16) संघटनेचा इतिहास

लेखिका: श्रीमती स्वाती डोकबाने )

संघटनेचे जे आज बहारदार रूप बघत आहोत....त्यातील अनेक स्थित्यंतरे... आणि  ज्या लेकरांनी ह्या  संघटना मातेची मनापासून सेवा केली....आणि आपल्या बांधवांना प्रतिष्ठा, वेतन श्रेणी, आणि हक्क...मिळवून दिले....त्या सर्वांना सूत्र  बद्ध रूपात..बांधण्याचा हा छोटा प्रयत्न...

1 मे 1960 महाराष्ट्राची निर्मिती होण्याआधी....अनुरेखक संवर्गातील पदे तांत्रिक म्हणून शासनात होती....  1960 ते 1972 पूर्वी संघटनेचे अस्तित्व नव्हते.. परंतु  महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर.....आपल्या संवर्गाला...कारकून लोक आपले मानत नव्हते  आणि अभियंता लोकही आपले मानत नव्हते ...आपले पद तांत्रिक की अतांत्रिक?असा प्रश्न उभा राहिला

 त्यामुळे अनुरेखक संवर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतःची स्वतंत्र संघटना असावी  या कारणास्तव संघटनेचा उदय झाला.

संघटनेची खरी सुरुवात 1972 पासून झाली....आदरणीय श्रीसंभाजी रायपुरे सर (संघटनेचे संस्थापकीय अध्यक्ष)यांनी संघटन करण्यास सुरुवात केली....त्यांच्यासोबत मुळचे लातूरचे ...औरंगाबाद मध्ये ,राहत असणारे श्री मग्गीरवार सर यांनी  संघटनेची घटना लिहीण्याच काम हाती घेतलं...आणि घटनेचे खरे मूळ शिल्पकार ठरले.....1973 ला पुणे येथे राज्यव्यापी पहिले संघटनेचे अधिवेशन झाले आणि खऱ्या अर्थाने संघटनेची  मुहूर्तमेढ रोवली.

.....आणि 12 जून 1975  रोजी संघटना  रजिस्टर झाली... आणि संघटनेचे शासकीय आदेशानुसार अस्तित्व निर्माण झालं....

              "अंगणी  बीज ते रोपल

            सूर्यकिरणान सवे तेही वाढलं

,               खतपाणी देऊन

                 माळ्याने ते जपल"

आनंदाला उधाण आलं.... नवीन कार्यकारिणीही अस्तित्वात आली... संघटन कार्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

 संस्थापकीय अध्यक्ष.... आदरणीय श्री संभाजी रायपुरे  सर  नागपूर हे झालेत .

उपाध्यक्ष.....  आदरणीय श्री वर्तक सर , अहमदनगर

 सरचिटणीस. .... आदरणीय श्री मग्गीरवार सर, औरंगाबाद

 विभागीय चिटणीस  आणि जिल्हा प्रतिनिधींची निवड झाली... संघटना रूप घेऊ लागली.... संघटन बांधणी साठी  प्रवास

 सुरू झाले.

  प्रवास साधनांची कमी... अशा वेळेस  एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी थांबायचे... आजूबाजूचे तालुके फिरायचे... आणि संघटन घडवून आणायचं... सभासदांच्या अडचणी जाणून घ्यायच्या... आणि तो सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा...असं काम सुरू होतं.

संघटने  दुसरे अधिवेशन ...25 व 26 जून 1977  ला औरंगाबाद येथे भरले. त्याच वेळेस संघटनेच्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले.संघटनेच्या पहिल्यावहिल्या स्मरणीकेने सर्वांना आनंद दिला.त्यावेळी आरेखक संवर्गातील श्री बाबुराव मडावी हे त्यावेळी आमदार झाले होते .यामुळे संघटनेस राजकीय वर्तुळही मिळाले संघटनेने सामाजिक भान जपत काही विधायक कामही केले.त्यात दुष्काळग्रस्तांना...रोख स्वरूपात 1500 रुपये त्यावेळचे मुख्यमंत्री  सन्माननीय वसंतराव नाईक यांना दिले होते.

अत्यंत उत्साहाने कामे सुरु झाली.

 त्यावेळेस वेतन आयोग हे राज्य सरकारी  कर्मचारी संघटनेकडून केले जायचे त्यांच्यासोबत आपली संघटना  काम करायची1966 चा पहिला बडकस आयोग 1977भोळे आयोग  या काळातही वेतन श्रेणीसाठी शासनाकडे पत्रव्यवहार झालेत .1972 ते 16 जून1982  हा दहा वर्षाचा पहिला कालखंड आणि त्यानंतर  दुसरा कालखंड सुरू झाला.

16जुन198 2 ते 24 जून2000 ला संघटनेला नवीन नेतृत्व मिळाले.एकूण एकोणावीस वर्षांचा कालखंड यात

अध्यक्ष श्री दिवाकर गोवर्धने( वर्धा),श्री.आर. बी.दाशरथे (औरंगाबाद)उपाध्यक्ष_श्री .रा.दे.टेंबे (पुणे) हे माजी अध्यक्ष होऊन गेले  या सर्वांसोबत आदरणीय श्री काझी साहेब सरचिटणीस म्हणून काम करत राहिले ,हे कामे करताना

या सर्व अध्यक्षानी त्यांना स्वातंत्र्य तर  दिले आणि विश्वासही दाखवला त्यांच्यासोबत अतिरिक्त सरचिटणीस आदरणीय श्री प्रमोद मुळे सर झालेत.

संघटन कार्यास वेग आला....

पत्रव्यवहार सुरू झाले....

१) संघटने पुढे संघटना बांधणीचे  काम होते.

२) आर्थिक मागण्या  व्यवस्थित मांडणे व शासन स्तरावर पोहचणे.आर्थिक मागण्या माहित होत्या पण त्या कशा संयुक्तिक आहे हे माहीत नव्हते.

मग नियोजन हाती घेतले पंधरा-वीस जिल्ह्यातच फक्त संघटन शाखा होत्या. बाकीच्या दहा जिल्ह्यात नव्हत्या, जिल्हे फिरायची, संघटन बांधणी करायची , पदाधिकारी कर्मचाऱ्यांना भेटायचा सभा घ्यायच्या मार्गदर्शन करायचा यासाठी काझी  साहेब , वीस दिवसात 20 दिवसात 20 जिल्ह्यात , चांद्यापासून बांद्यापर्यंत( चंद्रपूर ते सावंतवाडी)  महाराष्ट्र पालथा घातला, तेही एसटीने. अपुरे साधने असताना..स्वतःचा पैसा खर्च करत, कितीही तळमळ आणि निष्ठा..आहे त्या साधनांचा उपयोग करत  जिल्हा भेटी हे एक त्यांचं कौशल्यच ठरलं.

४)आर्थिक मागण्यासंबंधीअभ्यास करून संघटनेने पुढील मागण्या  शासनापुढे मांडल्या.

१)अनुरेखक___290 ते 540

२)सहाय्यक आरेखक___365ते 760

३)आरेखक___500 ते 900

४)प्रमुख आरेखक___600 ते 950(वर्ग-2 दर्जा)

५)उपविभागीय पातळीवर ,सहाय्यक आरेखक पदाची निर्मिती करणे,विभागीय/मंडळ/प्रादेशिक पातळीवर ,स्टॉपिंग पॅटर्न(ड्रॉईंग ब्रँच)सुधारणा करणे.

६)केंद्राप्रमाणे महाराष्ट्र राज्य रेखाचित्र कर्मचाऱ्यांना पदनाम देऊन सुधारणा करणे.

७)अमोनिया जोखीम भत्ता ५० रुपये वरून २००रुपये करणे

            संघटना बांधणीसाठी संघटनेचा  सभासदा कडून फॉर्म भरून घेतले जायचे त्यावेळी वार्षिक वर्गणी 15 रुपये होती....सभासदाला रजिस्ट्रेशन नंबर दिला जायचा....

