संघटनेची आजची गरज : या संगणकीय गतीमान
युगात चित्र शाखेतील बरीच पद सेवानिवृत्ती मुळे रिक्त होत आहेत. शासनाकडून ती पद
भरली जात नाहीत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांना अतिरीक्त
कामाचा भार उचलावा लागत आहे. सभासद संख्या कमी होत आहे. आज रोजी नव्याने आलेले
पदाधिकारी पद वाचवण्यासाठी, हक्कासाठी व सातव्या वेतन आयोगातील तरतुदी साठी खूपच
प्रयत्न करत आहे : ही मोठी समाधान कारक बाब आहे. सेवानिवृत्त व कार्यरत असलेल्या
कर्मचाऱ्यांनी त्यांना साथ देणे आवश्यक आहे. या संघटनेचा इतिहास खूप चांगला आहे.
या संघटनेचे कार्य करत असताना एक अध्यक्ष आमदार झाले आहेत व मी स्वता युनिफॉर्म
सेवेत आहे. अश्या या नामवंत संघटनेच्या वाटचालीस मी शुभेच्छा देतो व सुयश चिंतितो
: धन्यवाद.
my sweet memories please click below link
https://drive.google.com/file/d/1mfkJ-gEniBRPDBJtby5Lc5OS8HLd3kCm/view
7) मा. सुनीलकुमार सुर्वे , माजी कार्याध्यक्ष,यांचे मनोगत
कृपया खालील लिंक वर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/15ue-iUtpAaSAHhpCu_pf9f7mkOgOJGf5/view?usp=sharing
8) मा.सतीश पारणकर साहेब यांचे मनोगत

मित्रांनो ! जय हिंद🇮🇳 जय महाराष्ट्र जय रेखाचित्र संघटना...💪🏼🙏🏼💪🏼
एकतेचा
विजय असतोच असतो मी पोलीस खाते नाईलाजाने सोडले त्यानंतर दैव बलवत्तर व
वडिलांच्या पश्चात संसारीक जबाबदारी पार पाडतांना भरपूर समस्यांशी तोंड
देता यावे म्हणूनच की काय..!! अनुरेखक पदावर नियुक्ती पाटबंधारे संशोधन
विभाग अकोला येथे मिळाली असतांना संघटनेतील ब-याच संघटन प्रेमी पदाधिकारी
यांचेशी संपर्क आला.
माझ्या पूर्वीच्या खात्यात संघटनेचा शब्द
सुध्दा काढण्यास मज्जाव केला जायचा, त्यामुळे संघटनेची शक्ती निश्चितच
वरदाना प्रमाणेच मला मिळाली अन् त्यासाठी सभासदांचे एकमेकांच्या हातात हात
तंतूचा धागा जसे तानाबाना केल्यावर हातमागावर एक तलम वस्त्ररूपी शाल
एकात्मतेचे प्रतिक स्वताःचे अस्तिव विसरून "संघटन "तयार होते ते याच
तत्वांमुळे ...! तेच वस्त्ररूपी पांघरून घालून स्वहिताचे बलिदान करनारे
पदाधिकारी श्री रावसाहेब कोरे , श्री वाल्मिकजी दारूणकर (पितामह) व श्री
राजेंद्र करपेजी व ब-याच निष्ठावान वरिष्ठ संघटन प्रेमी यांचे कार्ये
वस्त्रा वरिल नक्षी सारख्या किनारीने ते सर्वांना खुलून दिसते..! याचाच
प्रत्यय मला आला. त्यामुळेच मला श्री जकी जाफरी अध्यक्ष ;सुधिर गभणे सचिव
रविंद्र बिंड उपाध्यक्ष यांचे सारखे तसेच महिलांचे सह आपणां सर्वांचे सोबत
संघटनेची सेवा करण्याची माझ्या सारख्या सामान्य सभासदास संधी देऊन संघटनेत
लहान-थोर भेद मिटविला..! त्याबद्दल साभार. ....
स्वातंत्र्यांसाठी ज्याप्रमाणे विदेशी वस्त्राची होळी केली त्याप्रमाणे आपण
सर्व संघटनेच्या एकात्मतेसाठी सर्व भेदभाव विसरून संघटनेला सक्षम मजबूत
करून संघटनेचा महाराष्ट्रातच नव्हे तर देशात शालरूपी सन्मान मिळवून
देण्यासाठी श्री राजेंद्र घोडकेजींचा तथा आजी माजी व दिवंगत पदाधिकारी
यांचे संघटनेवरिल प्रेममय त्यागांच्या आदर्शाने प्रेरित होवून, संघटनेशी
प्रतिबध्द आहोतच याची आम्हांला खात्री आहे , ती पूर्णत्वास जाईल यात
तिळमात्रही शंका नाही...!
🏆 यश हे सर्वांचे सहकार्यानेच फळते🏆
पिकले फळ उडते पक्षीयांनाच चाखायला मिळते...! 🦅
यश हे सर्वांच्याच.......
कसा डल्ला मारायला कुठले फळ पिकते ते यांनाच बरे हो कळते....!🍎🍐
यश हे सर्वांच्याच.......
नजर ठेऊन हवेतून सुगंधावर भान ठेवणे त्यांनाच बरे वळते.....🥦
त्यांनाच बरे वळते...👀
यश हे सर्वांच्याच सहकार्याने मिळते...
🤝🤝🤝🙏🏼🤝🤝🤝
💐🙏🏼💐
निसर्ग नियम
धन्यवाद....
आपलाच ...
सतिश पारणकर
(विभागीय सचिव-
अमरावती विभाग)
9) मा.श्रीमती वंदना परिहार यांचे मनोगत

महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी व माझे सभासद बंधु भगिनींना माझा सप्रेम नमस्कार !!
आपल्या संघटनेची वेबसाईट तयार करणाऱ्या मान्यवरांना हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन !!
संघटना म्हणजे काय, हे मला आपल्या रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेने
दाखवुन दिले आहे.संघटना असावी तर आपल्या रेखाचित्र संघटनेसारखी. असे इतर
संवंर्गाचे कर्मचारी म्हणतात व ते खरेच आहे. कारण आपल्या संघटनेसारखी दुसरी
संघटना नाहीच. मला माझ्या संघटनेचा अभिमान आहे.
संघटनेची
कोल्हापुर येथील आमसभा व तिचे कामकाज हा मी प्रत्यक्ष अनुभवलेला अविस्मरणीय
प्रसंग आहे. आमसभेत निवड झालेले पदाधिकारी सर्वश्री जाफरी सर अध्यक्ष,
गभणे सर सरचिटणीस , उपाध्यक्ष , बिंड सर व ज्यांनी संघर्ष करून उपाध्यक्ष
पद मिळविले ते माणिकराव शिंदे सर, कोषाध्यक्ष श्री आपटे सर,तसेच या
सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले अत्यंत अनुभवी श्री करपे सर व
दारूनकर सरां सारखे संघटनेचे प्रमुख सल्लागार हे सर्व महाराष्ट्रातून
निवडलेले हिरेच आहेत.हे सर्व मिळुन संघटनेला आपल्या कामाच्या जिद्दीने व
चिकाटीने संघटनेला प्रगतीपथावर नेईल यात यत्किंचितही शंका नाही.व त्यांना
आम्ही सर्व सदस्य भक्कमपणे साथ देऊच.
संघटनेच्या सभेत येणाऱ्या
विषयावर,सभासदांच्या समस्यांवर वरीष्ठ पदाधिकार्याकडुन करण्यात येणारे
मार्गदर्शन अत्यंत सखोल व अभ्यासपूर्ण असते हे त्यांच्या संघटनेप्रती
असलेल्या प्रेमावरून निष्ठेवरुन दिसून येते.कोणत्याही समस्येला सहज सोडवुन
देणाऱ्या सक्षम पदाधिकार्यामुळे व त्यांच्याच सानिध्यात आपली संघटना आणखी
मजबूत होत आहे.यामुळे संघटना पुढे उंचावत व प्रगतीपथावर जाईल,यामुळे मला
आपल्या संघटनेवर अधिक विश्वास आहे.याकरीता आपल्या सर्वाचा सहभागही लागतो व
हा सहभाग नक्कीच राहणार,त्याबद्दल म्हणावेसे वाटते की,
" *आँखो मे बहनेवाले आंसू बडे अलबेले है...जिंदगी मे बहुतसे झमेले है...
