहेब, श्री मोहिते साहेब श्री गरुड साहेब, श्री जकी अहमद जाफरी ,श्री वाय ओ पठाण,श्री अहमद, श्री जेजुरकर ,श्री वसंत सोनवणे साहेब श्री आर डी. करपे श्रीमती वाघमारे श्रीमती सुषमा सुरडकर श्रीमती गिता तरटे,या सह अनेक कर्मचारी / अधिकारी उपस्थित होते...
102) 👆 *मृद व जल संधारण विभाग औरंगाबाद चे अधिक्षक अभियंता श्री गालफाडे साहेब यांची भेट घेउन त्यांचा पुष्पगुच्छ देउन सत्कार केला तसेच कृषि प्रमाणे लाभ लाभार्थींना लवकर मिळण्याबाबत सकारात्मक चर्चा करुन अधिक्षक अभियंत्या साहेबांकडुन लाभ प्रदान करणे बाबत आश्वासन मिळविले .
Date: 18/11/2021
101) *संघटनेच्या कार्यात सतत कार्यशिल असणारे आपले अध्यक्ष श्री जाफरी सर आज पुनःदिवसभर सक्रीय होते.. आज श्री पठाणसर श्री अहमदसर व मी त्यांचे सोबत औरंगाबाद परिमंडळाला भेट दिली व प्रशिक्षण अटीवर रोखलेल्या पदोन्नती विषयासंबंधी अधिकार्यांची भेट घेतली तसेच मृद व जल संधारण कार्यालयातही कृषि प्रमाणे लाभ फरकाची रक्कम काही सदस्यांना देण्यासाठी कारकुन मंडळीपासुन होत असलेली अडवणुक पाहता अधिक्षक अभियंत्याची भेट घेउन त्याना सर्व प्रकरण समजाउन सांगीतले व मृद संधारण विभागातील सर्व विभागाच्या लाभार्थींना फरकाची रक्कम मिळणेबाबत मा.अधिक्षक अभियंत्याकडुन सर्व लाभार्थीचे फरकाची रक्कम मिळणे बाबत सकारात्मक कार्यवाही बाबत योग्य ते आश्वासन देण्याचे अधिक्षक अभियंत्याकडुन सम्मती मिळवली आणि या नंतर औरंगाबाद / जालनाचे माजी अध्यक्ष नेते स्वर्गिय श्री रावसाहेब धस ज्यांनी आपले कार्यकाळात अनेक सदस्यांच्या समस्या सोडवल्या मात्र त्यांचेच त्यांच्या निधनानंतर अद्यापपर्यंत पहीली दुसरी आश्वासित प्रगती योजनेची वेतन निश्चिती झालेली नव्हती व काही कारणामुळे प्रकरण अतिशय किचकट होउन बसले होते ..श्री धस साहेबांचे चिरंजीव हे अनेक दिवसांपासुन प्रयत्न करत होते पण त्यांचे कामात अनेक अडचणी निर्माण झालेल्या असताना अखेर संघटनेच्या हस्तक्षेपातुन मा.अध्यक्षांनी हे प्रकरण आपल्या हातात घेतले व सातत्याने पाठपुरावा केला व आज ल.पा.विभाग औरंगाबाद च्या कार्यकारी अभियंता तसेच अधिक्षक अभियंता यांचेशी चर्चा करुन योग्य ते जी.आर व कागदपत्रे सादर करुन सदर प्रकरणी तोडगा काढुन पाच वर्षापासुन अडचणीत आलेले प्रकरण सोडवले आता लवकरच स्व.धस साहेबांच्या प्रलंबित सर्व वेतन निश्चितीचा मार्ग मोकळा झाला... आमचे नेते स्व.धस साहेबही आज स्वर्गातुन समाधानी झालेले असणार व आम्हीही आज समाधानी झालो व हे संघटनेच्या माध्यमातुनच हे अवघड कार्य करता आले.... मा.अध्यक्ष यांनी आपल्या संघटनेतील सदस्यांच्या अडचणी सोडविण्याच्या कार्यासाठी असलेली तळमळ व संघटन कार्य करण्याची खास शैली पाहुन आपल्या नेतृत्वाच्या कार्याला खरोखरच तोड नाही.... जय रेखाचित्र संघटना ...*.🤝👍Date: 18/11/2021
१०० ) कालचे पत्र माईल स्टोन ठरले..
सरळसेवा नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण हा विषय किल्ष्ट झाला होता.
शासनाने प्रथमच मुख्य आरेखक आरेखक व सहा आरेखक ही सरळसेवा भरती केली गेली. व यामध्ये नियुक्ती आदेशामध्ये प्रशिक्षणाची अट टाकण्यात आली. वास्तविक या पदांना कोणताही प्रशिक्षण कार्यक्रम न आखता ही अट शासनाने टाकली होती.
क्लार्क मंडळींनी प्रशिक्षणाची अट दाखवूनआश्वासित प्रगती तसेच पदोन्नती थांबवली. वास्तविक तत्कालीन केंदीय कार्यकारिणीने याच्यावर 2010 मध्येच कार्यवाही केली असती तर आज ही वेळ आली नसती. बरेच सहकारी 2012 पासून पदोन्नतीस पात्र असताना देखील पदोन्नती पासून वंचित राहिले. व यावर काम देखील झाले नाही.
कालच्या पत्राने लाईफ टाइम प्रशिक्षण अट या विषयाला पूर्णविराम मिळाला.
2018 ला देवालाच काळजी म्हणून जकी जाफरी साहेब व गभने साहेब यांसारखे हिरे संघटनेस अध्यक्ष व सरचिटणीस म्हणून लाभले. आणि संघटनेचा कायापालट झाला. संघटनेने या तीन वर्षात मागील 10 वर्षाच्या कामाचे बॅकलॉक भरून काढला. मागील तीन वर्षात तिजोरीचा कडखडात, करोना महामारी व पायात पाय घालणारे विरोधक अशा अनेक संकटाना तोंड देत संघटने कामकाज केले.
असो पिचर अभि बाकी हे. अजून बऱ्याच मोठ्या कामासाठी अध्यक्ष,सरचिटणीस व कार्यकारणीस शुभेच्छा देतो तसेच संघटनेवर निस्वार्थ प्रेम व सहकार्य करणाऱ्या रेखाचित्र शाखेच्या तमाम सहकार्यांना आभार व्यक्त करतो.
जय संघटना.. ✌️✌️
राहुल साळुंखे
विभागीय सचिव,पुणे
९९ ) सरळ सेवेने लागलेल्या सहायक आरेखक,आरेखक,अनुरेखक यांच्या पदोन्नती करिता प्रशिक्षणापासून सुट मिळणे बाबत शासनाने पत्र निर्गमित केले. हे औचित्य साधून नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष श्री. राहुलजी आहेर हे अध्यक्ष महोदयांचे सत्कार करणे साठी आज औबादला आले.. मात्र अध्यक्ष महोदय कामा निमित्त बाहेर गावी असल्याने श्री. राहुल यांनी प्रमुुख सल्लागार श्री. करपे साहेब व माझी भेट घेतली व पुष्प गुच्छ देऊन नाशिक जिल्हा शाखे तर्फे शुभेच्छा दिली...व श्री. करपे साहेबांच्या निवास स्थानी संघटनेच्या विविध विषयावर सविस्तर चर्चा केली... धन्यवाद श्री. राहुलजी..🙏🙏
९८ ) न राहवून प्रतिक्रिया लिहल्याशिवाय माझे मन मला स्वस्थ नाही बसु देणार व आपल्या प्रतिक्रियाच्या माध्यमातुन काही कटूगोड शब्द प्रहार सवयीप्रमाणे ओघाने येणार..असो... तुम्ही केलेल्या संघटन नेतृत्व व कार्याची अभ्यासपुर्ण प्रशंसा हे तंतोतंत खरंच आहे... कुणी काही म्हणो मी तर ठामपणे म्हणेन हाच संघटनेच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ होय ..न भुतोन भविष्यती असे जलद गतीने,निष्ठेने संघटनेचे कार्य आपण पहात आहोत ... संघटनेला जी संजिवनी मिळाली व तीनच वर्षात संघटना सर्व स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त करु शकली याचे श्रेय युवा अध्यक्ष मा.श्री जाफरी सर ,गभणेजी व त्यांच्या टिमला जाते .. संघटनेतील सद्य कार्यकारीणीचे कार्य व सर्व सभासदांची एकजुट यामुळेच आपल्या संघटनेचा विकास झालाय...संघटनेतील कोणत्याही कार्याला परिश्रम सचोटी प्रयत्ना शिवाय आर्थिक पाठबळाची अत्यंत आवश्यक्ता असते व या आर्थिक पाठबळाच्या जोरावरच संघटनेतील प्रलंबीत अथवा सदस्य हिताचे प्रश्न सोडविता येतात या साठी सर्व सदस्यांनी वेळोवेळी लढा निधी किंवा वार्षिक वर्गणी नियमित देणे हे त्यांचे नैतिक कर्तव्येच आहेत... अनेक निष्ठावान सदस्य आता नियमित वार्षिक वर्गणी व प्रासंगीक लढानिधी देत आहेत हि समाधानी बाब आहे... परंतु अजुनही काही भिकारचोट वृत्ती संघटनेत जिवंत आहेत जे की काहीही योगदान न देता संघटनेच्या पदाधिकार्यांच्या परिश्रमाच्या यशप्राप्त फळाचा लाभ फुकट लाटुन घेत असतात.. अशा वृत्तीच्या ऐतखाउ लोकांनी कोणतेही योगदान न देता चोरवृत्तीने संघटनेच्या यशामार्फत मिळत असलेला लाभ लाटलेला त्यांना कदापी पचणार नाही, हे नक्कीच ... संघटना काय करते ? काय कामाची? आम्हाला लाभ तर मिळणारच होता संघटनेने काय केले असले नपुसंक प्रश्न विचारणारी वृत्ती कडे आता संघटनेने वाळीत टाकलेले आहे... संघटने विरुद्ध वागणाऱ्या प्रवृत्तींनाही दुर्लक्षित केलेले आहे व संघटनेचे उज्वल कार्यच संघटनेची आता ओळख बनलेली आहे... संघटनेचा पारदर्शक कारभार व होणारी प्रगती पाहुन इतर अनेक संघटनाही अचंबीत झालेल्या आहेत हा प्रगती आलेख काहींना देखवत नाही व ते संघटनविरुद्ध काड्या करणे ..नेतृत्वाला नावे ठेवणे ,भलतेच आरोप करणे अशा वृत्तीचाही आता सफाया होत आहे... काही जुनी जाणती मंडळीही अशी आढळलेली आहे की जे संघटनेचा पोवाडा गात असायचे त्यातीलही काही मंडळी काहीही योगदान न देता काही वेळा विरोधाने वागताना लाभ घेण्यात मात्र दुष्काळग्रस्ताप्रमाणे सर्वात पुढे आहेत... व काही मांडुळासारख्या वृत्तीचेही महाभाग हे दोन्ही बाजुने बोलतात पण योगदान देण्याच्या भानगडीत न पडता मिळणाऱ्या लाभाचे भक्ष्य मटकन गिळतात...असो..या सर्व बर्या वाईट परिस्थितीतुन संघटनेचा प्रवास खुपच छान चाललाय ..संघटनेचे क्रांतीवीर अध्यक्ष सरचिटणीस व संपुर्ण टिम हे संघटनेच्या सभासदांच्या हितासाठी झटत आहे म्हणुनच संघटना बळकट झालीय .. प्रमोद राव तुमच्या पदोन्नतीचा अडसर ठरलेला प्रश्न संघटनेचे कार्य हाती घेतल्यावर सर्वप्रथम मा.अध्यक्ष मा.सरचिटणीस श्री दारुणकर व मी स्वतः मंत्रालयात हे प्रकरण मा.सचिवांकडे सादर करताना दोन दिवस मुंबईत होतो जवळपास तीन वर्षापासुन या प्रकरणाचा मा.अध्यक्षांनी सर्व नितीचा अवलंब करुन पाठपुरावा केला होता ..या प्रकरणाच्या संपुर्ण प्रवासाचा मी साक्षीदार आहे अनेक वेळा मी , पठाण सर आम्ही अध्यक्षांबरोबर मुंबईला गेलो तेंव्हा या प्रकरणावर कुठे कुठे कुणा कुणाशी संघर्ष करावा लागला हे सांगण्यापेक्षा कालपरवा प्राप्त झालेल्या यशस्वी पत्राचा आनंद महत्वाचा वाटतोय...सरळ सेवेतील सर्व जे कुणी या पत्रानुषंगाने लाभधारक आहेत त्यांच्या पदोन्नती लवकर व्हाव्या या शुभेच्छा आणि आशिर्वादही कारण आम्ही बरीचशी जेष्ठ मंडळी अशी आहेत की सदतीस अडतीस वर्षे अनुरेखक या पदावर रुजु झालो अन सेवानिवृत्तही ..हे पदोन्नतीचे शल्य कायम उरात असायचे जरी वेतन प्रमुख आरेखकाचे मिळत होते पण इतरांना वेतन सांगता येत नसे अन वय व सेवा वाढुनही पद सांगायची लाज वाटायची ..आम्हा पदोन्नती वंचीत जेष्ठांचे राहीलेले अपुर्ण स्वप्ने आम्ही तुम्हा युवा सदस्यांच्या मिळणाऱ्या पदोन्नतीच्या स्वरुपात आम्ही पाहतो... एकच सांगणे आहे ..हे असे सामुहीक कार्य फक्त आणि फक्त संघटनेमुळेच होउ शकते तेंव्हा सर्व तरुण मंडळी पदोन्नत व्हा संघटनेशी जुळून रहा एकनिष्ठ रहा ... संघटनेची प्रतिष्ठा वाढवा पुढील कार्यकाळ तुम्हा युवा कार्यकर्त्यांचाच आहे.... संघटनेची सर्व धुरा आता तुमच्याच हाती आहे...खुप खुप शुभेच्छा...... राव साहेब तुम्ही छान लिहता असेच लिहीत रहा... तुम्ही संकेत स्थळाचे कार्यही व्यवस्थित करत आहात त्या बद्दलही खुप छान वाटते .. राजेंद्र करपे / प्रमुख सल्लागार
९७ ) ज्यांना असते कर्तव्याची जाण.. तेच पेलू शकतात संघटनेची कमान.. अध्यक्ष महोदय हे सरळ सेवेने लागलेल्या सभासदांच्या पदोन्नती होणे साठी बरेच चिंताग्रस्त होते.प्रशिक्षणाची अट कशी शिथिल अथवा सुट लवकरात लवकर मिळविता येईल याबाबत अत्यन्त अस्वस्थ राहायचे...बऱ्याच वेळा अध्यक्ष महोदय,करपे साहेब व मी ह्या विषय बाबत जलद गतीने कार्यवाही कशी करता येईल यबाबत विचारविनिमय करायचो...अध्यक्ष महोदयांनी अधिकारी व राजकीय मदतीने कशी सोडवता येईल...सतत चिंतग्रस्त राहायचे...त्यातून बरेच सभासद गण अधून मधून ह्या विषयावर टोमणे, टिका टिप्पनी करायचे...मात्र सर्व परिस्थितिच्या सामोरे जाऊन आज अध्यक्ष महोदय व केंद्रकार्यकारिणीने सरळ सेवेने लागलेल्या सभासदांचा पदोन्नती सारख्या अती जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावला..धन्यवाद अध्यक्ष महोदय...
प्रमोद राव यांनी संघटनेच्या कार्याची जाण ठेऊन अतिशय सुंदर व गोड भाषेत आपले अभिप्राय दिलेत... मित्रांनो आपली संघटना बुलेट मोटार सायकल सारखी दोन चाकावर चालणारी आहे..खरे तर संघटना ही बुलेट नव्हे तर बुलेट ट्रेनच आहे...जशे बुलेट च्या दोन्ही चाकत योग्य हवा व पेट्रोल टाकीत पेट्रोल असणे आवश्यक आहे..ह्या दोन्ही पैकी एक ही स्तर कमी झाले तर बुलेट आहे त्याच ठिकाणी उभी राहते अर्थात चालू शकत नाही.. तसेच संघटनेचे आहे..सभासदांचे संघटने वरील विश्वास,एकनिष्ठता व एकजुटी तसेच आर्थिक साह्य हे गरजेचे आहे...समस्त सभासदांना विनंती की संघटनेला गतिशील व मजबूत करण्यासाठी आपापली वार्षिक वर्गणी आपल्या जिल्हाध्यक्ष,कोशाध्यक्ष अथवा जबाबदार पदाधिकार्यकडे जमा करावी ही विंनती...लढानिधी ही प्रासंगकी स्वरूपात घेतली जाते..मात्र वार्षिक वर्गणी ही संघटनेचा आवश्यक भाग आहे आपले कर्तव्य समजून वेळेत अदा करावी..अशी पुनःश्च विनंती..( Y. O. Pathan )
९६ ) हा प्रश्न सरळ सेवेने नियुक्ती मिळालेल्या सहायक आरेखक/आरेखक यांच्या फक्त पदोन्नतीचाच नव्हता तर त्यांना आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ सुध्धा नाकारल्या गेला असता. त्यामुळे अशा सरळ सेवेने नियुक्त Adm/Dm यांचे आर्थिक नुकसान झाले असते. हि बाब केंद्रिय कार्यकारिणीच्या लक्षात तेव्हाच आली. कोल्हापूर आमसभेच्या बैठकीनंतर 1 महिन्याच्या आतच या विषयाला हात घातला होता. तेव्हा पासून मंत्रालयातील विविध अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या/ सेवानिवृत्ती/ covid 19 विषाणू प्रादुर्भाव, lockdown इत्यादी संकटाना तोंड देऊन सतत पाठपुरावा करून संघटनेने हे यश मिळवले आहे. सध्या पुरते इतकेच सविस्तर नंतर लिहीनच...( सुधीर गभने, सरचिटणीस )
९५ ) संघटनेच्या यशाबद्दल आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा व अभिनंदनाचा मी संघटनेच्या वतीने स्विकार करतो.परंतु या ठिकाणी मी अध्यक्ष म्हणून हे सांगू ईच्छितो की,या यशाचे जे खरे मानकरी आहेत त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
माझ्या सोबत मा.सरचिटणीस श्री.सुधीर गभणे साहेब यांचा सुद्धा नेहमी या प्रकरणी पाठपूरावा व भक्कम पाठिंबा मला नेहमी असायचा व सदैव राहील.मंत्रालयात प्रमुख सल्लागार श्री.करपे साहेब व श्री.पठाण साहेब हे ही नेहमी माझ्या सोबत मंत्रालयात असायचे व त्यांचे ही आवश्यक ते मार्गदर्शन मला लाभले.मंत्रालय संपर्क प्रमुख श्री.बन्सिलाल राठोड साहेब,उपाध्यक्ष श्री. माणिकराव शिंदे साहेब यांनी 2019-20 मधे सातत्याने या फाईलचा पाठलाग केलेला आहे.अतिरिक्त सरचिटणीस श्री.विनायक जोशी साहेबांनी मा.आमदार धिरज देशमुख व मा.आ.सतिश चव्हाण यांना भेटून त्यांच्याकडुन सकारात्मक पत्र प्राप्त करून घेतले व मा.जलसंपदा मंत्री यांना या प्रकरणी संबंधित अधिकारी यांना बोलायला लावले,तसेच या पूर्वी त्यांनी वेतन पडताळणीच्या अडचणीच्या वेळेस तत्कालिन मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे कडून संघटनेच्या पत्रावर आवश्यक अभिप्राय प्राप्त करुन घेतले होते व मोठे प्रकरण यामुळे निकाली निघाले होते.
विभागीय सचिव श्री.राहूल साळूंखेची ओळख सामान्य प्रशासन विभागात असल्यामुळे त्यांनी सा.प्र.विभागातून फाईलचा निपटारा करण्यासाठी मोठी कामगिरी केलेली आहे.तसेच उपाध्यक्ष श्री.रविंद्र बिंड साहेब,कोषाध्यक्ष श्री.आपटे साहेब, श्री.किरण मुळे,मंत्रालय प्रमुख दिपक रसाळ साहेंबाचे सहकार्य लाभले.महिला प्रतिनिधी सौ.वंदना परिहार मॕडमनी मा.राज्यमंत्री श्री.बच्चू कडु साहेबां सोबत मिटींग घडवून आणली व खुप मोठे सहकार्य केले तसेच प्रमुख सल्लागार श्री दारुण कर साहेब, श्री.करपे साहेब, श्री.नजीर शेख साहेब, यांचे मार्गदर्शन या प्रवासात मोलाचा टप्पा ठरले.(यापैकी कुणाचे नाव सुटले असेल तर या बद्दल क्षमस्व कारण प्रत्येकाचा नामोल्लेख करणे इथे शक्य नाही ) तरी महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी यांचे अध्यक्ष या नात्याने मी मनापासून आभार व्यक्त करतो व सर्व सभासदांचे ही अभिनंदन करतो कारण हे यश माझे एकट्याचे नसून हे संघटनेचे यश आहे. यापुढेही आपल्या सर्वांचे सहकार्य मला नेहमीच राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
आपलाच
जकी अहमद जाफरी
९४ ) जलसंपदा विभाग, रेखाचित्र शाखेच्या आरेखक संवर्गाच्या पदोन्नतीचा प्रलंबित प्रश्न मंत्रालयीन स्तरावर मार्गी लावल्याबाबत सदर अभूतपूर्व यशाचे मानकरी रेखाचित्र शाखा संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. जाफरी साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना प्रमुख पाहुणे मा. श्री. बुद्धभूषण दाभाडे साहेब ( उपविभागीय अभियंता ) व इतर उपस्थित संघटनेचे पदाधिकारी. यावेळी उपविभागीय अभियंता यांनी संघटनेची कार्यप्रणाली समजून घेतली तसेच संघटना करत असलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. मित्रांनो सदर यश अतिशय महत्वाचे आहे. सरळसेवेने नियुक्त आरेखक संवर्गाच्या पदोन्नतीस विभागीय परीक्षेच्या अटीमुळे विलंब होत होता. काही परिमंडळे सदर अधिसूचना दाखवून मंत्रालयाच्या मार्गदर्शनशिवाय पदोन्नती करणार नाही अशी भूमिका घेत होती. मंत्रालयात विविध विभाग व डेस्क वर फाईल शिफारशीसाठी फिरत होती. सदर कामाचा पाठपुरावा वाटते तितका सोपा नक्कीच नव्हता. मा. जाफरी साहेबांनी मंत्रालयात वारंवार पाठपुरावा केला. लोकप्रतिनिधी यांची शिफारस घेणे. मा. सचिव साहेबांना विषय अवगत करून देणे. पत्राच्या draft मध्ये अपेक्षित बदल न झाल्याने त्यात पुन्हा बदल घडवून आणला जेणेकरून भविष्यात पुन्हा अडचणी निर्माण होऊ नयेत याची काळजी मा. जाफरी साहेबांनी घेतली. पदोन्नतीच्या सदर कामासाठी MAT ची पण चाचपणी करून पाहिली होती. MAT चा निर्णय सकारात्मक लागला तरी शेवटी पुन्हा मंत्रालयात जावेच लागणार होते त्यामुळे मंत्रालयातील सकारात्मक पत्र काढण्यासाठी प्राधान्य दिले. मा. सचिव साहेबांशी यशस्वी शिष्टाई नंतर आपल्याला पत्र मिळाले व पुढील मार्ग मोकळा झाला. यासाठी जाफरी साहेबांनी प्रचंड चिकाटी ठेवली . सदर कार्य तडीस नेण्यासाठी जे जे शक्य ते सर्व पर्याय त्यांनी वापरून पाहिले. हे मला माहिती असलेले पर्याय मी तुम्हाला सांगितले यापेक्षा जास्त मेहनत त्यांनी घेतली. सदर पत्रामुळे सरळसेवेने नियुक्त ज्यांचा फायदा होत आहे त्या सर्वांनी सदविवेक बुद्धीने व स्वयंस्फुर्तीने संघटनेचा लढा निधी जमा करावा असे आवाहन मी एक लाभार्थी म्हणून सर्व लाभार्थी सदस्यांना करत आहे. आज आम्ही प्रतिनिधी स्वरूपात प्रत्येकी 5,000 रुपये असे एकूण 20,000 रुपये संघटनेकडे जमा केले आहेत. सदर पत्रामुळे आपला फायदा होणार आहे यामुळे सर्व लाभार्थी सदस्यांनी याची नोंद घ्यावी ही विनंती. यावेळेस संघटनेचे कोणतेही पदाधिकारी तुम्हाला लढा निधी मागणार नाहीत किंवा तसे आवाहनही करणार नाहीत. आता गरज आहे ती लाभार्थी सदस्यांनी स्वतः हुन स्वयं प्रेरणेने पुढे होऊन संघटनेला बळकट करण्याची. सदर पत्रासाठी निश्चितच खूप मोठी शक्ती पणाला लागली आहे. अजूनही बरेच कामे मार्गी लावायचे आहे यासाठी संघटनेला बळकट करूया. 1996 ते 2006 कालावधी थकबाकी साठी लाभार्थी सदस्यांनी संघटनेचा लढा निधी वेळेवर भरला होता. त्यामुळे या पत्राचा फायदा घेणाऱ्या सर्वांनी लढा निधी देऊन एक आश्वासक पाऊल टाकूया. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रात्री एक वाजता जेव्हा जाफरी साहेबांचे मुंबईहुन औरंगाबादला विजयी पत्र घेऊन आगमन झाले तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी करपे साहेब, पठाण साहेब, शेख साहेब रेल्वे स्टेशनवर गेले होते या पत्राने या सर्वांचा काहीही फायदा होणार नव्हता तरीही निस्वार्थ भावनेने त्यांनी जाफरी साहेबांचे स्वागत केले. जेव्हा आपण सारे लाभार्थी झोपेत होतो तेव्हा आपल्या संघटनेतील सर्व जेष्ठ, वरिष्ठ पदाधिकारी, सदस्य यांनी केलेल्या त्यागाची व समर्पणाची जाणीव ठेवा, ही नम्र विनंती. पुन्हा एकदा सरळसेवेने नियुक्त आरेखक संवर्गाच्या पदोन्नती साठी मंत्रालयातून पत्र काढून आणल्याबद्दल संघटनेचे मा. अध्यक्ष श्री जाफरी साहेब तसेच सर्व केंद्रीय पदाधिकारी यांचे खूप खूप अभिनंदन व धन्यवाद ! ( प्रमोद राव )
९३ ) संघटनेचा आणखी एक विजय
सर्व सभासद बंधू भगिनींचा हार्दिक अभिनंदन💐💐🎊🎊
मा.सचिव,जलसंपदा श्री .अजय कोहिरकर साहेब यांचे मन पूर्वक आभार
या विजयासाठी घेतलेल्या परिश्रम व कष्ट व पाठपूरावासाठी सर्व संबंधित केंद्रीय कार्यकारीणी पदधिकारी यांचे संघटने मार्फत आभार व अभिनंदन 💐💐💐
माजी जलसंपदा मंत्री मा.श्री.गिरीष महाजन साहेब ,मा.ना.बच्चू कडु साहेब,राज्य मंत्री,मा.आमदार अतुल सावेजी,मा.आमदार श्री.धिरज देशमुख,मा.आमदार श्री .सतिश चव्हाण या सर्व मान्यवरानी वेळोवेळी सहकार्य केल्या बद्दल मन पूर्वक आभार....जय संघटना...महाराष्ट्र राज्य रेखाचित्रशाखा कर्मचारी संघटनेचा विजय असो......
९२) मी मागील तीन दिवसांपासून मंत्रालयात ठिय्या मारुन बसलेलो आहे . कामे होती "सरळ सेवा भरती आरेखक व सहाय्यक आरेखक यांची रखडलेल्या पद्दोन्नतीसाठीचे " पत्र काढणे.
विषयांकित प्रकरणात मागिल ३ वर्षापासुन पाठपुरावा चालू आहे. अधिसुचनेशी संबंधित प्रकरण असल्यामुळे जलसंपदा विभाग स्वतः कुठलेही निर्णय घेत नव्हते. फाईल सामान्य प्रशासन विभाग- वित्त विभाग नंतर पुन्हा सामान्य प्रशासन विभाग असा प्रवास झाल्यानंतर मागील वर्षी फक्त परिक्षा नसल्यामुळे वार्षीक वेतन वाढ रोखण्यात येऊ नये असे पत्र निघाले होते व पदोन्नतीसाठी पुन्हा स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले.
सा.प्र.विभागाने परिक्षा नियम तयार करण्याचे आदेश दिले. परिक्षा नियमासाठी मेटा नाशिकला आदेशित करण्यात आले.मेटा नाशिकने syllabus तयार करुन शासनास सादर केले व नियमांची अधिसुचनेची कार्यवाही सुरु झाली.
या कार्यकाळात ३ सचिव, ४ उप सचिव व २ अवर सचिव बदल झाले. सर्वांना वेळोवेळी प्रकरण समजावून सांगण्यात आले व अखेर पत्र तयार झाले परंतु पत्रात जो मसुदा होता त्यातील शब्द असे होते की "2016 च्या पुर्वी नियुक्त आरेखक व सहाय्यक आरेखक यांच्या पदोन्नत्या रोखण्यात येऊ नये परंतु 2016 नंतर पदोन्नत झालेल्या आरेखक , सहाय्यक आरेखक व अनुरेखक यांना पुढील पदोन्नती साठी विहित करण्यात येणारी परिक्षा देणे अनिवार्य आहे(आस्था प्रशि च्या अभिप्राय नुसार).
सदरील वाक्य भविष्यात पुन्हा घातक ठरणार होते. म्हणून मी सचिवांची भेट घेतली व त्यांना समजाऊन सांगितले आणि सचिवांनीही सकारात्मक response देत उप सचिव,अवर सचिव व कक्ष अधिकारी सोबत चर्चेसाठी मिटींग लावली. 21/10/2021 रोजी मिटींग झाली व मसूदा बदलण्याचे आदेश मा.सचिवांनी दिले.
मी सध्या मंत्रालयातच आहे ...मागील तीन दिवसांपासुन कोविड निर्बधामुळे मंत्रालय प्रवेशासाठी दररोज अनेक अडचणी येत आहे तसेच प्रत्येक कक्षावर तासनतास अधिकार्यांची कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा करताना भयंकर वैताग येत आहे परंतु संघटनेचे कार्य व सदरील विषयी पत्र आज निघण्याची अपेक्षा असल्याने संघटनेचे कार्य अर्धवट सोडुन माघार घेणे योग्य वाटत नाही माझे संघटनेच्या प्रत्येक कामासाठी शंभर टक्के प्रयत्न चालुच असते पुढेही चालुच राहणार .. आज सदर पत्राविषयी शुभसमाचार येण्याची दाट शक्यता आहे .. संघटनेच्या सर्व सभासंदांच्या माहितीस्तव....
धन्यवाद
आपला... जकी जाफरी, अध्यक्ष.म.रा.रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटना
91) दिनांक २६- २७ ऑगस्ट रोजी च्या बैठकीचे इतिवृत्त
90) संघटनेची घटना दुरुस्ती... दिनांक २७ / २८ आॕगस्ट 2021 रोजी वाल्मी औरंगाबाद येथे हि बैठक आयोजित होती व या बैठकीत केंद्रीय पदाधिकारी हे संघटनेच्या स्थापनेच्या वेळेसची जी रचित नियमावली घटना होती त्या जुण्या घटनेत कालपरत्वे आजच्या कालानुरुप आवश्यक असलेल्या संघटनेच्या सुशासन, नियम. आचारसंहीतेत सर्वानुमते सर्व जाणकार पदाधिकार्यांच्या चर्चा विरोध प्रतिरोध व अशा अनेक खलबतांसह अंतीम एकमतासह प्रत्येक शब्दानशब्दांचा अक्षरशः किस काढण्यात येउन किंवा अमृत मंथनातुन प्राप्त होणाऱ्या अमृताप्रमाणे निर्विवाद निशंक निर्विरोध एकआदर्श अशी आदर्श आचारसंहिता नियमावली अर्थात संघटनेच्या घटनेचे अंतीम परिपुर्णतेचे कार्य मराठवाड्यात घडले हा हि एक इतिहासच घडला असेच म्हणावे लागेल... कारण आपल्या संघटनेचा जन्म याच मराठवाड्याच्या भुमीत झाला ... माझ्या संघटनेसह माझ्या मायभुमीचा अभिमान वाटणे साहजिकच आहे मात्र या घटनेस प्राप्त स्वरुप देणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम पदाधिकार्यांचे व या घटना दुरुस्तीसाठी येउन अकरा बारा तासाची कायम बैठक देउन आपल्या अंगी असलेल्या सर्वगुण,ज्ञान अनुभवासह संघटनप्रेम व संघटनेच्या भविष्यातील कारकीर्दीसाठी मार्गदर्शक ठरेल याठी अपार मेहनत घेण्यासाठी आपले कौटुंबिक व वैयक्तिक कार्यातुन वेळ काढुन या संघटनेच्या महायज्ञात सामिल होउन जे अभुतपुर्व कार्य केले यासाठी या पदाधिकार्यांना मानाचा सलाम करावाच लागेल.... या इंग्रजी भाषेत असलेल्या जुण्या घटनेचे मराठी भाषेत रुपांतर करुन आजच्या काळाप्रमाणे त्यात दुरुस्ती मुद्यासह प्रारुप घटना या बैठकीत प्रस्तुत कार्य करण्याचे श्रेय जुने जाणते संघटनेच्या स्थापनेपासुनचे साथीदार साक्षीदार व सध्याचे संघटनेचे मार्गदर्शक श्री नझीर शेख सिंधुदुर्ग यांना जाते ...मित्रांनो हि घटना म्हणजे काय असते ? कशासाठी ? असे अनेक प्रश्न मनात आले.. खरं तर मलाही माझ्या पुर्ण हयातीत संघटनेची घटना असते व त्याप्रमाणे संघटन कार्य असते हे माहित नव्हते.. असेच अनेकांनाही माहित नसेल परंतु खरोखरच घटना संघटनेच्या कार्यासाठी किती महत्वाची आहे हे काल परवाच्या बैठकीत कळले...आजवर जे संघटनेचे कार्य चालु होते यात किती चुकीची कार्यप्रणालीने कार्य चालु होते ...अनेक दिग्गजांनी जरी संघटनेचे महान कार्ये केलेली असतील परंतु किती पदाधिकारी यांनी घटनेप्रमाणे वागले असतील हा संशोधनाचाच विषय ठरेल..मागील कार्यकारीणीच्या कार्यकाळातील आठ वर्षाचा कार्यकाळ तर मनमानी अनागोंदीचाच कार्यकाळ ठरला हे सर्वश्रुत आहे... मागील कार्यकारीणीस महासंघर्ष करुन कोल्हापूर आमसभेत सत्तांतर झाले... संघटना आमच्या शिवाय कुणाच्याच ताब्यात जाणार नाही आम्हीच येथील राजे आम्हीच बादशहा अश्या भ्रमात असलेल्यांचा फुगा कोल्हापुरातील आमसभेतील उपस्थित सभासदांनी फोडला... अन् त्या नंतर नवनिर्वाचित नेतृत्वाने तमाम सभासदांच्या आग्रहाने आजतागायत संघटना परिवर्तनाचे , विकासाचे पारदर्शक कारभाराचे व संघटनप्रेमाचे वारे वाहु लागले... संघटनेला स्वतःची खाजगी मालमत्ता मालकी समजुन संघटनेच्या सदस्यांच्या अधिकाराला लोकशाहीप्रमाणे घटनेप्रमाने कार्य करण्यास न जुमानणार्या मग्रुर अहंकारी स्वार्थी भ्रष्टाचारी व दडपशाहीने दहशत पसरवुन संघटना चालवणार्याच्या वृत्तीचे निर्दालन झाले ........ ते काळपर्व संपले ...नव्या दमाचे नेतृत्व संघटनेला लाभले व्हेंटिलेटरवर गेलेली संघटना आता मोकळा श्वास घ्यायला लागली ...संघटनेच्या कार्याला , सभासदांच्या कल्याणासाठी नवसंघटना सदस्य हितासाठी सज्ज झाली ... एक एक यशाचे टप्पे पार केलीत ...जे कार्य तीस वर्षात होउ शकणार नाही ते घटना दुरुस्तीचे महत्वाचे कार्य तीन वर्षात करुन दाखविले या सह अनेक सदस्य हितांची शासन यंत्रणेशी लढा देउन यशस्वी कार्ये पार पडली..ते ही कुण्या मामा,काका,भाउ दादा ,आबा व कोण्या साहेबांच्या मदतीशिवाय... आज संघटनेच्या प्रत्येक सभासदांच्या ह्रदयात संघटनेसाठी कार्य करण्यासाठी लढणार्या झटणार्यांनी आपले स्थान निर्माण केलेले आहे... संघटनेचा कारभार पारदर्शकतेने चालु आहे...संघटनेच्या पै पैश्यांचा योग्य ठिकाणीच खर्च व त्यांचा पारदर्शक हिशोब संघटनेकडे आहे.... मागील काळातील एक रुपया तसेच एक कागदही हस्तांतर या आताच्या कार्यकारीणीला झालेले नसतांना शुन्यातुन साम्राज्य निर्माण केलेले आहे.. हे साम्राज्य हि संघटनेची प्रतिष्ठा ,संघटनेचा पारदर्शक कारभार ,लौकीक अजुनही मागील काही असंतुष्टांना देखवत नाही ..अधुन मधून त्यांच्या कुटाळक्या चालुच आहे काही मागील कार्यकाळातील आपला वैयक्तिक झालेला खर्च या काळातील जमा निधीतुनही काही संबंध नसताना सर्व नैतिकता विसरुन वसुल करतानाही कानावर आले.. काही वृत्ती अशा आहेत कि सभासदांना संघटनेच्या कार्यासाठी वार्षिक वर्गणी, लढा निधी देउ नये असे बहकवण्याचाही केविलवाणा प्रयत्न करताहेत...काही महाभाग संघटनेच्या संघटनेच्या यशाचे श्रेय स्वतःच्या पत्रावळीत ओढुन घेण्याचाही प्रयत्न करताना दिसले ..तर काही संघटनेच्या विकासाचा यशाचा रथ वेगाने धावताना पाहुन अवाक् होतात तर काही अगदी मुग गिळून बसले आहेत .. बरेच जनांनी मुक्त मनाने सद्यकार्याची यशाची प्रशंसाही केली कौतुक अभिनंदने केली...असो वाईटांचे वाईट कर्म तेच जाणो ... संघटना आत्ता परिपुर्ण झाल्यासारखी वाटते हे निश्चित संघटनेतील आताचे भारावलेले वातावरण मला नाही वाटत या पुर्वी कधी कोणी अनुभवलेले असणार....या औरंगाबाद शहरात संघटनेची पायाभरणी झाली अन् आता कळसही चढवण्याचे भाग्य या शहराला मिळाले याची नोंद इतिहासात आपल्या संवर्गाचा अखेरचा सभासद सेवेत असेल तोवर असणार... आज महाराष्ट्रातील सर्वात कार्यक्षम, विकसित ,डिजीटल व सक्रीय संघटना म्हणुन रेखाचित्र संघटनेचा डंका वाजत आहे...स्वतःचे संकेतस्थळ असलेली आपली संघटना ही एकमेव आहे.. कालच्या बैठकीत संघटनेच्या घटना दुरुस्ती कार्यानंतर सर्वसाधारण सर्व सभासदांच्या उपस्थितीत पुढील मोठी सभा लवकरच आयोजित होईल या सभेत या घटना दुरुस्तीचे सर्व सभासदांसमोर प्रस्तुतीकरण होउन घटना दुरुस्तीसाठी शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येईल .. शासनाकडुन संघटनेची घटना मान्यता मिळाल्यानंतर आपल्या संघटनेचा कारभार अजुनही विकसित होईल.... येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी ...नव्या दमाच्या युवा पिढीसाठी पुढील संघटन कार्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे... विद्यमान कार्यकारीणीने , नेतृत्वाने सर्व सहकारी मित्रांनी सर्व सभासदांच्या सहकार्याने आताची संघटना भुमी अतिशय सुपिक मशागत करुन ठेवलेली आहे नजिकच्या भविष्यात याच संघटनेच्या घटनेच्या खतपाण्यासह निष्ठेने संघटनेचे कार्य करणार्याच्या मेहनतीला कष्टाला असेच यश येत राहणार आहे..यातुनच आपल्या संवर्गाचा सर्वांगीन विकासही होणार आहे ..या संघटनेच्या सुपिक भुमीवर सुगंधी बहारदार फळेफूले बहारणार आहेत... संघटन हे नंदनवन होईल ..पुनः या बागेत कोण्या उद्दांड जनावरांनी हैदोस घालवुन वृंदावन पायदळी तुडवून संघटनेची नासधूस करु नये म्हणुनच संघटनेची हि जुणी व आपणा कुणालाच माहीत नसलेली संघटनेची घटना आपल्याला माहित असणे आवश्यक होते..व तिच्या आजच्या काळान्वये योग्य तो बदल घडवुन एक सुधारीत घटना आपल्या हाती पडावी व ती संघटनेला पुढच्या काळात क्षणोक्षणी मार्गदर्शक ठरावी याच साठी होती हि महत्वाची बैठक ..हि बैठक अतिशय खेळीमेळीत समजुतदारीने,जवाबदारीने,पुढील पन्नास वर्षाच्या काळाच्या विचाराने सर्व पदाधिकार्यांच्या वैविध अनुभवी तल्लख कुशाग्र बुद्धीच्या रवीने वाल्मी परिसराच्या शांत निसर्गरम्यरुपी कुंभातील घटनारुपी दह्याचे दोन दिवसांच्या सततच्या बावीस तासांच्या घुसळुन घूसळून हाती आलेल्या नवनिता प्रमाणे या संघटनेच्या सुधारीत घटनेला यथावकाश लवकरच शासन मान्यता मिळेलच व त्या सुधारीत घटनारुपी आदर्श यावरुन आपली संघटना मार्गक्रमण करत राहील व अनेक यशाचे टप्पे पार करतील यात शंकाच नाही.... हि बैठक आयोजनाची व्यवस्था औरंगाबाद जिल्हा शाखेने लिलया सांभाळली.. सर्व आयोजनासह खर्च अर्थातच केंद्रीय कोषातुन करण्यात आला...वाल्मिच्या निसर्गरम्य शांत परिसरातील वास्तव्यात एकही पदाधिकारी एक सेकंदही बोअर झालेला वाटला नाही...या बैठक काळातील चहा नाश्टा भोजनही साध्या स्वस्त सात्त्विक स्वरुपात असल्याने कुणालाही अजिर्ण झाल्याची तक्रार अद्याप कानी नाही...पत्ता सापडण्यासही कुणाला त्रास झाला नाही... या बैठकीतील मध्यंतरात आम्ही औरंगाबाद जिल्हा अध्यक्षांसह काही सेवानिवृत्त व काही पदोन्नती धारकांचाही सत्कार बुकेचा अनाठायी खर्च टाळुन त्यांना सन्मानपत्रे प्रदान करु दोनच बुके आलटुन पालटून वापरुन संघटनेचा खर्च वाचविण्याचाही प्रयत्न झाला.. बैठक यशस्वी होणेसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच काम करणार्यांचे काम बाहेरुन आलेल्या पदाधिकार्यांच्या स्तुतीस पात्र आहेत... तदनंतर न्यायढा जिंकुन देणारे वकील श्री अविनाश खेडकर यांचेही त्याच्या कार्यालयात जाउन धावती भेट घेउन आभार मानण्याचे औचित्य नागपुर टिमसह मा.अध्यक्ष व घटना दुरुस्ती सादर करणारे मार्गदर्शक यांनी दाखवले... हि घटना दुरुस्ती बाबतची बैठक संघटनेच्या अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी उपस्थित काही सदस्य यांना बरंच काही शिकवून गेली..बैठकी अनेकदा झाल्या आताही होत असतात पुढेही होणार आहे परंतु सर्वसामान्य सदस्य जो अशा बैठकीत हजर नसतो व त्यास बैठकीत काय घडले हेच माहित होत नाही व या मुळे दुरावा वाढतो गैरसमज होतो ...यामुळे अनुपस्थितांनाही सर्व काही कळावे म्हणुन आमचा सदैव प्रयत्न असतो... नाही तर पदाधिकारी आपले घरदार सोडुन संघटनेच्या बैठकीस कार्यक्रमास येत असतात ते संघटनेच्या प्रेमापोटी...पण पलिकडून यास फॕमिली टुर अशी दुषणे देणारी कोल्हेकूई ऐकू येत असते...असो ..मित्रांना मी नेहमी म्हणतो संघटनेत अलौकीक आनंद आहे...हा आनंदाचा निखळ झळझळणारा झरा आहे...यात संघटन निष्ठेने ,प्रेमाने, मैत्रीने, जो प्रवाहात पोहेल त्यालाच या आनंदाची अनुभुती येईल..काठावरुन पाय बुडवुन हुडहूडी भरणारे दरिद्री नाही तर काय......... पुरे करतो.. राजेंद्र करपे / प्रमुख सल्लागार म.रा.रेखाचित्र शाखा संघटना.