तळागाळापर्यंत.....सभासदाला संघटनेशी जोडलं...त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.....त्यावेळी संपर्क साधन हे फक्त पत्रव्यवहार होते.......सभासद पत्रव्यवहारातूनच आपल्या अडचणी सांगायचे....आणि त्यावेळेचे पदाधिकारी.....काळजीपूर्वक त्यांना उत्तरे द्यायची.....  कार्यकर्त्यांची हस्ताक्षरे.... त्यांच्या उपस्थितीची जाणीव करून द्यायचे.... त्यामुळे पत्रांनी भावनिक जिव्हाळा जपला... प्रवास साधन  कमी असल्याने....अनेक अडचणींना तोंड दिले... स्वखर्चाने प्रवास केले... संघटनेच्या कामासाठी... स्वतःच्या खिशातला पैसा खर्च केला.

पण कार्यकर्ते एकाच ध्येयाने प्रेरित होते....सभासद हित...अत्यंत निष्ठेने काम सुरू होते.....आता संघटनेची वाट  वटवृक्ष कडे चालली होती.ड्राफ्टिंग मध्ये  श्री .प्रमोद मुळे सरांचा हातखंडा होता.... काझी सर आणि मुळे सर ही कामे अत्यंत तन्मयतेने करायची ...अत्यंत सुंदर हस्ताक्षरात ....हस्तलिखित द्वारे प्रस्ताव शासनास सादर केले जायचे.....त्यात त्यांची भावनिक कळकळ असायची ....अत्यंत निष्ठेने....सभासदाच्या हिताच्या दृष्टीने....कामे केली जायची.....

संघटन जिवंत ठेवण्याचं.....संघटनेला तळागाळापर्यंत.... पोहचवण्याचे अत्यंत मौल्यवान काम ......काझी सरांच्या काळात झालं.....

त्या काळात हॉटेल नव्हती...त्यामुळे...सहकारी कार्यकर्त्याच्या घरी....मुक्काम असायचा....घरातील मंडळीही...अत्यंत आदराने स्वागत करायची...आणि आदरातिथ्य ही........1980 पर्यंत संघटना फुलत गेली.....संघटनेचा सुवर्ण काळ म्हणावा लागेल  अशी कामे संघटनेकडून झाली...

संघटन इतिहासाचे वारसदार आम्ही 

 मिरवितो अभिमानाने फुगवून छाती

 लाभले भाग्य आम्हास

 गातो सभासद हित दक्ष  नेत्यांची गाणी

1)  चौथा वेतन आयोग समानीकरण अहवाल आणि रेखाचित्र शाखा आचार्यांच्या वेतन श्रेणी यांचे तौलोनिक दर्शन या विषयाबाबतची महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा  कार्य नियमावली  सूचना  पहिली पुस्तिका 1987 आणि दुसरी पुस्तिका 1994 साली प्रसिद्ध झाली...अत्यंत अभ्यासपूर्ण अपार कष्ट घेऊन आदरणीय श्रीकाझी साहेब यांनी ती तयार केली.

2)अनुरेखक संवर्गाला  सिव्हिलअसिस्टंट या पदाचा लाभ मिळवून देत 40रुपये विशेष भत्ता संघटनेने मिळवून दिला.

3)वेतन विषयक सुधारणा विषयी शासनाने नेमलेल्या डिपार्टमेंटल कौन्सिलवर ,आपल्या  संघटनेने प्रतिनिधित्व केलं

4) अखिल भारतीय  पातळीवर संघटनेने निवेदन सादर केली.. इतर राज्यातील संघटनांकडून... वेतन पुस्तिका मिळवत... उपयुक्त माहिती संकलित केली....  चौथा केंद्रीय आयोग अमंलात आल्यापासून , सर्व राज्यातील शासकीय केंद्रीय तुलनीय  पदासमान वेतन श्रेणी ची मागणी करू लागले त्या मागण्यांचे ध्रुवीकरण होऊ लागले .. म्हणून आपल्या संघटनेने, स्वतः प्रयत्न करत गुजरात राजस्थान हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश प. बंगाल, बिहार मध्यप्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश , केरळ तामिळनाडू या राज्यातील प्रांतिक रेखाचित्र शाखा संघटना पदाधिकाऱ्यांशी पत्राद्वारे संपर्क साधून या सर्व राज्यातील रेखाचित्र शाखा संवर्गातील , पदनामे शैक्षणिक अहर्ता वेतन श्रेणी स्टाफिंग पॅटर्न इत्यादी सर्व माहिती मिळवली त्यातून असे निदर्शनास आले भारतात केरळ राज्यातील रेखाचित्र शाखेत स्टफिंग पॅटर्न सर्वोत्तम आहे व त्यांच्या वेतनश्रेणी ही त्यावेळेस सर्वोत्तम होत्या. या माहितीच्या आधारे1994 मध्ये पाचवा वेतन आयोग जाहीर झाल्यावर आदरणीय श्री काझी साहेब सरचिटणीस म्हणून अखिल भारतीय पातळीवर एक इंग्रजी भाषेत निवेदन सर्व प्रांतांना पाठविले व पाचव्या वेतन आयोगात सर्वांनी समान वेतन श्रेणी ची मागणी करताना , मूळ पाया काय द्यावा सर्वांना परिपत्रकाद्वारे कळविले होते आणि त्यावर अनेक उत्साहवर्धक, प्रतिक्रिया त्यांना आल्या होत्या.

5) ड्रॉइंग स्टॉप युनियनच्या वार्षिक अधिवेशनात कलकत्ता येथे प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय श्री काझी साहेब व नागपूरचे श्री गंगाधरराव चहारे  यांच्यासह व त्यांच्या प्रयत्नाने उपस्थित राहण्याचा बहुमान मिळाला 2000 किमीचा प्रवास करत ही मंडळी  गेलीत ... तेथील लोकांनी त्यांची राहण्याची जेवणाची व परतीच्या तिकिटाच्या आरक्षणाची सोय केली होती.

 त्याचप्रमाणे त्यांनी अधिवेशनासाठी भित्तीपत्रके इंग्रजी व बंगाली भाषेत छापून घेतली होती .त्यात प्रमुख अतिथी म्हणून श्री एच .बी काझी, सरचिटणीस महाराष्ट्र असे छापले होते रेखाचित्र शाखा महाराष्ट्र राज्य चा हा सर्वोच्च गौरव होता.

 त्याचप्रमाणे श्री एच .बी काझी  साहेब ,जेव्हा मंचावर स्थानापन्न झाले तेव्हा त्यांचे सरचिटणीस श्री वसंत मुखर्जी, यांनी सर्व सभासदांना काझी सरांना अभिवादन करावे असे सांगितले आणि सर्व सभासदांनी त्यांना अभिवादन केले

त्यांच्या आयुष्यातील हा सर्वोच्च आनंदाचा  दुसरा क्षण होता.

६)मोलाच कार्य म्हणून राज्यातील इतर संघटनांशी सौख्याचे संबंध प्रस्थापित केले त्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

नगररचना व मूल्यनिर्धारण,महाराष्ट्र कृषी विद्यापीठ कर्मचारी संघटना यांच्या निर्मितीस आपत्या संघटनेचा मोलाचा हातभार लागला.तसेच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद ,रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेचेमुख्यालय नाशिक ला असल्यामुळे व त्या पदाधिकाऱ्यांनीआपल्याला सहकार्य करावेअशी सूचना केली होती ती संघटनेने सार्थ ठरवली.

७)नकारात्मक भूमिका असूनही  शासन स्तरावरून  आर्थिक मागण्या मान्य करून घेताना सकारात्मक भूमिकेत आणण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता व पाठपुरावा तसेच  यथार्थता खात्याचे सचिव वित्त सचिव मुख्य सचिव खात्याचे मंत्री मुख्यमंत्री यांना पटवून देणे हे त्या वेळी तारेवरची कसरत होती. आर्थिक राजकीय आणि खंदया नेत्यांचा अभाव , असतानाही आर्थिक मागण्या मंजूर करून घेणाऱ्यांमध्ये, महाराष्ट्रातील शासन मान्य संस्थांपैकी तुरळक संस्था होत्या ,त्यापैकी आपली एक संस्थाअग्रेसर होती.हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आर्थिक मागण्या मान्य करून घेताना

माननीय एकनाथ खडसे वित्तमंत्री,मा.नामदार नितीन गडकरी नागपूर,मा.नामदार महादेवराव शिवणकर भंडारा,मा.आमदार गिरीश बापट पुणे यांच्या अत्यंत मोलाचे सहकार्य मिळाले.