मगर साथ मिले रेखाचित्र संघटन का... तो हम कहाँ अकेले है*
आता आपली नवनिर्वाचित संघटना एक मोठा मैलाचा दगड पार करीत आहे, अनेक
उपक्रमे राबवित...दिलेले शब्दाचे पालनही होत आहे..... आपल्या संघटनेची
वेबसाईट सभासदांकरीता समर्पित करत आहेत.जे अत्यंत महत्वाचे व सभासदांच्या
हिताची आहे. यावरून दिसून येते की संघटनेचे काम किती पारदर्शक आहे. अशा
संघटनेची मी महिला प्रतिनिधी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.
" जय हिन्द, जय संघटना"
🙏🏻🙏🏻🙏🏻😊
आपली स्नेहांकित
सौ.वंदना डी.परिहार
( महिला प्रतिनिधी)
नागपुर
10) मा.रवींद्र नागरे,(जिल्हाध्यक्ष बुलढाणा) यांचे मनोगत
दिनांक : 02/12/2018,
आजी
सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा धनु.... असाच काही आजचा दिवस आहे महाराष्ट्र
राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटना हे नाव मी फक्त ऐकून होतो सन २००८
साली पाटबंधारे विभागात अनुरेखक पदी नियुक्ती झाली संघटना हे नाव फक्त
ऐकून होतो संघटनेबाबत यत्कींचीतही कल्पना नव्हती सन २०१२ साली नागपूर येथे
अनुरेखक प्रशिक्षणा दरम्यान नवनियुक्त प्रशिक्षणार्थी यांना कुठल्याही
प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नये यासाठी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले .
संघटनेची व संघटन कार्याची जाणीव करून दिली असे व्यक्तिमत्व आम्हास
त्यावेळी लाभले संघटनेसाठी अहोरात्र झटणारे व संघटनेविषयी तळमळ असणारे असे
पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणजेच दारुणकर दादा आणि यांच्या प्रेरणेतून संघटन
कार्याची ओढ लागली मागील दहा वर्षात आमच्या समस्या कोणाला सांगाव्या
याबाबत काहीच कळत नव्हते संघटना मात्र अंधुक धुके पडल्याप्रमाणे झाली होती.
सभासदांमध्ये मरगळ पसरलेली होती त्यातच करपे साहेबांसारखे सारथी मिळाले
.जाफरी साहेबांसारखे अभ्यासू व्यक्तिमत्व लाभले यातून संघटनेला नवीन ऊर्जा
मिळाली सभासदांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन आज सोनियाचे दिवस पहावयास मिळत
आहे. महाराष्ट्रातील कर्मचारी संघटना पैकी आपल्या संघटनेने उत्तुंग भरारी
घेतली आहे त्यामुळेच तर काय संघटनेला सुद्धा अनमोल असे चेहरेमोहरे
मिळालेले आहेत म्हणूनच तर सभासदांना आजच्या संगणक युगात गरज होती ती संघटन
कार्याची व संघटनेने केलेल्या यापूर्वीच्या शिदोरीची अशी शिदोरी तयार करून
सभासदां प्रती उपलब्ध करून देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी
आज संघटन संकेत स्थळाची निर्मिती झालेली आहे. यामध्ये अथांग सागरा प्रती
चंद्र सूर्य असेपर्यंत माहिती उपलब्धही होणार आहे व सदर माहिती ही
सभासदांना मार्गदर्शक ठरणार आहे माहिती मिळण्याचे हे एक भांडार निर्माण
झालेले आहे .अशा या संकेतस्थळाचा अनावरण सोहळा बुलढाणा जिल्ह्यातील संत
गजानन महाराज यांच्या कृपाशीर्वादाने शेगाव येथे पार पाडण्यासाठी साठी
केंद्रीय कार्यकारिणीने बुलढाणा जिल्हा कार्यकारणीला संधी दिली व बहुमान
दिला कार्यकारणी संघटन कार्य व संघटनेचा कळस बसविण्याप्रती खारीचा वाटा
उचलण्याची संधी आम्हाला मिळवून दिली म्हणूनच तर काय आम्ही धन्य पावलो आहे.
त्यामुळेच केंद्रीय कार्यकारिणीचे आभार मानावे तितके कमी आहे संघटनेच्या
संकेतस्थळाचे अणावरण सोहळ्यास बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सदस्य
यांचे वतीने मी जिल्हाध्यक्ष रविंद्र लक्ष्मण नागरे हार्दिक शुभेच्छा
व्यक्त करतो .या सोहळ्यास उपस्थितांचे स्वागत व अभिनंदन करतो व संघटन कार्य
करण्यासाठी केंद्रीय संघटनेकडून आम्हाला संघटन कार्यात मदत करण्याची संधी
वेळोवेळी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो... धन्यवाद.. रविंद्र
लक्ष्मण नागरे जिल्हाध्यक्ष बुलढाणा.
11) मा. विनायक जोशी (जिल्हाध्यक्ष लातूर ) यांचे मनोगत
आणि संघटणेस जो़डला गेलो.
अहो तुमचे म्हणने
आगदी बरोबर, मागील काळात सहाय्यक आरेखक व वरिष्ठ लिपीक एकच वेतन श्रेणीत वेतन घेत होते,
पण सध्याच्या वेतन आयोगात अन्याय झाला , सहाय्यक आरेखकांचे वेतन कमी झाले , आता तसे
होऊ नये याची दक्षता आता पासून आपल्याला घ्यावी लागेल, …….
लातूर – नाशिक
मार्गे अहमदनगर मध्ये जाणा-या एसटी मध्ये अहमदनगर येथून बसलेल्या माझ्या समोरच्या सिट
वरील व्यक्ती मधील संवाद , वरील वाक्ये माझ्या
कानी पडली, मी सावध (दक्ष) झालो, ते काय - काय बोलतात हे लक्ष देवून ऐकत राहीलो. एसटी पुढील थांब्यावर
थांबली , पुढे आलो त्यांना माझी ओळख करून दिली , त्यांचा परिचय विचारला … या वेळी मा.
श्री.प्रमोद मुळे , संघटनेचे तत्कालीन अतिरिक्त सरचिटणीस, श्री अरूण आहेर.. ईत्यादी
ईत्यादी यांची ओळख झाली .
यावेळी समजले
की , आपल्या रेखाचित्र शाखेत कांम करणा-या कर्मचारी संवर्गाची एक संघटना आहे. बस मधील
सर्वजन नाशिक येथे संघटनेच्या बैठकीसाठी जात आहेत. सर्वा सोबत चर्चा झाली , मी ज्या
कामासाठी नाशिकला जात होतो ते काम नंतर पाहू म्हणून राहू दिले आणि त्यांच्या सोबत संघटनेच्या
बैठकीला उपस्थित झालो. तिथे श्रीमान काझी साहेब,
सरचिटणीस, श्रीमान दाशरथेसाहेब अध्यक्ष श्री. बाबा (उत्तमराव गांगुर्डे) व संघटनेचे
अनेक कार्यकर्ते यांचा परिचय झाला.
माहे मे 1985
मध्ये अनुरेखक पदी नौकरीस रूजू झालो त्या वेळी कार्यालयात नविन वेतन आयोगाची चर्चा
ऐकावयास मिळायची , उस्तुकता होतीच . सन 1986 मधील वरील बैठक होती – चौथ्या वेतन आयोगाला
दिलेल्या वेतन श्रेणी प्रस्तावाची, बैठकीला मराठवाड्यातून मी एकटाची तोही अगंतूकपणे
उपस्थित. त्यादिवसापासून रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेस जोडला गेलो, आणी संघटना माझी झाली अण मी
संघटनेचा, कायमसाठी .