89) 🌹संघटनेची घटना दुरुस्ती व मराठी अनुवाद 🌹
सन्मानीय सभासदांनो आपली संघटना ही 12 जुन 1975 ची शासन मान्यता प्राप्त संघटना आहे..1975 मध्ये असलेले संघटनेचे पाहिले सरचिटणीस श्री.वाय.एन.मग्गीरवार सरांनी तयार केली होती..त्यांच्या कार्यकाल संपला व आज संघटनेच्या घटनेला 46 वर्षाचा कालावधी झाला असून अनेक अध्यक्ष व केंद्रीय कार्यकारीनी आल्या गेल्या मात्र संघटना दुरुस्ती बाबत कोणीही कार्यवाही केली नाही. सर्वांनी दुर्लक्ष केले...गरजे व काळानुसार घटनेत बदल करणे आवश्यक असते..मात्र सर्वांनी घटने दुरुस्ती बाबत कोणतीही कार्यवाही केली नाही.मात्र विद्यमान अध्यक्ष महोदय श्री. जाफरी सर, सरचिटणीस श्री. सुधीर गभणे व केंद्रीय कार्यकारीनीतील जेष्ठ व श्रेष्ठ असे मार्गदर्शक श्री.नज़िर भाई, ह्यांनी इंग्रजी मध्ये असलेले संघटनेच्या घटनेचे मराठी अनुवाद केले.. श्री.नज़िर भाई व प्रमुख सल्लागार श्री. वाल्मिक दारुणकर सर यांच्या मार्गदर्शनात ना भूतो ना भविष्य घडणारे कार्यास अंमलात आणले.. अर्थात घटना दुरुस्तीची कार्यवाही करणे बाबत केंद्रीय कार्यकारिणीची बैठक दिनांक 27 व आगस्टला वाल्मी परिसर,औबाद येथे आयोजित करण्यात आली.. सदरील बैठकीसाठी समस्त केंद्रीय पदाधिकारी हाजर होते...दिनांक 27 ला सकाळी 10.0 वाजे पासून सुरवात झाली अल्पशा विश्रांती नंतर सुरु होऊन रात्री 9.30 पर्यंत चालली..दुसऱ्या दिवशी ही सकाळी 10.0 ते रात्री 9.30 पर्यंत बैठक चालली.. प्रत्येक मुद्यावर सविस्तर चर्चा अत्यंत खेळी मेळीच्या व आनंदिमय वातावारणात संपन्न झाली...अध्यक्ष महोदय श्री.जाफरी सर,मार्गदर्शक श्री. नज़िर भाई ,प्रमुख सल्लागार श्री. दारुणकर सर यांच्या मुळे संघटनेच्या घटनेची व निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती सर्वांना मिळाली...समस्त पदाधिकार्यांची साधक बाधक चर्चा होऊन संघटनेच्या घटना दुरुस्तीला मंजुरी मिळाली...सदरील बैठकीस सर्वश्री..जाफरी सर,सरचिटणीस गभणे सर,अतिरिक्त सरचिटणीस विनायकजी जोशी, उपाध्यक्ष शिंदे व रवींद्रजी बिंड सर, प्रमुख सल्लागार दारुणकर सर,करपे सर, सहकोशाध्यक्ष किरणजी मुळे,महिला प्रतिनिधी सौ. वंदना ताई,स्वाती ताई डोकबाने, विभागीय सचिव रहीम भाई, प्रदीप कांबळे, प्रशांत कहाते, सतीशजी पारणकर, मोरे सर,राहुल साळूंके, राजेश शाकाहर,.....
संघटना दुरुस्ती म्हणजे संघटनेच्या इतिहासतील सुवर्णं पान.. ना भूतो ना भविष्य असे कार्य.. नज़िर भाई अर्थात संघटनेच्या घटना दुरुस्ती शिल्पकार
-:- वाय.ओ.पठाण,औबाद
88) रेखाचित्र संघटनेच्या महिला प्रतिनिधी श्रीमती स्वाती डोकबाने यांनी घटना दुरुस्ती बैठकीच्या शुभारंभी सादर केलेल्या विद्यमान कार्यकारीणीच्या कारकिर्दीचे सिंहावलोकन करता प्रस्तुत केलेली कविता लिखीत स्वरुपात सादर .
💐 कोल्हापूर आमसभेने इतिहास घडवला
सत्तांतराचा मोठा कौलच दिला
अध्यक्ष महोदयांनी फेटा बांधला
मराठवाड्याचा झेंडा रोवला
कार्यकारिणीचा डंका वाजला
उत्साहाचा ढोल धडाडला
परखड वक्ते , टीकाकार सच्चे
ढवळून निघाले वातावरण सारे प्रामाणिकपणा अन मेहनतीचे
इंद्रधनु रंग सजले
सभा अन् , दौऱ्यांचा माहौल सजला
शेगावीच्या पहिल्या सभेने मनाचा ठाव घेतला
अन् , संकेतस्थळाच्या अनावरणा ने
डिजिटल क्षेत्रात प्रवेश मिळवला
सगळ्याच सभा विशेष गाजल्या
धुळे यवतमाळ अन चंद्रपूरच्या सभेने मानाचा तुरा खोवला
पश्चिम महाराष्ट्र दौराही झाला
मनामनातील भडास ओकला, झाला सगळा निचरा
कोकण दौर्यात प्रेमाचे पुकार, विश्वासाची वेगळीच साथ
विदर्भ दौरा यशोशिखर ठरला
संस्थापकाचे दिव्य दर्शन दिधला
निरोप हा आगळाच ठरला, साश्रु नयनांनी निरोप घेतला.
औरंगाबाद बैठक सुवर्ण अक्षरातील पान ठरले
घटना दुरुस्तीच्या कामाचे , नजीर शेख सर शिल्पकार ठरले
यशस्वी करत सर्वच टप्पे
सोडवून घेतले अनेक मसले
कैवारी हे सभासदांचे.. नाही भ्रष्ट नेते..
रात्रं दिवस मेहनत, अन् नाही जीवाची परवा
ठेवा सभासदहो याची जाण, देऊन त्यांना आदराचा मान
संघटनशक्ती आहे ही नाही खोटी भक्ती
प्रत्येक कार्यासाठी लागते धनाचीच शक्ती
संघटनेचा असे हा निधी , नाही ही भीक
जाणून संघटनेचे महत्व, समजुन ही रीत
शुद्ध रत्नांची खान येथे, नाही गर्व अभिमानाला स्थान येथे
बहुरंगी कलाकारांच्या भांडारात प्रत्येकाचा सन्मान येथे,
अशीही संघटनशक्ती, शिलेदारांची बळकट काठी
एक रूप अन् एकतेची हीच महाशक्ती.. हीच महाशक्ती !!!!!🤝 💐 स्वाती डोकबाणे: नाशिक
87) भव्य सत्कार समारंभ
औबाद- जालना जिल्हा कार्यकारिणीने आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमास कार्यरत, जेष्ठ व श्रेष्ठ सभासदांनी भरभरून प्रतिसाद दिला त्या बद्दल मी आजी माजी सभासदांचे आभार मानतो..व प्रथम आपण सर्वांना स्वातंत्र दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो....आज रोजी कडा भवन येथील मुख्य अभियंता कार्यालयातील चित्र शाखेत सत्कार कार्यक्रम हर्षो उल्हासात संपन्न झाला...कृषी विभागा प्रमाणे जल संपदा विभागाचे शासन निर्णय अध्यक्ष महोदयांनी कोरोना सारख्या संक्रमन काळात जीवाची पर्वा न करता मत्रालंय, मुंबई येथे जाऊन निर्गमित केले याप्रित्यर्थ औबाद- जालना जिल्हा शाखेने अध्यक्ष महोदय श्री. जाफरी सर व केंद्रीय सल्लागार श्री. करपे साहेबांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला...जिल्हा अध्यक्षा श्रीमती विना ताई ह्यांच्या हस्ते श्री. जाफरी सर यांचा व श्री. नाईक यांच्या हस्ते श्री. करपे साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला...श्री. कल्याणकर,वीणा ताई यांनी संघटनेच्या कार्या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले.. तसेच सदरील कार्यक्रमासाठी अहमद नगर जिल्हा कार्यकारिणीने आपला प्रतिनिधी जिल्हा सचिव श्री. अमोल सुपेकर सरांना पाठविले..व सुपेकर सरांचे श्रीमती विना ताई यांनी पुष्पगुछ देऊन स्वागत केले..श्री. सुपेकर सरांनी संघटनेच्या कार्या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले..औबाद- जालना जिल्हा शाखा सुपेकर सर व अहमद नगर जिल्हा कार्यकारिणीचे आभारी आहे धन्यवाद.. तसेच जेष्ठ व श्रेष्ठ मंडळी श्री. पालकर सर, रमेश भुसावळकर, कल्याणकर,गांगवे, कुलकर्णी इत्यादी मंडळींनी विशाल असा पुष्पहार अध्यक्ष महोदयांना अर्पण करून त्यांच्या कार्यविषयी आपली कृतज्ञता व आनंद व्यक्त केला..(छाया चित्र देणार आहे) तद नंतर श्री. करपे साहेबांनी संघटनेचे कार्य, महत्व,संघटने बद्दल एकनिष्ठ रहावे..असे आवाहन केले..व वेळोवेळी नाम मात्र असलेली रु.1000.00 वार्षिक वर्गणी न चुकता व न मागता जिल्हा शाखे कडे जमा करावी..लढा निधी ही प्रसंगनुरूप जमा केली जाते..आर्थिक व सभासद पाठबळा शिवाय संघटना प्रगती करू शकत नाही.. नंतर अध्यक्ष महोदयांनी आपल्या मार्गदर्शन भाषण केले व त्यात त्यांनी म्हटले की हा विजय अध्यक्ष किंवा केंद्रीय कार्यकारिणीचा नसून तळागळातील प्रत्येक सभासदाचा आहे..सभासदा शिवाय संघटना असूच शकत नाही..व यशा मध्ये एडवोकेट श्री. अविनाश खेडकर सरांची खूप मेहनत श्रम आहेत..तसेच इतर उर्वरित विभागाचे शासन निर्णय लवकरच निर्गमीत होतील..व सरळ सेवेने लागलेल्या सभासदांचे प्रश्न सोडविण्यासाठ संघटनटा वचन बद्ध व प्रयत्नशील आहे व त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयास चालू आहे.आज चित्र शाखेतील झालेल्या कार्यक्रमाची नियोजन बद्ध अशी व्यवस्था जिल्हा कोशाध्यक्ष श्री. मोरे साहेबांनी केली.. सदरील कार्यक्रमास सर्वश्री. पालकर सर, शेरे साहेब, अजय कुलकर्णी, सुसलादे, गांगवे, जाधव,पडवी, अहमद भाई, बोर्डे, दिवटे, परदेशीं,कल्याकर,कोकाटे,
जैस्वाल व इतर सभासद उपस्थित होते..कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन जिल्हा सचिव श्री. नाईक साहेब यांनी केली..अल्पो उपहार व चहा पाणी घेतल्या नंतर कार्यक्रमाची सांगता झाली..धन्यवाद ...आनंद व हर्षो उल्हासाचे काही छाया चित्रें आपल्याला समर्पित..
वाय.ओ.पठाण,औबाद.
86) औबद- जालना जिल्हा शाखेतील समस्त कार्यरत व सेवानिवृत्त बंधू भगिनींना विंनती करण्यात येते की, अध्यक्ष महोदय श्री. जकी अहमद जाफरी सरांनी कृषी विभागा प्रमाने आपणांस लाभ मिळणे बाबतचा (ज.सं.वि. चा) शासन निर्णय प्रत्यक्ष मंत्रालय,मुंबई येथे जाऊन निर्गमित केला आहे.त्यानिमित्ताने अध्यक्ष महोदयांचा औबद- जालना-जिल्हा शाखे तर्फे उद्या दिनांक 15.8.2021 रोजी सकाळी झेंडा वंदना नंतर ठीक 9.00 वाजता कडा कार्यालय येथे सत्कार कार्यक्रम आयोजित केला आहे...तरी समस्त सन्मानीय सभासदांनी सदरील कार्यक्रमास आवर्जून न चुकता हजर रहावे..अशी आपणांस आग्रहाची विनंती आहे...सदरील कार्यक्रम हा अध्यक्षा श्रीमती विना ताई ठाकूर यांच्या स्वीकृती व संमतीने आयोजित आहे...
वाय.ओ.पठाण
85) या पुर्वीचे पदाधिकारी हे निष्क्रीय होते असे मी कधीच म्हणणार नाही.. सदामते साहेब सुर्वे साहेब,निमकरसाहेब यांसारखे अनेक पदाधिकारी मित्र खरोखरच संघटनेवर प्रेम करुन संघटन सदस्य हिताचे कार्य पहात असे..माझ्या अवलोकन तथा पारखी नजरेला हे निश्चितच जाणवत असे मात्र तत्कालीन कार्यकारीणीत संवाद,जिव्हाळा,परस्परावर विश्वास व एकसुत्रता व संदस्यांच्या मनात विश्वास व प्रेमाची छाप पाडण्याचा अभाव अशा त्रुटीमुळे त्या कार्यकारीणीचे बारा वाजले... एकदोनच पदाधिकार्यांची दादागीरी ,अहंभाव, राजकीय चाटुगीरीची खोटी मिजास व सदस्यांशी कोणताही संपर्क न ठेवता फक्त मोठ्या पदाची हाव या अवगुणी काही संगतीमुळे संघटना पुर्णपणे डेड झाली होती... आता या लोकांची दातखिळी बसलेली असणार कारण त्यांना स्वप्नातही वाटले नसेल कि शेराला सव्वाशे असतात.. आम्ही आव्हान दिले ,स्विकारले,आणि पेलले सुद्धा याचा संघटनेला व आम्हाला अभिमान आहे... पुर्ण गतप्राण झालेली नव्हे गतप्राण केलेल्या संघटनेत आम्ही प्राण फुंकले ..शुन्यातुन साम्राज्य निर्माण केले सदस्यांच्या ह्रदय मनात विश्वासाने स्थान मिळवले हे कसे घडले ? एका एका सदस्यांच्या एक एक रुपया योगदानाचा पारदर्शकतेने योग्य काटकसरीने वापर..चोख हिशोब .. संघटन विकासाचा प्रगतीचा ध्यास ,पारदर्शक कारभार ,संघटनेचा एक रुपयाही खाणे हे हरामपणाचे हि वृत्ती म्हणुन असे पवित्र यश प्राप्त होत गेले... या जुण्या काही नतदृष्टांनी अनंत अडचणी अडथळे आमच्या मार्गात आणले अजुनही अधुनमधून वळवळ चालुच असते ... त्यांनी आमचे यश पळविण्याचे प्रयत्न केले पण सचोटी इमानदारीच्या कार्यापुढे अडथळे आणणारे संघटनेच्या भर बाजारात नंगे झाले उघडे पडले... एक रुपया ही संघटनेला लढानिधी योगदान न देता विरोधात्मक काड्या करणारे आता पहा कसे कारकुणांना लोणी लावतील व आयत्या बिळावरचे नागोबा टाळुवरचे लोणी खातील... जरा तरी मनाला शरम वाटत असेल तर जे जे फुकटे असतील त्यांनी संघटनेच्या बँक अकांउटच्या विहीरीत आपली कावड लवंडावी .तरच मिळालेला लाभ पचेल फुकट्यांना... दारुणकर साहेब.... जुण्या कार्यकारीणीतील कॕनरा बँकमध्ये मुद्दामुन अडवून ठेवलेला संघटनेचा पन्नास हजाराचा निधी व विद्यमान संघटनेला कोणताही कारभार हस्तांतर न करताने संघटना विरोधी काड्या कृत्य करणाऱ्यांना मागील पन्नास हजार रुपयाची मागणी अजिबात करु नका ..ते त्यांनाच लखलाभ होवो ..नाहीतरी मागिल कोर्टकेस संदर्भात किती पैसा जमवला किती घोळ केला याचा कुठे आहे लेखाजोखा..व त्यातलेच उरलेले पन्नास हज्जार आता अपवित्र धन आपल्या कोषात घेउन संघटनेची पवित्र तिजोरी बाटवू नका... असो ..सर्व लाभधारकांना शुभेच्छा अभिनंदन करतो .. हे यश एकट्यादुकट्ंयाचे नव्हे व फुकट्याचे तर अजिबात नाही हे यश कल्पक मेहनती व निष्ठावान नेतृत्व ,कार्यकारीणी व लढानिधीद्वारे सहकार्य करणाऱ्या प्रामाणिक सदस्यांचे सामुहीक सांघिक यश आहे... पदाधिकारी असो किंवा सदस्य आजि असो वा माजी संघटनेच्या यशावर लाभ घेताना एकवेळ आपल्या अंतःकरणाला प्रामाणिकपणे विचारुन पहा कि खरंच मी हा लाभ घेण्याच्या लायकीचा आहे का ? हा लाभ घेणे म्हणजे माझा हक्क आहे का लबाडी ..
राजेंद्र करपे
प्रमुख सल्लागार,
रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटना
84) रेखा चित्र शाखेतील सर्व बंधु भगीनीनो सर्व प्रथम सर्वाना ५ व्या वेतन आयोगाची थकबाकीचा प्रयत्न करुन जी.आर. काढल्या बद्यल श्रीमान जाफरी साहेब केद्रिंय अध्यक्ष यांचे अभिनंदन व आपणास थकबाकी मिळणार याचे खुप खुप अभिनंदन मला वरील विषयात काही अडचन आल्यास फोन करुन शंकेचे निरसन करतात.आसेच एक बांधवाचा फोन आला त्यांनी सेवा पुस्तक कारकुन कडुन तपासुन घेतले त्यांनी सांगीतल्यावर माझ्या लक्षात आले कि ३ जनांचे १/१/१९९६ पासुन ४५००- १२५-७००० ही वेतन श्रेणी मिळाले तथापी त्यांच्या वेतन त्रुटीचे ५०००- १५०-८००० चे वेतन निश्चीती केली नाही.तीच ठेवुन ६ वा वेतन आयोग लागु झाल्यावर ६ व्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चीती करुन वेतन पडताळणी करुन घेवुन सेवानिव्रुत्त झाले आहेत.आता झोपेतुन जागे झाले.तरी आपणही सेवा पुस्तक बघुन घ्या.थकबाकी मिळाल्यावर काही तरी रक्कम संघटणेच्या खात्यावर आपण टाकुन संघटना बळकट करु 💐💐 जय चित्र शाखा💐💐
83) Instead of congratulating me, congratulate the president and body members.
I have litigation from all over Maharashtra but the experience of working with Association was different.
Also Rajaharishchandra is not enough to appreciate the president you have got..
Congratulations 💐💐to all the members and President of the association Mr. Jafri Saheb.💐💐💐💐
Adv Avinash Khedkar
High Court Aurangabad Contact: 9503650420
82) आमचे एडव्होकेट श्रीमान खेडकर साहेब, आपले परीश्रम तर आहेच, त्यामुळे आपलेही आभार मानले पाहिजेत.. कारण या यशाचे माध्यम आपण आहात..
मा. अध्यक्षांनी हि धुरा यशस्वीपणे पेलली व ईतंभुत माहिती आपणास दिली आमचे अध्यक्ष तर ग्रेट आहेतच यात शंकाच नाही... सर्वतोपरी सर्व सभासदांचे सहकार्य व वरीष्ठांचे त्यामागे आशीर्वादही आहे..
मी पंढरपुरला आलो त्याच दिवशी पांडुरंगाच्या चरणी ही संघटनेप्रती नतमस्तक होऊन या कामास यश मागीतले होते व आजही दर्शन घेऊन तेच मागणे मागुन माघारी परतत असतांना ही गोड बातमी मिळाली..
माणुस जेव्हा एखाद्या कामात मन ओतून , मग्न होऊन, कोणतीही कमी न ठेवता प्रामाणिक प्रयत्न करतो, त्यास दैवी शक्तीही हमखास यश देतेच हा माझा अनुभव आहे..
तेव्हा अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, सभासदा बरोबरच आपलेही आभार संघटनेच्या वतीने व्यक्त करतो. धन्यवाद!🙏🙏
वाल्मीक दारुनकर
प्रमुख सल्लागार,
रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटना
81) Great karpe saheb , Khan saheb n pathan sahebji,,
यह तो होना ही था.. माझे मनाला फार चांगले वाटले,. असाच वेतनश्रेणीचा शासन निर्णय पहीला जीआर घेऊन आलो, तेव्हा नागपुर अजनी रेल्वे स्टेशनवर तत्कालीन जिल्हाध्यक्ष व सहकारी यांनी मला सकाळी ७.०वाजता स्वागतासह रिसीव्ह केले होते..
माझेही मनात असेच काहीसे होते ते करपे साहेबांनी हेरले व पुर्ण केले..
व्वा करपे साहेब व्वा, आपला खुप आभारी आहो...आजचा दिवस आपणा सर्वांसाठी खुप मोठा आहे..तसेच पुढे येणारे दिवसही आनंदी राहणार आहे..
आणखी प्रतीक्षा लवकरच पूर्ण होईल..
80) जलसंपदा विभागातील अनुरेखक/ आरेखक संवर्गास दिनांक ०१/०१/१९९६ ते ३१/०३/२००६ या कालावधीतील वेतनाची थकबाकी देणेबाबत शासन निर्णय, जलसंपदा विभाग, दिनांक: ०९/०८/२०२१
संघटनेच्या सर्व सभासद सदस्यांचे हार्दिक अभिनंदन !
श्री. दारूणकर साहेब यांनी संघटनेच्या वर्धापनदिनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संभाजी रायपुरे साहेब व श्री काझी साहेब, माजी सरचिटणीस यांचेशी मोबाईलद्वारे संपर्क साधून वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या 💐💐
Date : 12/06/2021
78) माननीय प्रमुख मार्गदर्शक आदरणीय करपे साहेब यांच्या आवाहनानुसार... संघटनेने प्रती प्रेम आदर व्यक्त करण्याकरता मला आलेले अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न करतो.
11/6/1987 साली मी पहिले पत्र तत्कालीन संघटनेचे सरचिटणीस माननीय ह.ब.काझी साहेब यांना लिहिले होते.
दिनांक 23/6/1987 त्यावर त्यांचे दोन पानी उत्तर लिहून आले. मला खूप आनंद झाला, कारण त्याने त्या पत्राने माझ्यातला कार्यकर्त्याला जागा केला, त्यावर विश्वास दाखवला . त्यानां ते पत्र इतक भावलं की, त्यानी त्या पत्राच्या झेरॉक्स करून संपूर्ण महाराष्ट्रात पाठवले.
हा तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या विचारचा गौरव होता.
त्यावेळी संघटनेचे नेतृत्व मा.ह.ब.काझी साहेब सरचिटणीस म्हणून समर्थपणे करत होते.
काझी साहेब म्हणजे...
नेतृत्व कस असावा याचा उत्तम परिपाठ घालून देणारे... अभ्यासू व्यक्तिमत्व होत.
त्यांच्या प्रयत्नांमुळेच 4था वेतन आयोगात आपल्यावरील अन्याय दूर झाला. त्यांनी त्यासाठी खुप मेहनत घेतली.त्यांच्या प्रयत्नांना यश आले.समानीकरण समितीने केंद्राप्रमाणे वेतनश्रेणी देऊन आपला संघटनेवरील अन्याय दूर केला. काझी साहेबानी त्यावर तौलनिक विवेचन करणारी एक अभ्यासपूर्ण पुस्तिका तयार केली होती.आपल्या सभासदांच्या माहिती साठी सोबत पीडीएफ मध्ये देते आहे.
मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो की,मला संघटनेतील दिग्गजांचा सहवास लाभला...यामध्ये काझी साहेब
स्व.प्रकाश परांजपे रावसाहेब
स्व.रावसाहेब कोरे साहेब
स्व. टोणपे साहेब
मा.नझीर शेख साहेब
आदरणीय दारूणकर साहेब
मा. सुनिल सुर्वे साहेब
आणि आता नवीन स्थापन झालेली... यशस्वी टीम
एक कुशल व संयमी नेतृत्व माननीय जाफरी साहेब
कुशल संघटक...
माननीय गभने साहेब
अभ्यासू व्यक्तिमत्व, मार्गदर्शक
माननीय करपे साहेब
तसेच सर्व केंद्रिया पदाधिकारी, सर्व जिल्ह्यांचे पदाधिकारी.
तसेच संघटनेत कुठल्याही पदाची अपेक्षा न करता काम करणारे माझे मित्र राठोड, माटवणकर, अविनाश भिंगार्डे, नाईक तसेच औरंगाबादचे पठाण साहेब, रहीम इ.
तसेच माझ्या जिल्हा शाखेत माझ्या सोबत माझ्या मोठ्या भावासारखे साथ देणारे माझे मित्र सुधीर तावरे
माझे सर्व सहकारी त्यांच्या सहकार्यामुळेच मी जिल्हा शाखेचे काम करू शकलो.
मला आज सार्थ अभिमान वाटतो की, मी रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेचा सदस्य असल्याचा. या संघटनेने मला खूप काही दिले.आईची माया दिली, नेतृत्व करण्याची संधी दिली, जिवाभावाचे मित्र दिले.
बस आणखी काय पाहिजे.
सुख म्हणजे नक्की काय असतं...
संघटनेवर मनापासून प्रेम करण असत...
जय संघटना...!
नरेंद्र गौरी रामराव महाडिक.
अध्यक्ष,
जिल्हा शाखा-रायगड
सोबत: वरीलप्रमाणे
1) मा. श्री. काझी साहेबांचे पत्र
2) संघटनेच्या प्रगतीचा आढावा व मार्गदर्शिका
3) चौथा वेतन आयोग समानिकरण
माहिती सौजन्य : श्री . नरेंद्र महाडिक साहेब, जिल्हा शाखा-रायगड
77) संघटना! तू मोठी होत जा.
माणसं येतील-जातील...,
तुझं असणं निरंतर, चिरकाळ...
इथल्या प्रत्येकाला सन्मान दिला तू!
तुझ्या प्रदीर्घ प्रवासातील आम्ही केवळ भोई पालखीचे.
संघटना! तुला वर्धापनदिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!!आणि अभिनंदन!!!
Poem by : D.D. sir, Nashik ( Date: 12/06/2021 )
76) माटवणकर साहेब तुमचा विस्तृत लेख अतिशय सुंदर आहे सविस्तर मांडणी भुतकाळातील आठवणी करुन देणाऱ्या आहे..खरंच त्या वेळी आजच्या सारख्या सुविधा नव्हत्या तरी कार्यकर्ते किती काम करायचे कारण ते झपाटलेले होते.. आपल्या लिखाणावरुन बराचसा जुना इतिहास माहित झाला...तुम्ही त्याचे साक्षीदार आहात..तुमच्याही कार्याचे योगदान खुप आहे ..त्यास लोक विसरले असे म्हणता येणार नाही सध्याचे अध्यक्ष निवड प्रक्रीयेतही तुमचा सिंहाचा वाटा होता..श्री जाफरी सर अध्यक्ष झालेवर मी व जाफरी साहेब आम्ही संघटनेच्या कामासाठी मुंबईला आलो होतो तेंव्हा तुम्ही संघटनेला स्वयंस्फुर्तीने दिलेला चेक मदत हि संघटना उभारणीसाठी अध्यक्षांना उत्साह वाढवणारी होती ..अनेक सदस्य मित्र सोबत घेउन तुम्ही रात्री उशीरापर्यंत आमची व श्री दारुणकर.श्री गभणे यांची खास भेट व सोबतचहापान साठी प्रेमाने प्रतिक्षा करताना चे दृश्य आम्हाला अजुनही आठवते..तुमच्या संघटन कार्याचे प्रेमाचे व मार्गदर्शनाचे आम्ही नेहमीच अभिलाषी आहोत.... धन्यवाद !
Post by: Shri. Rajendra Karape Sir
75) त्यावेळी आमच्या कडे आजच्या सारखी ना संपर्काची साधने होती ना प्रवासाची , कार्यालयातील दुरध्वनी चा उपयोग करावा लागे. त्यातही दुरध्वनी वर बोलायचे झाले तर कार्यालयातील नोंदवहीत नोंद. पत्र व्यवहारातून चर्चा. लातूर ते मुंबई फारच कमी वाहतूक व्यवस्था, लातूर मुंबई रेल्वे सेवा नव्हती. फक्त एसटी चा प्रवास, एकदा मला मुंबई या येण्याबद्दल सांगण्यात आले. निघालो पण एसटीत जागाच नाही. रात्रभर एसटी मधील पाय-यावर बसून लातूर ते पनवेल प्रवास केला, व सकाळी मुंबई मंत्रालयात पोहोचलो. दिवसभर सर्वांसोबत राहून रात्री परत मुंबई लातूर प्रवास ,..
त्यावेळी मी स्व श्री परांजपेसाहेबांना सांगीतले मला मुंबईतील काहीच माहिती नाही मी कसे येवू . त्यांनी सांगितले नुसार मी लातूर हून पनवेलला गेलो . श्री परांजपे साहेबांची भेट झाल्यानंतर त्यांचे घरी गेलो. तेथेच तयार होवून परांजपे साहेबासोबत पहिल्या वेळी मंत्रालयात गेलो.
ते वेढच वेगळे होते
आताचे सन्मानजनक वेतन व प्रतिष्ठा पाहिल्यावर त्याकाळी झालेल्या कृतीचे काहीच वाटत नाही.
मुद्दाम एक आठवण सांगतो.
संघटणेचे एका महत्त्वाच्या कामासाठी मला व सरचिटणीस श्री काझी साहेब यांना परळीला जायचे होते. ठरल्याप्रमाणे काझी साहेब नाशिक हून लातूर ला निघाले. मी त्यांना माझे घराचा पत्ता सांगितला होता. तरी पण मी त्यांना घेण्यासाठी बसस्थानकावर गेलो. बसस्थानकावर वाट पहातोय तर काझी साहेब माझे घरी , मी घरी आलो तर काझी साहेब माझी वाटपाहून बाहेर. परत मी काझी साहेबांसाठी बाहेर जाणार तोच काझी साहेब घरी आले.
श्रीमान काझीसाहेब ,श्री दारुणकर साहेब, स्व.श्री कोरेसाहेब, श्री वासनकर साहेब, श्री शशिकांत हिंगमिरे साहेब तसेच संघटना परिवारातील अनेक सदस्य यांचे माझे घरी आदरातिथ्य करता आले हे मी माझे भाग्य समजतो.
🙏🙏
विनायक जोशी, लातूर
74) धन्य धन्य श्रीमान माटवणकरजी…आपण संघटनेच्या कार्याचा आणि घडामोडींचा संपूर्ण इतिहास आज तुमचे स्वतःचे आलेल्या अनुभवातून लिखित केला…तुम्हाला प्रत्यक्ष पाहण्याचा व भेटीचा योग शेगांवी आला होता… ज्यावेळी २४ वर्षांच्या पदोन्नत्तीसंदर्भात आम्ही काही मुद्दे घेऊन १४ मुद्द्यावर अधारीत पाठिंबा देण्यासाठी सभासदांच्या सह्यांचे निवेदन घेऊन तेथे मी आणि श्री.दंगेकर कोथरुडमधून आलो होतो… त्यावेळी आम्ही २४ वर्षे पदोन्नतीचे कामासाठी सलग दोन वर्षे संघटनेच्या झालेल्या दोन गटांशी संपर्क करुन चर्चा करत होतो आणि त्यासंदर्भातच श्रीमान दारुणकरांचे आमंत्रणावरुन व दुसऱ्या गटाकडून दखल घेतली जात नसल्याने आम्ही तेथे आलो होतो… त्यावेळी आपल्यातील तडफदारपणा, शिष्टाई आणि मागील कार्याचा अनुभव सडेतोडपणे कथन करताना पाहिले…तळमळीचा, सच्चा दिलाचा आणि सर्वहित जपणारा कार्यकर्ता काय असतो ते अनुभवल… आपण हे लिखाण करताना ज्या घटनांचा उल्लेख केला त्यापैकी एक स्व.कोरेजींची शक्तीप्रदर्शन करुन केलेली निवड याचा मी साक्षीदार आहे… खरंच कुठल्याही पदाची अपेक्षा नसलेले बरेच कार्यकर्ते पूर्वी या संवर्ग संघटनेत होते म्हणून खुप काही मिळाले…ते व त्यांचे कार्य दुर्लक्षित झाले की जाणीवपूर्वक केले गेले हा एक संशोधनाचा किंवा शंका घेण्यासारखाच विषय आहे…असो… आपण महान आहात…आज आपल्या लिखाणातून मागील आठवणी परत जागृत झाल्या हे मात्र नक्कीच…
★आदिनाथ द.रावळ, पुणे…
73) सर्व सन्माननिय सभासद,
(लिखाण थोडे मोठे आहे,पण अनिवार्य होते.)