८)तसेच पश्चिम बंगालमधील  वार्षिक अधिवेशनाला  संघटनेचे दोन प्रतिनिधी हजर होते... नाशिक येथील केंद्रीय बैठकीत गुजरातचे दोन प्रतिनिधी प्रमुख अतिथी  म्हणून हजर होते... बडोदा येथे संघटनेचे सरचिटणीस हजर होते... अनेक राज्यांच्या संघटनेचाअभ्यास करून  संघटना बांधली गेली.... तेही अपुरे साधने असताना... संघटनेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची  निष्ठा बघता मानाचा मुजरा करावा वाटतो.

संघटन जिवंत ठेवण्याचे काम.... आदरणीय काझी साहेबा आणि आदरणीय मुळे साहेब यांच्याकडे जाते . याच काळात ....  साधारण 01/07/1997 मध्ये 

 आमोनिया प्रिट काढणे आणि  त्यामुळे अनुरेखकांना अमोनियाचा शारीरिक त्रास सहन करावा लागत ..... आणि कार्यक्रम हाती घेतला.... जोखीम  भत्ता मिळवणे.....  त्यांनी  त्यावेळी1990 मध्ये याबाबत थेट त्यावेळेच्या पंतप्रधानांना पत्राद्वारे मागणी करण्यात आली होती ते पत्र केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवले यावर शासनाने स्पष्टीकरणे व पुरावे मागितले सदर प्रकरण ५ ते ७ वर्ष प्रलंबित होते .पुन्हा त्यावर पत्रव्यवहार  सुरू झाला त्या अनुषंगाने डायरेक्टर हेल्थ पब्लिक सर्विसेस महाराष्ट्र शासनकडे प्रकरण पाठवले त्यांनीअमोनिया गॅस इंजुरिअस टू हेल्थ हे प्रमाणपत्र दिले . यावेळी डायरेक्टर यांना  मुंबई मंत्रालयात प्रत्यक्ष नेऊन ब्ल्यू प्रिंट काढण्याची प्रक्रिया दाखवून व समजावून सांगितले...त्यानंतर डायरेक्टर यांनी अमोनिया गॅस इंजुरिअस टू हेल्थ आहे .असा दाखला दिला.त्यानंतर1/7/ 97 रोजी अमोनिया जोखीम  भत्ता मंजूर करण्यात आला. संघटनेच्या 25 वर्षातील मागण्या मिळवण्याच्या धडपडी तील शासनाने मान्य केलेली पहिली आर्थिक मागणी या निर्णयाची नोंद होते...इतर आर्थिक मागण्या ही शासनाकडून मंजूर करून घेऊन असा आत्मविश्वास त्यामुळे बळवला.

तसेच जेंव्हा श्री.ए. बी. काझी सरचिटणीस होते तेंव्हा १९८६ ला ४था वेतन आयोग केन्द्रा प्रमाणे लागू करण्याचे राज्य शासनाने मान्य केले. परंतू त्या वेतन श्रेणीत तफावत होती.   संघटनेत आलेली मरगळ  त्यामुळे हा विषय र१९९६पर्यन्त केस रेंगाळला. 

स्व. श्री. प्रकाशजी परांजपे श्री शरद माटवणकर  यांना सोबत घेऊन संपूर्ण राज्यभर संपर्क दौरा केला व मरगळलेल्या संघटनेत चेतना निर्माण केली. 

       त्या वेळचे कोंकण विभागीय सचिव  स्व.श्री. प्रकाशजी परांजपे यांना आदरणीय काझी साहेबांनी मोठ्या मनाने पुढाकार देत शासनाशी ४थ्या वेतन आयोगातील तफावती बाबत पत्रव्यवहार सुरु केला. त्या वेळी सा.बा. व पाटबंधारे विभागाचे प्रस्ताव मंत्रीमंडळा समोर मांडताना अभियंता संवर्गाचे (वर्ग १ व २चे) प्रस्ताव सा.बा.चे अभिप्राय घेऊन पाटबंधारे विभाग मांडत असे व वर्ग ३ व ४चे प्रस्ताव पाटबंधारे विभागाचा अभिप्राय घेऊन सा.बा.विभाग मांडत असे. त्याचवेळी योगायोगाने पुण्याचे तत्कालीन  मा.आमदार श्री.गिरीशजी बापट साहेब यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले ...आणि त्यांचे पी.ए श्री अरुण जोशी सर( पुणे अनुरेखक) यांनी त्यांचा संपर्क  घडवून आणला आणि पुढे मदत मिळत गेली अनुरेखक  संवर्गाचा प्रस्ताव मंत्री मंडळाचे बैठकीत मांडण्यापूर्वी अभिप्रायासाठी पाठबांधारे विभागाकडे आला असता योगा योगाने ते प्रकरण सद्या संघटनेचे मंत्रालय संपर्क प्रमुख असलेले श्री.बन्सिलाल राठोड याचे जेष्ठ बंधू यांचे डेक्सवर गेला. त्याचवेळी या विषया बाबत शासनाकडे विचारणा होत होती ती बाबही त्यांचे कडून समजली व प्रकरणाला गती देण्या साठी  त्यावेळी श्री काझी साहेबानी त्यावर तौलनिक विवेचन करणारी एक अभ्यासपूर्ण पुस्तिका तयार केली होती. श्री.काझी / विधर्भातुन श्री. भंडारकर(उपाध्यक्ष),श्री.निमकर.../ पुण्याहून श्री.बनकर व श्री. शिन्दे/ मिरजहून श्री. मुलानी /श्री.चव्हाण/ लातूरचे श्री.विनायक जोशी /जळगांवहून श्री.पी.जी.राणे, नरेन्द्र महाडीक रायगड( यांनी त्यावेळचे अर्थमंत्री मा. एकनाथजी खडसे साहेब यांच्याशी पदाधिका-यांची बैठक घडवून प्रकरण मार्गी लावण्यास मोलाचे सहकार्य केले.) मुंबईतून सा.बा.चे श्री. कावजी व श्री. निमकर, पाटबंधारे विभागातील स्व.श्री.पाटील व श्री. शशिकांत नाईक 

असे सर्वजण दिवस रात्र एक करुन ४थ्या वेतन आयोगातील तफावत ( अनुरेख मु.वे.९७५/- ऐवजी १२००/- साहय्यक आरेखक १२००/- ऐवजी १४००/- व आरेखक १४००/- ऐवजी १६००/-) दुर करण्यासाठी झटत होतो. या प्रकरणातील दोन किस्से अर्जावून सागण्या सारखे आहेत. १) हे प्रकरण जेंव्हा वित्त विभागाकडे श्री.लागवणकर, उप सचिव यांचेकडे आभिप्राया साठी गेले होते तेंव्हा त्यांनी आजच्या आज त्रुटीची पूर्तता करण्यास सांगितले तरच दुसऱ्या दिवशी मंत्री महोदयांचे सहीसाठी ठेवता येईल. त्यावेळी   श्री शरद पाटणकर ती त्रुटी पूर्ण  करण्यासाठी रात्री ११ वा, त्यांचे घरी सर्व पदाधिका-यांसह (२० ते२५ जण ) घेऊन पोहचले. 

