1) व्यक्ती आणि वल्ली काही व्यक्ती अक्षरशः वेड्या असतात ...वेड मैत्रीचे असते,वेड प्रेयसीच्या प्रेमाचे असते,वेड कलेचे असते ,ईशभक्तीचेही असते किंवा असाध्य एखादी गोष्ट साध्य करण्याची धुंदी मस्तकात भिनते तेंव्हाही वेडच लागते व ती असाध्य गोष्ट साध्य होईतोवर ते वेड शिगेला पोहचते ...लोकं हसतात वेडं म्हणतात पण अशाच येड्यांनी देशस्वातंत्र्याचं वेड लागल्याने आपला देश पारतंत्र्यातुन मुक्त झाला....असाच एक येडा मित्र होता माझा ...त्याला वेड होतं मित्र वाढवायचं...संघटन वाढवायचं गृपनं जमायच चहापान करायचा सर्वांना खुष ठेवायचं...काही लोकं त्याला नेते म्हणुन हाक मारायचे तेव्हा तो अधिक खुलायचा...जेंव्हा संघटना नामशेष होती तेंव्हा औरंगाबाद जालना जिल्ह्यात प्रचंड सदस्य संख्या असुनही संघटनाचा मागमुस नव्हता तेंव्हा एक व्यक्ती एक वल्ली अचानक उगवला ...हसरा चेहरा स्मार्ट पर्सन्यालीटी गावरान भाषा व अजातशत्रु असा माझा मित्र स्व.श्री रावसाहेब धस... संघटनेसाठी ठार वेडा झालेल्या माझ्या मित्राने एक एक मित्र जमवले जिल्हा पातळीवर संघटन मजबुत केले अनेक बैठका कार्यक्रम उपक्रम आयोजन केले...अनेक विषयावर संघर्ष केला सामान्य सदस्यांना न्याय मिळवुन दिला...जिल्हाध्यक्ष पदावर समाधानी राहीला कधीही केंद्रीय पदाची लालसा बाळगली नाही...अनेकांना संघटनेचे पाठ गिरवले..संघटनेचे व्हाट्सएप्स गृप बनवुन अख्खा महाराष्ट्र सदस्य एका माळेत गुंफला.....अजुन बरंच काही करायची महत्वकांक्षा त्याच्या ठायी होती पण नियतीला हे मान्य नव्हते...अचानक हा वेडा एका भिषण अपघाताचा बळी पडून आमच्या वर संघटनेचे ओझे लादून अनेक अधुरे स्वप्न पुर्ण करण्याचे आम्हाला सांगुन आमच्यातुन दिनांक १३ नोव्हेंबर २०१६ ला सोडुन दुर निघून गेला ...लई दूर जेथून परतीचा रस्ता नाय.....मित्रा तुझी लय सय येते.......... राजेंद्र करपे.
2) हरपलेल्या हिर्याचे शल्य हयात असतात जे सोबत असतात तेंव्हा त्याचे महत्व इतके नसते अगदी सहजतेने आपण त्यास घेतो पण जर का ती व्यक्ती आपल्यापासुन दुर गेली मग मात्र हुरहूर लागून राहते... मानव जन्म हे एक नाटकच नव्हे का एकएका पात्रांनी एंट्री घ्यावी आपली भुमिका निभवावी व काम संपलं की एक्झीट.... परंतु ज्यांनी छान भुमिका वठवली त्यांचे कौतुकही होते , टाळ्याही मिळतात अन् चिरकाल त्याची भुमिका लक्षातही राहते... आपल्या वाट्याला किती काळ व किती मोठी भुमिका येणार हे आपल्या हातात नसते मात्र त्या भुमिकेचे सार्थक सोने करणे हे मात्र आपल्या हातात असते पण ते सर्वांना शक्य होत नसते... जन्माला येणार तो एक वेळ जाणारच हे जरी सत्य असले तरी जावे असे कुणाला वाटते ? जन्म मृत्युच्या प्रवासकाळाला आयुष्य म्हणायचे. परंतु शेवटचा दिस गोड व्हावा या साठी सत्कर्म सदाचरण महत्वाचे.... तरीही जो गेला त्याचे कर्म कसेही असो सत्कर्म कुकर्म त्याचे मुल्यमापण करण्याचा अधिकार आपणास नाहीच... गेलेल्यांचे फक्त अवगुण शोधुन त्यावर टिकाटिप्पणी हा ही अधमपणाच ... कारण तो जात्यात तर आपण सुपात असतो .. मित्रांनो आता तर सुपातील रासही उतरणीला लागलीय...