आज महाराष्ट्र राज्य रेखाचित्र कर्मचारी संघटना ४६ वा वर्धापन दिन साजरा करित आहे.
श्री. संभाजीराव रायपूरे साहेबांनी (संघटनेचे संस्थापकिय अध्यक्ष) यांनी १२ जून १९७५ रोजी संघटना रजिस्टर केली. वास्तविक अनुरेखक संवर्गास लिपिक वर्ग आपल्यातील मानित नव्हते,अभियंता संवर्गही आपल्यातील मानित नव्हते. प्रश्न आसा होता की अनुरेखक संवर्ग तांत्रिक की अतांत्रिक? त्यामुळे अनुरेखक संवर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतःची स्वतंत्र संघटना असावी हे अनिवार्य होते या कारणास्तव संघटनेचा उदय झाला. सुरवातीस फेरोप्रिंट काढणे, त्यानंतर आमोनिया प्रिट काढणे त्यामुळे अनुरेखकांना अमोनियाचा शाररिकत्रास सहन करावा लागत आसल्याने त्या वेळच्या पदाधिका-यांनी जोखिम भत्ता मिळवून घेतला.
जेंव्हा श्री.ए. बी. काझी अध्यक्ष होते तेंव्हा १९८६ ला ४था वेतन आयोग केन्द्रा प्रमाणे लागू करण्याचे राज्य शासनाने मान्य केले. परंतू त्या वेतन श्रेणीत तफावत होती. श्री. काझी साहेबांनी त्या विरुध्द MAT कोर्टात केस लावली. दरम्यानच्या काळात संघटनेत आलेली मरगळ व असंघटीत पणामुळे १९९६पर्यन्त केस रेंगाळली.
त्या वेळचे कोंकण विभागीय सचिव, स्व. श्री. प्रकाशजी परांजपे यांनी पुढाकार व मला सोबत घेऊन संपूर्ण राज्यभर संपर्क दौरा केला व मरगळलेल्या संघटनेत चेतना निर्माण केली. स्व.श्री. प्रकाशजी परांजपे यांनी शासनाशी ४थ्या वेतन आयोगातील तफावती बाबत पत्रव्यवहार सुरु केला. त्या वेळी सा.बा. व पाटबंधारे विभागाचे प्रस्ताव मंत्रीमंडळा समोर मांडताना अभियंता संवर्गाचे (वर्ग १ व २चे) प्रस्ताव सा.बा.चे अभिप्राय घेऊन पाटबंधारे विभाग मांडत असे व वर्ग ३ व ४चे प्रस्ताव पाटबंधारे विभागाचा अभिप्राय घेऊन सा.बा.विभाग माडत असे. अनुरेखक संवर्गाचा प्रस्ताव मंत्री मंडळाचे बैठकीत मांडण्यापूर्वी अभिप्रायासाठी पाठबांधारे विभागाकडे आला असता योगा योगाने ते प्रकरण सद्या संघटनेचे मंत्रालय संपर्क प्रमुख असलेले श्री.बन्सिलाल राठोड याचे जेष्ठ बंधू यांचे डेक्सवर गेला. त्याचवेळी MAT मधील केस बाबत शासनाकडे विचारणा होत होती ती बाबही त्यांचे कडून समजली व प्रकरणाला गती देण्या साठी श्री.काझी / विधर्भातुन श्री. भंडारकर(उपाध्यक्ष),श्री.निमकर/ पुण्याहून श्री.बनकर व श्री. शिन्दे/ मिरजहून श्री. मुलानी /श्री.चव्हाण/ लातूरचे श्री.विनायक जोशी /जळगांवहून श्री.पी.जी.राणे ( यांनी त्यावेळचे अर्थमंत्री मा. एकनाथजी खडसे साहेब यांच्याशी पदाधिका-यांची बैठक घडवून प्रकरण मार्गी लावण्यास मोलाचे सहकार्य केले.) मुंबईतून सा.बा.चे श्री. कावजी व श्री. निमकर, पाटबंधारे विभागातील स्व.श्री.पाटील व श्री. शशि नाईक
असे आम्ही सारे दिवस रात्र एक करुन ४थ्या वेतन आयोगातील तफावत ( अनुरेख मु.वे.९७५/- ऐवजी १२००/- साहय्यक आरेखक १२००/- ऐवजी १४००/- व आरेखक १४००/- ऐवजी १६००/-) दुर करण्यासाठी झटत होतो. या प्रकरणातील दोन किस्से अर्जावून सागण्या सारखे आहेत. १) हे प्रकरण जेंव्हा वित्त विभागाकडे श्री.लागवणकर, उप सचिव यांचेकडे आभिप्राया साठी गेले होते तेंव्हा त्यांनी आजच्या आज त्रुटीची पूर्तता करण्यास सांगितले तरच दुसऱ्या दिवशी मंत्री महोदयांचे सहीसाठी ठेवता येईल. त्यावेळी मी ती त्रुटी पूर्ण करण्यासाठी रात्री ११ वा, त्यांचे घरी सर्व पदाधिका-यांसह (२० ते२५ जण )पोहचलो.
२) वेतनत्रुतील तफावत दूर करण्याच्या प्रस्तावाबाबत श्री. पी.जी.राणे यांनी मा.एकनाथजी खडसे (वित्तमंत्री) साहेबांची भेट पहाटे ५.००वा.मुंबईत बंगल्यावर निश्चित केली त्यानुसार श्री.परांजपे, श्री.बनकर,श्री.शिन्दे,श्री.शशि नाईक, श्री.पाटील,श्री. बन्सिलाल राठोड व स्वतः मी साहेबांचे भेटीस जाऊन विषय समजावून सांगितला. त्यावर मा. खडसे साहेबांनी सकाळी १०.००वा. मंत्रालयात बोलावले आम्ही मंत्रालयात पोहलो तर BJPच्या वडाळा येथील एका कार्यालयात चिंतन बैठकीस साहेब गेले होते. फाईलवर सही घेणे गरजेचे असल्याने उत्साहाचेभरात आम्ही वडाळ्यास फाईल घेऊन पोहलो. लाॕबीत उभे असताना सा.बा.मंत्री मा. नितीनजी गडकरी साहेबांनी आम्हास पाहीले व फाईल घेऊन तुम्ही येथे कसे ? आसे म्हणून आमचेवर कारवाई करण्या हेतू त्यांचे P.A.ला सांगितलं परंतू आमचे नशिब व सभासदांचे आर्शिवाद ऐनवेळी मा. खडसे साहेबा तेथे पोहचले व त्यांनी मा.गडकरी साहेबांना "हि माणस माझी आहेत" आसे सांगून कारवाई होण्यापासून आम्ही वाचलो. असे पिसाटल्या सारखे आम्ही कार्य करित होतो.
मा.सुकथनकर सामिती पुढे संघटनेचे म्हणणे मांडून ४थ्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी ७/५/४ वर्षाच्या अहर्तताकारी सेवे नंतर केंद्राप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करुन घेतली. (त्या वेळेस राज्यभरातून २५-३० जण जमत असत, त्यांचा पाहूणचार आमदार निवासातील कॕन्टीनमध्ये ठाणे जिल्ह्याचा सचिव म्हणून मी करित होतो.) तेंव्हा संघटनेची आर्थिकस्थिति नव्हती. लढानिधि काढणेही शक्य नव्हते. त्याच वेळेस १२ वर्षानंतरची आश्वासित प्रगती योजनेच्या लाभामुळे व ५व्या वेतन आयोगातील श्रेणीमुळे आरेखक संवर्गाची वेतन श्रेणी लिपिक संवर्गापेक्षा अधिकची झाल्यामुळे त्यांचा पोटशूळ उठला व त्यांनी आक्षेप नोंदवायला सुरवात केली. ५व्या वेतन आयोग लागू होण्यापूर्वी सभासद लढानिधि देण्यास चालढकल करित, GR निघू दे. GR निघाल्यावर सभासदांनी लिपिक वर्गाला खूष करुन लाभ पदरात पाडून घेतला. कांही संधिसाधू लोकांनी निधी गोळा करुन संघटनेकडे जमाच केला नाही. संघटनेत देखील अध्यक्ष पदावरुन राजकारण सुरु झाले. अहमदनगर येथे संघटनेच्या बैठकीत अध्यक्ष पदासाठी स्व.श्री. प्रकाश परांजपे यांचे कार्य दुर्लक्षित करुन लाॕबी करुन स्व.श्री. कोरे हे अध्यक्ष झाले. पुढे आकृतिबंध लागू झाल्याने अतिरिक्त ठरलेल्या अनुरेखकांना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर समायोजन करुन घेतले.मात्र या संधीचा फायदा घेऊन स्व.श्री. कोरे रावसाहेबांनी एक्साईज निरिक्षक पदावर स्वतःची वर्णी लावून घेतली. हे एकमेव उदाहरण आसावे.त्यामुळे संघटनेच्या अध्यक्ष पदी श्री. दारुणाकर साहेब यांची निवड झाली व स्व.श्री. टोणपे यांची उपाध्राक्ष व श्री. भाऊराव वासणकर यांची सरचिटणीस म्हणून निवड झाली. आकृतिबंध, आश्वासित प्रगती योजनेतील आक्षेपांची पूर्तता, पदनाम बदल इ. यामागण्या श्री. दारुणकर यांचे कार्यकाळात यशस्वी रित्या सोडविल्या व त्या करिता मंत्रालया नजीकचि शाखा म्हणून वेळोवेळी मी,व श्री. बन्सिलाल राठोड,श्री. शशि नाईक,श्री.श्रीकृष्ण आपटे,व सा.बा.विभागातील इतर सहकारी यांनी सहकार्य करुन शाररीक व ऐनवेळी तातडीची आर्थिक मदत उभी केली, कोणत्याही प्रसिध्दीचा हव्यास न धरता.
श्री. दारुणकर साहेबांनी संघटनेस मिळालेल्या यशानंतर संघटनेचे महाअधिवेशन मा. गिरिशजी बापट साहेबांचे सहकार्याने पुण्यातील बाल गंधर्व नाट्यगृहात आयोजित केला. त्यावेळेस संघटनेची स्मरणिका प्रसिध्द केली त्या स्मरणिकेसाठी रु.२५०००/- चे मलपृष्ठा वरिल जाहिरात मी वैयक्तिक रित्या मिळवून दिली व लहान मोठ्या इतर जाहिराती अशा जवळ जवळ एकूण ६०-७० हजार पर्यन्तच्या जाहिराती मिळवून दिल्या मात्र या सोहळ्यात साध कौतूक तर सोडाच ज्या विविध समित्या नेमल्या होत्या त्या समितिपैकी एकाही समितिवर माझी किंवा श्री. बन्सिलाल राठोड यांची वर्णी लागली नाही. (जाणिवपूर्वक डावलले)आम्ही त्या बाबत कोणतीही नाराजी न दाखविता संघटनेच्या कामात आजही झोकून घेतले आहे. ( आज विषय काढण्याचे कारण जो उठतो तो प्रसिध्द घेण्याचे मागे आहे. खरा इतिहास दडपला जात आहे म्हणून तोंड उघडणे भाग पडले.)
अधिवेशना नंतर संघटनेत खरी धुसपूस सुरु झाली. पदोन्नती वरुन, खाते निहाय परिक्षा उत्तीर्ण न झाल्या मुळे सेवा जेष्ठता यादीत डावल्या गेल्यामुळे श्री. निमकर व स्व.श्री. टोणपे यांनी मंत्रालयात कक्ष अधिका-या सोबत झालेला वाद परिणामी २४ वर्षाच्या दुसऱ्या अश्वासित योजनेत निर्माण झालेला अडथळा शेवटी MAT मधुन त्याबाबत संघटनेने मिळविलेला विजय, श्री. दारुणकर व श्री. सुर्वे यांच्यात कोल्हापूरात झालेला वाद परिणामी स्व.श्री.टोणपे,श्री. निमकर, यांनी शासनाकडे श्री. दारुणकर(अध्यक्ष ) यांचे विरुध्द केलेली तक्रार त्यामुळे शासन स्तरावर संघटनेची घसरलेली पत. या सर्व घटनेचे आम्ही ठाणे - मुंबईचे प्रतिनिधी साक्षीदार आहोत. संघटनेवर अधिकार मिळविण्यासाठी पुण्यात जोशी यांच्या अधिपत्याखाली निवडणूक फार्स श्री. धापटे यांचे मदतीने घडवून स्व.श्री. टोणपे (अध्यक्ष ) श्री. धापटे (उपाध्यक्ष)श्री. निमकर. श्री. सुर्वे हे पदाधिकारी झाले. संघटनेत असंतोष माजला होता. या वादात श्री. धापटे यांनी संघटनेचा निधि पूण्यातील बॕन्केत अडवुन ठेवला आहे. श्री, दारुणकर विरुध्द स्व.श्री. टोणपे,श्री. निमकर,श्री. सुर्वे यांच्यात शेगांवचे श्री. काकड साहेबांनी दोन वेळा शेगांव मुक्कामी राज्यातील सर्व पदाधिका-यांना एकत्र करुन समेट घडवून आणण्याचा निशफळ प्रयत्न केला.
शेवटी कौल्हापूर येथे संघटनेस श्री. जाफरी साहेबां सारखे अभ्यासू, संय्यमी,प्रसिध्दी पासून अलिप्त रहाणारे, हाती घेतलेले कार्य तडीस नेणारे, सर्व सभासदांना बरोबर घेऊन जाणारे,संघटनेची व्याप्ति वाढविणारे, कणखर नेतृत्व लाभले. त्यांच्या प्रयत्नांनी न्यायालयीन प्रक्रियेतून सभासदांना घवघवित आर्थिक लाभ मिळवून दिला. श्री. बन्सिलाल राठोड, मंत्रालय संपर्क प्रमुख यांनी या दरम्यान दिलेल्या योगदानाचेही कौतूक व्हावे. तसेच संघटनेचे खजिनदार श्री. श्रीकृष्ण आपटे यांनी वेळो वेळी दिलेले योगदानही नाकारुन चालणार नाही.
आज ४६ व्या वर्धापनदिने भरभरुन कौतुक सोहळा होत असताना सत्य इतिहास सभासदांना कळावा व संघटनेत पदलालसे पोटी कशी दुफळी माजते आणि संघटनेचे नुकसान होते हे कळावे हाच या मागील शुध्द हेतू. धन्यवाद.
Post by: श्री. शरद माटवणकर साहेब , ठाणे. ( Date: 12/06/2021 )
72) मंजिल उन्ही को मिलती है जिनके सपनो में जान होती है ! पंख से कुछ नही होता हौसलों से उडान होती है!
संघटना के संस्थापक सरचिटणीस मा.श्री.डाॕ.मग्गीरवार और संस्थापक अध्यक्ष मा.श्री.रायपूरे साहब ने इन ही विचारों के साथ 46 वर्ष पहले आज ही के दिन अपने हौसलों के बाल पे महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटना की बुन्याद रखी थी.अपने संवर्ग के कर्मचाऱ्यों को इंसाफ दिलाना उनके हक्क की आवाज बुलन्द करना येही एक मकसद उनका ध्येय था.1977 मे 54 दिन के संप की शासन को जो लिगल नोटीस दी गयी थी वो राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ने हमारे ही संघटना के लेटर हेड से दि थी और संप 100% कामयाब रहा.
निगाहों में मंजिल थी गिरे और गिरकर संभलते रहे !हवाओं ने बहुत कोशिश की मगर चिराग आंधियों में भी जलते रहे!
ईस मिश्न को जो हमारे बुजरगोंने शुरु किया था उस को बेलौस आगे बढाणे का काम मा.श्री. काजी साहब ने 1982 से 2000 तक 18 साल तक अंजाम दिया.
पानी में तस्वीर बना सकते हो तुम कलम को शमशीर बना सकते हो तुम! कायर हैं जो तकदीर पे रोते हैं जैसे चाहो वैसी तकदीर बना सकते हो तुम !
इस तराह फिर एक नये जोश के साथ सन 2000 मे नवजवान खयादत ने उसे अपने हाथ मे लिया वो थे राव साहब कोरे..पुरे राज्य का दौरा कर के एक एक सभासद को जोडणे का काम और मजबुत संघटना के रुप मे एक ताकत बकशी.
मुश्किलों से भाग जाना आसान होता है हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है ! डरने वालों को मिलता कुछ नही जिंदगी में लढणे वालोंके कदमों में जहां होता है! इसी फलसफे पे अमल करते हुए 2005 से मा.श्री.दारुणकर साहब ने शासन से टक्कर लेकर अपने कार्यकाळ में सभासदों को अपना हक्क दिलाने मे बेशुमार कामयाबींया हासिल की.
आज बादलों ने फिर साजिश की जहाँ मेरा घर था वहीं बारिश की! अगर फलक को जिद है बिजलियां गिराने की तो हमेंभी जिद है वही पर आशियाँ बसाने की!
शासन ने 24 साल का लाभ देने से इंकार कर दिया लेकिन ईस जिद्द के खिलाफ जंग का एलान करने वाले मा.श्री. टोनपे साहब और मा.श्री. निमकर साहब ने नियम और शासकीय धोरणा के तज्ञ मा.श्री .सुर्वे साहब के साथ मील कर वहीं आशियां बसाया( अपना हक्क दिलाया).
मै आज के इस यादगार मौके पर अपने दिल की गहरायों से उन सभी संघटना के महापुरुषो का शुक्रिया अदा करता हुं जिन्हो ने अपना तन मन और धन से संघटना के लिए काम किया है लेकीन सभी के नाम लिखना मुम्कीन नही हो सका. मेरे सहकारी कार्यकारी मंडळ के सभी सदस्य , राज्य के सभी जिल्हा शाखा पदधिकारी,सभी सभासद को संघटना के वर्धापन दिन की शुभेच्छा देता हुं और उम्मीद करता हुं के संघटना पे आपका विश्वास ,आपका साथ ,आपका प्रेम इसी तरहा हमेशा कायम रहे.......
जय संघटना..जय महाराष्ट्र ..जय हिंद
जकी अहेमद जाफरी
अध्यक्ष ( Date 12/06/2021 )
71) रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेचा ४६ वा वर्धापन दिन चिरायु होवो... १२ जून महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेचा वर्धापन दिन.... संघटना ४६ वर्षाची झालीय ..मागील ४६ वर्षात संघटनेने अनेक स्थित्यंतरे पाहीली ...संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री संभाजी रायपुरे साहेब यांपासुन विद्यमान अध्यक्ष श्री जकी अहमद जाफरी साहेबांची संघटनेतील कारकिर्द जवळपास सर्वांनाच माहित आहे.. संस्थापक सरचिटणीस डॉ.श्री मग्गीरवार साहेब, स्व.श्री रावसाहेब कोरे ,स्व श्री दिपकराव टोणपे, श्री वाल्मिक दारुणकर या सारखे दिग्गज अध्यक्ष संघटनेला लाभले मा.श्री काझी साहेबांचीही सरचिटणिस पदाची तत्कालीन कारकिर्द आजही आपल्याला संघटनेच्या कार्यासाठी आदर्श उदाहरण ठरते... अशी अनेक पदाधिकार्यांची अनेक आदर्श उदाहरणे आहेत सर्वांची नावे घेणे शक्य नाही...... संघटन व संघटना म्हणजे काय ? व कशासाठी ? या विषयी जर विचार करायचा म्हंटलं तर सर्वप्रथम १२ जून १९७५ साली संघटना स्थापन झाली होती त्यावेळेपासुन आज पर्यंतचा इतिहास पाहता असे दिसते कि जसे आजकाल आपण म्हणतो कि आमची संघटना म्हणजे संघटन परिवारच होय... आम्ही सर्व या परिवारातील सदस्यच आहोत अगदी हेच खरे... कुटुंबाप्रमाणे कुटुंबाच्या सर्व अडचणी व प्रश्नाकडे लक्ष देउन सभासद हिताची जवाबदारीने निराकरण करणारे झटणारे कुटुंब प्रमुख म्हणजे संघटनेचे आपण सर्वानुमते नियुक्त केलेले आपल्या विश्वासाचे हक्काचे पद म्हणजे अध्यक्ष... अध्यक्ष व इतर सर्वच पदाधिकारी तसेच संघटनेतील सर्वच सदस्य या सर्वांचा मिळुन असलेला समुदाय म्हणजेच संघटना होय .. संघटनेत अध्यक्ष असो वा सामान्य सदस्य सर्व समान योग्यतेचे असतात एक व्यवस्थेचा भाग म्हणुन विवीध पदांची रचना करुन पदाधिकारी नेमुन कामाची विभागणी करुन सदस्य हिताची कल्याणाची कार्ये यशस्वी होणे हेच संघटनेचे अतीम ध्येय होय... आजवर आपल्या संघटनेतील सर्वच पदाधिकार्यांनी त्या त्या वेळी आपआपल्या परिने अफाट कामगीरी करुन संघटनेला एका उच्च शिखरोस्थोपी नेउन ठेवलेले आहे .. आज आपण अतिशय सन्मानाने उच्च वेतन वर्गात गणल्या जातो ते आपल्या संवर्गाच्या आपल्या कामाप्रती निष्ठा,प्रामाणिकपणा,आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणाचा अविष्कार व एक वेगळी उठुन दिसणारी कार्यशैली यामुळे आपण इतर संवर्गाहुनी वेगळे आहोत सरस आहोत ... व हे वेगळेपण सरसपण आपणास प्राप्त झालेले असेल तर ते केवळ आपल्या संघटनेमुळेच... आपल्या संवर्गातील कर्मचारी हा प्रतिष्ठेने,कर्तबगारीने, प्रामाणिकपणामुळे आपल्या उच्च अधिकाऱ्यांच्या प्रशस्तीला पसंतीला पात्र ठरतो .... संघटनेने आपल्याला सर्व काही दिलेले आहे ..जगण्याची कला,मैत्रीप्रेम,कामातील तन्मयता,आपले राहणीमान, आपले कौटुंबिक संस्कार व कौटुंबिक प्रगती स्थैर्य व ऐश्वर्य या सर्व बाबतीत संघटनेचेच योगदान आहे... रेखाचित्र संघटनेचा झेंडा पुर्वी पासुनच विजयउन्मादाने फडकत आहे .. अनेक रथीमहारथींनी आपले सर्वस्व वाहुन संघटनेचा इतिहास रचलेला आहे.. सर्वांचे योगदान महान आहे यात शंकाच नाही परंतु जर संघटनेचा पाया मा.रायपुरे साहेबांनी रचला तर संघटना मंदिराच्या पवित्र व सुवर्णाप्रमाणे चमकणारा कळस चढवला तो आजच्या अध्यक्षांनी यात कुणाचेही दुमत असणार नाही.. संघटन चालवणे हे तितकेसे सोपे नाहीये. संघटन चालवणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासम आहे..सर्व सभासदांना सोबत योग्य दिशेने मार्गक्रमण करण्याची कला आहे.. घेउन व या साठी सर्व सदस्यांचा सक्रीय सहभाग अत्यंत महत्वाचा असतो..सदस्य हे तन मन व धनाने संघटनेशी जोडलेले असावे.. संघटना परिवार चालवायचा असेल तर येथे मतभेद होउ शकतील पण मनभेद असु नये ,आपआपल्या जवाबदारीचे सर्वांना भान असायला हवे.. सर्वांनी मिळुन हा संघटनेचा पर्वत उचलायला हवा... संघटनेत हल्लीच्या काळात काही नकारात्मक वृत्ती चे संकट वादळं अधुन मधुन येताना दिसताहेत.. काही गोटातुन सकारात्मक कार्याला तडा देण्याचा प्रयत्न होताना दिसतोय, विद्यमान कार्यकारीणीच्या चाललेल्या पारदर्शक व स्वच्छ कारभारावर गलीच्छ शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न होतोय... अनेक आरोप संघटनेच्या कार्यावर होत आहे ... हे आरोप करणारे कोण ? आपण यांना आपल्या संघटनांचे सदस्य तरी म्हणावे कसे ? ... या संघटना परिवाराच्या घरात जर आपण रहात असु तर या परिवाराच्या घराची भिंत उभारणीतील एक वीट म्हणुन तरी तुमचे योगदान असायला पाहीजे... संघटनेचे कार्य व्यवस्थित चालणे यासाठी आर्थिक कोषही भक्कम असावा लागतो यासाठी संघटनेने वेळोवेळी केलेल्या मागणी प्रमाणे अर्थात वार्षिक आपल्या नियमित वर्गणी संघटनेच्या खात्यात जमा करणे हे सभासदाचे कर्तव्य आहे... सभासद हे नियमित आपले योगदान देतच असतात परंतु काही आपल्याच घरचे भेदी हे आपलेच घर जाळायला निघालेले दिसतात... ज्यांनी संघटनेला सुरुवातीपासुन अर्था या तीन वर्षाच्या कार्यकाळात एक रुपयाही योगदान संघटनेला दिलेला नाही, कधीही संघटनेत कोणत्याही उपक्रमात,आमसभेत बैठकीत व पदाधिकार्यांची संगनमताने राहीलेले नाही अशा काही वृत्ती आहेत त्यांना आपण सभासद म्हणायचे का? हा महत्वाचा विषय आहे...बरे योगदान देत नाहीत तर शांत रहावं ना... संघटनेच्या व इतर सदस्यांच्या योगदानाद्वारे मिळणाऱ्या लाभाचा फायदा लाटावा ना..पण नाही यांचा किडा वळवळतोच ते संघटनेला खर्चाचा हिशोब विचारतात, इतर योगदान देणार्या सदस्यांना वर्गणी देण्यापासुन रोखतात , संघटनेच्या सदस्यांच्या गृपवर वाद निर्माण करतात स्वतः संघटनेत काहीच काम करत नाही व इतरांनाही काम करु देत नाही ... काय म्हणावं अशा वृत्तीला... दुसर्याच्या प्रयत्नाने योगदानाने कष्टाने मिळवलेल्या यशाचे लाभाचे आयते लाभ आपल्या पात्रात ओढुन घेताना हे फुकट्यांना पचणारही नाही व रुचणार हि नाही कारण नैतिकता यांचे अंगीच शिल्लक राहीलेली नाही..असो अशा वृत्तींना संघटनेतील सन्माननीय संघटनेशी एकनिष्ठ असणाऱ्या सदस्यांनी सतर्क रहायला हवे... ज्यांनी संघटनेशी नाळ तोडली ,जो संघटनेच्या चांगल्या कार्यात बाधा आणतो तो संघटनाद्रोहीच समजावा... आपल्या संघटनेचे कार्य अतिशय पारदर्शकपणे चालु आहे, अनेक महत्वाची कामे संघटनेने यशस्वीरित्या पार पाडलेली आहेत...तीन वर्षापुर्वी सदस्यांना एकाही तत्कालीन पदाधिकार्याशी संवाद व संपर्क व अस्तित्व अजिबात माहित नव्हते आज या तीन वर्षात संघटनेतील प्रत्येक सदस्याच्या ओठातोंडावर ह्रदयात संघटना विराजमान आहे..प्रत्येक सदस्य संघटनेचा आनंद घेतोय .संघटनेशी एकरुप झालाय ...नाकर्त्यांना पार विसरलाय आताचा सदस्य .... उगवत्या सुर्याला नमस्कार असतो... प्रत्येक सदस्याला अधिकार आहे संघटनेच्या पदाधिकार्यांना जाब विचारायचा,हिशोब विचारायचा... संघटनाही तत्पर आहे काय हवी ती माहीती लगेच तुम्हाला मिळेल.. मिळणारच.. संघटनेने जमवलेला सर्व सभासदांनी दिलेला निधी हा परस्पर बँकेत जमा केला तसा सुरक्षित आहेच..जो खर्च झाला असेल त्याचे लेखापरिक्षण,जमाखर्च नोंदी सर्वकाही टापटीप आहे ...कोणत्या ही सदस्याला हे सर्व व्यवहार पहायचा अधिकार आहे व संघटना त्यांना दाखवतीलच पण जे मुळात अधिकृत सदस्यच नाही , ज्यांचा एक रुपयाही यात जमा नाही ते कोणत्या तोंडाने हिशोब मागु शकता ? ..... अशा वृत्तींना संघटनेत थारा नाही ... आज संघटनेच्या ४६ व्या वर्धापनानिमित्य पुनः एक सांगावेसे वाटते की तीन वर्षापुर्वी कोल्हापुर आमससभेत विद्यमान कार्यकारीणीकडे संघटनेची जवाबदारी आली तेंव्हापासुन मा.अध्यक्ष व सर्व पदाधिकारी हे रात्रंदिवस संघटनेचा ध्यास घेउन अपार मेहनत करुन एकएक सदस्यांना जोडुन आज एक भक्कम मजबुत असे संघटन उभे केलेले आहे... संघटनेची जवाबदारी शुन्यातुन सुरवात केली .. एक साधा कागद,मागील रेकॉर्ड,बँकेतील शिल्लक हिशोब, कसलाच कार्यभार हस्तांतरण झालेले नसताना केवळ प्रबळ इच्छाशक्ती व अपार मेहनत व बेजोड संघटन प्रेम व सर्व सन्माननीय सदस्यांची साथ व प्रेम या आधारेच आज संघटनेने हिमालयाची उंची गाठलीय.... बहरलेल्या आम्रवृक्षाला तर कोणीही दगडं मारतात पण दगडे मारणार्या ला त्या वृक्षाच्या रसाळ फळाचा आनंद नशीबी नसतो... जे प्रेमाणे संघटनेशी जुळलेले आहेत ते निरंतर संघटनेच्या फळाचा रसास्वाद घेतील... अनेक अडथळे येतील..अनंत अडचणी येतील ..काही अडचणी येतील कोणी अडचणी निर्माण करतील पण संघटना सर्व अडचणीवर संकटावर मात करेल..कारण संघटनेला विश्वास आहे संघटनेच्या एकनिष्ठ सदस्यावर... संघटनेच्या सर्व पदाधिकार्यावर, संघटनेची श्रद्धा आहे संघटनेच्या इतिहासातील नेतृत्वाच्या कार्यावर आदर्शावर ...सभासद हित व सदस्य कल्याण व संघटन परिवार ऐक्य , एकजुट व संघटनेची प्रतिष्ठा यासाठीच संघटना व पदाधिकारी अविरत लढत राहणार ... संघटनेतील सर्व जेष्ठ जुने जाणते मान्यवर पदाधिकारी यांच्या आदर्श तत्वावर हि संघटना पवित्र गंगे सारखी प्रवाहित राहिल ... संघटनेतील सर्व हयात जेष्ठ नेत्यांना आज माना चा सलाम करावासा वाटतोय त्यांच्या आदर्शांचा वारसा घेउन आपण चालणार हा संकल्प आज आम्ही करतो... तसेच संघटनेतील अतिशय जिव्हाळ्याचे व्यक्तीमत्व स्व.श्री दिपक टोणपेसाहेब , स्व.श्री रावसाहेब कोरेसाहेब , स्व श्री रावसाहेब धस तसेच आपल्या संघटनेतील दिवंगत झालेले अनेक पदाधिकारी व सदस्य बंधु त्याचप्रमाणे कोविड काळात कोरोना सारख्या गंभीर आजारामुळे आपल्याला कायमचे सोडुन गेलेले अनेक सदस्या या सर्व मान्यवरांना विनम्रपणे श्रद्धांजली सह विनम्र अभिवादन करतो .... आणि आजच्या या महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्य आपल्या संघटनेतील सर्व सदस्यांना अंतःकरणापासुन हार्दीक हार्दिक शुभेच्छा देतो ... 💐 धन्यवाद ! 🙏🏻 जय रेखाचित्र कर्मचारी संघटना ! 🤝 राजेंद्र करपे / प्रमुख सल्लागार ( Date 12/06/2021 )
70) महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटना परिवारातील सर्व मान्यवर पदाधिकारी,वरिष्ठ,जेष्ठ सन्मानिय सभासद व माझे मित्र,मैत्रीणींना आज संघटनेच्या 46 व्या वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा 🙏🙏
सर्वांना माहितच आहे आज आपल्या संघटनेला 46 वर्ष झालेले आहेत तरी आजही संघटना भक्कम मजबुत व कार्यशील गतीशील आहे आहे,हे केवळ आपल्या सर्वांच्या सहभागामुळेच...आपल्या संघटनेची स्थापना 12 जुन 1975 साली झाली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्यवर म्हणजे आदरणीय श्री रायपुरकर साहेब! यांनी एक वटवृक्षाचे रोपटे लावीले ..त्याला खत पाणी टाकले, त्या रोपटयाचे दिवसेंदिवस वाढ होउन आज इतका मोठा वृक्ष झालाय की आज ४६ वर्ष पुर्ण होऊन सुध्दा आपण त्या वृक्षाच्या शितल छायेत वावरत आहोत,अनेक ऊन,पाऊस,हिवाळे आलेत नी गेलेत तरी त्याची झळ आपल्यापर्यंत पोहचलेली नाही, केवळ या आपल्या संघटनेमुळेच. आज आपल्या संघटनेचा कारभार जर पारदर्शक नसता तर आज एवढे सभासद जुळलेले दिसले नसते, जर सभासद नसते तर पदाधिकारीच नसते, म्हणून सभासदांना पदाधिकारी व पदाधिका-यांना सभासद हे दोघांनाही एकमेकांची आवश्यकता आहे. ते म्हणतात ना आईचं मुलांशी नाळ जुळलेली असते म्हणून जास्त प्रेम असते.तसेच आपल्या संघटनेला पदाधिकारी व सभासद हे दोन्हीही अविभाज्य आहे . म्हणूनच माझ्या आदरणीय सभासदांनो एकमेकांशी जुळून रहा.
आपल्या आजी व माजी पदाधिका-यांनी आपल्या संवर्गाकरिता ऐवढे काही मिळवुन दिले आहे ते इतर कुठल्याच संघटनेनी केलेले दिसत नाही. आजही पदाधिकारी सभासदांच्या समस्यांचे निराकरण करत असतात, हे खरं आहे की ते निराकरण करता करता वेळ लागत असतो परंतु काही सभासदांना धीर नसतो त्यांना वाटते की, तव्यावर पोळी ठेवली की ती न शीजताच आपल्याला खायला लवकर मिळाली पाहीजे पण ते शक्य नसते त्या पोळीला तव्यावर भाजल्या शिवाय खाणे योग्य नाही, पोळी कच्ची जर खाल्ली तर पोट दुखेल तसेच कामाचेही असेच असते नियमाने केलेले काम करायला थोडा उशीर लागतो त्या करीता धीर धरणे आवश्यक आहे.
"वो बोलते है ना,सबर का फल मिठा होता है" तसंच आहे.
संघटनेचे काम करत असतांना पदाधिका-यांना ब-याच अडचणी येत असतात त्या अडचणीवर मात करता करता दमछाक लागते पण तरी काम करायचे पदाधिकारी सोडत नाही कारण त्यांना आपल्या कुटुंबातील सभासदांची काळजी असते,म्हणून सर्वांना विनंती आहे की सर्व मान्य सभासदांनी संघटनेच्या पाठीशी राहावे कारण पुढील काळ अत्यंत कठीण राहणार आहे सर्व सभासद आपले आहे नी सर्व पदाधिकारी आपले आहे,असे जर सर्वांनी मनात ठेवुन काम केले तर आपली ऐकजुटच राहील. एकत्र कुटुंब असतांना थोडाफार वाद हा होणारच म्हणून काय आपली एकजुट सोडायची काय ?बिलकुल नाही,सर्वांना एकत्र राहणेच कधी पण सोईचे...
डि.डि.जाधव सरांनी केलेल्या कवितेप्रमाणे..
तुच आमची माय माऊली
आम्ही तुझी लेकरे
तुझ्या अंगणी फुललो,फळलो
याप्रमाणे आपली संघटना.खरंच डि.डि.सर खुप छान.
आदरनिय श्री सुर्वे सरांनी वेबसाइट वर आपले मनोगत व्यक्त केले ते फारच सुदंर ते सर्वांनी वाचले असेलच.सॉरी सर तुमच्या मनोगत मधले काही ओळी चोरलेत मी😊 संघटनेला उद्देशुन असल्यामुळे मी या गृपवर मांडले.
"कर्मचारी संघटना कोणतीही असो या संघटनाचा शासनाशी
कंपन्याच्या व्यवस्थापनाशी संघर्ष हा अटळ असतो अश्या संघर्षातुन कर्मचा-याच्या भल्यासाठी असतो.अश्या संघर्षातुन कर्मचा-याच्या अडीअडचणी,मागण्यांची पुर्तताही होत असते.परंतु या पुर्तता करित असतांना काही अशी वैयक्तिक मतभेदाची. द्वेषाची दरी पडण्याची शक्यता असते.असा संघर्ष टाळुन कर्मचा-यांच्या मागण्या शासन दरबारी योग्य पध्दतीने मांडुन त्यासाठी लोकप्रतिनिधीची मदत घेऊन मागण्याची पुर्तता करतात त्यासाठी कोणत्याही कर्मचारी संघटनेचे नेतृत्व हे सेवेत असणा-या कर्मचा-याकडेच असणे आवश्यक आहे ...नेतृत्व अभ्यासु,कष्टाळू,निपक्ष,व प्रामाणिक असले पाहिजे तसेच लोकप्रतिनिधीच्या सहकार्याची कौशल्याने य़शस्वी समर्थन मिळवुन ध्येय प्राप्ती करणारे असावे त्यासाठी संघटनांची शासनाप्रती भुमिका तसेच शासनाची संघटनाप्रती भुमिका सकारात्मकतेकडे नेण्यासाठी आटोकाट प्रयत्न,सौदर्याचे, प्रेमाचे व आपुलकीचे निर्माण करणारे असावे.