२) वेतनत्रुतील तफावत दूर करण्याच्या प्रस्तावाबाबत श्री. पी.जी.राणे यांनी मा.एकनाथजी खडसे (वित्तमंत्री) साहेबांची भेट पहाटे ५.००वा.मुंबईत बंगल्यावर निश्चित केली त्यानुसार श्री.परांजपे, श्री.बनकर,श्री.शिन्दे,श्री.शशि नाईक, श्री.पाटील,श्री. बन्सिलाल राठोड व स्वतः मी साहेबांचे भेटीस जाऊन विषय समजावून सांगितला. त्यावर मा. खडसे साहेबांनी सकाळी १०.००वा. मंत्रालयात बोलावले ,ही सर्व  ,मंडळीमंत्रालयात पोहलो तर BJPच्या वडाळा येथील एका कार्यालयात चिंतन बैठकीस साहेब गेले होते. फाईलवर सही घेणे गरजेचे असल्याने उत्साहाचेभरात हि मंडळी वडाळ्यास फाईल घेऊन पोहचले. लाॕबीत उभे असताना सा.बा.मंत्री मा. नितीनजी गडकरी साहेबांनी त्यांना  पाहीले व फाईल घेऊन तुम्ही येथे कसे ? असे म्हणून त्यांच्यावर  कारवाई करण्याच्या हेतूने त्यांचे P.A.ला सांगितलं परंतू यांचे  नशिब व सभासदांचे आर्शिवाद ऐनवेळी मा. खडसे साहेबा तेथे पोहचले व त्यांनी मा.गडकरी साहेबांना "हि माणस माझी आहेत" आसे सांगून कारवाई होण्यापासून ही मंडळी वाचली. असे पिसाटल्या सारखे सर्वजण  कार्य करित होते.

 मा.सुकथनकर सामिती पुढे संघटनेचे म्हणणे मांडून ४थ्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी ७/५/४ वर्षाच्या अहर्तताकारी सेवे नंतर केंद्राप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करुन घेतली. (त्या वेळेस राज्यभरातून २५-३० जण जमत असत, त्यांचा पाहूणचार आमदार निवासातील कॕन्टीनमध्ये ठाणे जिल्ह्याचा सचिव म्हणून शरद माटवणकर करित होतो.) तेंव्हा संघटनेची आर्थिकस्थिति नव्हती. लढानिधि काढणेही शक्य नव्हते. त्याच वेळेस १२ वर्षानंतरची आश्वासित प्रगती योजनेच्या लाभामुळे व ५व्या वेतन आयोगातील श्रेणीमुळे आरेखक संवर्गाची वेतन श्रेणी लिपिक संवर्गापेक्षा अधिकची झाल्यामुळे त्यांचा पोटशूळ उठला व त्यांनी आक्षेप नोंदवायला सुरवात केली.  ५व्या वेतन आयोग लागू होण्यापूर्वी  सभासद लढानिधि देण्यास चालढकल करु लागले.

झिरो बजेट लागू झाल्याने आपली पदे वर्ग 4 मध्ये समावेशन सुरू झाले यावेळी संघटनेची  जास्तच गरज भासू लागली आणि मग दुसरा कालखंड संपून ती तिसऱ्या कालखंडाची चाहूल लागली.


झिरो बजेट लागू झाल्याने आपली पदे वर्ग 4 मध्ये समावेशन सुरू झाले यावेळी संघटनेची जास्तच गरज भासू लागली आणि मग दुसरा कालखंड संपून  तिसऱ्या कालखंडाची चाहूल लागली.

        26 जून 2001 मध्ये रेखाचित्रशाखा राज्य कार्यकारिणीची सर्वसाधारण सभा व पदाधिकारी निवड कार्यक्रमासाठी आदरणीय श्री  प्रमोद  मुळे सरचिटणीस साहेब यांनी संघटनेच्या वतीने अहमदनगर येथे सभा आयोजित केली.

        राज्यभरातून सभासद मंडळी आली काही जिल्ह्यांचे सभासद आदल्या दिवशी हजर होते नवीन नेतृत्व कोण असेल यावर अनेक चर्चा रंगल्या अहमदनगर जिल्हा शाखेने चोख व्यवस्था ठेवली होती दुसऱ्या दिवशी सभेला सुरुवात झाली मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात उपाध्यक्ष ,सरचिटणीस, कोषाध्यक्ष ही पदे निवडली गेली अखेर अध्यक्षपदासाठी दोन नावे समोर आली स्वर्गीय श्री प्रकाश परांजपे, अनुभवी व अत्यंत हुशार आणि स्वर्गीय श्री रावसाहेब कोरे ...कोरे साहेब हे सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून 1999 ते 2001 पर्यंत काम बघत होते. उत्कृष्ट संघटनआणि कौशल्यपूर्ण नियोजनाद्वारे झिरो बॅलन्स असणाऱ्या जिल्हा संघटनेकडे सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे एक लाख रुपये बॅलन्स उभा केला आणि त्याच्या वार्षिक व्याजातून प्रत्येक जिल्हा सभासदाचा एक लाख रुपये अपघाती विमे काढून घेतले होते. केंद्रीय कार्यकारिणीचा काहीही अनुभव नव्हता तरीही

त्यांची ही कामगिरी बघून  हे नवीन 

 नेतृत्वाला अध्यक्षपदाचा मान मिळाला.

 उपाध्यक्ष --श्री अरुण जोशी पुणे

सरचिटणीस --श्री प्रमोद मुळे अहमदनगर

कोषाध्यक्ष-- श्री विवेक ठकार यांची निवड राज्यकार्यकारिणीवर झाली.

       संघटने पुढेअतिरिक्त ठरत असलेले अनुरेखक संवर्गातील पदे त्यांच्या समायोजन बाबतचा गंभीरप्रश्न होता.आकृतीबंधमुळे

सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागात ४८८व २७५  पदे अतिरिक्त ठरत होती.

 चौथा व पाचवा वेतन आयोगातील वेतन श्रेणी अनुरेखक संवर्गाला मिळाली पण शासनाने टप्प्याटप्प्याने ही पदे संदेशकवर्ग 4 मध्ये समायोजन करण्यास सुरुवात केली...हे 2001 जी  आर नुसार चुकीचे समायोजन होते.

  पुणे परिमंडळातील पस्तीस-चाळीसअनुरेखक संदेशक म्हणून भीतीपोटी हजर झाली.

मुकादम ,शिपाई ,कारकून जर सिव्हिल असिस्टंट होऊ शकतो तर अनुरेखक का नाही ? श्री सुनील सुर्वे सर यांनी

यावर  सविस्तर अभ्यास केला आणि त्यावेळी मंत्रालयात डेक्सवर असणाऱ्या आघावसाहेबांना  हे समायोजन 2001 चा जीआर प्रमाणे कसे चुकीचे आहे हे मोठ्या धाडसाने सांगितले

त्याचा परिणाम असा झाला की संदेशक पदावरील समायोजन तिथेच थांबवलं गेलं.

        याविरुद्ध सरकारवर डाव टाकायचा सरचिटणीस प्रमोद मुळे व अशोकजी निमकर साहेब व पदाधिकार्‍यांनी चर्चा करून ठरवलं.अनुरेखकला पद प्रतिष्ठा आणि वेतन मिळूनच द्यायचं!!!

            याबाबतचा सविस्तर अभ्यासपूर्ण प्रस्ताव  श्री प्रमोद मुळे सर यांनी तयार केला आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव झाली आणि नागपूर अधिवेशन कालावधीत  शासन दरबारी मांडायचे ठरले.

             त्यावेळेची सांगलीचे माननीय आमदार   दिनकर तात्या पाटील व , हापीजी धत्तुरे साहेब हे होते.आमदार   दिनकर तात्या पाटील महाराष्ट्र एक्सप्रेस ने सांगलीहून नागपूरला चालले होते त्यावेळी माननीय कोरे साहेबांनी  प्रत्येक जिल्हा शाखेला सूचना दिली होती की जिल्हाध्यक्ष व सभासदांनी  त्या त्या थांब्यावर स्टेशन वर जाऊनआमदारांचा सत्कार करायचा त्याप्रमाणे प्रत्येक जिल्हाध्यक्ष ने सांगली ते नागपूर दरम्यानच्या स्टेशन वर जाऊन हार , पुष्पगुच्छ व मिठाई  देऊन सत्कार केला व आपल्या अडचणी सांगितल्या ,आमदार साहेब ज्या बोगीत होते त्या बोगीतील तीन सीट चा बाक हार  पुष्पगुच्छ व मिठाई ने भरून गेले होते. त्यांच्यासोबत असलेले 40 आमदार त्यांना विचारत की असं तुम्ही कुठलं मोठं काम केलं आहे कि सगळेजण प्रत्येक स्टेशनवर हार फुले आणि मिठाई घेऊन येत आहे.