जरा मागे वळुन पाहताना किती सगे सोबती सोडुन गेलेय याचीही जाणिव ठेवा... मरण सोपे झालेय , आता भेटलाय दोन शब्द प्रेमाचे आपुलकीचे बोलुन घ्यावे काय जाणो पुढील क्षणी भेट आहे की नाही .. घडीभरचा भरवसा नाय.. जगभरातील महामारी आपलेही द्वार ठोठावत आहे , मुक्तसंचारास, स्वैरविहारास बंधने आलीत, देवधर्मावरचा विश्वासही उडत चाललाय, अन्नपाण्यातील रुचिरता नाहीशी होतेय , गंध,सुगंध,दर्प क्षीण झाले ... जगण्याचे भय मरणापेक्षा भयानक होतेय... अशा बिकट प्रसंगात मैत्री व मित्र व सुसंवाद हाच एक पर्याय ठरतोय सहज जगण्याचा.... काल मा.रावसाहेब कोरे साहेब गेले.. संघटन परिवाराच्या काळजावर कुर्हाडीच्या घावाप्रमाणे बातमी अनेकांना घायाळ करुन गेली ...या पुर्वीही असाच आघात आम्ही औरंगाबादकरांनी अनुभवला होता ते माझे मित्र रावसाहेब धस गेले तेंव्हा ... कोरेसाहेब ,धस साहेब, टोणपे साहेब हे असे दिग्गज जिवलग एकामागे एक जाता राहीले ..दुःख करायलाही उसंत नाही ..आपल्या संवर्गातील अनेक मित्रही असेच एक एक करुन काळाच्या पडद्याआड झाले... गेले ते दिन राहील्या आठवणी .. संघटनेचा सुवर्णकाळ आठवुन अंगावर रोमांच येतात... सुवर्णकाळातील साथीदार,मार्गदर्शक सहप्रवासी गेले ....ते संघटना जगले , ते जिंकले आता आपण आहोत त्यांच्या आदर्श मार्गाच्या पाउलखुणावरुन मार्गक्रमण करतांना आपण सर्वांनी एकमेकांचे हात घट्ट धरण्याची खरी गरज आहे.... आपल्याच साथीदाराचे उणेदुणे काढण्याची हि वेळ नाही.... स्व.कोरे साहेबांच्या दुखवट्याचा आज तीसरा दिवस आहे .. तसे तर हि संघटनेची ही क्षती भरणे शक्यच नाही...आपण सर्वांनी संघटीत राहणे हिच त्यांना आदरांजली होय.... मा.कोरे साहेबांचा माझा तसा फारसा परिचय नव्हता परंतु त्यांच्या संपुर्ण संघटन कारकिर्दीच्या उंचीला मी जाणुन होतोच व विद्यमान अध्यक्षांच्या निवडप्रक्रियेत कोरेसाहेबांचा सिंहाचा वाटा होता.... त्यावेळी कोरे साहेबांची पोस्टिंग औरंगाबादला होती मी या साठी जेंव्हा त्यांना फोन केला ते माझे त्यांचे पहिले संभाषण होते मग नंतर मात्र कोल्हापुर आमसभा व कालपरवापर्यंत कोरेसाहेबांशी स्नेह संबंध राहीला यास विसरणे शक्यच नाही .... दोन दिवसांपासुन मी माझं मन हलकं करायचा विचार करत होतो पण काहीच सुचत नव्हते... संघटनेतील हिमालयाच्या उंचीच्या व्यक्तीमत्वास आपण पारखे झालोत .. दुःख काय वर्णावे.... संघटनेच्या कोंदणातील कोहिनुर निखळला ... संघटनेचा मुकुटमणी निष्प्रभ झाला ....संघटनेचा हिरा हरपला ...हिरा हरपल्याचे शल्य काय ...निशब्द झालोय आम्ही... निशब्द ! राजेंद्र करपे / प्रमुख सल्लागार
3) खरं वाटतच नाही.........दोनच दिवसांपूर्वी अशक्तपणा चे कारणांने सांगलीला दवाखान्यात भरती झाले होते.व आज स. १२.३० ला ही बातमी मिळाल्याचे मुलांनी साहेबांनी सांगीतले..