अगदी बरोबर सुर्वे सर तुम्ही लिहील्या प्रमाणे आपले केन्द्र कार्यकारीनींचे संघटनेचे अध्यक्ष सर्व गुण संपन्न आहेत त्यांना साथ देणारे सरचिटणीस व इतर मान्यवर पदाधिकारी आहेतच.संघटना टिकवण्याकरिता सोबत सर्व संघटना कुटुंब आहेच.
मंजील उनको मिलती है, जिनके सपनो मे जान होती है
पंखो से कुछ नही होता,होसलो से उडान होती है।
जय रेखाचित्र संघटना 😊🤝🏻🤝🏻🌷🌷🌹🌹💐
💞 सौ वंदना परिहार
महिला प्रतीनिधी💞 ( Date 12/06/2021 )
69) अविस्मरणीय विदर्भ दौरा......
i) माझी संघटना... खरंच संघटनेशी हे अतुट नातं हे दिवसागणिक अधिकच दृढ होत चाललयं आणि याचं कारण म्हणजे सभासद मित्रांचं परस्परावरील आपुलकी व प्रेम.... याचा प्रत्यय मागील वर्षीच्या कोकण दौऱ्यावर असताना आम्हाला आलेला होताच त्याच प्रमाणे नुकत्याच परवाच आटोपलेल्या विदर्भ दौऱ्याच्या निमित्तानं आला... संघटना म्हणजे काय ? काय मिळतंय संघटनेत राहुन ? खरंच का संघटना म्हणजे परिवार आहे का ? तर हो , संघटना म्हणजे परिवारच आहे म्हणुनच तर इतका जिव्हाळा , प्रेम , काळजी, ओढ आदर, मला अनुभवायला मिळाला.... केंद्रीय कमेटीची बैठक दिनांक ०२ जानेवारीला यवतमाळ येथे आयोजित असल्याचे मा.सरचिटणिसाचे निमंत्रण मिळाले आणि त्यात एक दिवस आधी नागपुर यावे व नंतर नागपुरचे पदाधिकारीसह एकत्र जमुन वर्धा जिल्हा पदाधिकार्यांच्या भेटी घेउन यवतमाळ जायचे ठरले त्यानुसार दिनांक ३१ डिसेंबरलाच मी अध्यक्षांच्या गाडीत माझी बॅग ठेवली आणि सकाळी सातलाच नागपुर कडे कूच केले.... प्रवास सुरु झाला नागपुर वाटेने तर अनेक सदस्य पदाधिकारी यांचे प्रवासाच्या शुभेच्छांचे फोन खणखणायला लागले..आदल्या दिवशी औरंगाबाद शाखेने अगदी साग्रसंगीत सत्कार करुन आम्हाला निरोप दिलेला होताच ... पण या येणाऱ्या फोनवरुन नागपुरच्या वाटेने लागणारे जिल्हा पदाधिकारी आमचा रस्ता प्रेमाणे अडवताना दिसत होते..देउळगाव राजा या पुढे अंडेरा फाट्यावर श्री रविंद्र नागरे साहेब पुष्प गुच्छ घेउन हायवेवर आमची प्रतिक्षा करत होते आमची आलेली गाडी पाहुन एका मंत्र्यासम आमचा सत्कार करुन नजिकच्या हॉटेलात आम्हाला नाश्ता चहापाणी करुन प्रेमाच्या गप्पा व संघटनेच्या गप्पा करुन आम्हाला निरोप दिला... पुढे खामगावला श्री बहादरे,श्री इंगळे नागपुर रोडच्या चौकात आमची वाट पहात होते त्यांनीही आम्हाला खामगाव कँपमध्ये आम्हाला चहापाणी केले अतिशय आदर पुर्वक वागताना या मित्रांविषयी मनात जागा निर्माण झाली तसेच पुढे अकोला शहर आले अन तेथील कार्यकारीणीचा उत्साह व प्रेमाचे उधाण पाहता अक्षरशः आम्हाला काहीच सुचेनासे झाले.. डॉ.ढवळे, श्री पालवे सह सर्व जिल्हा पदाधिकारी व सदस्यमित्र पुष्पगुच्छे घेउन वर पक्षाप्रमाणे स्वागतास सज्ज होते जेवणाचा अत्यंतिक आग्रह कसाबसा चहावर निभावला पण प्रेमाची मायेची जिव्हाळ्याची मैत्रीची व संघटनेच्या अभिमानाची मेजवानी काही औरच होती अकोला जिल्ह्याचा निरोप घेतला वाटेत गाडी थांबवून गाडीतच सोबत आणलेली शिदोरी सोडली गाडीतच भोजन करुन पुढे निघालो तोच वाटेत अमरावतींच्या केंद्रीय उपाध्यक्ष श्री बींड साहेब ,श्री राजेश शहाकार (विभागीय सचिव) यांचे सोबत आलेल्या सदस्य मित्रांनी रस्ता अडवला येथेही पुष्पगुच्छे,चहापान फोटो ,सेल्फी ,जेवणाचा आग्रह झालाच अंधार पडायला लागला नागपुर गाठायचे म्हणुन अमरावतीच्या मित्रांची गळाभेट घेऊन नागपुरकडे गाडी निघाली...वाटेने या भेटलेल्या सर्वच पदाधिकारी व सदस्य मित्राच्या नावाचा मी उल्लेख जरी केलेला नसेल तरी आमच्या ह्रदयात या मित्रांची नावे कायमची कोरल्या गेली आहेत...साडे पाचशे किलोमिटरचा टप्पा पार करताना मा.अध्यक्ष जाफरी साहेब सतत ड्रायव्हींग करुन रात्री नउच्या सुमारास नागपुरला पोहचुन तसुभरही थकल्यासारखे अध्यक्ष वाटत नव्हते कदाचित हि उर्जा संघटन प्रेमाची असावी... आज म्हणजे ३१ डिसे.ला नागपुर मुक्कामी पोहचलो दिनांक ०१ जानेवारीचा संपुर्ण दिवसाचा कार्यक्रम हा स्थानिक नागपुरलाच होता ...तो उद्याचा कार्यक्रम काय आहे कसा आहे हे नागपुरच्या मंडळीने काहीसे गुपीतच ठेवले होते व व आम्हीही दिवसभरच्या प्रवासाने जाम थकलो होतो ...उद्याचा कार्यक्रम काय असेल कसा असेल याचा जास्त विचार न करता नागपुर मुक्कामस्थळी केंव्हा निद्रापाशात अडकलो ते कळलेच नाही.....
ii) दिनांक १ जानेवारी नववर्ष २०२१ चा आरंभ...या नववर्षाच्या नवसंकल्पाची सुरवात संघटनेच्या नव्या कल्पनेसह कार्य करण्याचा ध्यास ...व या कार्याची सुरवात आज नागपुर नगरीतुन होत आहे... विदर्भ कर्मचारी पत संस्था मर्यादित नागपुर चे अध्यक्ष श्री संजय खोंडे व मानद सचिव तसेच महा.राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष श्री नानाभाउ महल्ले हे आपल्या संघटनेच्या कार्यापासुन प्रभावित होतेच त्यांनी आम्हाला दौरा सुरु होण्यापुर्वीच पत संस्थेला भेट द्यावे असे आग्रहाने कळविले होते त्यानुसार मा.अध्यक्ष जाफरीसर सरचिटणीस श्री गभणेसर व आम्ही सर्वच जण पतसंस्थेला पोहचलो..मुंबईहुन कोषाध्यक्ष श्री आपटेसर व कुडाळहुन श्री नजीर सर ही जॉईन झाले त्याचप्रमाणे श्री दारुणकरजी श्री प्रशांत कहातेजी , श्री रेवतकरजी श्री व सौ कडु सर सर्व जणांचे या पतसंस्थेत शाल श्री फळासह सत्कार करण्यात येउन पतसंस्थेच्या वतीने भेटवस्तुही दिल्या गेल्या पत संस्थेच्या कार्यविषयी जाणुन घेतले सविस्तर चर्चा चहापान असे आदरतिथ्य पाहुन आम्ही सर्वजण भाराउन गेलो...सायंकाळी रेखाचित्र नागपुर जिल्ह्या शाखेसोबत बैठक झाली जिल्हाध्यक्ष श्री जोशीसरांनी कार्यरत व सेवानिवृत्त सर्व सदस्यांसह केंद्रीय पदाधिकार्यासह बैठकीद्वारे संवाद साधण्याचा योग जुळवून आणला तसेच सेवानिवृत्त सदस्यांचा मा.जाफरी सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला... हा कार्यक्रम संपतो ना संपतो तोच महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना नागपुर विभाग कार्यालयातुन नागपुर जिल्हाध्यक्ष श्री नानाभाउ महल्ले यांचे आपल्या संघटनेच्या पदाधिकार्यांना चर्चा व सदिच्छा भेटीचे निमंत्रण आल्यामुळे आमचा मोर्चा आम्ही राज्य कर्मचारी संघटनेच्या कार्यालयाकडे वळविला..नुकत्याच लागलेल्या न्यायनिर्णयाचे व आपल्या संघटनेचे कार्य व यश याबद्दल जाणुन घेण्यासाठी महा.राज्य कर्मचारी संघटनेला प्रचंड उत्सुकता असल्यामुळे जवळपास दोन तास सविस्तर चर्चा झाली येथेही रेखाचित्र पदाधिकार्यांचा यथोचित सत्कार झाला...नव वर्षाचा पहिला दिवस कसा गेला काही कळलेच नाही ...सायंकाळ झाली वाटले आता आजचे कार्यक्रमे बैठका भेटी संपल्या परंतु नागपुर मित्रांचा उत्साह भारीच...आपल्या संघटनेच्या सरचिटणीस श्री गभणेसरांनी त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या बागेला पंचताराकीत दिमाखात रंगबेरंगी दिव्यांच्या रोषनाईसह सजावटकरुन अत्यंत स्वादिष्ट शाही भोजनव्यवस्थेसह भव्य पार्टीचे नियोजन आधीच करुन ठेवले होते... हे एक सरप्राईजच आमच्या करीता होते...सर्व गेट टु गेदर पार्टी स्नेहमिलनाचा योग नववर्षाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे वर्णन आयुष्यभार स्मरणात राहील असेच झाले.... नागपुर विषयी नागपुरच्या लोकांविषयी बरंच ऐकुन असायचो मात्र ऐकले त्याही पेक्षा कितीतरी जास्त असे दिलदार नागपुर मंडळी आहे याची प्रचिती आली.... नववर्षाचा प्रथम दिन विदर्भिय मित्रमंडळासह जोष जल्लोषासह गेला उत्साह आनंदाला भरती आली.. उपराजधानीतील रेखाचित्र संवर्गाच्या आपल्या संघटन परिवाराच्या सोबत घालवलेला दिवस सर्वाच्या अडी अडचणी ,सुखदुःख जाणुन,संघटन कार्याविषयी चर्चा अपरिचितांशी मैत्री परिचय या तसेच नववर्षाच्या नवरात्रीच्या स्नेहमिलन पार्टीचा जल्लोष या सर्व वातावरणाने विदर्भ दौर्यातील पहिला दिवस अनेक मधुर आठवणींची संप्पती ह्रदयाच्या तिजोरीत कायमची जतन झाली....नववर्षाचा पहिल्याच दिवसाचे सार्थक झाले......
iii) चला आज २ तारीख नववर्षाचा दुसरा दिवस.. महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखेची केंद्रीय कार्यकारीणीच्या महत्वाच्या बैठकीचे नियोजन व या बैठकीच्या आयोजनाचे यजमान पद स्विकारले ते यवतमाळ जिल्ह्याने... आमची सकाळ पासुनच लगबग सुरु झाली बैठक दुपारी बारा वाजेच्या दरम्यान होती, नागपुर ते यवतमाळ साधारण दिडेकशे कि.मी.प्रवास असावा .. मा.सरचिटणीसांची खाजगी गाडी व एक भाडोत्री वाहनाने आम्ही सर्व पदाधिकारी यवतमाळच्या दिशेने पहाटेच निघालो ...नागपुरचे विस्तिर्ण गुळगुळीत रस्ते ..,पोटातले पाणिही हलणार नाही असेच व सकाळचे प्रसन्न वातावरणात यवतमाळच्या दिशेने गाड्यांचे एक्सलेटर दबत होते आणि अचानकच एक्सलेटर सैल व्हावे आणि कचकण ब्रेक लागावे आमच्या दोन्ही गाड्या रस्त्याच्या बाजुला एका सुंदर रेस्टॉरंटला पार्क झाल्या ...हे ठिकाण होते वर्धा बायपास .. हातामध्ये पुष्पगुच्छे घेउन आतुरतेने वाट पाहणारे वर्धा जिल्ह्याचे मावळे आम्हाला पाहताच युद्ध जिंकल्याच्या अविर्भावात आमच्याशी सामोरे आले श्री यशवंत हिवंज सर , जिल्हाध्यक्ष, सुनील गजभिये,उपाध्यक्ष, चंद्रशेखर चाफले सचिव, योगिता सोरटे सहसचिव, आशिष राऊत, राठोड, मार्गदर्शक श्री. एस. व्ही. देशमुख येथे उपस्थित होते या सर्वांनी मोठ्या प्रेमाणे केंद्रीय कार्यकारीणी व मा.अध्यक्षांचा सत्कार केला मोठ्या प्रेमाणे सकाळचा नाश्टा चहापान आग्रहाने दिला प्रथेप्रमाणे सेल्फी फोटो चे कार्यक्रम पार पडले नाश्टा चहापान करता करता संघटनेविषयी जिल्हा कार्याविषयी एक अल्पवेळात छोटेखाणी बैठकच आयोजित झाली... वर्धा जिल्ह्याचे पदाधिकारी तसेच सदस्य अतिशय आपुलकीने प्रेमाणे आणि सुहास्यवदनाने वागत बोलतानाचे प्रसंग अजुनही चलचित्राप्रमाणे आम्हाला स्मरते... एका कर्मचाऱ्याच्या बदली व त्याचा अधिकारी त्यास रिलीव्ह करत नाही या प्रश्नावरील चर्चा तर या स्ट्रीट बैठकीचे खास आकर्षण ठरले विशेष म्हणजे श्रीमती सोरटे म्याडमने तर या प्रश्नी मा.अध्यक्षापुढे केलेले सदर प्रश्नी सादरीकरण हे तर लाजवाबच होते खरोखरच संघटनेतील महिला वर्ग म्हणजे संघटनेची शान आहे.... वर्धा बायपासवर आमचा विसावा या गांधीग्राम तसेच विनोबांच्या कर्मभुमीवर नियोजीत असलेल्या यवतमाळच्या बैठकीसाठी वेळेवर जाणे जरुरीचे असल्याने या वर्धा कर्मवीरांचा आम्ही निरोप घेतला ..... यवतमाळ केव्हा आले कळलेच नाही वर्धा वीरांच्या भेटीवरील चर्चेत वेळ लगेचच कटला... यवतमाळ शहरातील मध्यवर्तीय ठिकाणी सुंदरश्या हॉटेलमध्ये प्रांरंभिक विसावा व फ्रेश व्हावे म्हणुन केलेली व्यवस्था पाहता केंद्रीय पदाधिकार्यांना काही काळ मंत्र्याचा थाट बहुतेक असाच असावा असे जाणवले हॉटेलच्या द्वारापाशी पुष्पगुच्छाने स्वागत भेटी व हॉटेलच्या लक्झरी सुटमधील चहापान गप्पा नव्या जुण्याचा परिचय यामुळे एकच आनंददायी वातावण तयार झाले... येथे आम्ही सर्वजन फ्रेश होउन बैठक स्थळी निघालो स्थळाचे नाव हॉटेल एकवीरा , हॉटेलच्या मुख्य द्वारावरील संघटनेचा फ्लेक्सबोर्ड फलक पाहुन कार्यक्रमाची भव्यता काय असेल याची कल्पना येत होती...यवतमाळ बैठकस्थळी जमलेली सभासदांची गर्दी व उत्साह पाहुन संघटनेचे जुने दिवस आठवले व संघटना चिरंजीव राहणारच याची खात्री झाली ... आयोजकांनी बैठकीपुर्वी भोजन करावे असे सुचवले तसे आम्ही भोजन आस्वादास सरसावलो ...भोजनाचा मेनु व टेस्ट इतकी जबरदस्त होती की अजुनही त्याची आठवण होताच मेजवानीचा सुगंध आठवू लागतो...बैठकीचा आरंभ सजवलेल्या व नक्षी रांगोळी पुष्पांच्या मधोमध भव्य दिपसमई प्रज्वलनाने झाला ... हा कार्यक्रम जनु साहित्य सम्मेलन तर नव्हेना असा भास होत होता...या नंतर केंद्रीय कार्यकारीणीचा तसेच केंद्रीय अध्यक्ष व पदाधिकार्यांचा सत्कार सर्वांचा परिचय सर्व सोपस्कार अतिशय शिस्तीने पार पडले...प्रथम केंद्रीय कार्यकारीणीची प्रमुख बैठक ठरल्याप्रमाणे सुरवात झाली या बैठकीत सर्व केंद्रीय पदाधिकार्यांनी संघटनेच्या विवीध मुद्यावर चर्चा संवाद केला... ठराव मांडण्यात आले सुचक अनुमोदन मंजुरी या सर्व गोष्टी सह बैठक संप्पन्न झाली याचे सविस्तर इतिवृत्त मा.सरचिटनीसांनी प्रसिद्ध केलेले आहेच सारांश हाच की संघटनेचा कारभार तथा संघटनेच्या बैठकीत जे काही ठरत असते जे निर्णय होतात अध्यक्ष असो वा कोणताही पदाधिकारी बैठकीत जे विचार मांडतात जे ठराव मंजुर होतात ते अगदी शेवटच्या सभासदांना जाणुन घेण्याचा अधिकार असल्याने सर्व काही पारदर्शकपणे संघटनेची कार्यप्रणाली आपल्या संघटनेत प्रथमच रुढ झालेली आपणास पहावयास मिळते व याच मुळे आम सदस्यांचा संघटनेवर संघटनेच्या कार्यावर पदाधिकार्यांवर विश्वास व अभिमान वाढत आहे.... संघटनेच्या कार्यकारीणीची प्रमुख बैठक अतिशय शिस्तबद्ध खेळीमेळीच्या वातावरणात आटोपली विशेष म्हणजे केंद्रीय पदाधिकार्यांच्या बैठकीच्या अवकाशात सर्व उपस्थित सदस्य शांतपणे बसुन होते कुणीही कंटाळलेले ताटकळलेले दिसले नाही ..यानंतर लगेचच यवतमाळ जिल्ह्याशाखेचा कार्यक्रमास सुरवात करण्यात आली .. सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.. पहिल्यांदाच संघटनेचे अध्यक्ष महोदय यांचे आपल्या यवतमाळ नगरीत आगमन होत असल्याने प्रचंड उत्त्साहात त्यांचे जंगी स्वागत पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देउन सत्कार करण्यात आला.. सर्व मान्यवरांची मनोगते भाषणे झाली ...सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात येउन सन्मानपत्रे देण्यात आली .. श्री शरदजी चांदेकर,श्री रमेश डहाके,श्री यशवंत पाटिल,श्री चंद्रकांत घुले,श्री अरविंद झाडे,श्री शरद उमक,श्री अरविंद सोनकुसळे,श्री संजय दुधाने,श्री विश्वनाथ सुलभेवार,श्री ठोकळ श्री मलथे,श्री मांडवकर,श्री गवळी,श्री पेंदारे,श्री श्री चवलेवार,श्री शिरभाते,श्री रामटेके,श्री तेलतुंबडे अशा उपस्थित पदाधिकारी व सभासदाच्या व आयोजकाच्या उपस्थितीने बैठकीचा सोहळा अभुतपुर्व साजरा झाला.. या प्रसंगी सर्व सदस्यांच्या अडी अडचणी जाणुन घेण्यात आल्या .. केंद्रीय कमेटीचे अध्यक्ष जाफरीसर ,सरचिटणीस गभणे सर ,उपाध्यक्ष बिंड सर,कोषाध्यक्ष आपटे सर यवतमाळचे विशेष प्रेम असणारे महामहिम श्री दारुनकर सर, श्री नजीर सर,श्री रहीम सर,श्री रेवतकरजी,श्री प्रशांत कहातेजी,श्री हिवंजसर श्रीमती वंदना परिहार म्याडम श्रीमती स्वाती डोकबाणे श्रीमती कांचन गोमासे म्याडम तसेच इतर अने पदाधिकारी सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला... शंका समाधान मार्गदर्शने सुचना सर्व बाबीवर उहापोह करण्यात आला.. जिल्हा परिषद संघटनेचे अध्यक्ष श्री संजय कुकडेजी ..यांची उपास्थिती हे ही या बैठकीतील वैशिष्ट्य जाणवत होते.. जवळपास दिवसभर या बैठकीच्या कार्यक्रमाने रंगत आणली होती या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व केंद्रीय पदाधिकारी , जिल्हा पदाधिकारी तसेच उपस्थित सर्वच सदस्य सेवानिवृत्त सभासद महिला सदस्य सर्वांच्याच नावाचा उल्लेख या लेखात करायचा म्हंटलं तर लेख अतिशय लांबलचक होईल.. तरीही सर्व सदस्य बांधवांचे आठवतील ते नावे नमुद करीतआहे..म्हणुन उपस्थित सर्वच पदाधिकार्यांनी , आलेल्या कार्यरत व सेवानिवृत्त सदस्य मित्रांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली ...जिल्हा शाखा आयोजकांनी तर प्रचंड परिश्रम घेउन या बैठकीच्या कार्यक्रमाचे शिवधनुष्य लिलया पेलले...यवतमाळ जिल्ह्याचे कौतुक करावे धन्यवाद द्यावे की आभार मानावे यासाठी खरोखरच शब्द नाहीत ... आणि याची आवश्यकताही नाही कारण दिवसभराच्या परस्पर मनोमिलनाने एकमेकांची मने जिंकली ...एक आदर्श बैठक संप्पन्न झाली .... हे कार्यच अफलातुन आहे संघटनेत काय दम आहे काय शक्ती आहे काय सामर्थ्य आहे हे संघटनेत एकनिष्ठ व प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्यानाच ठाउक असते... दुरुन डोंगर पाहणारे किंवा काठावरुन पोहणारे कधीच इतिहास घडवू शकत नाही ... येथे पाहीजे जातीचे , संघटना जगणारे संघटनेसाठी खपणारे... असे सोहळे असे नियोजन करण्यासाठी कल्पक नियोजन व पुर्वतयारी करावी लागते... झटावे लागते आणि हे करुन दाखविले यवतमाळ जिल्ह्याने...धन्यवाद यवतमाळ शाब्बास यवतमाळ..... औपचारिक आभारप्रदर्शन तसेच राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली व एक गाडी नागपुरकडे परतीला निघाली व मा.अध्यक्ष , मा.सरचिटणीस व महिला प्रतिनिधी सह मी स्वतः व आजच्या बैठकीस चंद्रपुरहुन आलेले विभागीय सचिव श्री एम ए रहिम सरांच्या गाडीमागे आमची गाडी चंद्रपुर कडे निघाली कारण चंद्रपुर जिल्ह्यानेही जिल्हा शाखेच्या वतीने मा.अध्यक्षांचे प्रथमच विदर्भ भेटीच्या औचित्याने जंगी सत्कार व जिल्हा कार्यकारीणीच्या बैठक कार्यक्रमाचे आयोजन करण्याची सिंहगर्जना केंव्हाच केलेली होती.......
iv) यवतमाळ ची बैठक यशस्वीरित्या संपन्न झाली.. आता चंद्रावर स्वारी अर्थात चंद्रपुराकडे स्वारी निघाली होती रात्रीचा प्रवास होता दिवसभराचा थकवा पण संघटनेच्या कार्यक्रमाच्या गप्पा मारत रात्री अकराच्या सुमारास चंद्रपुर नगरीला आम्ही पोहचलो... चंद्रपुर आदिवासी जिल्हा आहे असे ऐकुण असल्याने काही तरी जेमतेम राहण्याची व्यवस्था असेल भोजनही अवेळी मिळेल की नाही या कल्पनेतच आम्ही होतो परंतु आमच्या पुढे असलेली मा.रहिम सरांची पायलट गाडी चंद्रपुरातुन जुण्या तटबंदी महाद्वाराच्या वेशीतुन वाटवळणे घेत एका भव्य सुंदर आलीशान हॉटेल लोटस जवळ येउन थांबली... या हॉटेलच्या प्रवेशद्वारापाशी भल्या रात्री जिल्हाध्यक्ष श्री सुरेश नागापुरे सचिव श्री हेमंत बुरडकर श्री शशीकांत अक्केवार इत्यादी मंडळी यांनी आमचे व आपल्या अध्यक्ष महोदयांचे स्वागत केले व आमची राहण्याची सर्वोत्तम सोय असलेल्या अती लक्झरी रुमचा ताबा आम्हाला दिला हे पाहता आमचा सर्व शीणभाग गेला... आणि याच हॉटेलात अतिशय सुंदर भोजन व्यवस्थाही झाली चंद्रपूर म्हणजे आदिवासी शहर असावे असा समज केंव्हाचाच गैरसमजात रुपांतरीत झाला.. हॉटेलातील दिडफुट उंचीच्या नरम गादीवर वरुन मुलायम उबदार पांघरुण असल्याने केंव्हा डोळे लागले कळलेच नाही.... प्रातःकाळी लवकरच उठुन सर्वजण सज्ज झालो चहापान सुंदर नाश्टाही आटोपला ..कार्यक्रम दुपारचा असल्याने वेळ होताच हे ताडून जिल्हाध्यक्ष श्री नागापुरे व श्री रहिमसरांनी त्यांचे घरी आम्हाला चहा पानासाठी नेले.. नागापुरे साहेबांकडील चहा घेउन रहिमसाहेबां कडे चहासाठी गेलो या दोन्हीही मित्रांच्या आग्रहाचे आदरतिथ्याचे वर्णन करावे तितुके थोडे.. रहिम सरांच्या घरी वेळ अवकाश असल्याने गप्पा रंगल्या सहजच बोलताना कळले की आज श्री / सौ रहिमसरांच्या लग्नाचा आज वाढदिवस ताबडतोब केक बुके मिठाई आणण्याची व्यवस्था झाली नकळत लग्नाचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झाला.. आणि यावेळी आश्चर्य म्हणजे श्री रहिम सर कविता करतात हे कळाले कुणाचाही विश्वास बसेना पण त्याचे कविता कथन व संग्रहातील निवडक कविताच्या वाचनाने आम्ही अक्षरशः थक्कच झालो.. चंद्रपुर नगरीत पाय ठेवल्यापासुन एकावर एक सुखद धक्केच मिळत होते असाच भलामोठा धक्का बसला तो कार्यक्रमस्थळी आल्यावर ...नियोजन भवनाच्या दर्शनी भागावर संघटनेचा मोठा फलक संघटनेची प्रतिष्ठा वाढविताना दिसला प्रवेश द्वारावरील सुंदर रांगोळ्या पाहुन मन प्रसन्न झाले...सभागृहात प्रवेश करताच आम्ही सर्वच थबकलो... इतका सुंदर हॉल पाहुन दिल्ली दरबारातील संसंद भवन सुद्धा फिके वाटेल अशी व्यवस्था माईक सिस्टिम ,एलसीडी वरील डिजीटल कार्यक्रम रुपरेषा डिसप्ले सर्व काही उच्चभ्रु हाय प्रोफाईल व्यवस्था पाहुन आपली रेखाचित्र शाखेचा कार्यक्रम आहे का टाटा अंबानीची कॉर्पोरेटीव्ह बैठक काहीच कळेना...संघटनेच्या इतिहासातील कदाचित बैठकीचे आयोजन हे पहिलेच असावे असे वाटते... जिल्हा शाखेचे आयोजक तरुण मंडळींना सुटाबुटात वावरताना पाहुन खुप गर्व वाटला... कौतुक करावेसे वाटले..केवळ आपल्या संवर्गाचे स्टेटस जपावे कसे, इतरांना हेवा वाटावा असे राहणीमान, कल्पक कुशाग्र बुद्धी , अभ्यासु वृत्ती,कलेची देण कलावंताची खाण आणि कोणतेही कार्य साहसाने प्रामाणिकपणे व कुशलतेने करायचे व सर्वांच्या पसंतीला चटकन उतरायचे हे वरदान आपल्या संवर्गाला आहे हे चंद्रपुरच्या कार्यक्रमावरुन पहायला मिळते... कार्यक्रमाचे नियोजन कसे असावे ,कार्यक्रमात शिस्तीने कशी रुपरेषा आखावी तसेच संपुर्ण कार्यक्रमावर अतीउत्कृष्ठतेचा ठसा उमटावा व उपस्थितांना कार्यक्रमास आल्याचे मनस्वी समाधान वाटावे असेच चंद्रपुरचे नियोजन पाहुन बरंच काही पहायला अन शिकायलाही मिळाले....संस्कारीत प्रथे प्रमाणे दिपप्रज्वलाने सुरवात झाली ... पाहुण्याचे अतिशय प्रेमाणे व सन्मानाने पुष्पगुच्छे देउन यथोचित सत्त्कार जिल्हा शाखेने केला यावेळी सभागृहात एक मंतरलेले सात्त्विक प्रेमाचे भावविश्वाचे वातावरण निर्माण झाले तदनंतर श्री हेमंत बुरडकर यांच्या शब्दांलंकारात कार्यक्रमाचे प्रास्ताविकाने तर संघटनेच्या पंचेचाळीस वर्षाचा इतिहास अगदी कमी वेळात पण सविस्तर प्रस्तुत करुन कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला नेली...उपस्थितांच्या मनातील शंका,कुशंका,प्रश्ने व मा.अध्यक्ष व सरचिटणीस यांचेशी संवाद व अपेक्षित समाधानाची उत्तरे यावर प्रथम सत्र झाले... पाहुण्याचे मार्गदर्शन संघटनेच्या कार्याचे सिंहवलोकन ,न्यायालयीन प्रक्रीयेतील यश तसे संपुर्ण बदललेली अत्याधुनिक व पारदर्शक,कल्पक अशा संघटनेच्या कार्यप्रणालीवर उच्चतम मा.अध्यक्ष व मान्यवरांची भाषणे यामुळे सभागृहातील उपस्थितांना खिळवून ठेवले...सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रे पुष्पगुच्छे देउन सन्मानित करण्यात आले ... एकंदरीत सर्वच कार्यक्रम अभुतपुर्व असा होता ..संपुर्ण विदर्भ दौऱ्याचा हा गाभा होता... न भुतो न भविष्यती असा कार्यक्रम आयोजित करायला संघटनेवर प्रेम विश्वास आपुलकी असायला हवी व ते निभावण्याचे सामर्थ्यही असायला हवे आणि याचे भांडार चंद्रपुर सारख्या आदिवासी जिल्ह्यात आहे हे विशेष...... नाही तर मोठ्यामोठ्या शहरातील आयत्या आयोजनावर इतरांच्या मेहनतीवर चालु कार्यक्रमात माईकवर बळजबरीने ताबा घेउन रटाळ भाषण झोडणारे ही पहायला मिळतात ... पण सुसंस्कृत कार्यक्रमाचे आयोजन कसे असावे याचा पाठ चंद्रपुरनगरीच्या आयोजनातुन सर्वानी घ्यावा.... असे एकंदरीत हा कार्यक्रम पाहुन मनोमन वाटले...कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन श्री भुषन बावणे यांनी सुंदर शब्दाने केले ...श्री शशीकांत अक्केवार यांचे लयबद्ध काव्यमय व सुंदर अलंकारीत शब्दांनी सजवलेले सुत्रसंचलनाने कार्यक्रमात बहार आणली...केंद्रीय कार्यकारीणीला जिल्हाशाखेने दहा हजार रुपये देणगी देउन बोळवण केली... आपल्याच संवर्गाच्या श्री विकास घोटेकर या कलाकाराने संपुर्ण कार्यक्रमाच्या अपुर्व प्रसंगाचे छायाचित्रण केले श्रीमती रविला दोडके स्नेहा पवार या महिला भगीनींच्या रांगोळ्याही अप्रतिम...चंद्रपुर जिल्याचे अध्यक्ष श्री सुरेश नागापुरे,जिल्हा सचिव श्री हेमंत बुरडकर कार्याध्यक्ष श्री शशिकांत अक्केवार सहसचिव श्री भुषन बावणे, कोषाध्यक्ष श्री दिलीप खरे तसेच कार्यकारी सभासद सर्वश्री एस एम वासेकर सौ.स्नेहा एन पवार, विकास पी घोटेकर,धीरज ढवळे, अनिल बुजाडे, संघटक सल्लागार श्री परशुराम शेंडे श्री एम ए रहीम या सर्व उत्साही संघटन प्रेमींच्या कल्पनेतुन प्रयत्नातुन व आयोजनातुन श्रमातुन हा अदभूत अभुत पुर्व रेखाचित्र संघटनेचा सोहळा संप्पन्न झाला कार्यक्रमाची सांगता नेहमीप्रमाणे गृपफोटो,सेल्फी,गळाभेटी व आस्थेवाईकपणाने परस्परांविषयी चर्चा होउन राष्ट्रगीताने समारोप झाला ... आपुलकीचे आदरतिथ्य व संघटन परिवारातुन विलग होण्याची अनिच्छा सहकारी मित्रांचा हवाहवासा सहवास खुप काही बोलण्याची मनिषा यामुळे आमचाही तेथून पाय निघेना मा.विभागीय सचिव श्री एम. ए .रहिम सरांनी संघटन परिवाराचा स्नेहमिलन कार्यक्रम व त्यांच्या लग्नाचा वाढदिवस या मणीकांचन योगाचे औचित्य साधुन सर्वांना रात्रीचे शाही भोजनासह पार्टीचे आयोजन केले....खुप गप्पा केल्या तरी मन भरेना.. आजचा विशेष दिन हा ही होता की आपल्या संघटनेचे लाडके केंद्रीय अध्यक्ष श्री जकी अहमद जाफरी सरांचा उद्या वाढदिवस असल्याने श्री हेमंत बुरडकर व श्री अक्केवार यांनी रात्री बाराचा काटा सरकताच आणलेला बर्थ डे केक व पुष्पगुच्छ आणुन अचानक आम्हाला सरप्राईज देउन मा.अध्यक्षांचा वाढदिवसाची धुम केले हे क्षण खरोखरच अविस्मरणीय ठरले....या अविस्मरणीय सर्व क्षणांना आम्ही कायमचे आमच्या ह्रदयात संग्रही केले.....सकाळच्या प्रातःकाळी चंद्रपुर नगरीतील प्रसिद्ध प्राचिन ग्रामदैवत कालीकामातेचे दर्शन घेउन चंद्पुर वासियांचा जिल्हा शाखेच्या उत्साही मंडळीचा आपल्या संघटनेच्या परिवारातील काहींचा उल्लेख प्रस्तुत लेखात अनावधानाने राहीलाही असेल या सर्व रक्तापलीकडील नात्याच्या सह्रदय मित्रांचा भावपुर्ण निरोप घेउन आम्ही गडचिरोलीच्या दिशेने मार्गक्रमित झालो....