   त्यावेळी विदर्भाचे विभागीय सचिव म्हणून श्री दारूनकर साहेब काम  बघत होते, त्यांच्यासोबत माननीय श्री निमकर साहेब ही होते.

       सहाय्यक अभियंता पद मिळावे यासाठी केलेल्या प्रस्तावाची फाईल , शशिकांत साहेब नाईक यांच्या मदतीने व पाठपुराव्याने मंत्रालयातून तयार होऊन नागपूर अधिवेशनात ती सादर करून त्यावर त्यावेळेचे एरीगेशन मंत्री माननीय श्री पद्मसिंह पाटील सही घेणे त्यावर आवश्यक होते.ही जबाबदारी कोरे साहेबांनी दारूनकर साहेबांवर सोपवली होती  दारूनकर साहेबांवर  भावनिक प्रेशर होतं की कुठल्याही परिस्थितीत त्या फाइलवर सही झालीच पाहिजे .

मंत्री साहेबांकडे तीन वेळेस ती फाईल गेली तरीही त्याच्यावर करतो करतो म्हणून सही होईना शेवटी आमदार साहेब दिनकर तात्या पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सांगतो असं सांगितल्यानंतर त्यावर  मंत्री साहेबांनी सही केली आणि इथेच आपला मोठा विजय झाला राजकीय इच्छाशक्तीचा मोठा फायदा घेत कोरे साहेबांनी , रेखाचित्र संवर्गास सहाय्यक अभियंता पद मिळवत पद प्रतिष्ठा व वेतन मिळवून दिले.

 जलसंपदा विभागाचा पद्धत समावेशनचा  शासन निर्णय काढण्यात संघटनेस यश आले .2003 ला नागपूर मजदूर भवनात त्यावेळचे माननीय आमदार  श्री दिनकर तात्या पाटील व हाफिज धत्तुरे साहेब यांना निमंत्रित करून सभा बोलविण्यात आली होती.

    माननीय कोरे साहेब हे त्यावेळेस एचडी एम होते  एचडी एम हे शेवटचे प्रमोशन असल्यामुळे  समकक्ष पद मिळवत राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक हे  पद त्यांच्या हिंमतीवर मिळवत दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये रुजू झाले.

       उपाध्यक्ष अरुण जोशी साहेब हेही सिव्हिल असिस्टंट पदावर रुजू झाले होते.

अध्यक्ष व  उपाध्यक्ष हे दोन्ही पदे रिक्त  झाल्याने संघटनेस पुन्हा मरगळ आली....आणि संघटनेस पुन्हा खंबीर नेतृत्वाची गरज भासली.

अध्यक्ष व  उपाध्यक्ष हे दोन्ही पदे रिक्त असल्यामुळे वर्षभर संघटनेस मरगळ आली होती.

     हे बघून कोरे साहेब, अरुण जोशी साहेब ,विवेक ठकारसाहेब अशोक निमकर साहेब  यांनी पुणे येथे मिटिंग बोलावली त्यावेळी बापट साहेब ही उपस्थित होते, अध्यक्षपदासाठी दोन नावे समोर आले शशिकांत नाईक साहेब आणि दारूनकर साहेब.कोरे साहेबांनी दोघांनाही पदावर आल्यानंतर काय काय कामे कराल असे विचारले असता नाईक साहेबांनी आपण मंत्रालयातील कामे करू परंतु महाराष्ट्रभर फिरून होणार नाही असे सांगितले परंतु दारूनकर साहेबांनी मी महाराष्ट्रभर फिरायला तयार आहे  असे सांगितले निमकर साहेबही या पदासाठी त्यावेळी दावेदार होते  परंतु त्यांनी मोठ्या मनाने तुम्ही हे पदत सांभाळा आम्ही सोबत आहोत सांगितले शशिकांत नाईक साहेबांनी ही दारूनकर साहेबांना

तुम्हीच अध्यक्षपद घ्या म्हणून सांगितले. 

 24 जानेवारी 2005 रोजी त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. सूत्रे हाती घेताच  आम सभेनंतर  त्या सभागृहात केंद्रीय कार्यकारिणीची बैठक घेऊन संघटने पुढे उभ्या असलेल्या मागण्यांची माहिती केंद्रीय कार्यकारणी पुढे ठेवली

दारूनकर साहेब हे जलसंपदा विभागात 1982 साली रुजू झाले होते, नागपूर येथे 1984 रोजी प्रशिक्षण वर्गात त्यावेळचे संघटनेचे सरचिटणीस काझी साहेब आले होते, त्यांनी संघटनेची दिलेली माहिती व मागण्या याबाबत उत्तम मार्गदर्शन केलेआणि दारुणकर सरांना त्याविषयी विशेष आवड निर्माण झाली, तेव्हापासून ते सर्व संघटनेच्या सभांना उपस्थित राहून संघटनेविषयी माहिती घेऊ लागले

2000 ते 2005 , अध्यक्ष कोरे साहेबांच्या काळात ते विभागीय सचिव म्हणून  11 ,जिल्ह्यांचे काम बघत होते त्या 11 जिल्ह्यांमध्ये संघटन घडवून आणले व संघटनेविषयी तळमळ निर्माण केली अध्यक्षांना ही आपल्या ड्राफ्टिंग कौशल्याने प्रभावित केले व अध्यक्ष यांसोबत मंत्रालयातील कामांसाठी उपस्थित राहिले असा हा धडाडीचा कार्यकर्ता,

महाराष्ट्रातील सभासदांना विश्वासात घेण्यासाठी स्वखर्चाने  18 दिवसांची अर्जित रजा काढून आदरणीय अशोक जी रेवतकर जी सर प्रशांत कहाते कडू साहेब यांच्यासमवेत त्यांनी महाराष्ट्र दौरा केला मागण्यांचे माहितीपत्रक तयार करून सर्व जिल्ह्यांना पोहोचविले त्या मागण्या पूर्ण करून जणू असे वचन दिले, संघटने पुढे उभ्या असलेल्या मागण्यांचे प्रस्ताव तयार करून मंत्रालयात सादर  केले यासाठी माननीय आमदार गिरीश बापट साहेब व सुधीर मुनगंटीवार साहेब यांची मदत चंद्रपूर जिल्हा व पुणे जिल्ह्याच्या मदतीने मिळाली व मंत्रालयातील कामे जलद गतीने करून घेतली.

मंत्रालयीन प्रस्तावात पुढील मागण्या सादर केल्या

आकृतिबंधातील जलसंपदा विभागाचा शासन निर्णय झाला होता, परंतु 1) सार्वजनिक बांधकाम विभागातील 488 कर्मचाऱ्यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी   समावेशन  करणेबाबत अनुरेखकांचा रोष होता.

2) समावेशन  नंतरची वेतनश्रेणी संरक्षित करणे .

3)वेतन निश्चिती मधील(7.5.4.वर्षाच्या सेवेचा) खुलासा काढणे .

4) आकृतीबंधात गोठवलेले 50 टक्के पदे पूर्ववत मिळविणे.

 5)दिनांक 1 जानेवारी 1996 पासून च्या वेतन त्रुटी माननीय सुकथनर समितीचे अहवालानुसार लागू करणे.

6)चौथ्या वेतन आयोगा पासूनचे पदनाम बदलाची मागणी मंजूर करणे.

     या सर्व मागणीचे प्रस्ताव शासनास सादर करून नियमितपणे पाठपुरावा, माननीय आमदार महोदय यांची मदत सचिव  पर्यंत घेणे.नागपूरचे हिवाळी अधिवेशन काळात 16 डिसेंबर 2005 मध्ये नागपूर येथे नानिवडेकर सभागृहात पहिले विदर्भ स्तरीय अधिवेशन माननीय आमदार यांचे उपस्थित घेतले होते या तीनशे सभासद उपस्थित होते दरवर्षी संघटनेच्या मागण्यांचे अहवाल सभासदा पर्यंत पोहचवणे करिता प्रिंटेड ब्रोशर काढून संघटनेच्या कामाचीअद्यावत माहिती सभासदा पर्यंत पोचवली होती.