बैठकीला उपस्थित
राहून लातूरला परत आलो, घडलेले वृतांत लातूर मध्ये आमचे आरेखक व सहाय्यक आरेखक व यांना
सांगीतला. त्यांनी आपली संघटना आहे. नोंदणी
करण्यासाठी लातूरचेच असलेले श्री मग्गीरवारसाहेब यांनी त्यावेळचे त्यांचे सहकारी यांचे
सोबत अथक प्रयत्न करून संघटना संघटीत केली , व शासन दरबारी त्यांची नोंद झाली. असे
सांगीतले (श्रीमान मग्गीरवार साहेब हे मुळचे लातूरचे – एक लातूर पॅटर्न दुसरे काय),
पण सध्या काय चालू आहे ते माहित नाही असेही
म्हणाले , यांच्या सल्यावरून लातूर मध्ये जिल्ह्यातील
सर्व सभासदा समवेत बैठक घेण्याचे ठरले यानुसार बैठक घेवून नाशिक येथील बैठकीचा वृतांत
सांगीतला. ब-याच कालावधीनंतर लातूर मध्ये संघटनेची बैठक असल्याने संघटनेचे जवळजवळ सर्वच सभासद उपस्थित होते. त्यावेळी
लातूर जिल्ह्यात सभासदांची संख्याही बरी होती . या बैठकीत नाशिक मधील बैठकीचा ईतिवृतांत
व संघटनेने चौथ्या वेतन आयोगाला दिलेले निवेदन एैकून सर्वांना आनंद झाला. नवचैतन्य
निर्माण झाले.
या नंतर ज्या
ज्या वेळी नाशिकला गेलो त्या त्या वेळी प्रथम प्राधान्य श्री काझी साहेब , श्री बाबा
गांगुर्डे ईत्यादी संघटनेला वाहून घेतलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची भेट , नंतर
ईतर कामे, (लातूर जिल्ह्यात ब-याच योजनाची कामे चालू होती, योजनांची सिडीओ नाशिक यांनी
मंजूर केलेली नकाशे प्रती आणने, मेरी नाशिक येथून उपकरणे दुरुस्ती करून आणने ईत्यादी
कामे सतत असत , नसतील तर आम्ही नाशिकला जाण्यासाठी काढत असू.) भेटीमध्ये संघटेनेतील व शासनस्तरावरील
वेतन आयोगाच्या संदर्भातील घडामोडीची माहिती मिळत असे. संघटनेच्या बैठका कधी व कोठे
आहेत याची माहिती मिळत असे, किंवा तात्कालीन पदाधिकारी पत्राद्वारे मला कळवत असत ,
संघटनेतील कोणत्याही पदावर नसताना आर्वजून सर्व बैठकीस उपस्थित रहात असे. (स्वखर्चाने).
कार्यालयातून मला वेळोवेळी रजेबाबत सवलत मिळत गेली , याबाबत लिपीक सर्वगाचेही सहकार्य
मिळाले.
चैाथे वेतन आयोगा पुर्वी कनिष्ठ लिपीक व अनुरेखक हे एकाच वेतन श्रेणीत
रू. 260 मध्ये वेतन घेत असत तर सहाय्यक आरेखकांना वरिष्ठ लिपीका पेक्षा कमी (वरिष्ठ
लिपीक रू.310 तर सहाय्यक आरेखक रू.290) वेतन मिळत असे. आणि आज….. चौथ्या वेतन आयोगातील
त्रुटी निवारणापासून आपणा सोबतच रूजू झालेल्या ईतर संवर्गातील कर्मचारी बांधवा पेक्षा
आपण जास्त वेतन घेत गेलो, नंतर पाचव्या , साहाव्या वेतन आयोगात वरचेवर फरक वाढत गेला,
वेतना सोबतच वेतनाबाबतची प्रतिष्ठा वाढत गेली , आजचे आपले वेतन व आपणा सोबत रुजू झालेले
ईतर संवर्गातील आपले बांधव यांच्या वेतनातील फरक पाहताना आपल्या संघटनेचा हेवा वाटतो
, अभिमान तर आहेच. हे यश सहजासहजी मिळालेले निश्चित नाही. या साठी संघटनेला (म्हणजे
आपणा सर्वांना) बरेच परिश्रम घ्यावे लागले. वेतन आयोगातील त्रुटी निवरणासाठी बरीच उबरठे
झिजवावी लागली. यात खरीचा वाटा उचलण्याची संधी मला संघटनेने मिळवून दिली याचा आनंद आहे.
कालांतराने अहमदनगर येथे झालेल्या नविन केंद्रीय कार्यकारीनी निवड बैठकीत
माझी मराठवाडा विभागी्य सचिव म्हणून निवडणूकीतून बहूमताने निवड झाली. (त्यावेळी मराठवाड्यासाठी
एकच विभागीय सचिव पद होते.) काझीसाहेब सरचिटणीस असताना मराठवाडा विभागीय सचिव म्हणून
काम केले, श्रीमान कोरे साहेबांना अध्यक्ष करण्यासाठी मराठवाड्यातून पुर्ण पाठिंबा
मिळवून दिला, त्यावेळी मराठवाडा विभागासाठी श्री सदाशिवराव मठपती साहेब (जिल्हा परभणी)
यांचे नांव मी सुचीत केले. विभागीय सचिव असताना मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात बैठका
घेवून संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय कार्यकारीनी पदाधिकारी नसताना पदाधिका-यांचे
सुचनेवरून शासन स्तरावर प्रकरणे मार्गी लावण्यासाठी मराठवाड्यातील कांही उच्चपदस्त
जनमान्य लोकप्रतिनिधींची भेट मिळवून देण्यासाठी
लातूर मधील माझे कांही सहकारी व ईतर पदावर काम करणारे स्नेही यांच्या मार्फत
योग घडवून आणला.(घटना व नावे देत नाही, कांही बाबींची चर्चा न केलेली चांगली. याबाबत
त्यात्या वेळचे पदाधिकारी ज्ञात आहेत.) जलसंपदा विभाग औरंगाबाद परिमंडळातील 109 अनुरेखकांना
अतिरिक्त ठरवण्यात आले होते, त्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला. या विरुध्द दाद
मागण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने यशस्वी कार्यवाही करण्यात आली. त्यांचे वेतन काढण्याबाबत
(जेथे कार्यरत असतील तेथेच) परिमंडळास आदेश काढावे लागले. सर्व अतिरिक्त ठरलेल्या अनुरेखकांचे
पुन्हा समावेश झाले.
संघटनेत श्री एच.बी. काझी साहेब, श्री. प्रमोदजी मुळे साहेब, श्री रावसाहेबजी
कोरे साहेब, श्री वाल्मीकराव दारूनकर साहेब, स्वर्गीय आण्णा टोणपे साहेब, श्री अशोकराव
निमकरसाहेब, श्री. सुभाषराव परळीकर साहेब, स्वर्गीय रावसाहेब धस साहेब, श्री सुनिलजी सुर्वे , श्री बन्सिधरजी राठोड यांचे
सोबत काम करण्याची संधी मिळाली. या सर्वासोबत संघटनेच्या उज्वल भवित्यव्याचा साक्षीदार
होता आले. अनेक मित्र / पदाधिकारी यांची नावे व चेहरेही आठवतात, पण शब्द मर्यादेने
उल्लेख करता येत नाही या बद्दल क्षमस्व. सध्या कोल्हापूर येथील प्रतिनिधी निवड सभेतून
निवड झालेल्या कार्यकारीणीतील श्री. जाफरी साहेब अध्यक्ष श्री गभने साहेब सरचिटणीस
व त्यांचे सर्व सहकारी यांच्या सोबत कार्य करण्याचा योग आला आहे. नविन कार्यकारीणीकडून सातव्या वेतन आयोगात सभासदांच्या वेतनात जास्तीत
जास्त फायदा कसा होईल याबाबत ठोस कार्यवाही होत असल्याचे समाधान आहे. यात संघटनेला
निश्चितच यश मिळेल या बाबत तिळमात्र शंका नाही.