v) मित्रांनो दिनांक ३१/१२/२० मी मा.अध्यक्ष श्री जाफरी सरां सोबत नियोजित विदर्भ दौऱ्यावर निघालो... त्याचे सुरवातीपासुनचे वर्णन मी आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे... आजचे लिखाणानंतर या वर्णनास विराम द्यावा असे वाटते कारण... अतिशय लांबलच लिखाण होत आहे हल्ली वाचन संस्कृती लोप पावलेल्या जमाण्यात कदाचित हे सर्व कंटाळवाणेही ठरत असेल ..परंतु संघटनेकरीता ,संघटना बळकट करणेसाठी संघटनेत चैतण्य संचारण्यासाठी संघटनेच्या खर्चातुन होत असलेला हा दौरा या प्रवास दौऱ्यात विवीध जिल्ह्यात घडलेल्या घडामोडींची इत्यंभुत माहिती आम सदस्यांपुढे सादर करणे हे आमचे कर्तव्य समजतो व हा आम सदस्यांचा हक्कही आहे... तसेच हा आपल्या आदर्श संघटना परिवारातील कार्यशैलीच्या पारदर्शकतेचा भाग ही आहे..... निमित्त होतं दोन जानेवारीच्या यवतमाळ शहरात आयोजित केंद्रीय कमेटीच्या बैठकीचा परंतु या निमित्तानं मा.अध्यक्ष प्रथमच विदर्भ दौऱ्यावर येत आहेत म्हणुन विदर्भातील काही जिल्ह्याने आपापल्या परिने केंद्रीय अध्यक्ष व केंद्रीय पदाधिकार्यांना मोठ्या प्रेमाणे आमंत्रीत केले ... हा उत्साह आश्चर्यकारकच नाही तर अविश्वसनिय होता... नाही तर केंद्रीय पदाधिकारी भेटीला येणार म्हंटलं तर त्या जिल्ह्यात आस्थेने प्रतिक्षा करण्याऐवजी त्यांना कसे कटवायचे असेच चित्र असायचे... यवतमाळ बैठक संपल्यावर चंद्रपुरचा अपुर्व सोहळा पार पडला आणि गडचिरोली व भंडारा या दोन जिल्ह्याचा भेटीचा आग्रह पुर्ण करावयाचा होता.... गडचिरोली व भंडारा जिल्ह्याने दिनांक ५/१ रोजी बैठक ठेवली होती व आज दि ४/१ चा दिवस प्रवासाचा तसेच मा.अध्यक्ष श्री जाफरी साहेबांचा वाढदिवस असल्याने आम्ही भंडारा मुक्कामी निवांतपणे पोहचण्याच्या हेतुने वाटेत भेटणारे देवदर्शने प्रेक्षणीय स्थळे तसेच भंडारा गडचिरोलीच्या नक्शलाइट भाग ज्या बद्दल केवळ ऐकुन कुतूहल करत असायचो अशा भागात फिरत फिरत आजवरच्या प्रवास दौऱ्यातील दगदगीनंतर जरा रिलॕक्सपणे फिरत गडचिरोली मुक्कामी पोहचलो.. कुठपर्यंत पोहचले ? म्हणुन श्री तुम्मावार साहेब माजी विभागीय सचिव यांचे सतत काळजीने फोन येत होते आणि रात्री अकरा वाजेच्या सुमारास गडचिरोली पोहचताच रेस्ट हाउस च्या समोरील हायवेवर श्री तुम्मावार साहेब व श्री गोपी गवारेजी तरुण जिल्हाध्यक्ष आमच्या प्रतिक्षेत उभे होते ..विश्राम भवनात आमचे अपेक्षेप्रमाणे स्वागत झाले भोजन , छान पैकी राहण्याची व्यवस्था झाली... सकाळी लवकरच बैठक घेण्यात आली श्री तुम्मावारजी जुने अनुभवी पदाधिकारी व नव्या दमाचे जिल्हाध्यक्ष व केंद्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनपर भाषणासह सभासदांच्या अडचणी जाणुन घेतल्या यावेळी श्री कोल्हे सहसचिव,कु.रामटेके कोषाध्यक्ष ,श्री डोंगरे,श्री उईके ,व कु.आकरे इ.सभासदांनी उपस्थिती दर्शविली....गडचिरोलीचा निरोप घेउन भंडारा जिल्ह्याकडे प्रयाण केले ..एव्हाना दुपार होत होती भंडाराचे पदाधिकारीही प्रतिक्षा करत होते भंडारा येथे गोंदीया जिल्हा शाखाही सहभागी असल्याने हि भंडारा गोंदीया संयुक्तिक बैठक होती... आम्ही बैठकस्थळी पोहोचलो येथेही सर्व आजीमाजी सभासद सदस्य आतुरतेने प्रतिक्षेत दिसले या प्रसंगाचे खास आकर्षण म्हणजे आमचे सर्वांचे आदरणीय माजी सरचिटणीस श्री अशोक निमकरजी होते त्यांना पाहुन तर आम्हा सर्वांनाच आनंदाचे उधाण आले बरेच दिवसानंतर भेट होत होते..त्यांनीही आम्हाला प्रेमाणे कवटाळले... कार्यक्रमाला छान सुरवात झाली सर्वांचा यथोचित स्वागत सत्कार झाला .. मा.निमकर सरांचे मनोगत ऐकण्यास आम्ही सर्वजण उत्सुक होतो त्यांनीही संघटनेच्या सद्याच्या अतिशय यशस्वी उज्वल कार्याबद्दल समाधान ,आनंद व्यक्त केला, काही दिवसांपुर्वी संघटने विषयी त्यांच्या मनात आलेल्या निरुत्साह व नैराश्यामुळे ते काहीसे दुरदुर रहात असताना आताच्या परिस्थितीमुळे त्यांनी कार्यक्रमात सहभागी राहुन एक हाडाचा कार्यकर्ता संघटनेशिवाय राहुच शकत नाही व संघटनेची पतझड पाहुन व्यथितही होतो , बेचैन होतो पण संघटनेची भरभराट विकास होत असेल तर सच्चा कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही..मनोगत व्यक्त करताना अक्ष रशः श्री निमकरांना गहीवरुन आले... वातावरण काहीसे गंभीरही झाले.. मोठ्या प्रेमाणे त्यांनी संघटनेला स्वेच्छेने एक हजार रुपये देणगी या वेळी दिली ... उपस्थित सदस्यांच्या अडचणी जाणुन मा.अध्यक्ष व सरचिटणीसांनी त्याचे निराकरण केले... या कार्यक्रमाचे सुत्र संचलन श्री अजय उखरे जिल्हाध्यक्ष गोंदीया यांनी अतिशय उत्कृष्टपणे केले... विभागीय सचिव श्री प्रशांत कहाते यांचेही दमदार भाषण उपस्थितांना ऐकावयास मिळाले... श्री. निमकर साहेब माजी सरचिटणीस, श्री.प्रशांत कहाते विभागीय सचिव नागपूर भंडारा गोंदिया, श्री.कृष्णा पवार सचिव भंडारा जिल्हा शाखा, श्री. चावरे, श्री. सचिन नगराळे, श्री. कारण जाता, कु. मनीषा वलथरे, श्री. कुरुटकर ( सार्व.बांधकाम विद्युत विभाग)
गोंदिया जिल्हा शाखा सचिव श्री. अजय उखरे, कोषाध्यक्ष श्री. शेरेकार, श्री. लील्हारे, श्री.सुनील चौधरी. हि सर्व मंडळीच्या उपस्थितीत व आयोजनामुळे संघटनेच्या एका छानशा बैठकीची समाधानाच्या वातावरणात समाप्ती झाली ..विदर्भ दौर्याच्या कार्यक्रमातील हि शेवटची बैठक सर्व विदर्भातील शहरांना भेटी देतदेत " संघटना आपल्या दारी " या उक्ती प्रमाणे जवळपास सहा दिवसांच्या सदस्य मित्रांच्या भेटीगाठीने विदर्भाशी नाते घट्ट झाले...प्रत्येकाच्या मनाचा ठाव लागला सदस्यांचे संघटनेवरील प्रेम दिसले...खुप काही शिकायला खुप काही अनुभवायला मिळाले...सर्वत्र सर्व शाखेचा उत्साह प्रतिसाद पाहता संघटनेच्या सेवाकार्यासाठी बळ मिळाले.... विदर्भाने खुप भरभरुन प्रेम दिले ... कार्यक्रम आटोपला आग्रहासह भोजनही आटोपले ...सर्वाचा निरोप घेतला आता परतीचे वेध लागले दौरा मोहीम फत्ते झाली असे समजून नागपुर नगरीकडे आज रात्रीचा मुक्काम ठोकावा म्हणुन रवाना झालो....
vi) विदर्भ दौरा यशस्वीरित्या पुर्ण झाला ... ३१ डिसेंबर ला मा.अध्यक्षांसोबत मी औरंगाबाद सोडले दोन जानेवारी यवतमाळ केंद्रीय कमेटीची बैठक अन त्यात आग्रहाच्या निमंत्रणाचे इतर शहरातील दौरे बैठका प्रवास या दरम्यान विदर्भ मित्रांच्या प्रेमाची बरसात या प्रेमवृष्टीने चिंब झालेलो असताना आता परतीचे वेध लागले पण शो अभी बाकी है दोस्तों म्हणत नागपुरला एक मुक्काम वाढलाच तसे आमचाही पाय निघेना दिनांक सहा जानेवारीचा दिवस आमचे मित्र दारुणकरांच्या मनात काही औरच होते त्यांनी संघटनेच्या नववर्ष दिनदर्शिका विमोचन सोहळ्याचे कारण पुढे करुन आम्हाला रोखलेच... दुपारी २-३० ते ५-३० च्या दरम्यान मुख्य अभियंता , गोसिखुर्द प्रकल्प,सिंचन भवन नागपुर येथील सभागृहात कार्यक्रमाचे नियोजन केले... आज तर नागपुर सोडणे शक्यच नव्हते अन् दुपारपर्यंतचा वेळ कारणी लागावा म्हणुन मी रामटेक येथील गढमंदीराला दर्शानास जाण्याची इच्छा व्यक्त केली .. रामटेक मंदीर दाखविण्याची जवाबदारी नागपुरच्या श्रीमती परिहार म्याडमने घेतली आणि सकाळीच आम्ही रामटेकला निघालो तासाभरात रामटेक पोहचलो ..संपुर्ण विदर्भ दौऱ्यातील हे विलोभाणीय तिर्थस्थळ पाहुन संपुर्ण दौऱ्याचे सार्थक झाल्याचे वाटले..प्रभु रामचंद्र सितामाईच्या दर्शनाने व रामटेकच्या पवित्र भुमी व गढमंदीरातील परिसराच्या भेटीने संपुर्ण प्रवास पावन झाल्यासारखे वाटले... रामटेकहुन थेट आम्ही सिंचन भवन नागपुरला ठरल्या वेळी पोहचलो... सिंचन भवनातील सभागृहात पोहचलो तत्पुर्वी श्री दारुणकरसाहेबांनी आपल्या सर्व आजी माजी सभासदगण मित्रांसह सभागृहात पुढील कार्यक्रमाची जय्यत तयारी करुनच ठेवली होती जवळपास तीसचे वर सभासद मित्र या सभागृहात एकत्र पाहुन रेखाचित्र संवर्गाची एकजुट ऐक्यता व संघटनेवरील प्रेम करणाऱ्या मंडळीचे एकत्र समुह पाहुन आपल्या संघटनेच्या शक्तीचे अस्तित्व जाणवले... मा.अधिक्षक अभियंता अकस्मित दौऱ्यावर असल्यामुळे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता श्री दळवी साहेब ,सहाय्यक मुख्य अभियंता श्री मो.वि.वंजारी साहेब , सहाय्यक मुख्य अभियंता श्री झरेकर साहेब , अधिक्ष क अभियंता श्री खुणे साहेब यां अधिकार्यांच्या हस्ते संघटनेच्या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले...तसेच संघटनेच्या मा.अध्यक्ष व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला मा.अध्यक्षांनी संघटनेची यशस्वी वाटचाली बद्दल अधिकार्यांना अवगत करुन संघटनेबद्दल आपल्या संवर्गाबद्दल सांगोपांग चर्चा केली संघटनेचे कार्य व एकजुट पाहुन हे अधिकारी मंडळी सुद्धा अक्षरशः अवाक् झाले... व त्यांनी संघटनेचे मनभरुन कौतुक केले शुभेच्छा दिल्या...... उद्या सकाळी औरंगाबादला जाता जाता घरी चहा घेउन जा असा श्री दारुणकरांचा आग्रह न टाळता चहापान करुन आम्ही सकाळीच औरंगाबादला निघायचे म्हणुन मुक्कामस्थळी जाउन तयारीला लागलो ... दिंनाक ७ जानेवारीची पहाट होताच आमच्या बॕगा गाडीत भरल्या व जाता जाता श्री दारुणकर साहेबांकडे चहा घेउन निघावे म्हणुन गाडीत बसलो ...नागपुर मंडळी दिसतात रफटफ पण इतक्या प्रेमळ स्वभावाचे कसे असतात हे कोडे उलगडेना कारण अगदी सकाळीच सरचिटणीस गभणेसाहेब हे संत्र्याच्या तीन पेट्या व भेटवस्तु घेउन गाडीत ठेवताना दिसले आधीच वंदना म्याडमनेही संत्र्याच्या तीन पेट्या मिठाई बॉक्स प्रवासात जेवणासाठी डबा पाणी व प्रवासात लागणार्या इतर बडीशेप ,पासुन तर चॉकलेट बिस्कीट औषधी सर्वच आमच्या गाडीत नको नको म्हंटलं तरी ठेवल्याच.. आता आम्ही सर्वजण दारुणकर साहेबांच्या घरी गेलो चहापान झाला तेथेही तोच प्रकार...संत्र्यांचा बॉक्स मिठाई बॉक्स... असा पाहुणचार साले आपले नातेवाईकही करत नाही अगदी सासुरवाडीतही एव्हढी काळजी नसते... काही वेळ संघटनेच्या जुण्या गप्पात रंगलो तर दारुणकरांना अचानकच सुचले की आपल्या संघटनेचे आद्य संस्थापक अध्यक्ष श्री संभाजी रायपुरे वय वर्षे ८८ रा.नागपुर यांची विद्यमान अध्यक्षांशी भेट घडवून आणावी ...त्यांचा आशिर्वाद घेण्यास आम्ही उत्सुक होतोच म्हणुन लगेचच श्री दारुणकर साहेब श्री रेवतकर श्री गभणे सौ परिहार म्याडम आम्ही सर्वच रायपुरे साहेबांकडे फोन करुन त्यांना भेटावयास निघालो... हा अदभुत अपूर्व योगायोग होता...संघटनेच्या आद्यपुरुषाचे व विद्यमान अध्यक्षांचे मिलन हा योग म्हणजे दैवी कृपाच होय.. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री रायपुरे साहेब व मध्यकाळातील संघटनेला वैभव मिळवुन देणारे श्री दारुणकरजी व विद्यमान संघटनेची उज्वल वाटचालीचे मानकरी श्री जकी अहमद जाफरीजी या आद्य,मध्य व सद्य काळातील संघटनेच्या अध्यक्षांचा हा अपुर्व मिलाप जणु तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगमच होता...श्री रायपुरे साहेबांनी १९७५ साली संघटनेची मुहुर्तमेढ रोवली त्या वर्षीच विद्यमान अध्यक्षांचा जन्म झाला होता...त्यांनी लावलेले इवलुसे झाड आजही मोठ्या दिमाखाने महाकाय वृक्षरुपी बहरलेल्या फुलाफळांसह आपल्या संवर्गाला शितल छायेच्या मायेने सांभाळत आहे.... काय भावनिक व गौरवपुर्ण प्रसंग होता कल्पना करवत नाही आम्हा सर्वांना पाहुन रायपुरे साहेबही आमच्यासारखेच झाले... भुतकाळात रमले.. काही किस्से सांगीतले जुण्या लोकांच्या आठवणी काढल्या जणु संघटनेची संपुर्ण कादंबरी आम्ही उत्सुकतेने पहात होतो.. तीची एक एक पानं चाळत होतो...रायपुरे साहेबांचा आशिर्वाद घेउन त्यांचा निरोप घेतला ...आता वेळ आली होती सोबतच्या मित्रांचा निरोप घ्यायची..... गाडीपाशी एकत्र जमलो चला भेटू या...येतो... परस्परांचा निरोप घेत होतो.. हातातले हात मात्र सुटेना... आवाजाचे सुर बदलले.. शब्द जड झाले... तोंडातून शब्द बाहेर पडेना अचानक अश्रूंचे बांध फुटले ..डबडबलेल्या डोळ्यांनी बोलायला सुरवात केली निरोपासाठी मारलेल्या मिठ्या सुटता सुटेना....दारुणकर असो का करपे,जाफरी असो वा गभने आणी रेवतकर, स्वाती असो किंवा वंदना आपण वरवर कितीही कठोर वाटत असु पण या क्षणाला मेणाहुनी मउ झाले ...विरघळले...विवाहोत्तर कन्या वाटे लावताना जसे घडते चक्क तसेच घडत होते.... औरंगाबादच्या दिशेने मोबाइल वर मॕप लावला..जवळपास तासभर गाडीत आम्ही शांत होतो... निशब्द ... मित्रांनो खरंच यालाच म्हणतात प्रेम , जिव्हाळा, आपुलकी, मैत्री, आणि रक्तापलीकडील नातं आणि या सर्वांचा संगम असतो फक्त आणि फक्त संघटनेतच... आणि जे संघटनेसाठी वाहुन घेतात ,जे संघटनेशी एकनिष्ट असतात ,जे संघटनेचा ध्यास घेतात त्यांनाच हे असे अनुभवायला मिळते..संघटनेची हिच शक्ती आहे भक्ती आहे... जगण्याची कला आहे..निमित्त आहे.. संघटना आहे म्हणुन आम्ही आहोत.. संघटनेत जगतो आम्ही , संघटना जगतो आम्ही कारण आमची संघटना आमचा परिवार आहे... होय...हा संघटना परिवार आहे ...
🙏🏻 * लेखनसिमा ! * 💐 राजेंद्र करपे / संघटन परिवार सदस्य
68) महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटना जिल्हा शाखा चंद्रपूरची दिनांक 03 जानेवारी 2021 ला सकाळी 12.15 वाजता ची पहिली बैठक आदरणीय केंद्रीय कार्यकारिणीच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
सदर बैठकीस कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून मा. श्री. जाफरी साहेब अध्यक्ष महाराष्ट्र, व प्रमुख उपस्थिती मा. श्री. गभणे साहेब सरचिटनिस, मा. श्री. करपे साहेब प्रमुख सल्लागार, मा. श्री. ए. एम.रहीम साहेब विभागीय सचिव (वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली), महिला प्रतिनिधी मा. स्वाती डोकवाने मॅडम, मा. वंदना परिहार मॅडम, जिल्हा शाखेचे पदाधिकारी श्री. सुरेश नागपुरे अध्यक्ष, श्री. बुरडकर सचिव, श्री.आक्केवार कार्याध्यक्ष, श्री. भूषण बावणे सहसचिव, श्री.दिलीप खरे कोषाध्यक्ष, श्री.पी.एन. शेंडे, श्री. अनिल बुजाडे, श्री.प्रशांत गोवर्धन श्री. धीरज ढवळे, श्री.सुराज बोधे,श्री. पंधराम, श्री. भोयर,कु. नेहा घडसे कु. रवीला दोडके मॅडम व इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त माजी सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. मा. अध्यक्ष महाराष्ट्र यांचे प्रथम आगमना प्रित्यर्थ चंद्रपूर शाखे तर्फे भव्य सत्कार करण्यात आला. यानंतर सन्मानीय अध्यक्षातर्फे सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला.
सदर बैठकीत सन्मानिय केंद्रीय पदाधिकारी यांनी जिल्हा शाखा चंद्रपूरच्या दिनांक 29 डिसेंबर 2020 च्या परिपत्रकातील विषयावर सखोल विचार मांडले. मॅट याचिका 797/2020 वरील न्यायनिवडा दिनांक 15 डिसेंबर 2020 वर सन्मानित पाहुण्याद्वारे विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. तद्नंतर सन्मानीय पाहुण्यांच्या हस्ते दिनदर्शिका 2021 चे लोकार्पण करण्यात आले. सेवा प्रवेश नियम 2016, एन.पी.एस. मधील अंशदान, 7 वा वेतन आयोगातच्या अनुषंगाने आस्थापना कर्मचारी कडून पहिला व दुसऱ्या लाभाबद्दल होत असलेली दिशाभूल, जॉब चार्ट बद्दल सद्द्यास्थिती व इतर अनेक विषयांवर मान्यवराकडून मार्गदर्शन लाभले.
बैठकीचे सविस्तर इतिवृत्त यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. कृपया सर्वांनी अवलोकन करून लाभ घ्यावा. कार्यक्रमाची काही निवडक छायाचित्रे आपल्या माहितीकरिता यासोबत कृपया पुन्हा सादर करण्यात येत आहे. सन्माननिय पाहुण्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्या करिता संपुर्ण केंद्रिय कार्यकारिणीचे जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने आभार मानतो 🙏 धन्यवाद
( हेमंत बुरडकर )
सचिव
जिल्हा शाखा चंद्रपूर
महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा संघटना
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
66) राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,जिल्हा शाखा,नागपूर या कार्यालयाला रेखाचित्र शाखा मध्यवर्ती कर्मचारी संघटना,महाराष्ट्राचे अध्यक्ष जकी अहमद जाफरी औरंगाबाद , प्रमुख सल्लागार श्री राजेंद्र करपे,औरगाबाद, कोषाध्यक्ष श्री आपटे मुंबई, मार्गदर्शक श्री नजीर शेख सिंधुदुर्ग , जिल्हा कार्यकारीणी सदस्या व रेखाचित्र शाखेच्या च्या महिला प्रतिनिधी सौ.वंदना परिहार,सौ.स्वाती डोकबाने विभागीय सहसचिव प्रंशात कहाते यांचे संघटनेचे वतीने राज्य अध्यक्ष अशोक दगडे,यांचे हस्ते सर्व पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी रेखा चित्र शाखा संघटनेचे वतीने अशोक दगडे राज्यअध्यक्ष व जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महल्ले,कोषाध्यक्ष बुधाजी सुरकर,उपाध्यक्ष यशंवत कडू, कार्यकारीणी सदस्य दिपक गोतमारे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी संघटनेच्या विषयावर राज्य अध्यक्षा सोबत जवळपास 45 मि.चर्चा केली.
65) दि.०३/०१/२०२१ च्या बैठकीस उपस्थित होण्याकरिता केंद्रिय कार्यकारिणी पदाधिकारी दि.०२/०१/२०२१ रात्रौ १० वाजता चंद्रपूर ला आगमन झाले.जिल्हा शाखा चंद्रपूर तर्फे पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
64) कृपया, सर्वांना कळविण्यात येते की चंद्रपूर जिल्ह्यात दि.०३/०१/२०२१ ला संपन्न झालेल्या जिल्हा शाखेच्या बैठकीचे वृत्तांकन व इतिवृत्त अधिकृत रित्या येत्या काही दिवसांत केंद्रीय कार्यकाणीचे सर्व ग्रुप व वृत्तपत्रात निवडक फोटोसह प्रसिध्द करण्यात येईल, तरीही...कृपया नोंद व्हावी विनंती.
सचिव
जि. शाखा चंद्रपूर
63) गडचिरोली जिल्हा शाखा चे दिनांक 05 जानेवारी 2021 चे बैठकी करिता केंद्रिय कार्यकारिणी चे मा. श्री. जाफरी अध्यक्ष साहेब, श्री. सुधीर गभने सरचिटणीस, प्रमुख सल्लागार श्री. राजेंद्र करपे साहेब तसेच महिला प्रतिनिधी स्वाती डोकबाने व वंदना परीहार यांचे आगमन गडचिरोली येथे दिनांक 04 जानेवारी 2021 रोजी रात्री 11.00 वाजता झाले. त्याप्रित्यार्थ कार्यकारिणी चे स्वागत करताना श्री. यश तुम्मावार माजी विभागीय सचिव तसेच श्री. गव्हाळे अध्यक्ष .
62) दि. 05.01.2021 ला होणा-या बैठकीच्या अनुषंगाने आज केंद्रीय कार्यकारीणीचे सन्माननिय पदाधिकारी यांचे बहूसंख्य आदीवासी व नक्षलग्रस्त भाग असलेल्या गडचिरोली जिल्हयात आगमण झाले. जिल्हा शाखेतर्फे पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले...
🌹🌹🌹🌹🌹💐💐💐🙏🏻😊💞
61) आज दिनांक 5 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा संघटनेच्या जिल्हा शाखा गडचिरोली ची सन 2021 ची पहिली बैठक केंद्रीय कार्यकारीणीचे सन्माननिय पदाधिकारी यांचे उपस्थितीत संपन्न्न झाली.
सदर बैठकीस केंद्रीय कार्यकारीणीचे सन्माननिय पदाधिकारी मा. श्री. जाफरी साहेब अध्यक्ष, मा. श्री. गभणे साहेब सरचिटनिस, मा. श्री. करपे साहेब प्रमुख सल्लागार, मा. श्री. तुम्मावार साहेब माजी विभागीय सचिव, महिला प्रतिनिधी मा. स्वाती डोकवाने मॅडम, मा. वंदना परिहार मॅडम, जिल्हा शाखेचे पदाधिकारी श्री. गव्हारे अध्यक्ष, श्री. कोल्हे सहसचिव, कु. रामटेके कोषाध्यक्ष, तसेच श्री. डोंगरे, श्री. उईके व कु. आकरे इत्यादी सभासदांनी उपस्थित दर्शविली.
सदर बैठकीत आदरणीय पदाधिकारी यांनी केंद्रीय कार्यकारीणी कडून रेखाचित्र शाखा संवर्गातील कर्मचा-यांच्या हितासाठी करीत असलेल्या कार्याबाबत महत्वपूर्ण माहिती सांगून संघटनेचे महत्व विशद केले. त्याचप्रमाणे संघटनेच्या प्रमुख मागण्या, वार्षिक वर्गणी, लढा निधी व गडचिरोली शाखा अंतर्गत सभासदांच्या अडचणी बाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीचे इतिवृत्त लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. केंद्रीय कार्यकारीणीच्या पुढील कार्यासाठी 100 टक्के सहयोग देण्याकरीता जिल्हा शाखा गडचिरोली सदैव प्रयत्नशील असेल. सन्माननिय पदाधिका-यांच्या आगमनाप्रित्यर्थ जिल्हा शाखा गडचिरोली आभारी आहे. केंद्रीय कार्यकारीणीच्या सन्माननिय पदाधिका-यांना पुढील वाटचालीकरीता जिल्हा शाखा गडचिरोली तर्फे हार्दिक शुभेच्या......!
आपला
जी.एन. गव्हारे, अध्यक्ष
जिल्हा शाखा गडचिरोली
महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा संघटना
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹😊🙏🏻💞💐
60) दि.६ जानेवारी २१ ला दु.२.३० ते ३.०० या वेळेत सिंचन भवन दुसरा माळा मुख्य अभियंता (गोसेखुर्द)चे सभागृहात मा. कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंता यांचे हस्ते संघटनेच्या नववर्षाच्या दिनदर्शिकेचे विमोचन होणार आहे. व सभासदांना समर्पीत करण्यात येणार आहे. तसेच मागील वर्षात सेवानिवृत्त झाले ल्या सभासदांना मा.अध्यक्षांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येईल तरी सेवानिवृत्त सभासदांनी आवर्जून उपस्थित राहावे हि विनंती..
59) भंडारा जिल्हा शाखा चे दौऱ्यानिमित्त आयोजित बैठकीस माजी सरचिटणीस मा. निमकर साहेब भंडारा यांनी संघटनेला १०००/- रुपयाचा निधी देणगी दिली. संघटना परिवार तर्फे मा. निमकर साहेबांचे आभार.🙏🏻🙏🏻🙏🏻
58) सन 1985-86 नंतर कोणत्याही केंद्रिय कार्यकारिणी ने प्रथमच गडचिरोली सारख्या सुदूर अंतरावर ( remote censing area ) जिल्हा शाखेला भेट दिली. तेव्हा मा. तुम्मावार सेवानिवृत्त प्रमुख आरेखक यांनी जुन्या आठवणी ताज्या केल्या. सदर जिल्हा शाखा तरुण अध्यक्ष श्री. Gavhale यांचे नेतृत्त्वात कार्यरत आहे.
57) संघटनेच्या नववर्षाच्या दिनदर्शिकेचा विमोचन सोहळा बुधवार दिनांक ६ जानेवारी २०२१ला दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत मुख्य अभियंता,गोसिखुर्द प्रकल्प,सिंचन भवन,नागपूर येथील सभागृहात संपन्न झाला.याप्रसंगी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडलाचे कार्यकारी अभियंता श्री दळवी साहेब,सहाय्यक मुख्य अभियंता श्री मो.वि. वंजारी साहेब,सहाय्यक मुख्य अभियंता श्री झरेकर साहेब,सहाय्यक अधीक्षक अभियंता श्री खुणे साहेब त्याचप्रमाणे संघटनेचे अध्यक्ष श्री जाफरी साहेब,प्रमुख सल्लागार श्री करपे साहेब आणि श्री दारूनकर साहेब,महिला प्रतिनिधी डोकबाने मॅडम व परिहार मॅडम तसेच विभागीय सचिव श्री प्रशांत कहाते,नागपूर जिल्हा उपाध्यक्ष श्री यशवंत कडू तसेच सार्वजनिक बांधकाम व जलसंपदाचे एकूण ३० सभासद उपस्तीत होते.याप्रसंगी मा.अध्यक्षांनी संघटनेची वाटचाल सविस्तरपणे विशद केली.येत्या एक दोन दिवसात मा. मुख्यमंत्र्यांचा गोसिखुर्द प्रकल्पावर दौरा असल्यामुळे मा.कार्यकारी संचालक आणि मा.मुख्य अभियंता व मा.अधीक्षक अभियंता आकस्मिक दौऱ्यावर गेल्यामुळे ते या कार्यक्रमात उपस्तीत राहू शकले नाही.
56) सर्वसाधारण सभेची नोटीस
सप्रेम नमस्कार वि.वि.
अहमदनगरच्या जिल्हा रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेच्या सर्व बंधू व भगिनींना कळविण्यात येते की, आपल्या अहमदनगर जिल्हा संघटनेची मंगळवार दिनांक 05/01/2021 रोजी दुपारी 2:00 वा. पाटबंधारे विश्रामगृह, अहमदनगर येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे, तरी सदर बैठकीस सर्वांनी आवश्यक ती काळजी घेऊन उपस्थित रहावे ही विनंती.
सभे पुढील विषय:
1. नवीन कार्यकारिणी निवड झाली असलेने letter Head design final करने.
2. संघटनेकडून वार्षिक निधी जमा करणेबाबत.
3. जिल्ह्यातील सर्व सभासदांना सेवानिवृत्त व कार्यरत असणाऱ्या व्यक्ती कसा प्रकारे संपर्कात राहतील त्यासाठी नवीन संकल्पना वर चर्चा.
4. कृषी विभागप्रमाणे मिळणाऱ्या लाभबाबत
5.पदोन्नती बाबत असलेली परिमंडळ कार्यालयाची भूमिका बाबत चर्चा.
6. आयत्या वेळेला उपस्थित होणार्या विषयांवर चर्चा.
तरी सर्व सदस्यानी (कार्यरत व निवृत्त) सामाजिक अन्तर पाळून व 😷 वापरून सभेस वेळे वर हजर राहून सहकार्य करावे ही नम्र विनंती
आपले विनीत
अध्यक्ष (श्री. विनोद पंडित ) सरचिटणीस (श्री.अमोल सुपेकर )
अहमदनगर जिल्हा रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटना
55) रेखाचित्र शाखा कर्मचारी मध्यवर्ती संघटना,महाराष्ट्र चे केंद्रीय अध्यक्ष श्री जकी जाफरी सर, प्रमुख सल्लागार मा.श्री राजेंद्र करपे औरगांबाद,मा.नजीर शेख सिंधुदुर्ग, कोषाध्यक्ष मा.आपटे मुंबई ,यांनी वैनगंगा नगर अजनी विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पत संस्था,नागपूर येथील मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली या वेळी नागपूर येथील पदाधिकारी सोबत होते सरचिटणीस सुधीर गभने,केंद्रीय कार्यकारीणी सदस्या सौ.वंदना परिहार,जिल्हाध्यक्ष जोशी,विभागीय सहसचिव प्रंशात कहाते,उपाध्यक्ष यशंवत कडू,माजी अध्यक्ष वाल्मिक दारूणकर,माजी विभागीय सहसचिव अशोक रेवतकर यावेळी मा.पद्माकर पाटील अधिक्षक अभियंता चंद्रपूर पाटबंधारे मंडळ,चंद्रपूर व संस्थेचे अध्यक्ष संजय खोंडे व संस्थेचे मानद सचिव नानाभाऊ महल्ले यांचे हस्ते संबधीत पदाधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन संस्थेव्दारे सत्कार करण्यात आला *नानाभाउ महल्ले / जिल्हाअध्यक्ष महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना नागपुर*
54) पाचव्या वेतन आयोगाच्या त्रुटी मान्य करून घेताना अनेक घडामोडी झाली. प्रस्ताव मान्य होत असतात एका मा. सचिव महोदयांनी वेतन त्रुटी देताना , पाचव्या वेतन आयोगा पासून न देता, सहावे वेतन आयोगा पासून देण्यात यावे असा शेरा लिहाला होता. हे आपणासाठी नुकसान करणारे होते. ही बाब मा. दारुणकर साहेबांनी इतरा सोबत मलाही दुरध्वनी वरुन सांगीतली. सदर शेरा खोडणे तसे अवघडच होते, पण ही जबाबदारी दारुणकर साहेबांनी लातूरकरावर सोपवली. आम्हीही हार मानली नाही. त्यावेळी मा.श्री.स्व.विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री होते , त्यांचे स्विय सहाय्यक लातूरचे होते. त्यांचे मोठे बंधू , आमचे मार्गदर्शक स्नेही व जलसंपदा चे उप अभियंता यांचे मार्फत मा. साहेबांशी संपर्क साधला , मा.साहेबांनी सचिव साहेबांचा शेरा खोडला व थकबाकी न देता पाचव्या वेतन आयोगाच्या त्रुटी पाचव्या वेतन आयोगापासून देण्यास मान्यता दिली. पाचव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीत दुरुस्ती झाल्याने सहावे वेतन आयोगात फायदा झाला. त्याचे फरकाची रक्कम आता मिळणार आहे.
(मा.विलासराव देशमुख साहेब, मा. देवेंद्र फडणवीस साहेब या दोन मा.मुख्यमंत्री यांचे स्विय सहाय्यक दोघेही लातूरचे होते , त्या दोघांचाही आपल्या संघटणेस फायदा झाला.)
🙏🙏💐💐🙏🙏
विनायक जोशी
अतिरिक्त सरचिटणीस, लातूर
53) पाचवे वेतन आयोगाच्या वेतन श्रेणी फरकाची रक्कम मिळणेसाठी मॅट मध्ये दाखल केलेल्या याचिकेत लातूर जिल्ह्यातील २३ सभासदांची नावे आहेत. या २३ सभासदांना न्यायालयाच्या निकालानुसार मागील थकबाकी मिळणार आहे.
या तेवीस सभासदा व्यतिरिक्त आपल्या संपर्कातील अन्य कोणी सभासद असल्यास त्यांना या प्रकरणाबाबत कृपया माहिती द्यावी. जे सभासद पुर्वी वर्गणी देवून दाखल केसमध्ये समाविष्ट होवू शकले नाहीत. त्यांनाही थकबाकी मिळवून देण्यासाठी संघटनेच्या वतिने मा. वकिल साहेब यांचे सोबत चर्चा करुन कार्यवाही करण्यात येत आहे.
यासाठी किती सभासद सादर केस मध्ये सहभागी झालेले नाहीत, याची एकूण संख्या संकलित होणे आवश्यक आहे.
तरी सर्व सभासदांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आपल्या संपर्कातील सर्व आजी / माजी, सेवेतील तसेच सेवानिवृत्त आरेखक संवर्गात काम केलेल्या मित्रपरिवाराला याची माहिती द्यावी ही विनंती.
आपला स्नेहांकित
विनायक (व्ही.आर.) जोशी
अतिरिक्त सरचिटणीस, लातूर.
52) संघटनेच्या न्यायालयीन लढ्याला अल्पकाळात अभुतपूर्व यश...आज दिनांक १५/१२/२०२० रोजी मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्याधिकरण खंडपीठ औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य रेखाचित्र संघटनेची याचिका OA797/2020 कृषी विभागाप्रमाणे लाभ मिळणे बाबत ची सुनावणी झाली .मागील आठ महिण्याच्या कोविड लॉकडाउनमुळे कोर्ट प्रक्रीया पुर्णपणे थांबलेली असताना दिनांक ०१/१२/२०२० पासुन Urgent Matter साठीच सुरु झालेल्या कोर्टाच्या सुनावणीत संघटनेचे वकील ॲड.श्री अविनाश खेडकर यांनी मोठ्या प्रयत्नाने संघटनेचे Matter लाउन घेतले व आजच्या कोर्टाच्या कार्यवाहीत अतिशय प्रभावीपणे युक्तीवाद केला व संघटने बाजुने विजयी न्याय निर्णय आदेश प्राप्त झाला...मा.न्यायालयाने शासनास कृषी विभागाप्रमाणे लाभ मिळवुन देण्यासाठीच्या संघटनेच्या याचिकेवर अमलबजावणीसाठी तीन महिण्याचा अवधी दिलेला आहे.या सुनावणीच्या वेळी संघटनेचे श्री करपे,श्री पठाण , श्री अहेमद श्री नाईक,व श्री कोकाटे व मी स्वतः हजर होतो.मा.न्यायालयाच्या न्यायनिर्णय कळताच संघटनेच्या या आनंदाच्या वेळी सर्वांनी एकमेकांना अभिनंदने करुन आनंद व्यक्त केला तसेच आपले वकील श्री खेडकर साहेब यांना पुष्पगुच्छे देउन तसेच पेढे वाटुन आनंद व्यक्त केला.आपल्या संघटनेच्या या अभुतपुर्व यशाचे सर्व श्रेय संघटनेच्या सर्व केंद्रीय तसेच जिल्हा पदाधिकारी, सर्व माननीय सभासद कर्मचारी तसेच मा.वकील साहेब व मा.न्यायालयीन कर्मचारी यांचेच आहे.जय रेखाचित्र संघटना !
(आपला विनीत: जकी अहेमद जाफरी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटना)
MAT Case No. OA 797/2020 click here to open
( काही सभासदांना या न्यायालयीन प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती नाही ती सविस्तर माहिती व्हावी या अनुषंगाने याबद्दल पुनश्च सर्व सभासदांना कळावे यासाठी थोडक्यात पार्श्वभूमी अशी की,संघटनेनी केंद्र सरकारच्या आपल्या पदांना दिलेल्या पाचव्या वेतन आयोगाच्या तृटीच्या सुधारीत वेतन श्रेणी आपण शासनाकडून २००६,०७ मध्ये मंजूर करून घेतल्या होत्या परंतु शासनाने त्या देताना काल्पनिक रित्या वेतनवाढीसह (एरीएर्स न देता) दिलेल्या होत्या व १० वर्षाची थकबाकी दिलेली नव्हती. कृषी विभागाच्या आपल्या संवर्गांच्या कर्मचाऱ्यांनी ती न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या न्याय निर्णयानुसार मिळवुन घेतली होती. त्याच आधारावर आपल्या संघटनेनी मागील वर्षी धुळे येथील आमसभेनंतर औरंगाबाद मॅटमधे, साधारण सप्टेंबर २०१९ मधे कोर्ट केस क्र OA749/2020 याचिका दाखल केली होती. मध्यंतरी कोरोना सावटाचा १० महिन्याचा कालावधी वगळला तर अवघ्या ५ महिन्यात आपण केस जिंकली आहे. संघटनेची हि कामगीरी खरंच दैदिप्यमान आहे.)
51) प्रिय संघटना परिवार,
सप्रेम नमस्कार,
दिनांक 18/12/2020 ला माझ्या वाढदिवसानिमीत्त्य आपण माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मन भरुन आले. कुणी प्रत्यक्ष फोन करून तर कुणी व्हॉट्स अप वर संदेश देऊन शुभेच्छा दिल्यात. कुणाकुणाचे नांव घेऊ ! यादी लांब होईल !! कुणा कुणाला Thanks म्हणु !!! नकोच !!! मला कायम तुमच्या ऋणात असु द्या. तुमचा स्नेहबंध असाच कायम असु द्या.
प्रिय संघटना परिवार, आपणपैकी मला कुणी तडफदार, यंग डायनामीक असे लिहीले,खरे सांगु आपले माजी पदाधिकारी व त्यांना साथ देणारे सभासद, ज्यांनी संघटना स्थापन केली व पुढे संघटनेला उंच शिखरावर नेले, ज्यांनी हि विरासत आपल्या हाती सोपविली त्यांच्या कर्तुत्वापुढे मी कुठेच नाही. त्या सर्वाना नमस्कार.