          प्रथम सार्वजनिक बांधकाम विभागातील 488 अनुरेखक त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता नागपूर हिवाळी अधिवेशनात तब्बल 44 आमदारांचे शिफारस पत्र घेऊन मुनगुंटीवार साहेब व गिरीश बापट साहेबांच्या मदतीने तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ साहेबांकडे भेट घेतली.भुजबळ साहेबांनी सचिवांना संघटनेसोबत मिटिंग घेऊन मागण्यांवर योग्य कार्यवाहीचे आदेश दिले.सचिव माननीय देवदत्त मराठी सार्वजनिक बांधकाम यांनी संघटनेसोबत मिटिंग घेतली संघटनेने सर्व मागण्यांचा जणू पाढाच त्यांच्यापुढे ठेवला त्या बैठकीत सकारात्मकता होती.बैठकीच्या इतिवृत्ता ची प्रत प्राप्त करून मागण्यांचा अखंड पाठपुरावा कसोशीने केला.

याचाच परिणाम म्हणून पुढे एका पाठोपाठ एक मागण्या मंजूर  घेतल्या.

1)अतिरिक्त कर्मचार्‍यांची आहेत इस वेतन श्रेणी ठेवणे बाबत वेतन श्रेणी संरक्षणाचे पत्र जलसंपदा विभाग क्रमांक वेतन1205/आ.ता दि.२७/०९/२००५ रोजी काढले.

२) सार्वजनिक बांधकाम विभागातील 488 अनुरेखक  यांचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी समावेशनाचे शासन निर्णय क्रमांक ईएसटी/२००५/प्र .क्र १४९/सेवा_३दि.१९ जुलै२००६

३) अहर्ता प्राप्त नसलेल्या कर्मचाऱ्यांना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाचे दोन महिन्यांचे ट्रेनिंग करीता दिनांक २० नोव्हेंबर२००६ ला  पत्र काढून ट्रेनिंग सुरू केले.

४)१ जानेवारी 1996 चौथ्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी ची पूर्णतेचा प्रमुख आरेखक चौथ्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीची पूर्णतेचा प्रमुख आरेखक पदाचा , ग्रेड ६५००_१०५०० शासन निर्णय क्रमांक १२०१/प्र.क्र.४ सेवा९ /विवि दि२७/०२/२००६व शुद्धिपत्रक दिनांक 24/ 1 /2007 रोजी काढले.

5)2001 आकृतिबंधात 50%गगोठलेली पदे पूर्ववत मिळवण्या बाबतचा शासन निर्णय जलसंपदा चा दिनांक 26 डिसेंबर 2007 रोजी काढण्यात आले.

6) पदनाम बदल चौथ्या वेतन आयोगापासून ची मागणी वित्त विभागाकडे शासन निर्णय क्रमांक व दिनांक 29 जुलै 2009 रोजी काढले.

      या सर्व मागण्या मंजूर झाल्याने माजी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदनाचे एकापाठोपाठ एक फोन येऊ लागले वेतन त्रुटी मिळाल्याने राज्यभर सभासदांना आनंद झाला तर चौथ्या आयोगापासून पदनाम बदलाची मागणी मंजूर झाल्याने तत्कालीन सरचिटणीस आदरणीय श्री काझी साहेबांनी वेतन त्रुटीसह प्रत्यक्ष त्यांना फोन करुन अभिनंदन केले तेव्हा त्यांना फारच बरे वाटले काळजी काझीसाहेबांनी 1984 येथील नागपूर बैठकीतील वक्तव्याने भारावून गेलेले आणि संघटनेत त्यामुळेच उडी घेतलेले दारूनकर साहेबांना ही मोठी शब्बासकिची व आनंदाची थाप होती .त्यातून  सभासदाच्या जीवनाचे जीवनाचे सार्थक झाले होते.

 वरील सर्व मागण्या पूर्ण करताना सभासदांचे सहकार्य लाभले होते .  राजकीय पाठबळ तसेच काही ओळखी त्यात सेंट्रल गव्हर्नमेंट चे प्रफुल्ल गुरुजे पाटील साहेब उद्योग मंत्री, तसेच त्यांचे पीए,आगाखेड साहेब नागपूर कडा  पीए साहेब होते.

यांच्या मदतीने वेतनश्रेणीचाअभ्यास करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट चे सगळे जीआर मिळवले. त्यातील एक अटेस्टेड कॉपी चा एक जीआर मिळवला जो प्रस्ताव सादर करताना त्यात लावण्यात आला होता, दारूनकर सरांसोबत शशिकांत नाईक साहेब,

 सुनील सुर्वे सर ,निमकर सर असत, तसेच चंद्रपूरचे तुम्मावार सर आणि संजय धरणे साहेब यांनीही अस्थी गावांमध्ये  सुधीर  मुनगंटीवार आमदार साहेबांसोबत मिटींग लावली होती .त्याचा उपयोग मागण्यांचे प्रस्ताव मंजूर करताना झालेत,तसेच,पुण्याच्या अरुण जोशी साहेब जे आमदार गिरीश बापट साहेबांचे पीए होते ,यांच्या मदतीने ही राजकीय पाठबळ मिळाले..तसेच इतर संघटन कार्यासाठी नाशिकचे बाबा गांगुर्डे ,गडचिरोलीचे तम्मावार त्यांनी उत्कृष्ट संघटन घडवून आणले.

वरील सर्व मागण्या पूर्ण झाल्याने ,जल्लोष करण्यासाठी 10 जून 2007 रोजी , बालगंधर्व रंगमंदिर येथे संघटनेचे भव्यदिव्य अधिवेशन आयोजित केले होते अधिवेशनात वचनपूर्ती स्मरणिकेचे विमोचन हा सह आनंदोत्सव साजरा केला.

अधिवेशनात वचनपूर्ती स्मरणिकेचे विमोचनासह आनंदोत्सव साजरा केला गेला.या कार्यक्रमात मा मंत्री रामराजे निंबाळकर

जलसंपदा विभागाचे सचिव व्यंकटराव गायकवाड, माननीय आमदार गिरीश बापट यांच्यासह इतर अधिकारीही उपस्थितयांच्यासह इतर अधिकारीही उपस्थित होते, सभागृह महाराष्ट्र रेखाचित्र संघटनेतील सर्व सभासदांनी खच्चुन भरून गेला होता . 

मा. अध्यक्ष जकी अहेमद जाफरी यांचा कार्यकाळ: ( २२ एप्रिल २०१८ ते आजतागायत)

( लेखक: श्री. राजेंद्र करपे )