अतिशय जिव्हाळ्याचा मित्र हारपला...
संघटनेला उंचावर नेऊन ठेवले ....
त्यांचे सारखे संघटनेचे धडाडीने काम करायचे आम्हाला शिकवले.,.
कालच मला त्यांची आठवण झाली व उद्याला मी त्यांना भेटणार होतो....
अचानक पणे काळाने घाला घातला...
अगदी अस्वस्थ वाटते...
देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो...
त्यांचे कुटुंबाचे दु:खात सहभागी आहोत..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वाल्मिक दारुणकर नागपुर
4) महाभयंकर बातमी आहे ही,अस कस झाल असच वाटत आहे,हे व्हायला नको होते पण शेवटी हे परमेश्वराच्या हाती.मा.कोरे सरांच्या आत्म्याला देव शांती देवो,व त्यांच्या कुटुंबांना या मोठ्या दुःखातुन सावरण्याचे बळ द्यावे.ही देवा चरणी प्रार्थना.🙏🏻💐💐💐💐💐 सर्वांनी खरच कोरोना सहज बीमारी समजु नका सर्वांनी कोरोना न होण्याचे नियम पाळावे.ही कडकडुन सर्वांना विनंती🙏🏻🙏🏻
वंदना परिहार
5) कोरे साहेबांची निधनाची बातमी वाचली. मन सुन्न झाले. जुलै महिन्यात बोलणे झाले होते. विभाग बदलला तरी संघटनेशी नाळ कायम होती. अध्यक्ष पदाची कारकीर्द कायम स्मरणात राहील. स्व. टोणपे अण्णाच्या निधनानंतर संघटनेला बसलेला दुसरा हादरा. कोरे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली🌹🌹
काका धापटे पुणे
6) साधारणपणे मागील एक महिन्यापूर्वी कोरे साहेब व माझे बोलणे झाले होते. लातूर मधील पाणी टंचाई व वाढता कोरोणा प्रभाव यात लातूरकरांनी काळजी घ्यावी अशी त्यांची सुचना होती. नागपूर वरुन लातूर मार्गे सांगलीला जाताना मला अगोदर सांगत, यावेळी त्यांची व माझी लातूर मध्ये दोन वेळा भेट झाली. पुढे जाण्यासाठी वेळ होईल म्हणून इतर सभासदांना सांगू नका असा निरोप असायचा. रावसाहेब कोरे साहेब प्रांत अध्यक्ष होण्यापूर्वी पासून त्यांचा व माझा परिचय.
आत्ताच श्री रविकांत मर्केंडेय यांचा फोन आला व दुःखदायक बातमी समजली ..
काय बोलावे ... शब्द सुचत नाहीत.
फक्त एक एक आठवणी स्मरणात येत आहेत.विनम्र श्रद्धांजली 🙏🙏
विनायक जोशी लातुर
7)आपल्या हातात काहीच नसतं...नियतीने जे योजून ठेवलेले असतं ते घडतं...