तडफ काय असते ते शिकावे अहमदनगरकरांकडुन, आम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी बैठकीची Video Clip चक्क स्थानिक Cable Chhannel वर झळकविली. तडफ काय असते ती शिकावी पुणे येथील सभासंदांकडुन, पुणे जिल्हा शाखा कार्यकारीनीची निवड करतांना सभासदांची असलेली उपस्थिती व त्यासाठी तेथील पदाधिकाऱ्यांनी घेतलेली मेहनत, हि तडफ असते. तडफ असते ती सातारकरांची. बैठकीला जुने नवे सर्व सभासद यांचा उत्कृष्ट संगम घडवुन आणण्याची. तडफ बघीतली ती सांगली येथील श्री. आय.जी. मुलानी साहेब यांची. त्यांचे कडे बघीतले तर कुणीही म्हणनार नाही या मानसात ईतकी हलकाई आहे. आम्हाला सभास्थळ दाखविण्यासाठी हा माणुस चक्क Highway वर आपली Activa घेऊन उभा. नविन सभासद म्हणेल की यात काय मोठं ! अहो मुलानी साहेब कधीचेच सेवानिवृत्त झालेत. तरीही संघटना वाढावी म्हणुन त्यांची धावपळ बघीतली की त्यांचेपुढे आपण खुजे ठरतो. तडफ बघीतली ती कोल्हापुरकरांची त्यातही उमेश सावंत यांची कोल्हापुरच्या आमसभेत. तीथे जुण्या नव्यांचा छान मेळ बसला आहे. तडफ बघीतली ती सिंधुदुर्ग जिल्हयातील सेवानिवृत्त सभासदांची, तसेही ईथे कार्यरत कर्मचारी कमी आहेत. तडफ व शिस्त बघीतली ती रत्नागीरीकरांची , शरदराव कांबळे व सुनिल कांबळे साहेब यांचे शिस्तबद्ध् सुत्रसंचालन. कीती सांगु नी काय सांगु !!!
तडफ बघीतली ती नाशिककरांची संघटनेच्या प्रत्येक कार्यक्रमांत, बैठकीत, तसेच प्रत्येक Activity मध्ये त्यांचा सहभाग असतोच. तडफदार व्यक्तिमत्त्व म्हणजे धुळयाचा वाघ जीभाऊ बच्छाव….
तडफ असते ती नजिर शेख साहेब आमचे मार्गदर्शक यांची, कीतीही उन पाऊस असुद्या, साहेब बैठकीला महाराष्ट्रात कुठेही हजर !!! तडफ बघीतली ती दारुणकर साहेब यांच्यात, अजुनही मंत्रालयाची सात मजले वरखाली करतांना आमची दमछाक होतांना ते मात्र त्याच उत्साहात असतात. तडफ बघीतली ती करपे साहेब यांच्यात, किल्ला लढवावा तो फक्त करपे साहेबांनीच. तडफ बघीतली ती महिला प्रतिनिधी स्वातीताई यांच्यात. आपली प्रकृती सांभाळत सर्व बैठकीला हजर असतात, विषय समजुन घेऊन आपले मत सुद्धा मांडतात. धुळयाच्या आमसभेतील ती डरकाळी अजुनही माझ्या कानात घुमत आहे ती म्हणजे महिला कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या आमसभेसारख्या बैठकांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याबद्दल वंदनाताईंनी केलेले आवाहन.
आमचे लातुरकर बंधुही नेहमीच कामात अग्रेसर असतात. त्यांचा लातुर पॅटर्न लय भारी !!!!!!
तडफ बघीतली ती औरंगाबादकरांची !!! सदैव मा. अध्यक्ष जाफरी साहेबांच्या खांद्याला खांदा लावुन संघटनेला मदत करीत असतात.
मीत्रांनो संपुर्ण सभासदांचा उल्लेख करणे शक्य नाही. सर्वच सभासदांशी मी नियमीतपणे फोन करुन बोलत असतो.
एकच सांगेन संघटने शिवाय पर्याय नाही हे आताच दोन तीन दिवसा पुर्वी औरंगाबाद मॅट मध्ये आपल्या संघटनेने जिंकलेल्या कोर्ट केस चे निकालावरून लक्षात येते.
जय संघटना !!!
आपला: सुधिर वा. गभणे, सरचिटणीस Date: 19/12/2020
50) Training Batch Registration Form For Various Courses Conducted by META, WALMI, RTC etc.
48) 1) Very Important Notice to all Diploma/B.E. Holder in D.M. cadre
47) महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटना ...वय वर्षे ४५ ...संघटनेचे प्रथम अध्यक्ष मा. श्री श्री संभाजी रायपुरे साहेब ते विद्यमान अध्यक्ष श्री जकी अहमद जाफरी साहेब यांच्या ४५ वर्षाच्या कालखंडातील संघटनेचे धुरंधर नेते मंडळी कोरेसाहेब,दारुणकर साहेब टोणपेसाहेब तसेच श्री काझी साहेब, या सर्व अध्यक्ष नेतृत्वाच्या कार्याने आपल्या सारख्या विवीध विभागातील सामान्य दुर्लक्षित अनुरेखक संवर्गाना आजवरच्या नेत्यांनी अनेक आर्थिक लाभांसह आपल्या पदानुरुप एक प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली...आपल्या संवर्गाचे सर्व सदस्य या जुण्या नेतृत्वाला त्यांच्या कार्याला मी मानाचा सलाम करतो ..हे नेतृत्व व त्यांचेसह कार्य करणारी कार्यकारीणीतील दिग्गज व अनुभवी अभ्यासु व संघटनेवर अतोनात प्रेम करणारे सर्व कार्यकारीणीतील पदाधिकारी यांचे आम्ही संघटनेतील सर्व सदस्य व आमचे कुटुंबीय आजन्म ऋणी आहोत व राहणार... कुणी आमचे पद विचारता आज आम्हाला अभिमानाने सांगता येते की होय मी अनुरेखक आहे...व अनुरेखक या नावातच अनुरेणू पासुन आकाशाएव्हढे सामर्थ्य आमच्या पदात असल्याची समोरच्याला जाण होते...व हे सामर्थ्य मिळवून दिले ते आमच्या या ४५ वर्षातील सर्वच पदाधिकार्यांनी....मित्रांनो या सर्व पदाधिकार्यांच्या कार्य उंचीपुढे मी फारच ठेंगणा आहे यांना पाहुनच आपण संघटन कार्य शिकलो...सर्वांचेच नाव येथे उल्लेख करणे शक्य नाही...परंतु आपण आज जे काही कमावले जे काही आजची आपली सामाजिक,राजकीय,आर्थिक ,कौटुंबिक परिस्थिती विकासशील आहे हे शंभर टक्के आपल्या संघटनेमुळे व संघटनेच्या सर्व नेतृत्वाच्या कार्यशैलीमुळे... माझी पत्नी मुले घर या कौंटुबिक व्याख्येपलिकडे माझा हा संघटना परिवार आहे.. हा परिवार आहे म्हणुनच माझा घरचा प्रापंचिक परिवार सफल आहे...संघटनेने आम्हाला खुप भरभरुन दिलंय...त्याची परतफेड होणे शक्य नाही ...आता दिवसमान अतिशय कठीण आहेत,पुर्वीसारखे वैभव संघटनेत दिसत नाही , अतिशय वेगाने सदस्य सेवानिवृत्त होत आहेत,त्यामुळे कार्यरत सदस्यांची संख्याच तोकडी रहात आहे..या दोन वर्षात जुने सदस्य एकही कार्यरत दिसणार नाही,परंतु संघटनेत सेवानिवृत्ती नाहीच म्हणुन आपण सर्व सेवानिवृत्तांसह संघटनेचा गाडा हाकणार आहोतच...नव्या दमाचे सदस्य अतिशय तल्लख ,चपळ,उर्जा असलेले, अभ्यासुही आहेत व उत्साही असुन संघटन कार्याची आवड असलेले आहे,व जुण्या जाणत्यांचा आदर करणारे आहेत या सर्व गुणांमुळे व विद्यमान युवा नेतृत्वामुळे संघटना वयाच्या ४५ वर्षानंतर ही अगदी विशीच्या तरुणाईप्रमाणे यंग दिसणार आहे...या सर्व युवा कार्यकर्ते सदस्यांकडे व त्याच्या सहभाग जल्लोषाकडे व आक्रमक लढवैय्या गुणांमुळे संघटनेचे भविष्य अधिक उज्वल आहे असे वाटुन आम्ही निवांत होतो...मी वैयक्तीक संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांना सर्व जिल्हा पदाधिकार्यांना व संघटनेतील तमाम सदस्यांना आजच्या वर्धापनाच्या दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो...तसेच सर्व गृपवरील सदस्यांना माझ्या गृपवरील लिखाणावरुन कधी काही कटू गोड अनुभव येत असतील व राग-अनुराग येत असेल तो गृपवरील संदेश देवाण घेवाण उत्तरे प्रतिउत्तरे व क्रिया प्रतिक्रियेचा भाग समजुन सर्व सदस्यांनी त्यास सहजतेने घ्यावे..माझा वैयक्तिक कुणाशी आकस असु शकण्याचे कारणच नाही सर्व सदस्य आदर व प्रेमाचे मैत्रीचेच प्रतिक आहे असेच मी समजतो...आपण सर्व एकाच परिवारातील सदस्य आहोत.. सर्वांचे आपल्या परिवारावर अतोनात प्रेम आहे...या परिवाररुपी संघटन संसारास आज पंचेचाळीस वर्ष पुर्ण होत आहे एका सणाप्रमाणे हा दिवस साजरा करण्याचा आपला मनोदय होता परंतु सध्याच्या महामारीच्या वातावरणामुळे सर्व आनंदावर विरझण पडलेय..असो परिस्थिती बदलेल ...आज नाही तर पुढील वर्षी सर्व सुरळीत असेल तेंव्हा होईलच संघटनेचा जल्लोष ...सर्वजण भेटु, एकत्र येउ , ..तोवर सर्वांना खुप खुप शुभेच्छा...अभिनंदन ...संघटनेचा ४५ वा वर्धापन दिन चिरायु होवो..... जय महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटना..... राजेंद्र करपे / प्रमुख सल्लागार💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 12/06/2020
46) श्री ह.ब.काझी साहेब,नाशिक सरचिटणीस, श्री प्रमोद मुळे साहेब, अतिरीक्त सरचिटणीस, यांचे विस्मरण होवून चालणार नाही , ख-या अर्थाने संघटनेच्या विकासाची मुहुर्तमेढ त्यांनी रोवली. एकेकाळी कनिष्ठ लिपीक व अनुरेखक एकाच वेतनश्रेणीत वेतन घेत होते (२६०-...) कनिष्ठ लिपिक पदोन्नती ने वरिष्ठ लिपिक झल्यास रु.३१० ते... च्या वेतनश्रेणी त जात तर अनुरेखकाची सहायक आरेखक पदी पदोन्नती झाल्यास रु २९० ते ... च्या वेतन श्रेणीत वेतन घेत. (३१०-२९० रु २० ने कमी)
वेतनश्रेणी सुधारणे बाबत मागील काळातील पदाधिकारी यांनी प्रयत्न व पाठपुरावा केला त्याची प्रचिती पुढील वेतन आयोगात दिसून आली . कनिष्ठ लिपिक रु ७५०..ते... व अनुरेखक रु ७७५ ते ... तर सहायक आरेखक वरिष्ठ लिपिक पेक्षा जास्त. फक्त रु २५ चा फरक फारच काही देवून गेला. या कालावधीत मलाही मराठवाडा विभागीय सचिव म्हणून संघटनेत काम करण्याची संधी मिळाली (यावेळी पाच विभागीय सचिव होते.)हे मी माझे भाग्य समजतो.
त्या काळातील घटना, पाठपुरावा, त्यातही अविस्मरणीय अनुभव व सहकार्य केलेल्या आदरणीय व्यक्ती यांच्या विषयी बरेच कांही सांगण्यासारखे आहे. तातडीने कार्यवाही व्हावी म्हणून अतिउत्साही पणे केलेल्या कार्यवाहीत मा.मंत्री महोदयांनी यांची नावे लिहून घ्या व सर्वांना सस्पेंड करा हे वाक्य ऐकल्यानंतर उपस्थित आमची संघटना पदाधिकारी याची आठवण झाली की आजही अंगावर शहारे उमटतात. आकस्मीत घडलेल्या घटनेमुळे कार्यवाही झाली नाही हा भाग वेगळा.
विनायक जोशी ,
अतिरीक्त सरचिटणीस.
लातूर
45) महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटना
( जिल्हा ठाणे - पालघर )
महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेची ठाणे - पालघर जिल्हा सभा बुधवार दिनांक ०४/०३/२०२० रोजी PWD कंपाउंड ठाणे येथे संपन्न झाली.
या सभेचे सुत्रसंचालन श्री जयवंत रसाळ साहेब यांनी केले व संघटनेबाबत थोडक्यात माहिती दिली, मान्यवरांचा परिचय करून देण्यात आला व नंतर सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
तसेच सेवा निवृत्त झालेल्या सदस्यांचाही सत्कार करण्यात आला.
सदर सभा केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री जकी जाफरी साहेब ,
श्रीकृष्ण आपटे साहेब, कोषाध्यक्ष
श्री राजेंद्र करपे साहेब, प्रमुख सल्लागार,
श्री बन्सीलाल राठोड साहेब, मंत्रालय संपर्क प्रमुख
यांचे उपस्थितीत पार पडली.
या सभेत श्री राजेंद्र करपे साहेब यांनी मार्गदर्शन म्हणून आश्वाशीत प्रगती योजना दुसरी (10-20-30)या विषयावर सखोल अशी माहिती दिली व यासाठी सतत सात महीने मंत्रालयात पाठपुरावा करण्यासाठी श्री राठोड यांचे सहकार्य लाभले असे सांगितले.
केंद्रीय अध्यक्ष श्री जाफरी साहेब यांनी सन 1996 ते 2006 या कालावधीतील लाभ मिळण्याबाबत प्रकिया चालू आहे, त्याबाबत सविस्तर माहिती दिली, तसेच सरळ सेवेने नियुक्त सहा.आरेखक, आरेखक, प्रमुख आरेखक विभागीय परीक्षा बाबत चर्चा व सविस्तर माहिती दिली.
या सभेत ठाणे पालघर जिल्हा कार्यकारिणी खालील प्रमाणे गठित करण्यात आली आहे.
अध्यक्ष- श्री नितिन किसन चव्हाण
सचिव - अरविंद नाना पाटेकर
उपसचिव - श्री महेंद्र भीमराव रोकडे
उपाध्यक्ष- श्री अंतु दुमडा
- श्रीमती वीणा विनायक शेलार
कोषाध्यक्ष- श्रीमती राजश्री अभिजित गोरे
महिला प्रतिनिधी - श्रीमती विद्या सु.केदारे
- श्रीमती जयश्री रमेश कुंभारे
संपर्क प्रमुख -
कळवा विभाग - श्री मनिष जाधव
श्री चंद्रकांत बाविस्कर
सा बां ठाणे विभाग - श्री गिरीष थोरात
ठाणे कोपरी विभाग - श्री अमेय निमकर
श्री भरत दांडुक
पालघर विभाग - श्री यशवंत उराडे
श्री एन डी केणी
जिल्हा परिषद ठाणे - श्री सुरेश खडसे
श्री संजय भास्करे
जव्हार विभाग - श्री विनायक वाघचौरे
सल्लागार -
श्री अर्जुन मेस्री
श्री जयवंत रसाळ
श्री शरद माटवणकर
श्री जगदिश विचारे
श्री राजेंद्र काचरे
श्री बाबू भोईर
श्रीमती ज्योत्न्सा शेट्ये
श्री पंढरीनाथ घरत
यांची निवड करण्यात आली.
निवड झालेल्या सर्व पदाधिकार्यांचे हार्दिक अभिनंदन.
सदर सभेला ठाणे पालघर मधील - जलसंपदा विभाग, सा. बा. विभाग, जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद विभागाचे सदस्य उपस्थित होते.
सभेच्या नियोजनासाठी
श्री अर्जुन मेस्त्री, श्री बन्सीलाल राठोड, श्री जयवंत रसाळ, श्री अरविंद पाटेकर, श्री गिरीष थोरात, श्री जगदीश विचारे, श्री राजेंद्र काचरे, श्री नितिन चव्हाण
यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
💐💐 🙏🙏
धन्यवाद
आपले,
कार्यकारिणी समिती व सदस्य,
महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा, ठाणे पालघर
44) सामाजिक कार्यात कुठे सहभागी असाल, तर अवश्य वाचा:-
कोणत्याही मंडळाचा/संस्थेचा/संघटनेचा अध्यक्ष/पदाधिकारी/सदस्य कसा असावा?
1) मंडळाची तत्त्वप्रणाली त्याला मान्य असावी. संघटनेचे अंतिम ध्येय, उद्दिष्ट त्याला माहीत असावे.
2) मंडळाबद्दल त्याला आपुलकी असावी.
मंडळाच्या कार्यकर्त्यांबद्दल त्याच्या मनात सद्भावना, प्रेम, आदरभाव असावा.
3) स्वत:च्या मंडळाचा/संघटनेचा पूर्वइतिहास त्याला माहीत असावा. कारण जो इतिहास विसरतो, तो इतिहास घडवू शकत नाही असे म्हटले जाते.
4)कार्यकर्ता हलक्या कानाचा नसावा. संघटनेचा नेता आणि उद्दिष्ट यांवर त्याचा ठाम विश्वास असायला हवा.
5) कार्यकर्त्याच्या ठायी अहंभाव नसावा. दुसऱ्या कार्यकर्त्याचा व त्याच्या कामाचा सन्मान, आदर करणारा असावा.
6) तो पदलोभी नसावा-
पदासाठी लाचार असलेले कार्यकर्ते शत्रुंपेक्षाही घातक असतात. ते स्वतःही संघटन वाढवीत नाहीत आणि इतरांनाही वाढवू देत नाहीत. संघटन फक्त लेटरपॅडवर व फोटोपुरते शिल्लक राहते.
7) आकलनशक्ती-
नेत्याच्या ‘सूचक’ शब्दांचा अर्थ समजला पाहिजे. Read between the lines दर्जाची आकलन क्षमता असावी.
8) सूक्ष्म निरीक्षण-
कार्यकर्त्याकडे सूक्ष्म निरीक्षण शक्ति असावी. सर्वच समाजात घडणाऱ्या लहानमोठ्या घटनांची त्याने नोंद घ्यायला हवी.
9) भाषण व संभाषण चातुर्य- आपल्या मधुर वाणीने मुद्दा पटवून देण्याचे चातुर्य कार्यकर्त्याने अवगत करावे.
10) आत्मविश्वास-
निराश मनोवृत्ती नको. अपयशाचे यशात रूपांतर करतो, तोच खरा लढवय्या, नाहीतर ‘रडवय्या’.
कार्यकर्त्याच्या डिक्शनरीत ‘निराशा’ हा शब्दच नसतो. दुर्बल परिस्थितीशी जुळवून घेतात. परिस्थिती हवी तशी बनवण्यासाठी पराक्रमी कार्यकर्ते लढा देतात.
11) परिश्रम, चिकाटी आणि सातत्य-
ध्येय गाठण्यासाठी इतरांपेक्षा जास्त परिश्रम करण्याची तयारी हवी. प्रयत्नांत सातत्य हवे. धरसोड वृत्ती नको.
12)
कार्यकर्ते जोडणारा असावा. तोडणारा नको. प्रभावी संघटन हिच संघटनेची शक्ति असते.
13) कार्यकर्ते हेरणारा व व्यक्तीपरीक्षक-
कर्तृत्वशाली, सदाचारी आणि प्रभावी व्यक्तींना हेरून त्यांना संघटनेत सामील करण्याचे कौशल्य नेत्याकडे हवे.
चांगले काम करणारा कार्यकर्ता पुढे जात असेल, तर त्यावर खोटे आरोप करुन त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न कदापी करु नका…
14) शिस्त व वेळ पाळणारा पाहिजे.
15) त्याला उपलब्ध साधनांचा काटकसरीने व कौशल्याने वापर करता यावा.
16) श्रेय लाटण्याच्या मनोवृत्तीचा नसावा. धोकेबाज नसावा.
17) कार्यक्रमाचे आयोजन करता यावे. संघटनेचे विविध उपक्रम राबविण्याची जबाबदारी स्वीकारावी. पुढाकार घ्यावा. किमान संघटनेच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्याचा सक्रीय सहभाग असावा.
18) समताप्रेमी व समर्पित मनोवृत्तीचा असावा. श्रमाची लाज त्याला वाटू नये.
19) अभ्यासू, चिकित्सक व संशोधक वृत्तीचा असावा.
20) गुप्तता- संघटनेतील काही गुप्त गोष्टी गुप्तच ठेवणारा असावा.
21) कार्यकर्त्याला संघटनेचा व स्वतःचा विचार दुसऱ्यांस पटवून देता यायला हवा.
22) प्रसिद्धी व प्रतिष्ठा यांस हपापलेला नसावा.
23) अंधश्रद्धाळू नसावा.
24) संघटनेसाठी वेळ, बुद्धी, धन, श्रम, कौशल्य हे ‘पंचदान’ देणारा असावा.
25) संघटना समाजातील सर्वांच्या भल्यासाठी आहे. स्वत:च्या भल्यासाठी नाही…
26) योग्य वेळेस कार्यकर्त्याने केलेल्या कामाचे कौतुक करणारा नेता असावा.
27) कार्यकर्त्यावर कामाची जबाबदारी देऊन त्यांच्यावर परिपूर्ण विश्वास ठेवणारा नेता असावा.
ज्या मंडळाकडे/संघटनेकडे वरील गुणधर्म असलेले कार्यकर्ते असतात; त्या संघटनेला जगात तोड नसते.
आपल्यालाही आपलं मंडळ/संघटन/संस्था मजबूत बनवायचं असेल, तर कार्यकर्ता / नेता म्हणून वरील सर्व गुणधर्म अवगत करून ते अंगी बाणवणं अत्यावश्यक आहे.
धन्यवाद!
Post by : श्री. नजीर उमर शेख, मार्गदर्शक
43) दिनांक ४/३/२०२० रोजी ठाणे, पालघर व कोकण भवन येथे जिल्हा कार्यकारीणीची तसेच केंद्रीय अध्यक्ष यांच्या संपर्क दौऱ्यासह बैठक आयोजित करण्यात आलेली आहे त्या साठी अध्यक्ष श्री जकी अहमद जाफरी सर व सोबत मी राजेंद्र करपे प्रमुख सल्लागार आम्ही सदर बैठकीसाठी औरंगाबादहुन निघालेलो आहे... बैठकीचे स्थळ वेळ व कार्यक्रमाची रुपरेषा खालील प्रमाणे आहे... महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटना
( ठाणे - मुंबई - कोकण भवन - पालघर )
---------- महत्त्वाची सभा --------
दिनांक ४ मार्च रोजी केंद्रीय कार्यकारिणी पदाधिकारी श्री जकी अहमद जाफरी साहेब- अध्यक्ष, श्री श्रीकृष्ण आपटे - कोषाध्यक्ष, श्री राजेंद्र करपे - प्रमुख सल्लागार, श्री बंशीलाल राठोड - मंत्रालय संपर्क प्रमुख यांची ठाणे व कोकण भवन, नवी मुंबई येथे नियोजित सभा आयोजित केलेल्या आहेत.
* ठाणे व पालघर यांची संयुक्त सभा
बुधवार दिनांक ४ मार्चला ठाणे येथे -
सकाळी , ११.३० वा. pwd hall, circle bldg., 2nd floor, pwd compound, Thane.
* मुंबई व नवी मुंबई यांची संयुक्त सभा कोकण भवन येथे -
दुपारी ३.३० वा. कोकण भवन, नवी मुंबई.
पालघर मधील सदस्यांनी कृपया ठाणे येथील सभेला उपस्थित रहावे,
व मुंबईतील सदस्यांनी कृपया कोकण भवन येथील सभेला उपस्थित रहावे.
हि विनंती.
सदर सभेस आपली उपस्थिती आवश्यक आहे. तरी आपण व निवृत्त सभासदांनी आवर्जून उपस्थित रहावे. हि विनंती.
* ठाणे सभेच्या कार्यक्रमांची रुपरेषा व सभेपुढील विषयसुची सोबत सादर केलेली आहे.
( वि.सु. सभेनंतर स्नेहभोजनाचे आयोजन केलेले आहे.)
🙏 धन्यवाद 🙏
आपले,
कर्मचारी वृंद व पदाधिकारी
जलसंपदा विभाग, ठाणे
सा. बां. विभाग, ठाणे
42) अध्यक्ष महोदय व समस्त सन्मानिय पदाधिकाऱ्यां समवेत संघटनेच्या लोगो चे अनावरण झाले...श्रीमान मुळे सर आपण छान उपक्रम राबविला..आपले व अहमदनगर जिल्हा शाखेचे अभिनंदन..💐💐तसेच आजची बैठक अतिशय आनंदी वातावरणात संपन्न झालेली आहे असे बैठकीच्या छायाचित्रा वरून दिसुन येते... धन्यवाद...
41) केंद्रीय कार्यकारीणीचा आज दिनांक 03-02-2020 पासुन पश्चिम महाराष्ट्र जिल्हा संपर्क कार्यक्रम सुरू झाला असुन कार्यक्रमाची सुरवात औबाद येथुन झाली आहे...सदरील संपर्क कार्यक्रमात अहमद नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापुर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यास भेट देणार आहेत... अध्यक्ष महोदय श्री.जकी अहमद जाफरी सर, सचिव श्री.गभने सर, प्रमुख सल्लागार श्री. करपे सर, महिला प्रतिनिधि सौ.वंदना ताई , ही सन्मानिय पदाधिकारी गण औबाद हुन पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यासाठी निघतांना औबाद-जालना जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष श्री.अहमद भाई व मी यांनी मिळुन, अध्यक्ष व समस्त पदाधिकाऱ्यांचे पुष्प गुच्छ देउन आपला प्रवास सुखकर, समाधानी व सुरक्षीत जावो अश्या शुभेच्छा दिल्या...
वाय.ओ.पठाण,औबाद..
40) महाराष्ट्र राज्य रेखाचित्र कर्मचारी शाखा संघटनेच्या सर्व कर्मचारी बांधवांसाठी संघटनेचे 2020चे दिनदर्शिका बुलडाणा जिल्ह्याच्या वतीने छपाईसाठी टाकलेले असुन सदर दिनदर्शिकाचे निमीत्ताने संघटना संपुर्ण महाराष्ट्रात नजरे समोर राहणार
त्यासाठी हा एक प्रयत्न
दिनदर्शिका 6 पाणी असुन
किंमत रू 30/-. असुन
पेमेंट 9049470181 या नंबर वर पाठवा वैयक्तिक याच नंबर वर संपर्क करा
जिल्हाध्यक्ष
रविंद्र नागरे बुलडाणा
39) मी...संघटना... बोलतेय...
आदरणीय व सन्मानिय सभासदांनाे ज्या प्रमाणे थेंबाने थेंबाने विशाल सागर तयार होते त्याच प्रमाणे मला (संघटना) एक एक सदस्य जमा करून तयार केले जाते...व एक छानश्या नावाने नामकरण करून शासन दरबारी मंजुरीसाठी अतिशय अदबीने सादर केले जाते... व मंजुरी मिळताच माझा हर्ष उल्हासाने जल्लोष साजरा केला जातो...येथूनच प्रत्यक्ष माझ्या जीवनाचा / हक्क, कर्तव्य व अधिकाराचा प्रवास सुरू होतो...हळु हळु माझा प्रचार व प्रसार करायला सुरवात होते कानाकोपऱ्यातून सभासदांची जुळवाजुळव करण्याचे कार्य सुरू राहते...माझे कार्य, महत्व व लाभाचे गुणगान केले जाते...प्रत्येकाला माझ्याशी जुळण्याची विनंती व आवाहन केले जाते...पदाधिकाऱ्यांची त्यांच्या बुध्दी कौशल्य व कार्या प्रमाणे पदांची वाटणी सर्वानुमते केली जाते...व येथूनच माझे कार्य सुरू होते...सभासदांच्या अडचणी घेऊन पदाधिकारी संबंधित कार्यालयात जाऊन तेथल्या संबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा करून समोर आलेल्या अडचणी सोडविण्याची प्रयत्न करतात...स्थानिक कार्यालया पासुन ते थेट मंत्रालया पर्यंत माझे कार्यक्षेत्र आहे... मी आपल्यां पाठीशी माईल स्टोन सारखी सदैव सचेत खंबीरपणे उभी आहे...अनेक सभासदांच्या अडचणी, रास्त प्रश्न माझे कर्तव्य, जबाबदारी असल्याने पुर्ण प्रामाणिक व पारदर्शकतेणे सोडविल्या मुळे माझी सर्व बाजुने प्रशंसा व वाहवा केली जात असुन माझे पाठबळ संख्या, कर्तव्य व जबाबदारीत दिवसेंदिवस वृध्दी होत आहे...आरेखक संवर्गास माझे महत्व व कार्य पटल्याने स्वतः हुन माझे आजीवन सभासद होत आहेत... मध्यंतरीचा कालावधीत माझी चुक नसतांनाही आलेल्या मरगळी मुळे मला अनेक त्रास टोमने सहन करावे लागले...मात्र आता मला नवीन कार्यकारिणी व नवीन प्रशासना मुळे नवजिवन मिळाले व नव ऊर्जे सहित मी पुन्हा एक संपुर्ण ताक्तीशी उभी राहिले...नवीन कार्यकारिणीने माझे वेगवेगळे कार्यक्रम रूपरेषा, वेगवेगळ्या जिल्ह्यात बैठका,वर्धापनदिन, आमसभा असे कार्यक्रम करून मला पुन्हा प्रकाशात आणले...माझे संपर्क व कार्य वाढल्या मुळे सभासदांना व संबंधीत कार्यालयांना माझ्याशी क्षणात संपर्क साधने साठी मला डिजिटल करण्यात आले, माझ्या नावाचे ईमल पत्ता तयार करण्यात आला तसेच सभासदांना सदस्य नोंदणी, संघटनेची माहीती, जुन्या आठवणी, महत्वाचे शासन निर्णय मिळणे साठी माझ्या नावाचे संकेतस्थळ तयार करण्यात आले माझे बँक खाते उघडण्यात आले व नुकतेच माझा पँन कार्ड काढण्यात आला असे अनेक प्रकारचे माझ्यात अनमोल परिवर्तन करण्यात येऊन माझे नववधु सारखे शृंगार करण्यात आले.सकारात्मक विचाराचे सभासद माझा खुप मान सम्मान व आदर करतात मात्र नकारात्मक विचारांचे सभासद माझ्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे निमित्त साधुन टीका टिप्पणी करत असतात त्यांचा मला फार राग येतो पण शेवटी ते माझेच असल्याने मी शांत रहाते...अन्ततः ते माझ्याच शरणी येतात...माझी गरज, कार्य,महत्व व सभासदांचे हित हें आदरणीय सर्वश्री. रायपुरे सर व मग्गीरवार सरांना अनेक वर्षांपुर्वी कळल्याने त्यांनी माझी स्थापना 12 जुन 1975 ला केली. धन्यवाद सरजी आज माझ्या बरोबर नारी शक्ति मोठ्या प्रमाणात जुळल्याने माझी शक्ति डबल झाली आहे व ही बाब माझ्या साठी अभिमानास्पद आहे..माझ्या प्रिय सभासदांनेा माझ्या ऊर्जा, शक्तीचे स्रोत खालील प्रमाणे आहे..
1) सभासदांचा माझ्यावर असलेला दृढ विश्वास..
2) कामात पारदर्शकता व प्रामाणिक पणा..व त्याग,बलिदान
3) आर्थिक सहाय्य म्हणजेच प्रत्येक सभासदाने न चुकता आपापली वार्षिक वर्गणी वेळेत जबाबदार पदाधिकाऱ्यां कडे जमा करणे..
4) प्रसंगांनुरुप लढानिधी देणे...
हें स्रोत मला मिळाले कि, मी विद्युतगती ने कार्य करून यश प्राप्त करण्याचा प्रयत्न करते...
अन्ततः मी तुमची व तुम्ही माझेच आहेत...एकमेकांना सहाय्य करूया..संघटनेची प्रगती, विकास व सभासदांची उन्नती करूया...
वाय.ओ.पठाण,औबाद.
38) [10:37 AM, 03/12/2019] Adinath Rawal:
धुळे येथे दि.२८ जुलै रोजीची रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटना केंद्रीय कमेटीची वार्षीक आमसभा...धुळे जिल्हा शाखेने या सभेचे आयोजन करुन न भूतो न भविष्यती याप्रमाणे ही सभा यशस्वीरीत्या पार पाडली... मला माझ्या शालेय जीवनातील पुस्तकात असलेल्या तैमुरलींग या पाठाची त्या ठिकाणी प्रकर्षाने आठवण झाली... एका धावण्याच्या शर्यतीत एक, एकच पाय असलेला तैमुरलींग नामक स्पर्धक सहभाग घेतो आणि शैर्यत अगदी पहिल्या क्रमांकाने जिंकतो... असाच हा प्रसंग धुळे जिल्हा सचिव श्रीमान जिभाऊ बच्छाव यांचे बाबतीत तेथे मी अनुभवला... या मर्दाने आव्हान तर स्विकारलेच परंतु अपंगत्वावर मात करुन त्यांनी व त्यांच्या सोबत्यांनी ते एक नंबरने पूर्णही करुन दाखविले...
खरं तर या आमसभेच्या कार्यक्रम पत्रिकेत असलेल्या विषयातील एक विषय म्हणजे सन १९९४ पासून पुढे प्रथम कालबद्ध पदोन्नती लागू झालेल्यांना सन १९९६ ते २००६ कालावधीतील दिलेली कालबद्ध पदोन्नतीची ४५००-१२५-७००० ही वेतनश्रेणी व नंतर बदल होऊन सुधारित झालेल्या ५०००-१५०-८००० आणि ५०००-१५०-८००० ची ५५००-१७५-९००० या बदललेल्या वेतनश्रेणीतील न दिलेल्या फरकाची रक्कम मिळवण्यासाठी तसेच सेवानिवृत्त होताना कोषागारातून होणाऱ्या सेवापुस्तक पडताळणीत घेण्यात येणाऱ्या आक्षेपांचे संदर्भात आमसभेतील चर्चेत सहभागी होण्यासाठी काही सन्माननीय सभासदांनी व पदाधिकाऱ्यांनी मला वैयक्तिक आमंत्रित केल्यावरुन मी या आमसभेस गेलो होतो...
सभेत चर्चीले गेलेले सर्वच विषय हे सभासदांचे हिताचेच होते... ते अत्यंत अभ्यासपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणांत सर्वांच्या सहभागातून चर्चीले गेले... आमसभा म्हटल की प्रश्नांची सरबत्ती... घोषणाबाजी... एकमेकांची अडवणूक व कालापव्यय... अनाठायी विरोध, अवास्तव अपेक्षा आणि असेच काही तरी...
पण ही आमसभा म्हणजे एक आदर्शवत उदाहरणच... प्रत्येकाच्या बोलण्यात ठासून भरलेला आत्मविश्वास होता... प्रत्येकाकडे काहीतरी व्हिजन (कार्यक्रम) होते... विषयांची यथायोग्य मांडणी आणि त्यांचे निराकरण अत्यंत समाधानकारक व अभ्यासपूर्वक पद्धतीने केले जात होते... मागील भूतकाळातील आणि चालू वर्तमानकाळातील प्रश्न हाताळतानाच भविष्यातील घडामोडींचा वेधही घेतला गेला...
संघटन व संघटना म्हणजे काय याचे यथार्थ दर्शन या आमसभेत घडले... आपण प्रथम शासकीय सेवक आहोत... शासकीय नोकरी हा आपला धर्म आणि त्यातील संवर्ग ही आपली जात... त्यामुळे आपणांस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष राजकारणांत किंवा राजकीय पक्षात सहभाग अथवा राजकीय व्यक्तीशी शासकीय नोकर म्हणून संबंध ठेवता येत नाही हा शासनाचा नियम आहे याची जाणीव... आणि म्हणूनच आपली संघटना ही स्वयंस्फूर्तीने आपले संवर्गाचे प्रश्नांची व अडचणींची सोडवणूक करण्यासाठी उदयास आलेली आहे... त्यामुळे ही संघटना कुठल्याही राजकीय व्यक्तीच्या वा पक्षाचे निर्मित किंवा अंकित नाही... म्हणूनच आपणांस यापलीकडे जाऊन सर्व सभासदांनी समान हक्काने व समान न्यायाने प्रत्येक प्रश्नांकडे व अडचणीकडे पाहिले तरच आपल्या प्रश्नांची सोडवणूक होईल...
सन १९७०-८० च्या दशकात वेगवेगळ्या प्रकारचे सांघिक किंवा संघटनात्मक लढे मी पाहिले आणि ऐकले आहेत... १९७८ मधील ५४ दिवसांचे शासकीय कर्मचाऱ्यांचा संप आणि त्याचप्रमाणे त्यावेळी नव्याने उदयास आलेली एक वालचंदनगर ही औद्योगिक नगरी... वालचंदनगर व मुंबई येथे काम मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने खेड्यातून जाणारा कामगार वर्ग... त्यामुळे साहजिकच न्याय्य हक्कांसाठी वालचंदनगरमधील कामगारांची आणि मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना व त्यांचे लढे... परंतू संघटनेच्या राजकीय संबंधामुळे हे कामगार अक्षरशः देशोधडीला लागले... त्यांची कुटूंबे उद्धवस्त झाली... सर्वपरिचित वालचंदनगर तर सर्वांच्याच स्मरणातूनच गेले...