२२ एप्रिल २०१८ संघटनेच्या ४४ वर्षाच्या आयुष्यातील सुवर्णपहाट घेउन उगवलेला दिवस..त्या सुवर्ण किरणांनी अक्षरशः न्हाउन निघाली आपली संघटना... आपल्या संघटनेचा आजवरचा इतिहास व प्रतिष्ठा तशी पहिल्यापासुन किर्तीमानच होती..अनेक दिग्गजांनी आम्हा सदस्यांच्या दिलावर राज्य केले ह्रदयात आदराचे स्थान मिळवले आमचे प्रश्न अडचणी सोडविल्या अनेक लाभ प्राप्त करुन दिले त्या सर्व दिग्गज मान्यवरांचे आम्ही ऋणी आहोतच व सदैव राहणार... याच परंपरेला मधल्या काही काळात ग्रहण लागले..त्या कार्यरत पदाधिकार्यांच्या चांगल्या व वाईट कार्याचेही पडसाद नकारात्मक वार्यासम झोंबू लागले संघटना दिशाहिन झाली..संघटनेत नव्या दमाचा व जुन्या दमदारांचा समन्वय बिघडला...नेतृत्व कुठे आहे हे नवोगतांना कळेना व नेतृत्व असे का करते हे संघटन मित्रांना कळेना...बदल..बदल..आणि बदल हाच एकमेव उपाय या प्राप्त परिस्थितीवर येउन ठेपला....तथाकथितांनी काही हिताचे कार्ये केली होती अतिशय कुशल नेतृत्व अभ्यासु कर्तृत्ववान पदाधिकारी असुनही मर्यादित कालसिमेच्या लक्ष्मणरेषा ओलांडून संघटनेला सहजतेने घेताना त्यांची गच्छंती अनिवार्य ठरली..पण हे शिवधनुष्य उचलावे कोणी हा बदल घडविण्याचे साहस करावे तरी कोणी ? महाराष्ट्रातील सर्व जिल्हा शाखा निद्रावस्थेत गेल्या असताना मराठवाड्यातुन संघटनेचा घोर करीत असलेले काही निद्रावस्थेत घोरणारे हळु हळू संघटन नेतृत्वाच्या शिवधनुष्य पेलवण्याचे स्वप्न पाहु लागले.. ...सोशल मिडीया माध्यमाचे हाती शस्त्र होतेच..व हातातील लेखणी व चाणक्यनितीचा वापर व पलिकडील कच्चेदुवे हेरुन रणनितीचे आराखडे आखले गेले...एव्हाना सर्वदुर निद्रालोप होत राहीला ...सुरात सुर मिसळले..कडीला कडी जोडत संघटन मित्रांची साखळी तयार होत गेली ..सर्व जुने नवे नेते प्रणेते शिलेदार साथी सोबती लिहीते झाले..आपल्या मनातले विचार मांडु लागले ..सोशल मिडीया व्हाट्सॲप्स फेसबुक जणु काही विचारांचे व्यासपीठ बनले...विचारांच्या आदान प्रदानाचे पेव फुटले...अनेकाअनेकांचे संवाद सुरु झाले..केंद्रिय पदाधिकार्यावर दबाव वाढत चालला...बैठकांवर बैठका आयोजित होत गेल्या...कुणाची मनधरणी तर कुणाचे समर्थन तर कुणाची हेटाळणी कुणाला विरोध कुणाचा हट्ट तर कुणाचा आग्रह असे घडत चालले..अनेक लहानमोठे मान्यवर उपदेशकर्ते झाले तर काही मागील कळा सोसलेला इतिहास उगळु लागले.. या धामधूमित मराठवाड्यातुन प्रमुख नेतृत्व मागणीचा हट्ट जोर धरु लागला..या नेतृत्वास जनसदस्यांतुन एकदिल पसंती मिळत राहीली.. तरीही पलिकडील एका बाजुने नवीन कार्यकारीणीच्या नेतृत्वास गृहीत धरुन जुण्याच बाटलीचे फक्त आवेष्ठण बदलण्याचे धोरण आखले...जनसदस्यांनी प्रचंड जोर धरला उत्कंठा शिगेला पोहचली..प्रतिष्ठेची चुरस लागली ...या धुमाकुळीत आमसभेतच नव नेतृत्व उदयास येणार हे निश्चित झाले..स्थळ काळ वेळ आयोजक सर्व काही ठरले...  आणितो सुदिन उगवला..दिनांक २४ एप्रिल २०१८ प्रभारी अध्यक्षांनी आमसभेचे सगळे सोपस्कार पार पाडले..अनेकांनी आपले संघटन प्रेम व्यक्त केले..अख्या महाराष्ट्रातील सदस्यगण या कुंभमेळ्यात सामिल झाले...आमसभा आयोजनाची धुरा समर्थपणे करवीरनगरीतील वीरांनी निभावली..आजवरच्या मंथनातुन चौदा रत्ने केंद्रीय कार्यकारीणीच्या रुपाने हाती लागले...महत्वाचे अमृत रत्न आम्हा मराठवाड्याच्या पदरात पडले ते अमृत पळविण्याच्या प्रयत्नात अमृत हिसकावणारेच रणछोड झाले...अखेर सत्य व प्रयत्नांचा चिकाटीचा व सच्या संघटन प्रेमाचा विजय झाला...संघटनेला संजीवणी मिळाली नवा भिडू नवे राज्य सुरु झाले.....वर्ष कधी संपले कळलेच नाही संघटनेच्या कार्याचा वर्षभराचा आलेख चढताच राहीला...वर्षभराचे सिंहावलोकन करतांना मा.अध्यक्ष व कार्यकारीणीने अनेक महत्वाचे कार्य सिद्धीला नेले..व अजुनही सकारात्मक दृष्टीने यशस्वी कार्ये करत आहे..आम्हाला सार्थ निवडीचा सार्थ अभिमान आहे...परंतु अजुनही एक शल्य कायम बोचत आहे आमच्या मनी...हि आमसभा हि निवड प्रक्रिया हे काही धर्मयुद्ध नव्हे...किंवा बांधावरील भाउबंदकीचे भांडणे नव्हे..राजकीय पक्षांतर्गत स्पर्धा नव्हे...संघटनेत आपण सर्व समसमान आहोत..सर्व सदस्य आपण एकाच कुटुंबातील सदस्य आहोत..मग अद्यापही मागील सन्माननीय पदाधिकारी इतके रुष्ठ का ?  त्यांनी संघटनेच्या मुळ प्रवाहात सामिल व्हायला पाहीजे होते..पण का कोण जाणे अनेकदा विनवण्या करुनही प्रतिसाद नाही..त्यांची साथ आम्हाला हवीय त्यांच्या अनुभवाचा लाभ नवोगतांनाही आवश्यक आहे..पण का कोण जाणे यांचा हट्टधर्म जाईल केंव्हा...असो..मित्रांनो संघटनेला अच्छे दिन आले ..वर्षभरात चांगले निर्णय चांगले कार्ये करण्याचा प्रयत्न केला..अध्यक्ष व पदाधिकारी कुठे चुकतही असतील तर आम्हा दोन्ही सल्लागारांच्या कानी घाला...सुधारणेचे प्रयत्न अविरत चालु राहतील...संघटना आपली आहे आपण संघटनेचे आहोत....//सामर्थ्य  आहे चळवळीचे/...जो जो करील तयांचे//... संघटित रहा.. संघर्ष करा..येणारा काळ आपलाच आहे ..विजय आपलाच आहे...

महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा    कर्मचारी संघटना   संघटनेची यशस्वी गरुडझेप                
 १) आरेखक संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना  Auto Cad चे प्रशिक्षण विभागीय प्रशिक्षण केंद्र ( R.T.C.) वाल्मी औरंगाबाद  मार्फत आयोजन करण्यात संघटनेला यश प्राप्त झाले.. संघटनेच्या प्रयत्नामुळे वर्ष 2019, 2020 या कालावधीत पाच प्रशिक्षण वर्गाचे आयोजन झाले.व आरेखक संवर्गाचे अनेक कर्मचारी यांना AUTO CADE चे प्रशिक्षण मिळाले.. 
२) १.१ १९९६ ते ३१.०३ २००६ या कालावधीतील ५ व्या वेतन आयोगातील वेतन त्रृटीतील थकबाकीचा लाभ रोखीने मीळणेबाबत  दि.02.02.2019 रोजी शासनास निवेदन देण्यात आले. सप्टेंबर 2019 ला मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्याधिकरण (MAT) खंडपिठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केली व 15.12.2020 मा. न्यायालयाने संघटनेच्या बाजुने न्याय निर्णय  दिला. त्या निर्णयाच्या अनुषंगाने जलसंपदा,सा.बां.विभाग,जलसंधारण,पाणीपुरवठा,या विभागाकडुन शासन निर्णय जुन , जुलै , ऑगस्ट मध्ये निर्गमीत करून घेतले.  या महत्वपुर्ण संघटनेच्या कामगीरीमुळेअनेक कर्मचारी आर्थिक दृष्ट्या लाभान्वित झाले,यात विशेषतः सेवानिवृत्त तसे मयत कर्मचारी बंधुनाही आर्थिक लाभ झाला.
३) सरळ सेवेने नियुक्त सहायक आरेखक, आरेखक यांच्या पदोन्नती करीता पहीले पत्र दि.02.08.2018 रोजी शासनास सादर केले व दि.22.10.2021 रोजी पदोन्नती संदर्भात सविस्तर आदेश काढले व सरळ सेवेच्या  कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती बाबत मार्ग मोकळा झाला.. .
४) राज्यातील वेतन पडताळणी पथक कार्यालयाने दुसरी आश्वासित प्रगती योजना २४ वर्षाचा लाभ संदर्भात संभ्रम तथा अडसर निर्माण करून सेवानिवृत्त आरेखक कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन देयके रोखलेली असताना  संघटनेने १७.०६.२०१९ रोजी संचालक लेखा व कोषागार, मुंबई यांना निवेदन दिले व सातत्याने पाठपूरावा केला  दिनांक ११.०१.२०२० रोजी वित्त विभागामार्फत वेतन पडताळणी कार्यालयांना  सुचना देण्यात आल्या व दि.२३.०१.२०२० रोजी संचालक वित्त विभाग मुंबई यांनी  सर्व वेतन पडताळणी पथक कार्यालयांस २४ वर्षाच्या आश्वासित योजनेचा लाभ लाभ देण्याबाबतआदेशवजा पत्र काढले..  संघटनेची हि अत्यंत महत्वाची कामगीरी आहे अन्यथा अनेक  सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वेतन रोखले जाउन कायमचे आर्थिक नुकसान झाले असते.
५) दि.०८.११.२०१९ चे पत्रान्वये संघटनेचा लेखापरिक्षण अहवाल (Audit Report) शासनास सादर करण्यात आलेला आहे..
६)  सातवा वेतन आयोग समिती समोर संवर्गाच्या ४/५/७ वर्षाची अट काढण्यात यावी व प्रथम नियुक्ती पासुन २४००/४२००/४३०० अशी वेतन श्रेणी  व प्रमुख आरेखकास ४६००/- ची वेतनश्रेणी देण्याबाबत प्रस्ताव सादर केलेला आहे.
७) संघटनेचे कार्य व कार्यप्रणाली पारदर्शक करणे, कार्यपद्धतीचे आधुनिकीकरण करणे,समाज माध्यमांद्वारे संघटन कार्य सर्व सभासदांपर्यत पोहचविणे या करीता संघटनेचे अधिकृत संकेतस्थळ ( WebSite) निर्माण करुन शेगाव येथील संघटनेच्या भव्य सभेच्या कार्यक्रमासह अनावरण करण्यात आले.. या संकेतस्थळावरुन संघटनेच्या स्थापनेपासुनचा अर्थात मागील ४८ वर्षाच्या ऐतिहासिक कामगिरीचा आजपर्यंत च्या कार्याच्या घडामोडीचा सचित्र माहीती व इतर संघटनेच्या चालु घडामोडीचा अंतर्भाव करण्यात येउन सर्व सभासदांना माहिती उपलब्ध करुन संघटन कार्ये विकसित करण्यात आली..
८)   महाराष्ट्रातील सर्व विभागातील जिल्हा शाखांना प्रत्यक्षात भेटी देणे या साठी मा.अध्यक्ष  व केंद्रीय पदाधिकार्यांसह पश्चिम महाराष्ट्र ,कोकण.विदर्भात संपर्क दौऱ्याचे आयोजन करुन " संघटना आपल्या द्वारी  "  या विचाराने सर्व जिल्हा शाखेच्या बैठका द्वारे संघटन मजबुत करण्यात आले..सर्व जिल्ह्यातील सदस्य व पदाधिकारी यांच्या प्रत्यक्ष भेटी व चर्चे मुळे संघटना तन मन व धनाने अधिक मजबुत करण्यात संघटनेला यश प्राप्त झाले..          ९) संघटनेच्या स्थापने पासुन साधारणतः ४८ वर्षांपुर्वीची    अस्तित्वात असलेली संघटनेची घटना यात कालपरत्वे सुधारणा व दुरुस्तीसह अद्ययावत सुधारीत घटना तयार  करण्यासाठी वाल्मी औरंगाबाद येथे कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करुन अभ्यासपुर्वक मंथनानंतर सुधारीत घटनेचा मसुदा तयार करण्यात आला व मार्च २०२२ नागपुर येथे आयोजित सर्वसाधारण सभेत  सुधारीत घटनेचा मसुदा सर्व मान्यतेसाठी  सादर करण्यात येत आहे.    १०)जलसंपदा विभाग / सां.बां.विभाग / जलसंधारण विभागातील चित्रशाखा संवर्गातील रिक्त पदे भरणे बाबत संबंधित सर्व मंत्री महोदयांना निवेदने देऊन विनंती केली.
११) सा.बां.विभाग, मुंबई परिमंडळात आरेखक संवर्गाच्या पदोन्नती करणेबाबत दि.०३.०८.२०२० व १२.०४.२०२१ रोजी निवेदन दिली व सतत पाठपुरावा करण्यात येउन  जानेवारी २०२२ मध्ये पूर्ण पदोन्नत्या करवून घेतल्या. 
१२) सरळ सेवेने नियुक्त झालेल्या सहायक आरेखक, आरेखक यांना विभागीय परिक्षा व प्रशिक्षणाचे प्रयोजन करण्यासाठी शासनामार्फत META नाशीक कडून अभ्यासक्रम व प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर करून शासनास सादर करण्यात संघटनेला यश प्राप्त झाले आहे व पुढिल कार्यवाही प्रगतीपथावर आहे.
१३) जलसंपदा/सां.बां.विभाग./जलसंधारण विभागातील चित्रशाखा संवर्गातील आकृतीबंध कार्यक्रम सुरू असुन संघटने मार्फत पदे वाचविण्याचासाठी शासनास प्रतिनिधीत्व करण्यात आले. पुढिल कार्यवाही प्रगतीपथावर आहे.
१४) अनुरेखक / आरेखक  संवर्गाच्या  सेवा प्रवेश नियम सुधारणा करणेबाबत दि.१९.११.२०२० च्या पत्रान्वये जलसंपदा विभागास प्रस्ताव सादर.
१५) अधिक्षक अभियंता . सा.बां. मंडळ जळगाव यांनी आरेखक संवर्गाविरूद्ध काढलेले परिपत्रक रद्द करणेबाबत  दि.२३.०६.२०२१ रोजी संबंधीत अ.अ. यांना पत्र देऊन दि.१७.०८.२०२१ रोजी परिपत्रक रद्द करून घेतले.
१६)  दिनांक .२९.१०.२०२१ च्या पत्रान्वये अ.अ. सा.बां. मंडळ पुणे यांनी अनुरेखकांच्या प्रशिक्षणासंबंधी चुकीचे काढलेले पत्र रद्द करून घेतले
१७)  अनुरेखकांची अर्हता प्रशिक्षण वर्ग सुरू करणेबाबत सां.बां. मंडळ पुणे यांना पत्र देऊन सातत्याने या विषयी पाठपुरावा करण्यात आला व सद्यस्थितीत सदर प्रशिक्षणाचे  आयोजन करण्यात येत  आहे. 
१८)   २०१९ या वर्षी धुळे येथे  सर्वसाधारण सभेचे आयोजन भव्य स्वरुपात करण्यात आले .. २०२० व २०२१ या वर्षाची सर्वसाधारण / आम सभा  कोविड महामारी प्रतिबंधामुळे होउ शकली नाही तथापी विलंबाने का होईना दिनांक १३ मार्च २०२२ रोजी नागपुर येथे  वर्ष २०२० व २०२१ एकत्रीत रित्या सर्व साधारण महासभा आयोजित करण्यात येत आहे..  
१९ )   सन २०१९, २०२०,२०२१ व २०२२ सलग चार वर्ष संघटनेच्या रंगीत दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येउन महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालये तसेच सर्व सदस्यांपर्यंत पोहचविण्यात आले...                         

मंजीले उन्हीको मिलती है...जिनके सपनोमे जान होती है..... पंखोसे कुछ नही होता  ...हौसले से उडाण होती है...