संघटनेचा कार्यकर्ता म्हणून काम करताना महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यात
मित्र मिळाले, स्नेह मिळाला. तात्कालीन काळात संपर्काची साधने मर्यादीत होती, प्रत्यक्ष
पहाणे - बोलने नाही पण पत्रव्यवहातून अनेक मित्र मिळाले. हे माझे भाग्य. मोबाईल व व्हॅास्टअप
नव्हते त्यामुळे पत्रव्यवहार - पत्रव्यवहाराचा आनंद मोबाईल वापणा-यांना काय माहित
! आधुनिक तंत्रज्ञानामुळे (मोबाईल) मिळालेल्या काही मित्रांचे प्रत्यक्ष दर्शन झालेले
नाही , पण आवाजावरूनही ओळखू येतात. मागे वळून पाहताना मागील तिस वर्षातील अनेक घडामोडी
आठवून येत आहेत, नवतंत्रज्ञानात परंगत आसलेल्या सभासदाकडून प्रगतीचे पुढचं पाउल च्या
निमित्ताने निर्मीत होत असलेल्या वेबसाईट निर्मीती साठी संघटनेबाबत मनोगत द्या अशी
सुचना आल्यानंतर मागील काळाची उजळणी झाली .
संघटणेच्या सर्व कामाबाबत समाधानी आहेच , पुर्ण समाधान झाले असा कोणाही
नाही, यानुसार शासनास कांहीही आर्थीक बोजा येणार नाही परंन्तू संघटनेच्या सभासदांना
आत्म समाधान व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी खालील मागण्याच्या पुर्ततेबाबत संघटनेकडून
पाठपुरावा व्हावा ही विनंती आहे.
1.
वेगवेगळ्या
कार्यालयातील आस्थापना शाखेतून वेळोवेळी माहिती तयार करताना आरेखक संवर्गातील कर्मचारी
यांना कुठे तांत्रीक तर कुठे अतांत्रीक कर्मचारी अशी वर्गवारी होते. वस्तुत: आरेखक
संवर्गातील सर्व कर्मचारी यांची तांत्रीक कर्मचारी अशी गणना होणे आवश्यक आहे. करीता
कर्मचारी / अधिकारी वर्गवारी करताना आरेखक संवर्ग हा पुर्णत: तांत्रीक कर्मचारी आहेत
आसे संबोधन्याबाबत शासन स्तरावरून नव्याने आदेश काढण्याबाबत संघटनेने कार्यवाही करावी
ही विनंती.
2.
आरेखक
संवर्गातील सर्वात जेष्ट असलेले प्रमुख आरेखक हे पद वेतन श्रेणीचा विचार करता संवर्ग
दोन या वेतन श्रेणीत येते . तथापी या पदास संवर्ग दोन असा उल्लेख शासन पत्रव्यवहारात
होत नाही. या बाबत संघटनेकडून पुर्वी पाठपुरावा करण्यात आल्याचे आठवते. परंन्तू अद्याप
या बाबत कार्यवाही झालेली नाही. प्रमुख आरेखक या पदास संवर्ग दोन संबोधल्यास शासनावर
काहीही आर्थीक बोजा निश्चित पडणार नाही, फक्त
या मुळे आरेखक संवर्गातील प्रमुख आरेखक पदास
संवैधानीक दर्जा व प्रतिष्ठा मिळू शकेल. या
बाबत पाठपुरावा व्हावा.
3.
या
पुर्वी आरेखक (साध्याचे आरेखक श्रेणी 1) व भांडारपाल या पदावर काम करणारे कर्मचारी
यांना देयक मोजमाप पुस्तिकेत नोंदविण्याचे
आधिकार (Recording Power) होते . सध्या आरेखकांना हे अधिकार असल्याचे दिसून येत नाहीत.
पण भांडारपाल या पदास आहेत. हे अधिकार दिल्याने शासनास काहिही आर्थिक बोजा येणार नाही.
उलट कार्यालयीन कार्यवाही मध्ये गतीमानता येईल. पुर्वीचे अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी
प्रयत्न व्हावेत.
सध्या बस एवढेच…….
शेवट पर्यन्त एकच ध्येय
संघटना
माझी – मी संघटनेचा.
My sweet memories please click below link
( विनायक रामभाऊ जोशी )
लातूर जिल्हा शाखा
तथा माजी मराठवाडा विभागीय सचिव,महाराष्ट्र
राज्य रेखाचित्र शाखा
संचालक, लातूर लघु पाटबंधारे विभाग कर्मचारीसहकारी पतसंस्था म. लातूर
भ्रमनध्वनी - 9422014195
12) मा. सुरेश बिक्कड ( बीड जिल्हा अध्यक्ष ) यांचे मनोगत
एकीचे
बळ मिळते फळ. ही म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. एकी असण्याचे फायदे अनेक
आहेत. पण भारता देशा मध्ये जसं जसं परिवार वाढत गेला तसं तसं शेत जमीन मधील बांध
वाढत गेले. या वाढलेल्या बांधांमुळे प्रत्येक शेतकऱ्याला शेती करण्यासाठी त्याच्या
वाट्याला आलेल्या जमिनीचा तुकडा लहान होत गेला. आज भारतामध्ये प्रत्येक
शेतकऱ्याच्या वाट्याला खूपच कमी जमीन आहे. प्रत्येक शेतकरी त्याच्या मालकीच्या
जमिनीपुरत काम करू लागला व शेती ही फायदेशीर नाही ही भावना दृढ व्हायला लागली.
एकतर भारतीय शेतकरी ही पावसावर अवलंबून आहे. जरी पाऊस चांगला झाला तरी सुद्धा
पिकाची काढणी, काढणी पद्धती, तंत्रज्ञानाची कमतरता व
त्याची बाजारपेठ याच्या मध्ये खूप मोठी दरी आहे. ही दरी दिवसें दिवस मोठीच होत
आहे. सध्याच्या स्वतंत्र शेती करण्याच्या पद्धतीमुळे, म्हणजेच माझं मी करणार या
मानसिकते मुळे प्रत्येक शेतकऱ्याचं जीवनमान खूपच खडतर होत आहे. त्यात खालील गोष्टी
अधिक भर पडतात,
आज
मित्तीला आपण पहिले तर शेतकर्याच्या मुलाला शेती करून जगणे व आपली सामाजिक
प्रतिष्ठा जपणे कठीण झाले आहे . काळाच्या ओघात माणसाच्या गरजा वाढत गेल्या . नौकारीतील
दर १० व्यक्ती पैकी ७ हि शेतकर्याची मुले आहेत मागच्या पिढीला मिळालेल्या सुविधांच्या तुलनेत हि पिढी फार
भाग्यवान समजावी ,कारण यांना आधुनिक जगातील प्रत्येक गोष्ट सहज बोटांच्या इशार्यावर
उपलब्ध होत आहे .
मित्रानो १९७९मध्ये मी ड्रोइंग कोलेजात फोटोग्राफीचा व्यावसाईक डिप्लोमा पूर्ण करून दैनिक लोकमत, फ्री प्रेस ,इंडियन एक्ष्प्रेस्स ईत्यादी
साठी फ्री लान्सर प्रेस फोटोग्राफर चा जॉब करत
होतो .सारे काही ठीक चालले होते.एके दिवशी रोजगार नियोजन कार्यालयातून कॉल आला , मी इरिगेशन खात्यात रुजू पण झालो पोटाचा प्रश्न मिटला .कलेच्या विश्वात रमणारा मी चाकोरी बद्ध नौकरीत रमलो तेव्हाच अनुरेखक हा आज पर्यंत अनुरेखच आहे
पुढे
रेखाचित्र कर्म.संघटनेचे सभासदतव स्वीकारले गात वर्षी पर्यंत या संघटनेवर पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचे वर्चस्व होते या वर्षी कोल्हापूर अधिवेशनात आम्ही महाराष्ट्राचे अध्यक्ष
पद मराठवाड्या कडे आल्या नंतर संघटनेचे सर्व चेहरा मोहरा बदलला अध्यक्ष श्री जाफरी जी व सल्लागार करपे जी व त्यांच्या चमूने सर्व सभासदांना योग्य न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने
हालचाल चालू केली व त्याचे फलीत दि २१/०९/२०१८ रोजी अनुरेखक संवर्गातील लोकांना सेवेत
पदोन्नती बाबत परिमंडळ स्तरावरून वेगवान हालचाली सुरु झाल्या
चांगल्या
सुधारणा करायच्या हा विचार करण्याची अत्यंत गरज आहे. आपण नेहमीच सरकारने काहीतरी
करावं याकडे डोळे लावून असतो. पण सरकारने हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी प्रयत्न केला
नाही असेही म्हणता येणार नाही.