आज धुळ्यातील आमसभा आणि तेथील यशस्वीतेबद्दल बोलायचे झाले तर "दुष्काळाने वठलेल्या वृक्षाला नव्याने पालवी फुटावी आणि ते पल्लवीत व्हावे, बहरावे" असेच वाटले... सर्वांना समानतेची वागणूक, सर्वांचा यथोचित मान सन्मान, पदाधिकाऱ्यांचा एकमेकांतील ताळमेळ, जुन्या नव्या सभासदांच्या शंकाचे अत्यंत विनम्रपणे व अभ्यासपूर्वक सर्व पदाधिकाऱ्यांकडून शंकासमाधान हे सर्व खरोखरीच कौतुकास्पदच होते... संघटनेस योगदान देणारांचे आणि निवृत्तांचे सत्कार... दिवंगतांचे कुटूंबीयांना सन १९९६-२००६ मधील फरकाचा रोखीतील लाभ मिळवून देताना कोणतीही वर्गणी न घेण्याचा किंवा नाममात्र घेण्याचा एक सामाजिक बांधिलकीतूनचा निर्णय... जिल्हावार अडचणी सोडवण्यासाठी सभेचे आयोजन करा आम्ही स्वत:ची सोय करुन व स्वत:चे डबे घेऊन येऊ असे केंद्रीय अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी केलेले आवाहन... सर्वांनी संघटनेत सहभागी व्हावे व परिवर्तन घडत रहावे यासाठी मोठ्या मनाने "उद्या तुम्हीही आमचे ठिकाणी असाल" हे संघटना अध्यक्षांचे अध्यक्षीय भाषण... खरोखरच खुप काही सांगून गेले...
मित्रहो... तसा मी सेवेत बराच वैयक्तीक संघर्ष केलेला एक सर्वसामान्य सभासद कर्मचारी... या सभेत सन्माननीयांकडून वारंवार झालेला माझ्या नावाचा नामोल्लेख... खरोखरच हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि औदार्याचा भाग... माझ्या शासकीय सेवेतील कामातील अनुभव आणि त्यामुळे झालेला माझा अभ्यास याची त्यांनी घेतलेली दखल... केलेल्या छोट्यामोठ्या सांघिक कार्याचे कौतूक... आणि हे सर्व करत असताना सर्वांना माहित व्हावे म्हणून "रावळ सर तुम्ही थोडे उभे रहाता का" हा अत्यंत विनम्रपणे व अपूलकीने केलेला आग्रह... त्यामुळे महाराष्ट्रभरातून आलेल्या सभासदांना माझी झालेली ओळख... सर्वांना माहीत झालेनंतर विशेषतः नव्यांनी माझेशी हास्तांदोलन करुन यापूर्वीच्या माझ्या काही कामाच्या संदर्भातील मार्गदर्शक लिखाणातील विचारांची घेतलेली दखल आणि त्याबद्दलच्या व्यक्त केलेल्या भावना... "सर भविष्यात तुमचे अनुभव आम्हाला शेअर करा" म्हणून हक्काने केलेली विनंती... अगदी अवर्णनीय असेच होते...
प्रत्येक तळमळीच्या सभासदाला संघटनेत आपण काहीतरी पद भुषवून कार्य करावे ही उर्मी असते... आपले अनुभव व अवगत ज्ञान सर्वांचे हितासाठी व कल्याणासाठी द्यावे... यासारख्या सुप्त ईच्छा असतात... काही वेळेस त्या त्या वेळेच्या प्राप्त परस्थितीने पूर्ण होत नाहीत... मी माझ्या एकूण शासकीय सेवेतील ३९ वर्षे ८ महिने आणि ११ दिवस इतक्या प्रदिर्घ सेवेनंतर फेब्रुवारी २०२० मध्ये मी सेवानिवृत्त होणार आहे... त्यामुळे भविष्यात या प्रवाहापासून मला थोड दुर जावे लागेल... या आमसभेने जाता जाता मला खरचं एक अतिशय सुंदर व स्मरणात राहील असा विचार आणि अनुभव दिला हेही तितकेच खरे आहे... शेवटी भविष्यात अभ्यासू आणि तळमळीच्या पदाधिकाऱ्यांची संघटनेत निवड व्हावी व संघटनेची याच प्रकारे यशस्वीपणे वाटचाल होऊन संघटना वृद्धिंगत व्हावी याच मनोमन सदिच्छा... जय संघटना
●●आदिनाथ रावळ, कोथरुड, पुणे.
37) २२ एप्रिल २०१८ संघटनेच्या ४४ वर्षाच्या आयुष्यातील सुवर्णपहाट घेउन उगवलेला दिवस..त्या सुवर्ण किरणांनी अक्षरशः न्हाउन निघाली आपली संघटना... आपल्या संघटनेचा आजवरचा इतिहास व प्रतिष्ठा तशी पहिल्यापासुन किर्तीमानच होती..अनेक दिग्गजांनी आम्हा सदस्यांच्या दिलावर राज्य केले ह्रदयात आदराचे स्थान मिळवले आमचे प्रश्न अडचणी सोडविल्या अनेक लाभ प्राप्त करुन दिले त्या सर्व दिग्गज मान्यवरांचे आम्ही ऋणी आहोतच व सदैव राहणार... याच परंपरेला मधल्या काही काळात ग्रहण लागले..त्या कार्यरत पदाधिकार्यांच्या चांगल्या व वाईट कार्याचेही पडसाद नकारात्मक वार्यासम झोंबू लागले संघटना दिशाहिन झाली..संघटनेत नव्या दमाचा व जुन्या दमदारांचा समन्वय बिघडला...नेतृत्व कुठे आहे हे नवोगतांना कळेना व नेतृत्व असे का करते हे संघटन मित्रांना कळेना...बदल..बदल..आणि बदल हाच एकमेव उपाय या प्राप्त परिस्थितीवर येउन ठेपला....तथाकथितांनी काही हिताचे कार्ये केली होती अतिशय कुशल नेतृत्व अभ्यासु कर्तृत्ववान पदाधिकारी असुनही मर्यादित कालसिमेच्या लक्ष्मणरेषा ओलांडून संघटनेला सहजतेने घेताना त्यांची गच्छंती अनिवार्य ठरली..पण हे शिवधनुष्य उचलावे कोणी हा बदल घडविण्याचे साहस करावे तरी कोणी ? महाराष्ट्रातील सर्व जिल्हा शाखा निद्रावस्थेत गेल्या असताना मराठवाड्यातुन संघटनेचा घोर करीत असलेले काही निद्रावस्थेत घोरणारे हळु हळू संघटन नेतृत्वाच्या शिवधनुष्य पेलवण्याचे स्वप्न पाहु लागले.. ...सोशल मिडीया माध्यमाचे हाती शस्त्र होतेच..व हातातील लेखणी व चाणक्यनितीचा वापर व पलिकडील कच्चेदुवे हेरुन रणनितीचे आराखडे आखले गेले...एव्हाना सर्वदुर निद्रालोप होत राहीला ...सुरात सुर मिसळले..कडीला कडी जोडत संघटन मित्रांची साखळी तयार होत गेली ..सर्व जुने नवे नेते प्रणेते शिलेदार साथी सोबती लिहीते झाले..आपल्या मनातले विचार मांडु लागले ..सोशल मिडीया व्हाट्सॲप्स फेसबुक जणु काही विचारांचे व्यासपीठ बनले...विचारांच्या आदान प्रदानाचे पेव फुटले...अनेकाअनेकांचे संवाद सुरु झाले..केंद्रिय पदाधिकार्यावर दबाव वाढत चालला...बैठकांवर बैठका आयोजित होत गेल्या...कुणाची मनधरणी तर कुणाचे समर्थन तर कुणाची हेटाळणी कुणाला विरोध कुणाचा हट्ट तर कुणाचा आग्रह असे घडत चालले..अनेक लहानमोठे मान्यवर उपदेशकर्ते झाले तर काही मागील कळा सोसलेला इतिहास उगळु लागले.. या धामधूमित मराठवाड्यातुन प्रमुख नेतृत्व मागणीचा हट्ट जोर धरु लागला..या नेतृत्वास जनसदस्यांतुन एकदिल पसंती मिळत राहीली.. तरीही पलिकडील एका बाजुने नवीन कार्यकारीणीच्या नेतृत्वास गृहीत धरुन जुण्याच बाटलीचे फक्त आवेष्ठण बदलण्याचे धोरण आखले...जनसदस्यांनी प्रचंड जोर धरला उत्कंठा शिगेला पोहचली..प्रतिष्ठेची चुरस लागली ...या धुमाकुळीत आमसभेतच नव नेतृत्व उदयास येणार हे निश्चित झाले..स्थळ काळ वेळ आयोजक सर्व काही ठरले... आणितो सुदिन उगवला..दिनांक २४ एप्रिल २०१८ प्रभारी अध्यक्षांनी आमसभेचे सगळे सोपस्कार पार पाडले..अनेकांनी आपले संघटन प्रेम व्यक्त केले..अख्या महाराष्ट्रातील सदस्यगण या कुंभमेळ्यात सामिल झाले...आमसभा आयोजनाची धुरा समर्थपणे करवीरनगरीतील वीरांनी निभावली..आजवरच्या मंथनातुन चौदा रत्ने केंद्रीय कार्यकारीणीच्या रुपाने हाती लागले...महत्वाचे अमृत रत्न आम्हा मराठवाड्याच्या पदरात पडले ते अमृत पळविण्याच्या प्रयत्नात अमृत हिसकावणारेच रणछोड झाले...अखेर सत्य व प्रयत्नांचा चिकाटीचा व सच्या संघटन प्रेमाचा विजय झाला...संघटनेला संजीवणी मिळाली नवा भिडू नवे राज्य सुरु झाले.....वर्ष कधी संपले कळलेच नाही संघटनेच्या कार्याचा वर्षभराचा आलेख चढताच राहीला...वर्षभराचे सिंहावलोकन करतांना मा.अध्यक्ष व कार्यकारीणीने अनेक महत्वाचे कार्य सिद्धीला नेले..व अजुनही सकारात्मक दृष्टीने यशस्वी कार्ये करत आहे..आम्हाला सार्थ निवडीचा सार्थ अभिमान आहे...परंतु अजुनही एक शल्य कायम बोचत आहे आमच्या मनी...हि आमसभा हि निवड प्रक्रिया हे काही धर्मयुद्ध नव्हे...किंवा बांधावरील भाउबंदकीचे भांडणे नव्हे..राजकीय पक्षांतर्गत स्पर्धा नव्हे...संघटनेत आपण सर्व समसमान आहोत..सर्व सदस्य आपण एकाच कुटुंबातील सदस्य आहोत..मग अद्यापही मागील सन्माननीय पदाधिकारी इतके रुष्ठ का ? त्यांनी संघटनेच्या मुळ प्रवाहात सामिल व्हायला पाहीजे होते..पण का कोण जाणे अनेकदा विनवण्या करुनही प्रतिसाद नाही..त्यांची साथ आम्हाला हवीय त्यांच्या अनुभवाचा लाभ नवोगतांनाही आवश्यक आहे..पण का कोण जाणे यांचा हट्टधर्म जाईल केंव्हा...असो..मित्रांनो संघटनेला अच्छे दिन आले ..वर्षभरात चांगले निर्णय चांगले कार्ये करण्याचा प्रयत्न केला..अध्यक्ष व पदाधिकारी कुठे चुकतही असतील तर आम्हा दोन्ही सल्लागारांच्या कानी घाला...सुधारणेचे प्रयत्न अविरत चालु राहतील...संघटना आपली आहे आपण संघटनेचे आहोत....//सामर्थ्य आहे चळवळीचे/...जो जो करील तयांचे//... संघटित रहा.. संघर्ष करा..येणारा काळ आपलाच आहे ..विजय आपलाच आहे... दिनांक ३१ मे २०१९ मध्यान्ननंतर मी सेवानिवृत्त होत आहे..माझा स्वतःचाही विश्वास बसत नाही..सेवानिवृत्त हा शब्द मला रोज वाकुल्या दाखवतोय पण मी त्याला बजावतोय की अरे मी जरी शासकीय सेवेतुन सेवा निवृत्त होत असेल मात्र माझ्या संघटनेतुन कदापीही सेवानिवृत्त होणार नाही..अजुन खुप काही करायचंय...........तुर्तास लेखनसिमा....जय रेखाचित्र संघटना...२२/४ चिरायु भव् राजेंद्र करपे प्रमुख सल्लागार
36) सेवानिवृत्तीच्या समयी मनात काय कोलाहल माजते हे दोन महिण्यापूर्वीच मी अनुभवले..प्रदिर्घ सेवाकाळाच्या पुर्णविरामानंतर आपण थबकतो..आता आयुष्याच्या पानावर पुढे काय लिहावे? याचा प्रश्न पडतो मस्तिष्कात विचारांची गर्दी दाटू लागते..अनेक विकल्प योजलेले असतात पण मृगजळाप्रमाणे ते निश्चित ठाम नसतात..सेवानिवृत्ती समयी सेवेत रुजूकाळाचा आवेश असतो चेहऱ्यावर चकाकी असते दुसऱ्या इनिंगमध्ये जोरदार फटकेबाजी करण्याचा आवेश असतो पण हळु हळु हा टच्च फुगलेल्या फुग्यावर शिथीलतेच्या सुरकूत्या दिसु लागतात..मित्रांनो हे नैसर्गिकच आहे...माणसाचं वय जरी वाढत असलं तरी मन तरुण असावं .. यामुळे कार्ये करण्याची इच्छा शक्ती वाढते..आपल्या समोर येणाऱ्या व्यक्तीच्या वयोपातळीनुरुप समवस्क होउन त्या नुसार वागल्यास मजा येते..बालकांसह बालक युवासह युवा व जेष्ठांसह जेष्ठ स्वभावाने वागल्यास आपला कोणी कंटाळा नाही करणार...सेवानिवृत्ती म्हटलं तर आयुष्याचा उतरंडीचा प्रवास असतो काहीसा सुकर काहीसा खडतर..काहीही म्हणा पण जवानी संपलीच हे मान्यच करावे लागते ..आता देवधर्म,नातवंड,लग्नकार्यास उपस्थिती,पर्यटन,व सामाजिक सेवा अथवा प्रवचन कीर्तन श्रवण असे याकडे वळावे लागते...आणि हे चांगलेच पर्याय आहेत.. यात वाचन व माणसं जोडणे या गोष्टी कडे जास्त लक्ष्य दिले तर सेवानिवृत्तीनंतरच्या भासणार्या एकांताला सहजिवनाचा आनंद मिळतो...मित्र जोडणे मैत्री टिकवणे ,वाढविणे व मैत्रीत रमणे हा सर्वात छान विरंगुळा आहे आणि याची संधी कोणत्यातरी संघटनाशी जुळवुन घेतल्यानेच मिळते..व आपली रेखाचित्र संघटचे द्वार,दालन व मंच आपल्यासाठी आपुलकीने उभी आहे...स्वाभिमानाने,प्रेमाने व आपुलकीने संघटनेसोबत आपण राहीलो तर निश्चितच सेवानिवृत्तीनंतरचा आपला रिक्त वेळ सत्कारणी तर लागेलच परंतु आपणास अवर्णनीय आनंदच मिळेल..कारण या संघटनेच्या बागेत आहे आनंद ..आणि आनंदच... सर्व सेवानिवृत्त बांधवांना माझ्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा ! 🌹 राजेंद्र करपे
35) संघटनेचा अभुतपुर्व सोहळा संप्पन्न झाला काल पासुन अनेक प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे...संघटनेच्या उपस्थित व अनुपस्थित सर्व सदस्यांना कार्यक्रमाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दर्शन झालेले आहेच ..मलाही राहवत नाही दोन शब्द लिहण्याशिवाय माझे मन मला स्वस्थ बसु देईना जरी कंटाळवाणे वाटले तरी लिहण्याचे धाडस करावे वाटले..मित्रांनो धुळे शहर संघटनेच्या इतिहासात आपली कायमची छाप पाडुन गेले..एरव्ही दुर्लक्षीत असणारे हे साधं शहर याचे वैशिष्ट्य आगळे आहे या शहराची रचना भारतरत्न सर विश्वैश्वरय्या यांनी कधी काळी केलेली आहे या थोर अभियंत्याच्या परंपरेतील अभियंता क्षेत्रातील निगडीत रेखाचित्र शाखेच्या संवर्गाने संघटनेचा कुंभमेळा यशस्वीरित्या भरवुन अभियंता क्षेत्राला उजाळा दिलाय...जेथे इच्छाशक्तीचे साहस आहे तेथे यश निश्चितच असते...असे सोहळे पाहण्यास भाग्यच लाभते असे मी आधीच म्हंटले ते काही चुकीचे नाही ..इच्छा तेथे मार्ग हे धुळेकरांनी सत्यात उतरवले..येथे पाहीजे जातीचे हे येरागबाळ्यांचे काम नोहे...एका साध्या फोनवर एका सैनिकाने हा किल्ला लढविण्याचे सामर्थ्य पेलले..फत्ते करुन दाखवले ...कार्य करण्यास शारीरिक अवयवापेक्षा मनःशक्तीचे अवयव सुदृढ असावे लागते ...यासाठी धुळे जिल्हासचिव या कामगीरीच्या श्रेयाचे मानकरी आहे व त्यांना साथ देणारे जिल्हाध्यक्ष व इतर कार्यकारीणी कौतुकास पात्र ठरतात.....कार्यक्रमाचे नियोजन कसे असावे व विनाश्रेय आपली जवाबदारी कशी सांभाळावी यावरुन खरे संघटनेवर प्रेम काय असते यावरुन आपण सर्व सदस्यांनी बोध घ्यायलाच हवा...पदांसाठी लढणारे व प्रत्यक्ष कामात निष्क्रिय असणारेही भरपुर आहेत त्यांनी यातुन धडा घ्यावा ..आपल्या संघटनेचे सव्वा वर्षातील कार्याचे सिंहावलोकन करतांना संघटनेचा चढता आलेख पाहतांना अनेकांच्या दातखिळ्या बसल्या असणार ..ज्यांनी या निर्मळ प्रवाहात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला त्या दुरुन चित्र पाहणार्या काही आपल्याच बांधवांचा घोर भ्रनिरासही झाला असेल..अरे संघटना तुमची पण आहे असे काठावरुन पोहण्यापेक्षा या आनंद प्रवाहात सामिल व्हा ...संघटनेवर संघटनेसाठीच प्रेम करा...तसेच संघटनेबद्दल मोठमोठ्या ज्ञानाच्या व गृपवरुन संघटनेबद्दल अनुभवाच्या कथा वाचणार्या महाभागांना ऐन वेळी या सोहळ्यास पाठ फिरवुन घरच्या जंजाळात राहणे पसंत करता वर्षातील एकदिवस सुध्दा न देउ शकणाऱ्या करंट्या आळशीवृत्तीनीही आपल्या वृत्तीत बदल करावा हे सांगावेसेच वाटते अपवादाने काही संघटन प्रेमी अतिशय तळमळ व येण्याची ओढ असुनही खरोखरच अडचणीमुळे येउ न शकलेल्या सदस्यांनी आम्हाला पुर्व कल्पना दिलेली असल्यामुळे त्यांची अडचण आम्ही समजु शकतो पण सर्व काही सहज असतांना जाणुनबुजून कंटाळा करणारे मित्र संघटनेला कधी समजाउन घेतील...कालच्या आमसभेने संघटनेचा आत्मविश्वास वाढवला बळ दिले संघटना सुरक्षित आहे कार्यक्षम नेतृत्वाच्या हाती आहे व छान कार्य चालु आहे याची खात्री होतेय..या प्रवाहात अनेक प्रवाह जोडले जात आहे ..मा.केंद्रीय अध्यक्ष व कार्यकारीणी कुशलतेने समर्थपणे संघटना चालवत आहे ..अध्यक्षांनी परिधान केलेल्या काटेरी मुकुटावर अनेक सुगंधी फुले उमलु लागलीय....संघटनेत खंड खंड आहे असे वाटणाऱ्या खंडप्रेमीना संघटनेत जोडले जाणाऱ्या नवीन प्रभागातील नेतृत्व सहभागामुळे संघटना आता खर्या अर्थाने अखंड झालेली आहे हे दिसेल...महाराष्ट्रातील चंद्रपुर,रत्नागिरी ,गोंदीया,चंद्रपूर,नागपूर ,नगर,नांदेड परभणी ,मुंबई,औरंगाबाद ,परभणी ,बीड,आणि पुणे तसेच इतर अनेक जिल्ह्यातुन उत्स्फुर्तपणे आलेले सदस्य पदाधिकारी यांच्या सहभागाने संघटना आपल्या भक्कमतेचे अखंडतेचे व ऐक्यतेचे उदाहरण बनलेले आहे..सेवानिवृत्त सदस्यांचा सन्मान व सहभाग सुद्धा विलोभणीय आहे ..अक्षरशः साठी सत्तरी झालेल्या जेष्ठांचेही मार्गदर्शन आपल्याला लाभले ते आपल्या पुढील जिवनकार्यात मार्गदर्शक ठरते..नवोदितांचा सहभाग हा ही संघटनेच्या भविष्यात संघटनेच्या सुरक्षिततेची हमी देतोय...मित्रांनो संघटनेला लाभलेले युवा अध्यक्ष हे सर्वांच्या ह्रदय मनातले अध्यक्ष बनले आहेत..त्यांची कार्यकुशलता व संघटनेवरील पकड हि संघटनेतील सव्वा वर्षातील उपलब्धी आहे...केंद्रीय कार्यकारीणीतील बाकी पदाधिकारी मा.अध्यक्षांच्या पाठीशी ठामपणे उभे राहुन मोलाची साथ देत आहे...आणि याच मुळे संघटनेचे नाव महाराष्ट्रात आदराने सन्मानाने घेतले जात आहे..इतर संघटनाही आपल्याशी अदबीने वागत आहे...आजवर संघटनेच्या आमसभेत आपण नुसता गोंधळ,वादावाद व धिंगाणा अनुभवला असेल पण धुळे आमसभेने शिस्तीचा व खेळीमेळीच्या वातावरणाचा पायंडा पाडलाय...हे ज्यांनी अनुभवले ते धन्य झाले वंचित राहीलेल्यांचे दुर्दैव ! मित्रांनो हि संघटना माझी आहे,तुमची आहे,आपली आहे, आपल्या सर्वांची आहे...वैयक्तिक हेवेदावे राग रुसवा सोडुन आपण संघटनेत सलग्न रहायला हवे...कुण्या एकाशी मतभेद असुही शकते म्हणुन काय संघटनेशी फारकत घ्यायची...सर्वाच्या भल्यासाठी कल्याणासाठी आहे संघटना.. नेतृत्व हा व्यवस्थेचा भाग असतो आज जो वरच्या पदावर आहे उद्या तेथे आपल्यापैकी कोणीही असु शकतो ..कुणाचीही मक्तेदारी नसते परंतु कार्य हे निकालात्मकच पाहीजे..जागा अडवणारे नेतृत्व संघटनेला मागे नेतात...मी धुळेकर आमसभा आयोजकाचे औपचारीक कौतुक अभिनंदन करुन मोकळा होणार नाही त्यांनी त्यांची जवाबदारी समर्थपणे पेलली व संघटनेचे कार्य प्रामाणिकपणे केले असेच इतर जिल्हा कार्यकर्ते सदस्य हि कार्यक्षम व्हा हाच संदेश द्यावा वाटतो..मी संघटनेचा सल्लागार म्हणुन कार्य करतो परंतु माझे पद हे संवैधानिक नव्हे परंतु संघटनेच्या हितासाठी अध्यक्षांच्या कार्यात मदत व संघटनेच्या भरभराठीसाठी माझ्या अल्पबुद्धीने मी वेळोवेळी सल्ला सुचवित असतो व हा सल्ला अमलात यावाच असा माझा आग्रहही नाही..परंतु संघटनेच्या प्रेमाखातर मी कार्यरत राहीन...चांगल्या कार्य करणाऱ्या चा उत्साह वाढविणे व दुरुन वल्गना करणाऱ्या अकार्यक्षम प्रवाहात नसणाऱ्यांना प्रवाहात आणण्याचे माझे कार्य चालु आहे..चालु राहील......जय रेखाचित्र संघटना... राजेंद्र करपे प्रमुख सल्लागार
34) नागपुर जिल्हाध्यक्ष पदी सर्वानुमते नवनिर्वाचित निवड होऊन जिल्हाअध्यक्ष पदी विराजमान झालेले नवतरूण तडफदार, टवटवीत, ताजे ताजे असे श्री.ताजने सुनील सर आपले हार्दीक अभिनंदन व भविष्यातील संघटनेच्या कार्यास अनेक अनेक शुभेच्छा...वन विभागात असलेले ट्रेसर
२ बंधू व १ भगिनी आपल्या समस्या घेऊन बैठकीस हजर झालेत. वन विभागात संपूर्ण महाराष्ट्रात 10 पदे असून पुढे त्यांना प्रमोशन ची पदे नाहीत. त्यामुळे ते ट्रेसर आपली समस्या घेऊन आलेत. नागपूर जिल्हा शाखा अध्यक्ष श्री. घोंगे साहेबांनी प्रकृती अस्वस्थ चे कारणाने राजीनामा दिला असल्याने सर्व संमतीने श्री. सुनील ताजने यांची जिल्हा अध्यक्ष पदी व श्री. Ghonge यांची जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली. उपस्थितांचे आभार मानण्यात आले ( 04/10/2019)
33) https://drive.google.com/file/d/1ErIcqoHQHvn27bZUpFqY34ZxsXnErccE/view?usp=drivesdk कार्यक्रम रुपरेषा
32) https://drive.google.com/file/d/1UX4N2CVsCmIorDjoY-4fRC6IpuHC4afY/view?usp=drivesdk वार्षिक सर्वसाधारण आमसभेची नोटीस दिनांक ( 28 जुलै 2019 धुळे )
31) https://drive.google.com/file/d/1E_
lwu7DWTW3ufpmgTA4ehdH00ew4o2M-/view?usp=sharing
दिनांक २६/०२/२०१९ ला आलेल्या संघटनेच्या अध्यक्षांनी दिलेले समर्पक उत्तर मा.अध्यक्षांवर तथा संघटन नेतृत्वावर आरोप करणार्यांनी कदाचित वाचले असेलच..त्यांचे समाधान होईल कींवा नाही हे कळणे दुरापास्त आहे...कारण एकदा विरोधात्मक चष्मा घातला तर मग कोणत्याही कार्याचा अर्थ नकारात्मक दिसणार..अर्थात यात आरोप करणाराचाही दोष नसतो त्यांना भरकटवणारी अतृप्त शक्ती पडद्याआड कार्य करुन नामानिराळी असते...परंतु विवेक बुद्धीने निरिक्षण करता आठ नउ महीण्यात संघटनेचा कायापालट होणे व संघटनेला एव्हढ्या अल्प काळात प्रतिष्ठेच्या शिखरवर नेऊन ठेवणे व संघटनेत संजिवणी आणणे तसेच अनेक महत्वाचे सदस्यहिताचे कार्य होणे अशा कार्याची स्तुती होण्याऐवजी बिनबुडाचे आरोप होताना पाहुन वाईट वाटते...संघटनेवर किंवा अध्यक्षांवर आरोप करणारांनी स्वतःच्या संघटनेप्रती योगदान व संघटनेतील आपल्या कार्याचा सहभाग पारखायला हवा...असे उदाहरण मागील कार्यकारीणीच्या थंड कार्यकाळात कोणी आवाज उठविण्याची हिम्मत करतांना दिसलेली नाही..असो ज्या वेळेस एखाद्या निस्वार्थ कार्य करणाऱ्या नेतृत्वार आरोप व विरोधात्मक विधाने सुरु होतात तेंव्हा त्या नेतृत्वाचे कार्य योग्य दिशेने व प्रगतीपथावर आहे असे माझे मत आहे..कारण जे नेतृत्व काही कामच करीत नाही व संघटनेतील सदस्यांचे हित जोपासत नाही तेंव्हा काहीच विरोध होत नाही व पुर्ण दुर्लक्षच करण्यात येते...आपल्याला आपल्या अडचणी व आपल्या कामाच्या अपेक्षा संघटनेकडुन असणे साहजिक आहे मात्र ते कार्य करुन घेण्याची एक पद्धत असते ना की संघटनेशी फारकत घ्यावी,राजिनामा द्यावा.. हे सपशेल चुकीचे आहे ..मी पहात आहे की मा.अध्यक्ष सतत संघटनेचे प्रश्न सोडविण्यात व सर्व सदस्यांचे समस्यांचे निराकरण करण्यात कायम व्यस्त असतात...संघटनेचे नेतृत्व सांभाळने,संघटनेत विधायक सदस्यहिताचे कार्य निस्वार्थ भावनेने करणे,व प्रत्येक सदस्यांच्या अडचणी सोडविणे हे कार्य सोपे नव्हे..हा काट्याचा मुकुट मा.अध्यक्षांनी शिरोधारी घेतलाय ,आपले नेतृत्व अभ्यासु ,सक्षम व आपल्या हितासाठी झटणारे आहे..गरज आहे आपण त्यांचेवर विश्वास ठेवण्याची व त्यांच्या पाठीशी उभे राहुन संघटन बळकट करण्याची...परंतु आपणच जर आपल्या संघटनरुपी वृक्षांच्या शाखा तोडत राहीलो तेही काही नकारात्मक प्रवृत्तीच्या सांगण्यावरुन तर तो आपलाच घात ठरेल...संघटनेत छान कार्य चालु आहे..संघटन मजबुत होत आहे,संघटनेची कधी नव्हे एव्हढी प्रतिष्ठा वाढत आहे या वेळी सर्वांनी संघटनेच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे...राजिनामा देणे,आरोप करणे ,निषेध करणे हे पळपुटेपणाचे लक्षण आहे ....कृपया माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढुन राग न मानता संघटनेत एकजुटीने एकत्र येउन सहकार्य करावे ..हि सर्व सदस्यांना कळकळीची विनंती .धन्यवाद..जय रेखाचित्र संघटना ! आर डी.करपे..औरंगाबाद .
30) आज
दिनांक ३१/०१/२०१९ रोजी महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटना
महाराष्ट्र च्या वर्ष २०१९ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन औरंगाबाद परिमंडळाचे
अधिक्षक अभियंता श्री सुर्वे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले .. या वेळी
जायकवाडी पाटबंधारे विभाग पैठणचे कार्यकारी अभियंता श्री राजेंद्र काळे
साहेब व परिमंडळाचे कार्यकारी अभियंता श्री खंदारे साहेब हे उपस्थित होते
...या वेळी मा. अ.अभियंता साहेबांना संघटनेबद्दल संपुर्ण माहिती देण्यात
आली व संघटनेच्या संकेतस्थळाबद्दलही मोबाईल वर माहिती दिली..आपल्या
संघटनेबद्दलचा सर्व सदस्याच्या ऊत्साह व संघटनेच्या कार्याबद्दल सुर्वे
साहेबांनी संघटनेची खुप प्रशंसा केली....आपले केंद्रीय अध्यक्ष श्री जाफरी
सर जिल्हाध्यक्ष श्रीमती विणा ठाकुर जि. सचिव श्री पाजारे उपाध्यक्ष श्री
अहमद ..श्री वाय.ओ.पठाण, जि.कोषाध्यक्ष मगन मोरे श्री पाडवी ,श्री
सुरवसे,श्री वहिदोद्दीन,श्री पखाले,श्री कोकाटे,सचिन खरात व बुलढाणा
जिल्हाध्यक्ष श्री रविंद्र नागरे व आर.डी.करपे केंद्रीय सल्लागार , सर्व
संघटणेचे सर्व सदस्य उपस्थित होतो..व हा दिनदर्शिका प्रकाशनाचा सोहळा
औपचारीकरित्या साजरा केला.....जय रेखाचित्र संघटना !
https://drive.google.com/file/d/1QzjB19VvO8JiAqGvUcBd5p5CMUOUIzlC/view?usp=sharing
29) https://photos.app.goo.gl/Z5cnoBojmy1ePWEJ7
दिनांक ०३ अॉगस्ट २०१६ रोजी पुणे येथे अनुरेखकांचे प्रशिक्षण चालु होते.. या वेळी तत्कालीन म.रा.रे.शा.कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी संघटनेची बैठक आयोजित केली होती...या प्रसंगी औरंगाबादहुन मी व जाफरीसाहेब ,श्री अहमद व स्व. श्री रावसाहेब धस आम्ही उपस्थित होतो..त्यावेळी मा.अध्यक्ष स्व.श्री टोणपे साहेब होते..मागील केंद्रीय कार्यकारीणीतील सर्व पदाधिकार्यांशी आम्ही संघटनेच्या प्रश्नांवर एकजुटीवर चर्चा केली होती...आज श्री टोणपे साहेब व श्री धस साहेब हयात नाही त्यांची खरोखरच उणीव भासते..तसेच या छायाचित्रातील बरेच मागील कार्यकारीणीचे पदाधिकारी सद्या काही कार्यरत आहेत व काही सेवानिवृत्तही झालेले आहेत परंतु सद्यस्थितीत ते संघटनेशी काहिसे तुटक राहतात...हे पाहुन संघटनेच्या व सर्व सदस्यांच्याहितास्तव सर्वांचे मनोमिलन घडुन संघटन मजबुत व्हावे अशी कळकळीची भावना माझ्या मनात आली व सहजच हे जुने फोटो पाहताना आपल्याला शेअर करावे वाटले.....धन्यवाद ! जय संघटना....राजेंद्र करपे औरंगाबाद .
28) महाराष्ट्र
राज्य रेखाचित्र संघटनेची वर्ष २०१९ दिनदर्शिका जिल्हाशाखा बुलढाणा
यांच्या वतीने छापुन तयार झालेली आहे..बुलढाना जिल्हाध्यक्ष श्री रविंद्र
नागरे साहेब आज 31/01/2019 रोजी औरंगाबादला येत आहे तरी सर्व स्थानिक
सदस्यांनी दुपारी ३ वा. कडा कार्यालय औरंगाबाद येथे जमावे ..दिनदर्शिकेचे
औपचारीक प्रकाशन करण्यात येणार आहे... या नंतर अर्ध्या दिनदर्शिका श्री
नागरे हे वितरीत करणेसाठी सोबत नेतील ..तरी सर्व सदस्यांना विनंती की आपण
श्री नागरे व माझ्याशी संपर्क करुन आपणास हव्या असलेल्या दिनदर्शिका
हस्तगत कराव्या...प्रत्येक सभासदाच्या घरी , शाखेत तसेच कार्यालयाच्या इतर
शाखेत आपल्या संघटनेची दिनदर्शिका लावण्यासाठी सर्व सदस्यांनी प्रयत्न
करावे....धन्यवाद..जय रेखाचित्र संघटना !
27) इतिवृत्त शेगाव मीटिंग दिनांक 2/12/18
https://drive.google.com/file/d/1N43FhK41fzAFbGUWALz_M_JP81SJZl_U/view?usp=drivesdk
26) [7:17 PM, 07/12/2018] Rajendra Karpe: प्रेस नोट
महाराष्ट्र राज्य रेखाचित्र कर्मचारी संघटनेच्या संकेतस्थळाचेअनावरण सोहळा संपन्न
रविवार दि.02/12/2018, रोजी शेगाव जि.बुलढाणा येथे रेखाचित्र कर्मचारी संघटनेच्या रेखाचित्र संवर्गातील सम्पुर्ण माहिती दर्शविणाऱ्या संकेतस्थळाचे अनावरण संघटनेचे केंद्रीयअध्यक्ष श्री.जकी अहमद जाफरी यांचे शुभ हस्ते सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला .सदर संकेतस्थळ सभासदांना खुले करुन देण्यात आले .श्री.गजानन महाराज यांचे प्रतीमेचे पुजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. या प्रसंगी सचिव श्री. सुधीर गभने, उपाध्यक्ष श्री. माणिकराव शिंदे, श्री. रवींद्र बिंड, सह कोषाध्यक्ष किरण मुळे तसेच प्रमुख सल्लागार वा.ना.दारुणकर, श्री.आर.डी.करपे व मार्गदर्शक श्री.शे.नजीर यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. महाराष्ट्रातील सर्व विभागीय सचिव व जिल्हाध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संकेत स्थळाच्या निर्मिती व सादरीकरण करण्यासाठी श्री.आर.डी. करपे व श्री.प्रमोद राव यांनी परिश्रम घेतले.या बैठकीचे आयोजन बुलढाणा जिल्हाअध्यक्ष श्री. रविंद्र नागरे आरेखक व कार्यकारीणी यांनी यांनी केले व कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री.आर.डी. करपे यांनी केले.कार्यक्रमास सम्पुर्ण महाराष्ट्रातून जिल्हाध्यक्ष ,सचिव ,संघटनेचे पदाधिकारी ,सभासद व सेवानिवृत्त सभासद उपस्थित होते.आभार प्रदर्शन बुलडाणा जिल्हा कोषाध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रम सांगता झाली.