आदरणीय कोरेसाहेब नाशिकला यायचे तेव्हा त्यांच्यातला नेता जवळून अनुभवला ..संघटनेस भूषण ठरावं असं त्यांच व्यक्तीमत्व आणि नेतृत्व होतं..आपल्यासाठी एक चांगला मार्गदर्शक हरपला..त्यामुळे होणा-या सर्वांच्या दुःखात मी व्यक्तीशः आणि नाशिक जिल्ह्याच्या वतीने सामील आहे..भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो..ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो..🙏🙏
डीडीजाधव नाशिक
8) संघटना परिवाराचा मेरुमणी निखळला
रावसाहेब कोरे यांच्या अकाली निधनाने संपूर्ण संघटना परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. सन 2000 पर्यंत सुप्तावस्थेत असलेल्या आपल्या संघटनेस, स्वतःच्या संघटन कौशल्याने त्यांनी एका विशिष्ट उंचीवर नेले. संघटना कार्यकर्त्यां साठी ते आधारवड होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांस आणि आप्तजनास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना👏
शेख नजीर
9)अतिशय दुःखद घटना. माननीय कोरे साहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली. त्यांचे नेतृत्व म्हणजे संघटनेचे भुषण होते. आपल्या धाडसी व धडाडीच्या व्यक्तीमत्त्वच्या जोरावर त्यांनी संघटनेला महाराष्ट्रात एका उंचीवर नेवुन ठेवले. संघटनेचा मंत्रालयात अभ्यासपुर्वक दबदबा निर्माण करुन सदस्यांना न्याय मिळवून दिला. संघटनेमध्ये सदैव सळसळणारे चैतन्यमय वादळ निर्माण करुन सर्व सदस्यांना नवसंजीवनी दिली. सदस्यांनमध्ये संघटने प्रती प्रेम, आदर, जिज्ञासा, जिव्हाळा, आपुलकी, निर्माण करुन संघटनेच्या न्याय मागण्यांसाठी सदस्यांनमध्ये लढाऊ बाणा निर्माण केला. संघटनेचे कार्यकरी मंडळामध्ये एकोपा निर्माण करुन नवनेत्रुत्वास चालना दिली. सर्व जिल्हा शाखा कार्यकारी मंडळास जोडुन संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून सर्व सदस्यांना एक नवा विश्वास दिला. मा.मुख्यमंत्री , मंत्री, आमदार व सचिव साहेबांनपर्यंत संघटनेच्या मागण्या मांडुन त्या कशा मंजूर करुन घ्याव्यात हे त्यांचेकडूनच शिकावे. संदेशक ते सी.इ.ए. हा फार मोठा विजयी प्रवास करून संघटनेच्या सदस्यांना मान, सन्मान व प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. एक झांजावात त्यांनी निर्माण केला. त्यांची नाळ सदैव संघटनेशी जोडलेली होती. संघटने प्रती नेहमी कळकळ असणारे, मदतीस नेहमी तत्पर, हसतमुख कणखर नेतृत्व होते. अशा या दिलदार नेत्यास संघटनेच्या सर्व सभासदांच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो तसेच ह्या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांचे कुटुंबीयांना मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना! सुनीलकुमार सुर्वे
10) मित्र शोक😞😞😞 आज उदास दुपार उजाडली ! जेंव्हा रावसाहेबांची दुःखद निधनाची वार्ता आली ! श्वास काहीसा थांबला मन सुन्न झाले ! विश्वासाला ही विश्वास होत नव्हता ! मात्र दुर्दैवाने ही वार्ता खरी ठरली ! जणु दुःखाचा डोंगर कोसळला ! जल हे जिवन आहे ! आज पाण्याचा घोट ही विष झाला ! उदास जड अंतःकरण काहीसे हलके झाले ! जेंव्हा नयनांनी अश्रूंना वाट करून दिली ! आज एक खरा व अच्छा मित्र हरपला आयुष्यभर तुमच्या आठवणी हृदयात राहतील ! तुम्ही नसल्याची जाणीव करून देतील ! स्वछ मन विचाराने कोरे ! अशे होते आमचे लाडके रावसाहेब कोरे ! संघटनेची आण बाण, शान ! ज्यांनी सभासदांची वाढविले मान, सम्मान ! संघटनेचे सुवर्ण पान आज इतिहासात विलीन झाले ! मात्र प्रत्येक सभासदाच्या हृदयात रावसाहेब कोरे स्थानांपन्न होते आहे व सदासर्वदा राहतील ! आदरणीय रावसाहेबांच्या आकस्मिक निधनामुळे संघटना परिवारास व त्यांच्या परीवारास, नातेवाइकास हे दुःख सहन करण्याची, हे अल्लाह, परमेश्वरा अपार शक्ती प्रदान कर...😞😞 आदरणीय रावसाहेब आपणांस अत्यंत जड अंतःकरणाने संघटना परिवारा तर्फे भावपूर्ण श्रध्दांजली...
वाय.ओ.पठाण,औबाद