सहकार
माध्यमातून सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाच आहे. पण सहकार तत्व काही ठिकाणी
सोडल्यास म्हणावं तसं यशस्वी झाले. एक खूप प्रसिद्ध म्हण आहे, “ जर तुम्हाला लवकर पोहोचायचे असेल तर एकट जा, पण जर लांबवर जायचे असेल तर
एकत्र जा” हाच काहीसा योग्य प्रकार आहे. गरज आहे ती फक्त नियोजन व उच्च व्यवस्थापनाची.
माझं
असं वैयक्तिक मत आहे कि जर , उच्च व्यवस्थापनात स्वतःची प्रतिमा संभाळली, तर तो दिवस लांब नाही ज्या दिवशी
तुम्ही तुम्हाला अपेक्षित फल हे निश्चित मिळतेच पण एकी कायम ठेवा
समझुन
घ्या, “एकीचे बळ मिळते फळ” या म्हणीचा. मित्रहो , आज सर्व काही online झाले आहे त्यामुळे
व्यवहार पारदर्शक झाले आहेत शंका सोडा महा राज्य रेखाचित्र कर्म.संघटनेचे सभासदतव स्वीकारा सभासद वर्गणी वेळेवर ध्या व आपले प्रश्न सोडवून आनंदमय जीवन जगा हेच खऱ्या प्रगतीचे गमक होय. बीड जिल्ह्याचे अध्यक्ष पद सांभाळून संघटनेचे कार्य नेकीने
करत आहे .
मित्रानो
,अभ्यासू बना ,
शिका, एकीने संघटीत व्हा.स्वतः वर
विश्वास ठेवणे पसंत करा ,इतरांच्या अनुभवाचा आपल्या
जीवनात व कार्यक्षमतेत परिपूर्णते साठी संघाने जागा देव प्रत्येकाला संधी देतो तिचा लाभ घ्या , त्या साठी एकच उदाहरण देतो ,
एकदा
एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या
किंमतीचे नॉलेज नव्हते त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून
विकला. हळू हळू सम्पूर्ण बाग रिकामी झाली.एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खुप
श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिति पहिल्या सारखीच
आहे असे दिसले राजाला आश्चर्य वाटले.सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले
तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का ? तेव्हा लोहारने कुऱ्हाडीचा
दांडा दाखविला.राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कडे पाठवले. तेंव्हां त्या
छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रड़ू लागला, त्याने राजाला अजुन एक बाग
देण्याची विनंती केली तेव्हा राजा म्हटला "अशी भेट वारंवार भेटत
नाही."मित्रांनो आपले आयुष्य त्या लोहारा सारखेच आहे मानवी जीवनाच्या
मुल्यांचे महत्व, आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते.पण...
त्यावेळेस आपण म्हणतो देवा
मला अजुन थोड़ा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते.मानवी जीवन अनमोल आहे. असे जीवन परत मिळणार
नाही.बोध :-या जगात एक नंबरची दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे, मनुष्य देह त्या देहाचा कोळसा
करायचा की, चंदन हे आपले आपण ठरवायचे.
एकीने
आसने हि काळाची गरज आहे व ती आपण पूर्ण कराल हि अपेक्षा ठेऊन थांबतो.
जय
संघटना ! जय जय !
श्री.सुरेश
बिक्कड आरेखक –II जिल्हा जल संधारण अधिकारी ,मृद व जलसंधारण विभाग ,बीड
( Date: 26/09/2018)
13)प्रत्यक्ष वर्णन आमसभेचे....वाय.ओ.पठाण यांच्या शब्दांतून....
जय हिंद, जय महाराष्ट्र,
जय रेखाचित्र संघटना
मी व माझे 18 सहकारी सर्वश्री करपे व जाफरी साहेबां बरोबर दि.20/4/2018 रोजी
रात्री 10.00 वाजता एका खाजगी वाहनाने आमसभेसाठी कोल्हापूर आमसभेला जाणेसाठी
निघालो व सकाळी 9.00 वाजेला सिंचन भवन कोल्हापुरला पोहचलो सिंचनभवनात प्रवेश करताच
एक नव युवक दिसला त्याकडे उमेश सावंतची चौकशी केली असता त्याने हास्य स्मिताने मीच
आमसभा आयोजक उमेश सावंत आहे कोल्हापुर मधे आपले स्वागत आहे असे सांगुन चला सर मी तूम्हाला रूम दाखवतो असे म्हणुन रूम कडे
घेऊन गेला व सर हे आपले रूम आहे कृपया आपण फ्रेश व्हा व काही गरज पडल्यास फोन करा
असे सांगुन त्याच्या पुढील कामासाठी निघुन गेला.मी आश्चर्यचकित झालो व मनात थोडी
शंकाही आली एवढा छोटा छोकरा आमसभा सारखी एवढी मोठी जबाबदारी कसा सांभाळेल व त्याच
क्षणी मी नकळत मनातल्या मनात त्याच्या कडुन ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पडावी
अशी अल्लाचरणी प्रार्थनाही केली.आम्ही सर्वजण फ्रेश होऊन शाहु पँलेस पाहण्यासाठी
गेलो.पँलेस ही इमारत भव्य अशी घडीव दगडाने बनवलेली असुन खुप सुंदर आहे.आत मधे
प्रवेश केल्यानंतर आतील वेगवेगळ्या हॉल मधे वेगवेगळे संग्रह केलेले आहे त्यात
पुस्तक संग्रह, शस्त्र संग्रह, कलाकुसर संग्रह , फर्निचर संग्रह , त्यांच्या सनदी
संग्रह , फेमिली फोटो संग्रह, वाघ, सिंह , हरिण व इत्यादीचे शिकार केलेल्या
कातड्याचे संग्रह , विशाल व भव्य असा सभागृह पाहुन मन अगदी प्रसन्न झाले
क्षणभर असे वाटले की आपण शाहू महाराजांच्या राज्यातच वावरत आहो.येथुन परत सर्वजण आता आई लक्ष्मीच्या
मंदिरात दर्शनासाठी गेलो.माता लक्ष्मीचे मंदिराला अनेक द्वार असुन अत्यंत शहराच्या
मध्यवर्ती ठिकाणी आहे दर्शन घेतांना अध्यक्ष पद मराठवाड्यास मिळो अशी प्रार्थनाही
केली व तेथुन परत रूमवर परत आलो...रूमवर परत आल्यानंतर सर्वजण फ्रेश होऊन रात्रीचे
जेवण हॉटेल मधे करून रूमवर आलो आदल्या दिवसाचा प्रवास व थकव्यामुळे आंथरुणावर आडवे
झालो मात्र झोप येत नव्हती थोडा आराम केला सिंचन भवनात सभासदांची येण्याची रेलचेल
सुरू झाली वाटसप वरील अनोळखी मित्रानं बरोबर परिचय व भरत मिलन भेटीगाठी सुरू
झाल्या काल पर्यंत आपण ज्यांना ओळखत नव्हतो ते आज प्राणप्रिय वाटायला लागले हे
फक्त आमसभेमुळेच शक्य झाले नंतर वरिष्ठ मंडळी पैकी श्री.उत्तमराव जी गांगुर्डे
आल्याचे समजले तेही वाटसप मित्र असल्याने त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेतल्याचा आनंद काही औरच मिळाला.