25) Meeting dated 2/12/18 Reference letter:
https://drive.google.com/file/d/15t_8FqMR_FehobsqZwBEHbfeWkodGItz/view?usp=sharing
24) दिनांक २/१२/२०१८ रोजी शेगाव येथे संघटनेची दुसरी बैठक आयोजित करण्यात येत आहेकार्यक्रम पत्रिका लवकरच जाहीर होईल...या बैठकीस सर्व केंद्रीय पदाधिकारी तसेच जिल्हा कमेटिचे सर्व पदधिकारी उपस्थित राहणे अपेक्षित तर आहेच परंतु सर्वसामान्य सदस्यही या बैठकीस हजर राहु शकतात .. सर्वांनी यावं परंतु या बैठकीस कोणकोण सदस्यगण येण्यास इच्छुक आहे...कोणकोणत्या जिल्ह्यातील कार्यकर्ते येत आहेत व किती कार्यकर्ते शेगावला एकत्र जमणार आहे..या सर्व गोष्टिंचा अंदाज यावा व आयोजकाला त्याप्रमाणे पाहुणे सदस्यांची सर्व व्यवस्था लावणेसाठी येणाऱ्या सर्व एकुण कार्यकर्त्यांचा आकडा लक्षात येणे आवश्यक आहे....तरी सर्वांना विनंती आहे की सर्व जिल्हाध्यक्ष यांना आपल्या जिल्ह्यातुन बैठकीसाठी येणार्यांची यादी व सदस्यसंख्या गृपवर पोस्ट करावी तसेच श्री नागरेसाहेब अध्यक्ष बुलढाणा जि. यांना बैठकीच्या आयोजनासाठी सहकार्य करावे हि नम्र विनंती... आर.डी.करपे प्र.सल्लागार
23) पुनश्च सर्व माननीय आजी-माजी सर्व संघटना प्रेमी सभासदांनाे सप्रेम नमस्कार यापुर्वी मी, संघट- नेचा कार्यभार हस्तांतरण करणे बाबतच्या विषयावर दोन पोस्ट टाकल्या असुन त्याचे अवलोकन जवळ जवळ आजी- माजी व कार्यरत सर्वच मान्यवरांनी अवलोकन केले आहे मात्र याबाबत एकाही मान्यवरांनी अभिप्राय, प्रतिक्रिया दिलेली नाही संघटनेचा अती महत्वाच्या कार्यभार बाबत कोणीही जागरूक किंवा गंभीर नाही असे दिसुन येते. कोल्हापुर येथे झालेल्या आम सभेत विद्यमान कार्यकारिणी सर्वानुमते एकमताने एकदिलाने कुठलीही डर्टी पॉलिसी किंवा राजनीती न करता निवडुन दिलेली आहे यात पुणेकर रुसले त्यात कोणाचा काय दोष? नियमानुसार व कार्यकाल संपल्याने पुर्ण पारदर्शकतेणे व लोकशाही मार्गाने झालेली ती एक यशस्वी व योग्य कार्यवाही होती मात्र श्रीमान धापटे सर व इतर पुणेकर मंडळी नाराज झाली, सर आपण संघटनेचे एवढे महानुभवी व मुरब्बी, अष्टपैलू खेळाडु आहात, अध्याप पर्यंत संघटनेची जन्म भूमि औबाद असुनही मराठवाड्यास प्रथम वेळेस अध्यक्ष पद मिळाले याची आपणांस अभिमान वाटायला पाहीजे होते मात्र परिस्थिती एकदम विपरीत झाली सर असे व्हायला नको होते. रविवार दि.02/12/ 2018 ला संत श्री गजानन महाराज यांच्या आशीर्वाद व क्रूपेणे संघटनेची, संत व पावन नगरी श्रीक्षेत्र शेगाव येथे होणारी दुसरी बैठक व संघटनेच्या वेब साईट अनावरण कार्यक्रमास,आपण भुतकाळात झालेले सर्व काही विसरून खुल्या मनाने, एकदिलाने केवळ संघटनेच्या हीतार्थ आपण व माजी सर्व सन्मानिय पदाधिकारी सर्व संघटना मित्रांसह उपस्थित रहावे अशी विनंती. आशा आहे संत श्री.गजानन महाराज यांच्या क्रुपेने व चमत्काराने निश्चितच आम्ही सर्व मतभेद विसरून आमचे मनोमिलन होईल असा माझा विश्वास आहे..... वाय.ओ.पठाण,औबाद.
22) मा.केंद्रीय कार्यकारीणी सर्व जिल्हा पदाधिकारी व सभासद यांना कळविण्यात येते की संघटनेच्या संकेतस्थळाचे अनावरण कार्यक्रम व केंद्रीय कार्यकारीणी जिल्हा अध्यक्ष व सचिव यांची दुसरी संयुक्तिक बैठकीचे दि .2 डिसेंबर 2018 रोज रविवार ला संतनगरीत,अन्नपुर्णा प्लाझा वाटीका परिसर खामगाव रोड शेगाव येथे
सकाळी 10 ते 11 भोजन
11ते 12 मान्यवर स्वागत व संकेतस्थळाचे अणावरण
दुपारी 12 ते 4 बैठक
वरील प्रमाणे
बुलडाणा जिल्हा कार्यकारीणी यांनी नियोजन केले आहे.सर्वांनी हजर राहून कार्यक्रमात सभागी व्हावे ही विनंती सविस्तर पत्रक मान्यवरांच्या परवानगी नंतर काढण्यात येईल.
रविंद्र नागरे
जिल्हाध्यक्ष बुलडाणा
21) या विषयांवर मागील 4-5 दिवसात बराच उहापोह सुरू आहे. ज्यास जसे वाटेल तसे अर्थ काढले जात आहे.एक- दोन नियम/ निर्णय पाहून तसे तर्क लावले जात आहे.यासाठी आपण. सुरुवातीपासूनचे निर्णय अवलोकन करणे आवश्यक आहे.संघटनेच्या मागणी प्रमाणे ते शासनाकडुन मिळवण्यासाठी कित्येक वर्षे लागली.व ते आपण लगेच वाचुन पाहिजे तसे अर्थ लावायला मोकळे झालो. कृपया गैरसमज नको ...
आपले प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माझेकडे आहे. पण ते गृपवर देउन आपणास अशाच शंका निर्माण होत राहील व तो न संपनारा विषय राहील. तेव्हा आपणापैकी कोणी एक सभासद मला प्रत्यक्ष भेटले तर आपली शंका न शंका 100% दुर करता येईल.... किंवा पुढे होणार्या संघटनेच्या सभेत आपण प्रत्यक्षपणे उपस्थित राहणे..
किंवा आपण आपले जिल्हात जिल्हा निहाय केंद्रीय कार्यकारीणीची सभा घेतल्यास सविस्तर पणे आपले व ईतर सभासदांचे मार्गदर्शन /समाधान करता येईल ...
आपला मुध्दा... सहा. आरेखक पदावर थेट 2400 मिळाले नंतर 24.5. 99 चे निणर्यापोमाणे , 5 वर्षानी अपग्रेडेशननंतर 4200 व आरेखक पदोन्नति नंतर 4300 मिळणार. यात काहीच शंका नाही....
याप्रमाणे थेट आरेखक लागलेल्यांना प्रथम 2800 (जी तृटीची कायम आहे. ती 4200 मीळायला पाहीजे. यावर जर सर्व थेट लागलेल्या आरेखकांनी जोर दिला असता तर नक्कीच लाभ झाला असता.आता आपण बक्षी समीतीसमोर हा विषय मांडला आहे. मागील पदाधीकार्यांनी लक्ष दिले नाही.) व 4 वर्षानंतर 4300 मिळणार यातही काही शंका नाही....
तेव्हा अनुषंगीक निर्णय व्यवस्थीत रित्या पडताळन पाहणे आवश्यक आहे... धन्यवाद! .. दारुनकर. (Contact no. 9975763712, 23/10/18)
20) पदोन्नतिचा आदेश 6 महीनेपर्यंत ग्राह्य असतो. आपण 4 ते 5 महिने पुर्ण झालेवर पदोन्नतिचे पदावर रुजु होउ शकता. ( post by Shri.Darunkar sir 22/10/18, 1.58 pm )
19) सर 2800/-नाही 4300/-मिळनार, य वर मी वेतन पडताळणी करुन आनु शकतो (post by 9404481141~rs bhusawalkar 21/10/18, 11.30pm)
18) सहाय्यक आरेखक पदावरून ५ वर्षाच्या आतच पदाेन्नती मीळाल्यास आरेखक पदाचे ग्रेड वेतन किती असेल. रू.२८००/- ४३००/-
५ वर्ष पूर्ण होण्यास ४ महीने बाकी आहेत. मग ४ महीन्यानी रू ४२००/- होणारा ग्रेड पे पदोन्नती मूळे जर रू.२८००/- होत असेल तर हे नुकसान नाही काय ?
( post by Pankaj Sapkal, 21/10/18, 11:12 pm )
17) आपला मुध्दा 1... अनुरेखकांना 7 वर्ष नंतर मिळणारी वेतनश्रेणी ही तृटीची प्राप्ती, अपग्रेडेशन असुन पदोन्नति नाही. तेव्हा जेष्ठता बदलत नाही हे प्रथम लक्षात घ्यावे. तुम्हाला जेव्हा अनुरेखक पदावरुन पदोन्नतीचे पद स.आरेखक आहे तेव्हा स. आरेखक पदाचेच 2400 ग्रेडपे मिळणार. यात संभ्रम नको. तुम्ही स.आरेखक पदावर जेव्हा 5 वर्ष सेवा कराल तेव्हा 4200 ग्रेडपे मिळणार कारण तुम्हाला हा लाभ एकदाच देतय आहे. तुम्ही अनुरेखक पदावर 7 वर्ष सेवा केली नसल्याने स.आ. पदावर 5 वर्ष सेवा करणे आवष्यक आहे..(post by Shri. Darunkar sir, 21/10/18, 10.40 pm )
16) जेष्ठता एकच राहील त्यानी काहीच फरक पडत नाही. कारण सर्वच कर्मचारी एकदिवस 7 वर्ष सेवा पुर्ण करतातच कोणी एकमेकास डावलुन 7 वर्ष सेवा कशी पुर्ण करणार?. .. हा मुळ मुध्दा चवथे वेतन आयोगापासुन पदनाम बदलायचा होता. त्याच वेळी पदनाम बदल झाले असते तर किमान पाचवे वेतन आयोगाचे अधीसुचनेत नविन पदनामासह वेतनश्रेणी लागुन आल्या असत्या. यावर आता 2016 चे सेवाप्रवेश नियम नविन पदनामासह निघाले तर हा प्रश्न मीटेल व तशी कार्यवाही संघटनेनी सुरु केली आहे. (post by: Shri. Darunkar sir, 21/10/18, 5.25 pm)
15) श्री. दारुनकर सर, तसेच समस्त वरिष्ठ सहकारी मंडळी यांना सप्रेम नमस्कार, चर्चेत सहभागी होवुन मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद, आपल्या या विभागात वेगवेगळ्या भागात कार्यरत कर्मचा-यांना होत असलेल्या अडचनी बाबत चर्चा तसेच मोलाचे मार्गदर्शन या गृपमध्ये मिळत असुन, वेळोवेळी मिळत असलेल्य शासन निर्णयाचा आम्हाला खुप फायदा होतो…..या शासन निर्णयाचे वा नियमांचे वाचन केल्यानंतर किवा याबाबत एका विशिष्ठ वर्गाकडुन त्याची अंमलबजावनी न केल्यामुळे या संवर्गातील कर्मचा-यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या चर्चेमुळे खुप महत्वाची माहिती प्राप्त होते…………………..
1) मला नम्रपणे असे नमुद करावेसे वाटते आपण म्हटल्या प्रमाणे जर अनुरेखकाचे (2000ग्रेड पे) पदोन्नतीचे पद (7 वर्ष पुर्ण न झालेल्या) आरेखक श्रेणी 3 (2400) आहे याबाबत संभ्रम अजुनही कायम आहे….
2)जेव्हा एका (अनुरेखक 2000) पदावर नेमणुक होणा-या व्यक्तीची पदोन्नती होते तेव्हा जेष्ठता व योग्यतेच्या आधारावर केल्या जाते (पदोन्नतीचे शासन निर्णय. सा.प्र.वि क्र SRV1074/D दिनांक 28/01/1975)………. यानुसार अनुरेखकाचे 7 वर्ष पुर्ण होण्या अगोदर तो पदोन्नतीस पात्रच नाही कारण योग्यता (आहर्ता) अद्यापही धारण केली गेली नाही….……….मग त्याची पदोन्नती होवुनही आपण त्याची सेवेची 7 वर्ष होण्याची वाट पाहत बसतो…….
3)महोदय जेव्हा पदोन्नती दिली जाते तेव्हा 7, 5, 4 चे नियम रद्द होतात असे मला वाटते.…… कारण 7,5,4 चा नियम हि सेवाकाळात एकदाच लागु आहे…. पदोन्नतीमुळे कर्मचा-याच्या कर्तव्य व जवाबदारीत वाढ होते. पदोन्नतीच्या पदाचे सर्व कर्तव्य जवाबदारी पार पाडण्याचा अधिकारासोबत मुळ पदोन्नतीच्या पदाची वेतनश्रेणी (आरेखक श्रेणी-2 4200ग्रेड पे)मिळावयास पाहिजे……..
4)परंतू अनुरेखक वरुन आरेखक श्रेणी3(2400) मधे कोणत्याच कर्तव्य व जवाबदारीत वाढ होत नाही तसेच पदोन्नतीचे कोणतेच आदेश काढल्या जात नाही. यासोबतच आनुरेखक व आरेखक श्रेणी 3 अशी एकच सेवा जेष्ठता यादी तयार केली जाते…
……….महोदय मि फक्त विषयाशी संबंधीत प्रश्न Post करीत आहे………….माझे या अगोदर पाठवण्यात आलेल्या Post चे ही अवलोकन करावे……………….आपण असेच मार्गदर्शन करत राहावे हि विनंती……….मला कोणाचेही मन दुखवायचे नसुन चुकिचे काही Post होत असल्यास क्षमा असावी…….( post by: 8806171347 ~ PG, 21/10/18, 5.22 pm)
14) अनुरेखकाचे प्रमोशन आरेखक श्रेणी ३ हे नसून ती केंद्रीय अनुरेखकाची (आरेखक श्रे.३ ची) वेतनश्रेणी लागू करण्यासाठी अर्हताकारी ७ वर्षांची सेवापूर्तता आहे. कारण भरती प्रक्रियेत केंद्रीय अनुरेखक (आरे.श्रे.३) हा सेवेत रुजू होताना स्थापत्य आरेखक ही ITI ची शैक्षणिक अर्हता असणारा असतो तर राज्य शासनाचा एसएससी पास अधिक इंटरमेडीएट ड्राईंग ग्रेड परीक्षा पास या शैक्षणिक अर्हतेवर घेतला जातो हे प्रथमतः समजून घेणे अत्यावश्यक आहे. म्हणून त्याला केंद्रीय अनुरेखकासारखा अनुभव किंवा पात्रता निर्माण करण्यासाठी ७ वर्षांची अर्हताकारी सेवा पूर्ण करावी लागते आणि सहा.आरेखक ३ असे कुठलेही पद अद्याप अस्तित्वात आलेले नाही याचाही अभ्यास करणे तीतकेच गरजेचे आहे
( post by: Adinath Rawal, 21/10/18, 8.36 am)
13) अनुरेखक 2000 व आरे.3-2400.. यातच स्पष्ट आहे. कि जे अनुरेखकांना 7 वर्ष व्हायचे आहे. त्यांचे जर प्रमोशन झाले तर त्यांना साहे.आरेखक पदावर 2400 ग्रेडपे मिळेल. व जे अनुरेखक 7 वर्ष पुर्ण करुन श्रेणो3 मधे 2400 ग्रेडपे घेत असेल त्यांना श्रेणी 2 ची पदोन्नति मीळाल्यास पुढे 4200 ग्रेडपे मिळेल.... याचप्रमाणे नक्षलग्रस्त भागातही एकस्तर मधे असाच वेतनलाभ मिळेल... हां, जर तुम्ही कालबधद पदोन्नति अगोदरच घेतली असाल तर एकस्तर मिळणार तर फक्त नक्षल भत्ता च मिळेल... आपल्या पैकी काही अनुरेखक कर्मचार्यांनी 7 वर्ष पुर्ण न करता स्वतःचे जबाबदारीवर एकस्तर मधे 4200 ग्रेडपे लाउन घेतला. यामुळे पुढे ए.जी. चे किंवा वेतनपडताळणी पथकाने जर आक्षेप काढुन वसुली केली तर त्यास ते स्वतः जबाबदार असेल. कारण अशी प्रकरणे यापुर्वी झाली आहे. तेव्हा नियमानुसारच वेतननिश्चीती करुन घेणे फायदेशिर असेल...दारुनकर ( 20/10/18, 7.00 pm )
12) माननिय रावळ साहेब तसेच सर्व सहकारी मित्र मंडळी, आपण दिलेल्या सहका-याबद्दल धन्यवाद, आपण विषद केलेली माहिती खरच कौतुकास्पद आहे,
महोदय आपले म्हणने पुर्णपणे योग्य आहे, परंतु माझे काही प्रश्नाचे उत्तरे अजुनही मिळालेले नाही, साहेब थोडं मार्गदर्शन करावे. हि नम्र विनंती….
1) आपल्या संवर्गात अनुरेखक ते आरेखकांपर्यंत एका प्रकारच्या पदास दोन पदनामे आणि दोन प्रकारच्या वेतनश्रेण्या आहेत. असे आपले म्हणने योग्य आहे; पण अनुरेखकांना एकस्तर मधे 2400 ग्रेड पे मिळायला हवा…. असा कोणताच शासन निर्णय नाही.
2) एकस्तर वेतनिश्चीती व कालबद्धची वेतननिश्चीती वेगवेगळ्या नियमाने केली जात नाही …...माझ्या मते यात पदोन्नतीच्याच पदाचीच वेतनश्रेणी देय ठरते…………… जर असे नसते तर 12 वर्षाची कालबद्ध मधे 2400 ग्रेड पे व 24 वर्षानी 4200 ग्रेड पे मिळाले असते. ….याकरिता जो मुख्य नियम ठरला तो कार्यात्मक / अकार्यात्मक पदाचा हे आपण जाणता…..
3) परंतु अनुरेखक या मुळ पदाचे पदोन्नतीचे पद हे सहाय्यक आरेखक (आरेखक श्रेणी 2-4200 ग्रेड पे.) आहे........ सहाय्यक आरेखक हे पद कार्यात्मक पद असुन यात कर्तव्य व जवाबदारीत वाढ होते व या द्वारे मि माझे मत मांडु इच्छितो की अनुरेखकाला एकस्तर अथवा कालबद्ध निश्चीत करतांना कार्यात्मक पद विचारात घेतले जाते….
4) 2002 च्या शासन निर्णयानुसार आदिवासी /नक्षलग्रस्त भागात कार्यरत असेपर्यंतच्या काळात त्यांनी धारण केलेल्या मुळ पदाच्या नजिकची वरिष्ठ / पदोन्नतीची वेतनश्रेणी व त्या अनुषंगाने वेतननिश्चितीचा लाभ देण्यात यावा. असे स्पष्ट नमुद आहे. त्यामुळे 12 वर्षाचे कालबद्ध प्रमाणेच एकस्तर वेतनश्रेणी (पदोन्नतीच्या पदाची) देय आहे……. कारण मुळात पदोन्नती चा अर्थ हा पदामधील कर्तव्य व जबाबदारीत वाढ होणे हेच आहे.
5) माननिय सामान्य प्रशासन विभागाचे 2002 च्या GR मध्ये कोणत्या पदाची वेतनश्रेणी देय ठरते याबाबत कृषी सहाय्यकांनी अभिप्राय मागितला यात कृषि सहायाकांची पदरचना अनुरेखकांप्रमाणेच आहे तेव्हा सा.प्र.वि यांचे अनौपचारीक पत्र पत्र क्र. 595/का.12/2014 दिनांक 05/04/2014 द्वारे स्पष्ट केले (प्रत जोडलेली आहे.) एकस्तर पदोन्नतीचा लाभ देतांना अकार्यात्मक वेतनश्रेणी विचारत घेतलेली नाही त्यानुसार संबंधितांना पदोन्नतीची/ वरिष्ठ वेतनश्रेणी अनुद्नेय होते.
6)आमचे सहकारी मित्र श्री. हेमंत बुरडकर आरेखक श्रेणी 3, चंद्रपूर यांनी माहितीच्या अधिकारात सदर पत्राची प्रत मागितली (प्रत सोबत जोडलेली आहे.), तसेच पदोन्नतीच्या कोण्त्या पदाचीवेतनश्रेणी देय आहे याचा खुलासा वित्त विभागाचे शासन परिपत्रक वेपुर 1203/प्र.क्र.5/सेवा-9 दिनांक 10 जुलै 2006 मध्ये स्पष्ट केलेले आहे.(प्रत जोडत आहे)
महोदय या बाबत मी व माझे सहकारी मित्रांनी विभागाशी 2015- 2016 मधे पत्रव्यवहार केला तसेच संघटनेला सुद्धा अवगत केले परंतू यावर कोणतिही कार्यवाही झालेली नाही तसेच कोणतेच लिखित उत्तर प्राप्त झाले नाही…..संघटने हि मागणी मि दिलेल्या संदर्भाच्या आधारावर रेटुन धरली तर नक्किच आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचा-यांचा लाभ होईल…
महोदय मी हे सर्व आपल्या महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटना, महारष्ट्र यांचे कडे पुन:श्च लिखित स्वरुपात सर्व सहकारी कर्मचा-यांच्या सहिनिशी निवेदनात देणारच आहे…………कृपया कुठे अतिशयोक्ती अथवा अतिरेक होत असल्यास क्षमा करावी….आपले सहकार्य मिळावे हि विनंती.
( Post by 880617168234 ~ PG, 19/10/18, at 6.29 pm ) reference ltr:
1) https://drive.google.com/file/d/1ll6hM0q8f8uECK7waExYvTKqmRrWYk6T/view?usp=sharing
2) https://drive.google.com/file/d/1JVi7fAg6j7l9XwtYK7N6fvQS4bjdXvuk/view?usp=sharing
3) https://youtu.be/TkHGCVHu3UA
11) ✨मित्रहो आपल्यापैकी काही बंधु- भगिनी आदिवासी/नक्षली भागात कार्यरत आहेत आणि त्यामुळे त्यांना एकस्तर वरील पदाचे वेतन द्यावे असे शासनाने सुचित केलेले आहे. परंतू त्यात येणाऱ्या अडचणी या विषयावर परवा दिवसभर उहापोह चालू होती. यासाठी ते वेतन कोणते मिळावे याची आपणास माहिती असणे अपेक्षित आहे व त्याचा अभ्यासही असणे गरजेचे आहे. आपल्या संवर्गात अनुरेखक ते आरेखकांपर्यंत एका प्रकारच्या पदास दोन पदनामे आणि दोन प्रकारच्या वेतनश्रेण्या आहेत. त्यामुळे आपले संवर्गाचे वेतनश्रेण्यांमध्ये थोडीफार गुंतागुत आहे व ती अनुभवी लिपीकांखेरीज अन्य लिपीकांना देखिल लगेच लक्षात येत नसल्याने ती प्रथमतः समजून घेणे गरजेचे आहे...
सरळ सेवेने भरती झालेल्या व पूर्वीच्या कार्यरत कर्मचाऱ्यांना सहाव्या आयोगामध्ये जे वेतन मिळते त्यामध्ये वेतन बॅन्डमधील मुळ वेतन अधिक ग्रेड पे मिळून एकूण वेतन असे आहे. त्यामुळे प्रत्येक पदावर नियुक्तीच्या वेळी कोणता ग्रेड पे असेल व अनुरेखकास ७, सहा. आरेखकास ५ आणि आरेखकास ४ वर्षानंतर कोणता ग्रेड पे मिळेल हेही माहीत असले पाहिजे असे वाटते...
... ... ... ... ... ... ... ... ...
अनुरेखक..ग्रे.पे.२०००(स.से.नियु.)
आरेखक श्रे.३..ग्रे.पे.२४०० (७ व.अ.सेवेनंतर)
१२ वर्षांच्या काल. पदोन्नतीनंतर..ग्रे.पे.४२००
... ... ... ... ... ... ... ... ...
सहा.आरेखक..ग्रे.पे.२४००(स.से.नियु.)
आरेखक श्रे.२..ग्रे.पे.४२००(५ व.अ. सेवेनंतर)
१२ वर्षांच्या काल.पदोन्नतीनंतर..ग्रे.पे.४३००
... ... ... ... ... ... ... ... ...
आरेखक..ग्रे.पे.२८००(स.से.नियु.)
आरेखक श्रे.१..ग्रे.पे.४३००(४ व.अ.सेवेनंतर)
१२ वर्षांच्या काल.पदोन्नतीनंतर..ग्रे.पे.४४००
... ... ... ... ... ... ... ... ...
आता अनुरेखक म्हणून कार्यरत असल्यास आणि ७ वर्षांची अर्हताकारी सेवा झाली नसेल तर एकस्तर वरचे पदाचे वेतन देताना ग्रेड पे २००० ऐवजी २४०० हा सहा. आरेखकाचा असेल आणि ७ वर्षांची अर्हताकारी सेवा झालेनंतर आरेखक श्रे.३ हे पदनाम व ग्रे.पे.२४०० ऐवजी ४२०० हा आरेखक श्रे.२ यांचा मिळेल. जो १२ वर्षांच्या कालबद्ध पदोन्नतीनंतरही लागू होतो...
... ... ... ... ... ... ... ... ...
याचप्रमाणे सहा.आरेखक असेल तर एकस्तर वरच्या पदाचे वेतन देताना ग्रे.पे.२४०० ऐवजी आरेखकाचा २८०० मिळेल आणि ५ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर मिळालेले आरेखक श्रे.२ हे पदनाम व ग्रे.पे.४२०० ऐवजी ४३०० मिळेल जो १२ वर्षांच्या कालबद्ध पदोन्नतीनंतरही लागू होतो...
... ... ... ... ... ... ... ... ...
याचप्रमाणे आरेखक असेल तर एकस्तर वरच्या पदाचे वेतन देताना ग्रे.पे.२८०० ऐवजी आरेखक श्रे.१ चा ४३०० मिळेल आणि ४ वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर मिळालेले आरेखक श्रे.१ हे पदनाम व ग्रे.पे.४३०० ऐवजी प्र.आरेखकाचा ४४०० मिळेल जो १२ वर्षांच्या कालबद्ध पदोन्नतीनंतरही लागू होतो...
पदनाम बदलाच्या शा. निर्णयानुसार पदनाम बदल व केंद्राप्रमाणे अर्हताकारी सेवा ही संपूर्ण सेवेतील प्रथम पदावर किंवा हा निर्णय लागू झाला त्यावेळी जे कर्मचारी ज्या ज्या पदावर कार्यरत होते त्या पदावर एकदाच मोजायची होती आणि आहे. म्हणून एकस्तर वरील पदाची वेतनश्रेणी देताना ग्रे.पे. हा
१)अनुरेखक असाल तर सहा.आरेखकाचा मिळेल.
२)आरेखक श्रे.३ असाल तर आरेखक श्रे.२ चा मिळेल.
३)सहा.आरेखक असाल तर आरेखकाचा मिळेल.
४)आरेखक श्रे.२ असाल तर आरेखक श्रे.१ चा मिळेल.
५)आरेखक असाल तर आरेखक श्रे.१ चा मिळेल आणि
६)आरेखक श्रे.१ असाल तर प्र.आरेखकाचा मिळेल...
... ... ... ... ... ... ... ... ...
सर्वसाधारणपणे वरीलप्रमाणे होणे अपेक्षित आहे. हे सर्व मी ४ था, ५ वा आणि ६ व्या आयोगातील व वेळोवेळी झालेल्या बदलानुसार निश्चित करण्यात आलेल्या वेतनश्रेण्यांमध्ये सहभागी झाल्यामुळे आणि मला त्यामधून थोड्याफार प्रमाणात ज्ञात झालेल्या माहितीवरुन देत आहे. "ते सर्वस्वी बरोबर असेलच असे नाही व तसा माझा आग्रही नाही." आपणाकडे आता काही ठिकाणी उच्चविभूषित व अभ्यासू सभासद आहेत. त्यांनीही यामधे सहभागी होऊन त्यांची अभ्यासपूर्ण मते द्यावीत असे वाटते...
आदिनाथ रावळ, आरे.श्रे.१, कोथरुड, पुणे. ( Post by Shri. Adinath Rawal, for more guidance call 8087168238, dt. 19/10/18 )
10) आपल्या संघटनेचा न्यायालयीन लढा अद्याप संपलेला नाहीये...मा.सुप्रीम कोर्टाने शासनाचे अपिल सध्या जरी दाखल करुन घेतले नाही तरी कृषी विभागाच्या न्याय निर्णयावर जरी आपला न्याय निर्णय आधारीत असेल तरीही आपल्या संघटनेला मा.सर्वोच्च न्यायालयात म्हणने दाखल करावे लागु शकते...व आपण दाखल केलेले क्याव्हेट पिटीशनला एक्स्टेंन्शन घेतलेले आहे...त्यामुळे आज ना उद्या कृषी विभागाच्या अपिल निर्णयानंतर आपल्यालाही सर्वोच्च न्यायालयात सामना करावा लागु शकतो ..म्हणुन आपला न्यायीक कार्यवाहीचा लढा अद्याप संपलेला नाही व गाफील व इतर विभागाच्या निर्णय धोरणावर अवलंबून राहता येणार नाही संघटनेने सतर्क राहीलेच पाहीजे...व आपण सतर्क आहोतच...सर्वोच्च न्यायालयात सामना करणे हि अतिशय खर्चिक बाब आहे...तरी सर्व सदस्यांनी लक्षात ठेवायला हवे की... भय अजून संपलेले नाही....तरी सर्व सदस्यांना नम्र विनंती आहे की आपला लढानिधि तात्काळ जमा करावा...संघटनेची आर्थिक स्थिती मजबुत करा ...संघटनेच्या कोषात पैसा जमा असेल तर आपण कशाशीही मुकाबला करु शकू...आर्थिक बळाशिवाय लढा शक्य नाही व लढानिधी संकलनाशिवाय पर्याय नाही हे सर्वांनी समजुन घ्यावे...असे मला वाटते....धन्यवाद ...जय रेखाचित्र संघटना !🙏🏼 आर.डी.करपे. ( 06/10/18, 9.48 pm )
9) मी आत्ताच कृषी विभाग रेखाचित्र संघटनेचे सचिव श्रीमान कामडी साहेबांशी चर्चा केली त्यांचेकडुन हे पत्र प्राप्त करुन गृपवर पोस्ट करीत आहो. अशाच प्रकारे काहीशी माहिती आपले प्रकरणी येईल असे वाटते...
श्रीमान राठोड व माटवनकर साहेबांचे खुप खुप अभिनंदन कालपरवाच्या नझीर शेख साहेबांनी फोनवरून याविषयी चर्चा केली. अध्यक्ष महोदयांनी सुत्र फिरविले व आज अंशतः सूखद बातमी कळते. ही संघटनेच्या आजी माजी पदाधिकारी यांची सहकार्याची ताकद आहे. शासन दरबारात पेरलेल्या विषयावर प्रगती चांगली आहे. तेव्हा नविन कार्यकारीणीचे व राठोडजी व माटवनकरजी सारख्या मुरब्बी अष्टपैलूंचे पुनश्च अभिनंदन. नाराज सभासदानी हेवेदावे विसरुन संघटना आपली सर्वांची असल्याने घटनेच्या कामात एकत्रीत येवुन सहकार्य करावे ही विनंती.. दारुनकर ( Post By Shri. Darunkar sir, 06/10/18, 9.00 pm ) Reference letter-
https://drive.google.com/file/d/1_NhyMXvD7FP59pxxk5KGpesqSnz6A6j8/view?usp=sharing
8) संघटनेच्या सर्व सदस्यांना कळविण्यात आनंद होत आहे की, श्री .बन्सीलाल राठोड साहेब, संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक मुंबई हे सुप्रीम कोर्टात शासनाने अपिल करणेबाबत जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकार्यांना भेटले व सुप्रीम कोर्टाने शासनाची अपिल याचिका दाखल करुन घेण्यास नकार दिलेला आहे अशी माहिती मिळालेली आहे. तसेच मंगळवारी मंत्रालयात जाऊन ते पुढील कार्यवाही करणार आहे.मा.सुप्रिम कोर्टाने आपल्या मा.उच्च न्यायालयातील फेटाळण्यात आलेल्या प्रकरणात मा.सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी कार्यवाहीचे प्रयत्न होत असतांना मा.सर्वोच्च न्यायालयात तत्सम कृषी विभागाची याचिका न्यायप्रविष्ठ झालेली आहे...व दोन्ही प्रकरणे परस्पर साम्य असल्याने कृषी विभागाचे अपिलावर होणारे न्यायनिर्णय आपल्या संघटनेच्या प्रकरणालाही लागु असेल.... मा.श्री बन्सीलाल राठौड साहेब मुंबई यांचे माहीतीबद्दल धन्यवाद ! ( Post By Shri. Jafari sir, 06/10/18, 7.40 pm )
7) नमस्कार मंडळी ,आज दिनांक 24.9.18 रोजी काही कार्यालयीन कामानिमित्त श्री गभने साहेब केंद्रीय सरचिटणीस महाराष्ट्र राज्य रेखाचित्र संघटना हे औरंगाबादला आले होते .मग त्याच अनुषंगाने श्री जकी अहमद जाफरी अध्यक्ष ,श्री करपे साहेब केंद्रीय सल्लागार महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा संघटना यांनी कडा कार्यालयात एक छोटेखानी बैठक आयोजित केली . बैठकीत काव्हेट कॅन्टीनऊ करण्याबाबत मतप्रदर्शन करण्यास सांगितले .पदोन्नती हा विषय निघाल्यावर,"पदोन्नती हा कर्मचाऱ्यांचा हक्क/ अधिकार असून तो त्याला लवकर मिळाला पाहिजे असे माननीय अध्यक्षांनी आपले मत व्यक्त केले. व तसेच विविध विषयावर व पुढील नियोजनाबाबत चर्चा झाली .बैठकीस औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष सौ. विणा चव्हाण ठाकूर, जिल्हा सचिव प्रफुल पाझारे, जिल्हा समन्वयक श्री कोकाटे हे सुद्धा हजर होते .चहापानाचा कार्यक्रम होऊन बैठक समाप्त करण्यात आली. जय रेखाचित्र शाखा संघटना ( By Prafulla Pazare, Aurangabad, जिल्हा सचिव, औरंगाबाद)
6) काल औरंगाबाद परिमंडळात अध्यक्ष श्री जाफरी साहेब,मी स्वतः तसेच जिल्हा शाखेचे सर्व पदाधिकारी कर्मचारी तसे अन्य संवर्गाचे कर्माचार्यांसोबत परिमंडळावर हलौलाबोल केला..अक्षरशः परिमंडळ दणानुन सोडले ..प्रारंभी टालमटोल करणारे अधिक्षक अभियंता शेवटी एकदम नरम पडले व या सप्टेंबर अखेर रेखाचित्र संवर्ग पदोन्नती निकाली निघणारच असे त्यांचेकडुन आम्ही प्रॉमिस घेतले...संघटन शक्तीला पाहुन अधिक्षक अभियंत्यांनेही आपल्या एकतेची प्रशंसा केली..( By R.D.Karpe 20/9/2018 at 3.45 pm)
5) नागपुरात परिमंडळाचे अ.अ. यांना घेराव करुन पदोन्नतिची कार्यवाही त्वरीत करणेसाठी संघटना पदाधिकारी व सभासदांचा हल्लाबोल....( Date 15/9/2018 at 1.00 pm )
4) दि. ११/९/२०१९ रोजी नगर जिल्हा कार्यकारणी व सभासदानची संयुक्त बेठक आयोजित केली होती .
बेठकीत सद्यस्थितीत संघटनेची वाटचाली विषयी सविस्तरपणे माहिती श्री . किरण मुळे ( जिल्हा सरचिटणीस) यांनी विशद केली तसेच लढा निधी संकलनची पुढील काळात आपल्याला अत्यन्त गरज आहे या बाबत मार्गदर्शन केले त्यास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला .
3) उद्या अध्यक्ष श्री जाफरी साहेब व सोबत नागपुरहुन श्री दारुणकर साहेब
हे तातडीने मुंबई ला रवाना होत आहे...सदर शासनाचे काढलेले पत्र सुस्पष्ट व
विभागांना खुलासा मागवणे पेक्षा शासनाने प्रशिक्षण अटी चे घश्यात अडकलेले
अर्धवट काम न काढता दिलेले पत्र सकारात्मक जरी असले तरी संभ्रमात्मक
वाटल्याने शासनाकडे उहापोह करण्यासाठी सर्व महत्वाची कामे सोडुन मा.अध्यक्ष
मुंबईला निघालेले आहेत....याला म्हणतात संघटन कार्याची तळमळ...... ( Post
By R.D.Karpe, 10/9/2018 at 5.45pm )
2) Letter From Mantraly about Departmental exam dated 10 Sept 2018
अत्यंत
महत्वपूर्ण व अभिनंदनीय अशा स्वरुपाचा हा निर्णय असून जलसंपदा विभागाने
मागविलेले खुलासेही तितकेच महत्वपूर्ण असेच आहेत. सदर कालावधीत करण्यात
आलेल्या सेवा भरतीप्रक्रियेत बऱ्याच परिमंडळांनी सा.बां.नियमावलीचा आपले
संवर्गासाठी अस्तित्वात असलेल्या नियमांचा अभ्यास न करता आणि आकसापोटी
लिपीक संवर्गाप्रमाणे व त्यांना कोणी विरोध न दर्शविल्यामुळे आपले संवर्गास
सेवा प्रवेश आदेशामध्ये प्रशिक्षणाची अट घालून ठेवली आहे. याचा त्रास व
मनस्ताप बऱ्याच सहा.आरे., आरेखक, प्र.आरेखकांना झालेला आहेच. त्यामुळे आजचे
हे पत्र व त्यावर होणारी कार्यवाही अत्यंत न्याय अशीच आहे...👍✌🤝 ( Post
by Adinath Rawal , 10/09/2018 at 4.44 pm )
1) नमस्कार मंडळी ,
आज सेवानिवृत्त सभासदांचा सत्कारकार्यक्रमाची माहिती तसेच सदस्यता शुल्क, वार्षिक वर्गणी, लढा निधी गोळा करण्याबाबत स्थानिक औरंगाबाद येथे जिल्हा पदाधिकारी यांनी दौरा केला.सद्यपरिस्थितीत आश्वासित प्रगती रक्कमा संबंधि शासन सर्वोच्च न्यायालयात गेल्याचे कळते. त्या अनुषंगाने दुसरा हप्ता देण्याबाबत सांगण्यात आले .प्रशिक्षण संदर्भात लवकरच मंत्रालयातून पत्र निघणार आहे व नंतर पदोन्नती हा विषय घेण्यात येणार आहे. संघटनेचे कामकाज या प्राधान्यक्रमानुसार व्यवस्थित चालू आहे याचा सर्वांनाच आनंद आहे. परंतु व्यवस्थित संपर्क अभावी अजूनही कार्यरत तसेच सेवानिवृत्त सभासदांचे पहिला हप्ता येणे बाकी आहे. तरी संबंधित कार्यालयातील सभासदांनी एकामेकांना समनव्य करून संघटनेस सहाय्य करावे कारण प्रत्येक सभासदास जवळ वैयक्तिक रित्या संघटनेला पोहोचणे अशक्य आहे. तरी आज प्रथम भेटीतच श्री अतुल वाळके, श्री प्रकाश हिवराळे, श्रीमती सोनाली पळशीकर, श्रीमती रोहिणी एडके यांनी प्रत्येकी 1000(हजार रुपये निधी) दिला व यात विशेष बाब म्हणजे श्री पी एम जाधव यांनी 5001 (पाच हजार एक रुपये) दिले व अजून सहकार्य लागले तर सांगा असा शब्द दिला. संघटनेस निधी दिल्याबद्दल संघटना आपली खूप खूप आभारी आहे. असेच सहकार्य व स्नेह असू द्या.
जय रेखाचित्र शाखा संघटना !
जिल्हा सचिव - प्रफुल पाझारे
औरंगाबाद व जालना (06 Sept 2018 at 6.22 pm)