अश्यातच श्री. शे.नजीर भाई व श्री.दारुणकरचे त्यांच्या नागपुर ग्रूपसह आगमन झाले व
त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन खूप आनंद झाले. शेवटी रात्र खुप झाल्या मुळे रूमवर
येऊन आडवे झालेा मात्र मनात चालल्या चलबिचल विचार व अनभिज्ञ संशयाने रात्री झोपु
दिले नाही.पहाटेच मी व सर्वश्री जाफरीजी, वहिदभाई, अहमद भाई सगळ्यांनी
नैसर्गिकविधी आटोपुन सकाळची नमाज अदा करून अध्यक्ष पद मराठवाड्यास मिळो अशी विशेष प्रार्थना केली व परत रूमवर आलो तितक्यात उमेश
सावंत नाश्त्याची कुपन देऊन नाश्ता तयार आहे करून घ्या अशी विनंती केली.नाश्ता
केल्या नंतर त्याच ठिकाणी अनोळखी मित्रांची प्रत्यक्ष भरत भेटी झाल्या व त्यामुळे
मनाला सुख विशेष आनंद मिळाला.मात्र इकडे वरिष्ठ व महानुभावांच्या या खोलीतून त्या
खोलीत सारख्या बैठकी चालु होत्या क्षणा क्षणाला मिळणारी बातमी काळजाचे ठोके वाढवत
होती.अश्यातच आपले माजी अध्यक्ष श्री मुलानीजींचे आगमन झाले त्यांनी उत्तमजींना
बोलाउन योग्य निर्णय घेण्याचा सल्ला दिला व त्यांनी चिंता करू नये संघटनेच्या
सुरक्षेची काळजी घेईल असे आश्वासन दिले परिस्थिती अधिकच गंभीर झाल्याणे श्री.राव
साहेब कोरे यांना बोलावण्यात आले बैठक चालूच होती मात्र आम सभासदांपासुन ते वरिष्ठ
व केंद्रीयकारीनी पर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर तमा व चिंता स्पष्ट दिसत होती
प्रत्येकाच्या तोंडात फक्त एकच प्रश्न काय झाले काय झाले सेकंदा सेकंदा ला वातावरण
तणाव ग्रस्त होत होते इतक्यातच कृपया सर्वांनी जेवण करून सभागृहात यावे असा संदेश
मिळाला व सर्वांनी सुखाचा श्वास घेतला.सर्वांनी पटापट जेवण करून जवळ पास 1.30
वाजता सरळ सभागृह गाठलेसभागृहात बसलयानंतर मान्यवरांचे आगमन झाले व कार्यक्रमाची
सुरवात दिप प्रज्वलन करून व शाहु महाराजांचा प्रतिमेचे पुजनाने करण्यात आली सर्व
मान्यवर (केंद्रीय पदाधिकारी) व्यास पिठावरील आपापल्या आसनावर विराजमान झाले. व
एका सभासदाने सूत्र संचालन करून कार्यक्रमाची सुरवात केली व उपस्थित असलेल्या
पाहुण्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले त्यांनी उत्तम असे भाषण केले
मात्र त्याकडे कोणाचेच विशेष लक्ष नव्हते असे तेथे एकंदरीत परिस्थितीवरून दिसुन आले तदनंतर दुसऱ्या
पाहुण्याने देखील संघटने बद्दल माहिती दिली व आमच्या संघटनेस सहकार्य करून पाठिंबा
दर्शविला व आपले मनोगत संपवले. आता एक कणखर व भरदार आवाजाने पूर्ण सभागृह गुंजले
मी सभागृह अध्यक्ष उत्तमराव गांगुर्डे यांनी संघटनेचा पूर्व इतिहास व संघटनेची
असलेली गरजे बाबत संक्षिप्त अशी माहिती दिली व
कार्यक्रम सुचीतील मुद्द्यांचे वाचन करण्यास सुरवात हाच तो क्षण आहे ज्याची सर्वांना
आतुरतेने वाट पाहत होते. संघटनेच्या जमा खर्चाचा हिशोब दाखविला तद नंतर सभागृह
अध्यक्षांनी सभागृहात अध्यक्ष पदाला इच्छुक असणाऱ्याने हात वर करून संमती दर्शवावी
एवढे म्हणताच पूर्ण सभागृहात एकमुखाने जाफरी जाफरी जाफरी च्या नावाची गर्जना सुरु
झाली अध्यक्ष महोदयांनी त्यांना व्यासपिठावर येण्याचे आमंत्रण दिले व आपण
आतापर्यंत संघटनेसाठी काय कार्य
केले व यापुढे काय कार्य करणार या बाबत सभागृहास संक्षिप्त मधे माहिती
द्यावी.जाफरी साहेबांनी आपल्या 15 मिनिटाच्या भाषणात अध्यक्षांनी अपेक्षीत असलेली
माहिती दिली पुन्हा अध्यक्ष महोदयांनी सभागृहास संबोधित करून विचारले या पदासाठी
अजुन कोणी इच्छुक आहे पुनःश्च पूर्ण सभागृहात एकच गुंज जाफरी जाफरी जाफरी तद नंतर अध्यक्ष महोदयांनी जाफरी साहेबांना
महाराष्ट्र रेखा चित्र शाखा संघटनेचे सर्वानुमते अध्यक्ष झाल्याचे घोषीत करताच
सभागृह शिटट्या, टाळ्यां व हर्ष उल्लाहसाने दुमदुमून गेले.या नंतर उपाध्यक्ष
म्हणुन रवींद्रजी बिंड व माणिकराव
शिंदे तसेच विभागीय सचिव म्हणुन प्रशांत कहाते व शशिकांत हिंगमिरे यांची निवड झाली
तसेच महिला प्रतिनिधी म्हणून वंदना परिहार व अजुन एक महिला प्रतिनिधींची निवड
करण्यात आली व सरचिटणीस (अ.का.)व सहसरचिटणीस म्हणुन गभने यांची निवड केली अश्या प्रकारे उरलेल्या इतर पदांची
ही निवड करून कार्यकारीनी पूर्ण करण्यात आली. एक अप्रिय घटना सोडुन बाकी पूर्ण
प्रक्रिया आनंद व हर्षो उल्लाहसात पार पडली.नवनिर्वाचित केंद्रीय कार्य कारीनीचे
हार्दिक अभिनंदन व भविष्यातील कार्यास हार्दिक शुभेच्छा. तसेच कोल्हापुर व सहकारी
यांनी केलेल्या उत्कृष्ट आयोजना
बद्दल विशेष आभार अभिनंदन. या कार्यक्रमात महिला मंडळींची उपस्थिती उल्लेखनीय होती
नागपुरची वंदना परिहार व त्यांची महिला मित्र मंडळ, औरंगाबादचे विणाताई ठाकूर व
पळशीकर मँडम व अ.नगरची महिला प्रतिनिधी स्वाती डोकबाणे यांना मनापासून सैल्युट. या
कार्यक्रमास नागपुर, औरंगाबाद, अहमदनगर व इतर लांबच्या विभागातून आलेल्या महिला मंडळाचे हार्दिक आभार
अभिनंदन. अंततः प्रस्तावना करतांना सूत्र संचालकाने कविता माध्यमातुन कोल्हापूरची
खासियत दाखविली मी सुध्धा दोन ओळी लिहतो कृपया गैर समज न करता अवलोकन करावे व नाही
पटल्यास विसरावे .
नेक विचार जेवण दिले शुध्द शाकाहार असे करतात कोल्हापुरी प्रेमाने पाहुणचार.
धन्यवाद.लिहण्यात चुक झाली असल्यास क्षमापित करावे ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र , जय संघटना..
आपला.. वाय.ओ.पठाण औबाद.
संघटनेबद्दल मनोगत :
महाराष्ट्र रेखा
चित्र संघटना परिवारातील बंधु व भगिनींनाे सर्व आजी माजी पदाधिकारी व सर्व सदस्य मित्रांनो...आपल्या
संघटनेतील ४३ वर्षाच्या वाटचालीतील प्रगतीच्या टप्यातील संकेतस्थळाच्या शुभारंभाच्या
निमित्ताने सांगावेसे वाटते की.... माझ्या
३४ वर्ष केलेली शासकिय सेवा व अनेक वर्ष संघटनेचे केलेल्या कार्याच्या मधुर
आठवणी ह्या ह्रदयाच्या कप्प्यात साठवुण ठेवल्या आहेत आज वेबसाईटच्या माध्यमातुन आपल्यापर्यत
खुल्या करण्याची संधी मिळतेय ... त्या मधुर आठवणीतील काही कळत नकळत आठवतात कायम त्या
आठवणीने मन भुतकाळात रमते... व त्यात आमचे
मित्र कै.श्री.रावसाहेब धस यांची आठवण येणार नाही व त्यांची आलेल्या आठवणीने डोळ्याचे
बांध फुटणार नाही असे शक्यच नाही. त्यांच्या
आत्म्यास सदगति देवो हीच अल्लाह चरणी प्रार्थना. कै.श्री.रावसाहेब धस यांनीच जायकवाडी,
पैठण येथे बैठक घेऊन मला पैठण तालुक्याचे प्रतिनिधित्व दिले होते तेंव्हा पासुन आज
पर्यंत संघटनेचे कार्य करीत असुन पुढेही करणार
करत राहू .तसेच आपल्या संघटनेचे जनक, संस्थापकीय
श्री.मग्गीरवार सर यांनी सन १९७४ पुर्वीच संघटनेचे महत्व व गरज जाणली होती...व त्या
मुळेच त्यांनी वर्ष 1974 मधे संघटनेची स्थापना करून शासन मान्य संघटना करून घेतली,
धन्यवाद सर... आपणास आमचे कोटी कोटी प्रणाम.त्यांनी
लावलेले रोपटे आज गोड फळदार विशाल वृक्ष झाले असुन त्या गोड फळांचा स्वाद आज आम्ही
सर्व घेत आहेात. तदनंतर संघटनेची धुरा अनुक्रमे सर्वश्री.काझी सर, राव साहेब कोरे सर
, दारुणकर साहेब, कै दीपक टोणपे साहेब साहेब यांचे कडुन होत आता श्री.जकी अहमद जाफरी
यांचे कडे आली आहे. उपरोक्त मान्य वरांनी संघटनेच्या
विकास व प्रगती साठी खुप प्रयत्न केले. ४ था, ५ वा व ६ व्या वेतन आयोगात उपरोक्त मान्यवरांनी
अतोनात प्रयत्न करून सभासदांना चांगल्या वेतन श्रेणीचा लाभ मिळवुन दिला. मान्यवर आम्ही
आपले आभारी आहोत.शिवाय आता ७ वा वेतन आयोग समोरच आहे यात ही सभासदांना चांगला लाभ मिळुन
देण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. शेवटी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अनेक
वर्षा पुर्वी संघटनेचे महत्व कळाले होते त्यामुळे त्यांनी आम्हाला संघटनेचे मुळ तत्व
सांगितले आहे शिका , संघटीत व्हा व संघर्ष
करा तसेच संघटना ही सभासद संख्येवर अवलंबून नसुन एकजूट व विश्वासावर अवलंबून असते.
वरील तत्वाचे अवलंबन केल्यास आपल्याला लाभ व
समाजात, कार्यालयात मान सम्मान निश्चितच मिळेल.मी संघटनेच्या हितासाठी प्रतिष्ठेसाठी सदैव आपल्या
सोबत आहे व सदैव राहणार... जय म.रा.रेखाचित्र
संघटना...आपला.. वाय.ओ.पठाण औबाद.
02/12/2018: संकेतस्थळाबाबत प्रतिक्रिया .....
अनेक दिवसांपासुन आपण आतुरतेने वाट पहात असलेल्या महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेच्या संकेतस्थळाचे अनावरण. दि०२/१२/२०१८, रविवार रोजी ता.शेगाव जि.बुलढाणा येथे रेखाचित्र कर्मचारी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री.जकी अहमद जाफरी यांचे हस्ते करण्यात आले असुन महाराष्ट्र राज्य रेखाचित्र कर्मचारी संघटनेची संकेतस्थळ/Website.. www.dbmaharashtra.com ही सर्वांसाठी खुली करण्यात आली.सर्व सन्माननिय सभासदांनी या संकेत स्थळास अवश्य भेट द्यावी. संकेत स्थळात एकूण १३ विभाग दिले आहेत. एक एक विभाग ओपन करून पाहिल्यास संघटनेची सम्पुर्ण माहितीचे ज्ञान मिळते. हया संकेतस्थळाचे मेकर श्री.प्रमोद राव असुन, श्री.राजेंद्र करपे यांच्या संकल्पनेने अत्यंत कल्पकतेने तयार करण्यात आलेली आहे. संघटनेच्या इतिहासात राजपत्रित अधिकारी महासंघा नंतर संकेतस्थळ बनविणारी २ नंबरची आपली संघटना आहे व मी या संघटनेचा सभासद आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. या कार्यक्रमास सम्पुर्ण महाराष्ट्रातून १३० सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. Shri Prmod Rao is the Website maker. आपण संघटनेसाठी दिलेले योगदान हे संघटना कधीच विसरू शकणार नाही. जेंव्हा जेंव्हा वेबसाईट चे नांव येईल तेंव्हा तेंव्हा श्री राव यांचे नांव अत्यंत आदराने घेतले जाईल. पुर्वी संघटनेचे पदाधिकारी कोण, कोठे , नांव, गाव याचा थांगपत्ता लागायचा नाही मात्र आज संघटना आपल्या ह्रदयापाशी आहे एक बटण दाबताच संघटनेच्या स्थापनेपासून आज पर्यंतची सर्व अद्यावत माहीती क्षणात उपलब्ध होईल. आज दि. ०२-१२-२०१८ रोजी श्री.राजेन्द्र करपे यांचे डिजिटल संघटना करणार हे संघटनेस दिलेले आश्वासन त्यांनी साकार केले ,असुन संघटनेने डिजिटल जगात पदार्पण केल्याचा आनंद होतो. आपण सर्वांनी दर वर्षी आठवण म्हणुन दि. ०२/१२ हा दिवस संघटना संकेतस्थळ अनावरण दिवस म्हणुन साजरा करायला पाहीजे असे मला वाटते. डिजिटल संघटनेस माझ्या हार्दिक शुभेच्छा... जय संघटना!
वाय.ओ.पठाण,औबाद.
14) मा. आदिनाथ रावळ साहेब यांचे मनोगत

एका
नाविन्यपूर्ण अश्या डिजिटल युगात दमदारपणे प्रवेश करताना "संघटना म्हणजेच"
सर्वांनीच एकत्र येऊन आणि एकसंघ होताना घटनात्मक पद्धतीने एकमेकांच्या
अडचणी सोडवण्यासाठी विचारांची देवाण-घेवाण करुन "संघटनात्मक रीत्या"
उत्तुंग भरारी घेण्यासाठी टाकलेले पुढचे एक मजबूत पाऊल आहे... असेच मला
संघटनेच्या वेबसाईटबाबत मनोमन वाटते...
मित्रांनो मी जुन १९८० मध्ये
पाटबंधारे खात्यात अनुरेखक पदावर शासकीय सेवेत रुजू झालो... पुढच्याच जुलै
महिन्यात मला संघटनेचे सभासदत्व देऊन तत्कालीन माझे आरेखक यांनी संघटनेचे
महत्व आणि गरज का आहे हे सांगितले...
मित्रहो त्यावेळी एकमेकांशी
संपर्क करण्याची साधने आजच्या इतकी नव्हतीच. तरीदेखील अत्यंत तळमळीने
तेंव्हाचे पदाधिकारी आणि सभासद संघटनेचे कार्य जोमाने करत होते. आपल्या
संवर्गाचे प्रश्न आणि शासकीय सेवा करत असताना कामात येणाऱ्या अडचणी यावर
मार्ग शोधून न्याय मागण्यांसाठी एकत्र येत होते. त्यासाठी लढे उभे करुन
आत्मियतेने प्रश्नांची सोडवणूक करत होते. सर्वच सभासद या प्रवाहात संपर्का
आभावी सामिल होत नसतानाही... सर्वांसाठी जमा होईल त्या उपलब्ध लढा निधीतून
कामे केली जात होती. त्यामुळे आपल्या या संघटनेचा कार्यात्मक आलेख
अभिमानास्पद उंचावला होता. संघटना इतर संघटनांच्या मानाने एक नंबरला होती.
संघटनेच्या त्यावेळच्या अशा या निस्वार्थी आणि अभ्यासू पदाधिकारी यांचे
प्रयत्नातून आपले संवर्गास सन्माननीय वेतन आणि कार्यालयात पत मिळालेली
होती. हा एक आपल्या संवर्गासाठी संघटनेच्या माध्यमातून लाभलेला सुवर्णकाळ
होता व तो अनुभवण्याचे आणि उपभोगण्याचे भाग्य मला लाभले.
माझी
जास्तीत जास्त सेवा ग्रामीण भागात म्हणजे प्रत्यक्ष प्रकल्पाच्या (धरण
बांधकाम व कालवे बांधकाम) या ठिकाणी झाली. ज्या ज्या ठिकाणी मी कार्यरत
होतो तेथील आपले सर्व संवर्ग बंधुना एकत्र करुन संघटनेशी जोडण्याचे, त्या
ठिकाणी संवर्गातील बंधुंचे काही प्रश्न असल्यास तेही तेथेच संघटनेच्या
माध्यमातून व वेळप्रसंगी वैयक्तिकरित्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन
सोडवण्याचा एक सामान्य असा छोटासा कार्यकर्ता म्हणूनही प्रामाणिक प्रयत्न
केले.
मित्रहो...अशा या संघटनेस दुर्दैवाने कोणाची दृष्ट लागावी
तसे काही कालावधीपूर्वी झाले आणि आपण सर्वच बाबींमध्ये बॅकफुटवर गेलो याची
मनात खूप मोठी खंत आणि दुःख आहे... परंतू त्याच कालावधीत माझी सन २०११
मध्ये पुण्यात कोथरुड येथे बदली झाली. कोथरुडमधील सहकाऱ्यांना सोबत घेऊन,
शासनाने नाकारलेल्या २४ वर्षांच्या पदोन्नतीबद्दल जागृत करुन ती
मिळवण्यासाठी प्रवृत्त केले व सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील
सर्वांसाठीच तो लाभ मिळवला हीच एकमेव सुखद बाब घडवू शकलो याचे मनस्वी
समाधान आणि आनंद आहे...
बंधुंहो आज नव्याने पुन्हा एकदा धडाडीच्या
अभ्यासू आणि सर्वांना नम्रतेने आपूलकीची वागणूक देणाऱ्या, सर्वांना सामावून
घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची फौज उदयाला येत असल्याचे सुखद
चित्र पाहावयास मिळत आहे. सुसंवादाची आणि संपर्काची भरपूर साधने उपलब्ध
झालेली आहेत. त्याचा योग्य वापर करुन संघटना हितासाठी अंतर्गत वादविवाद
बाजूला ठेवून व विरोधासाठी विरोध करणे कटाक्षाने टाळून राजकारण विरहीत
सर्वांनी सर्वांसाठी कार्य करण्याची खरी गरज आहे. त्यातच सर्वांचे सुख
सामावलेले आहे....आणि यामुळेच संघटनेची वेबसाईट तयार होणे ही बाब एक
महत्वपूर्ण टाकलेले पाऊल आहे असेच मला वाटते... मी सर्वार्थाने त्याचे
स्वागत तर करतोच पण त्याबद्दल ज्यांनी त्यासाठी कष्ट घेतलेत त्यांनाही
मनापासून धन्यवाद देतो...
💐🤝💐🤝💐🤝💐🤝💐
आदिनाथ द.रावळ, आरे.श्रे.१,
कोथरुड, पुणे-३८
15) मा. विवेक ठकार यांचे मनोगत
सस्नेह नमस्कार ..
मी
आपल्या संघटनेचा जवळजवळ २५ वर्षे सक्रिय कार्यकर्ता व दहा वर्षे प्रदेश
पदाधिकारी म्हणून कार्यरत होतो .सन २०१५ मध्ये आरेखक श्रेणी १ या पदावरून
सेवानिवृत्त झालो.जलसंपदा विभाग पुणे.येथून .
श्री रावसाहेब कोरे व श्री
वाल्मिक दारूणकर यांच्या अध्यक्ष पदाच्या कालावधीत मी कोषाध्यक्ष म्हणून
काम केलेले आहे.सन २००७ मध्ये पुण्यात झालेल्या अधिवेशनाची जबाबदारी
माझ्याकडे होती .व सघटनेचे हे अधिवेशन आपल्या संघटनेच्या इतिहासातील सुवर्ण
क्षण होता असे वाटते .याबाबत दारूणकर सविस्तर सांगतीलच.आपण संघटनेच्या
वेबसाईटचे नियोजन करित आहात .आनंद वाटला.संघटनेच्या यशाबद्दल मला सततच
खात्री आहे.कारण आपण सर्व प्रामाणिक कार्यकर्ते आहोत .संघटनेच्या
भविष्यकाळातील वाटचालीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा .
माझी काही मदत लागल्यास अवश्य सांगणे...स्नेहांकित ,विवेक ठकार.पुणे.
16) वेबसाईट संघटक प्रमोद राव यांचे मनोगत:
मा.अध्यक्ष महोदय
तसेच आदरणीय सर्व पदाधिकारी यांना विनम्र अभिवादन, रेखाचित्र शाखेचे संकेतस्थळ
असावे असा मा.अध्यक्ष महोदय जाफरी साहेबांचा मानस होता. मा. आर.डी.करपे साहेब
यांनी संकल्पना मांडली वेबसाइट कशा स्वरूपाची असावी याचे Design, Drawing,
Blueprint करपे साहेबांच्या कल्पनेत होते, फक्त त्यांना तांत्रिक सहाय्यकाची गरज
होती. करपे साहेब पुढील वर्षी ३१ मे २०१९ रोजी सेवानिवृत्त होत आहे, व मला
D.M.Grade 1 या पदावर रुजू होऊन नुकतेच ०४ वर्ष झाले आहेत. तर अशाप्रकारे वेबपेज
निर्मितीसाठी अनुभवी व युवा खेळाडू अशी जोडी कर्णधार मा.जाफरी साहेब यांच्या
मार्गदर्शनाखाली जमली. करपे साहेबांनी आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर आवाहन केले व
राज्याच्या कानाकोपऱ्यातून माहिती आम्हाला प्राप्त झाली.
वेबपेज सर्व माहिती
एकत्रित स्वरूपात दिलेली आहे. व ती सर्वाना सहजपणे उपलब्ध होत आहे. व्हाट्सअप वर
माहितीचे आदानप्रदान होते मात्र काळाच्या ओघात ते कुठंतरी मेमरी कार्ड, इंटर्नल
मेमरी, पेन ड्राईव्ह यात हरवलं जात, चुकून डिलिट होत. Hi Friend, Unfortunately I
had lost my data, please send again.या अडचणीतून आपली सुटका होणार आहे. यासाठी
सर्वाना विनंती की आपला जिल्हा, परिमंडळ मध्ये रेखाचित्र शाखा संबधी जी उपयुक्त
माहिती मिळेल ती मला 9420747685 या क्रं. व्हाट्सअप करा. राज्यात सर्वांसाठी
उपयोगी ठरेल अशी सर्व माहिती वेबसाईट वर नक्कीच टाकू. Thank you so much!